जगातील क्रमांक एक ची आर्थिक महासत्ता आणि त्यामागोमाग क्रमांक दोनवर असलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट आणि बैठक हा साहजिकच वैश्विक चर्चेचा विषय. त्यातच जेव्हा या दोन्ही देशांतून विस्तवही जात नाही, तेव्हा ही भेट जगाच्या केंद्रस्थानी येणे साहजिकच. असे हे दोन देश म्हणजे अमेरिका आणि चीन. जो बायडन आणि शि जिनपिंग यांची अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे ‘एशिया-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन’ (एपीईसी)च्या निमित्ताने भेट झाली. या सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्येही चर्चा वगैरेही झाल
Read More