आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
Read More
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीने उद्धव ठाकरेंना दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७ साली प्रभाग आरक्षण लागू केल्यानंतर, पुढील १० वर्षे ते कायम ठेवण्याचा ठराव मुंबई पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्याचा आधार घेत येत्या निवडणुकीतही हाच नियम लागू करण्याबाबत महायुतीने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
(Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर पार पडली.
मुंबईतील छोट्या-मोठ्या नाल्यांमधील तुंबलेला गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य वाहिन्या विभागाने बाह्या सरसावल्या आहेत.
मुंबईत खालावत जाणारी मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या यावर कुठलाही ठोस आणि परिणामकारक तोडगा न काढता इतर खर्चिक गोष्टींना प्राधान्याने हाती घेण्याचे उद्योग मागील २० ते २५ वर्षांपासून सुरु आहेत. दादर, सायन, शिवडीत राहाणारा मूळ मुंबईकर मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर फेकला गेला याकडेही सोयीस्कररीत्या डोळेझाक करण्यात सेनेने धन्यता मानली. पालिकेच्या प्रस्तावित निवडणुकांच्या तोंडावर शहरात स्थानिक नागरिकांची मते लक्षात न घेता उर्दू भाषा केंद्राची उभारणी केली जात असेल, तर या प्रकाराला ‘भाषेच्या आडून ध्रुवीकरणा
काही आठवड्यांपूर्वी महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या, ज्यावरून बराच गदारोळ उडाला होता. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, रस्तेदुरुस्ती प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या कंत्राटदारांना ‘पावन’ करून घेण्यासाठी राज्यातील एका मंत्र्याच्या मावस भावाने कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला आहे.