परीक्षेसह वर्ग, वह्या, पुस्तके अशा गोष्टी कायमच्याच काढून टाकल्या तरी उत्तम! तेवढाच सरकारी तिजोरीवरचा खर्चही कमी करता येईल ना? शिवाय त्यात राज्यपाल वगैरेंची कटकटही परस्पर संपून जाईल. मागील काही दिवस हा परीक्षांचा वाद खूप रंगला आहे, म्हणून त्याविषयी ऊहापोह करणे भाग आहे.
Read More
छोटीशी बचत भांडवली नफा मिळवून देण्यासाठी कुठे गुंतवावी? जोखीम घेण्याची तयारी तर आहे पण कुठले क्षेत्र गुंतवणूकीसाठी सुरक्षित असेल? असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर आपल्या आजूबाजूला बघायला शिका. अर्थव्यवस्थेची स्थिती कुठलीही असू देत पण खाद्यपदार्थ, मनोरंजन, शिक्षण आणि आरोग्य निगा ही क्षेत्रे कधीही थांबत नाहीत. तुम्ही कधी मंदी आहे म्हणून लोकांनी खाणे-पिणे बंद केले, असे ऐकले आहे का? शैक्षणिक कर्ज घेऊन देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ आहे कि घट याचा कानोसा घेतला आहे का? गेल्या
अभ्यास वा आकडेवारी ही अंधश्रद्धा असल्याप्रमाणे काम करू लागते आणि सामान्य जनता मतदार त्यांच्यापासून चार हात दूर होतो. कारण, त्यांनी कथन केलेले सत्य असले तरी ते सामान्य जनतेच्या नित्य जीवनातील वास्तव नसते आणि म्हणूनच लोक त्यांच्यापासून अलिप्त होत जातात. त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून राजकारण करणारेही मग अंधश्रद्ध असल्यासारखे एकाकी पडत जातात, फसत जातात.
केवळ आर्थिक वृद्धी आणि विकासाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) आकड्यांद्वारे विश्लेषण करून दारिद्र्यासारखा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी जे- पाल या संस्थेने सुचविलेले विविध उपाय लक्षात घेऊन आर्थिक धोरणही तसे राबवावे लागेल. जागतिक दारिद्र्याच्या ग्लोबल समस्येवर लोकल उत्तरे शोधावी लागतील. असो, एका भारतीयांस हा सन्मान मिळाला याचा आनंद आहेच परंतु मराठी वाचकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांचा मातोश्री निर्मला बॅनर्जी पूर्वाश्रमीच्या निर्मला पाटणकर या अस्सल मुंबईकर.
जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ इस्टर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.