मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या आधीच हिंसाचार घटना घडत असून आतापर्यंत विविध ठिकाणी २६ जण ठार झाले आहेत. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस, माकप- डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, पंचायत निवडणुका सुरु होण्याआधीच सात जणांचा मृत्यु झाला होता. तसेच, अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Read More