मुंबईच्या बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील एसी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात आणखी २५० सिंगल डेकर एसी बस ताफ्यात दाखल करणार आहे. त्यासाठी २७ सप्टेंबर पासून निविदा जारी केली जाणार आहे. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. या उपक्रमासाठी बेस्टला १ हजार ३२३ कोटी रुपयांहून अधिक खर्च मोजावा लागणार आहे.
Read More
नवी मुंबई महानगरपालिकेकडून एसी बससेवा नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना अवघ्या ५ रुपयांत गारेगार प्रवास करता येणार आहे. दरम्यान, ही बससेवा पहिल्या टप्प्यात वाशी ते कोपरखैरणे यादरम्यान चालविण्यात येणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर पालिकेकडून एसी बससेवेचा विस्तार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या यानिर्णयामुळे बेस्टच्या धर्तीवर नवी मुंबईकरांना बससेवा उपलब्ध होणार आहे.
आगामी काही वर्षांत 'बेस्ट' पूर्णपणे इंधनमुक्त करून इलेक्ट्रिकवर चालवण्याचाही 'बेस्ट'चा मानस आहेच. पण, सामान्य तिकीट दरापेक्षा प्रवाशांकडून एक रुपये जादा आकारून धावणाऱ्या या 'एसी' बसेसमधील 'एसी' यंत्रणेची मात्र सध्या दुरवस्था झाली आहे. खासकरून 'बेस्ट'च्या 'ट्रॅव्हेलर' प्रकारातील 'मिडी' बसेसमधील प्रवाशांच्या डोक्यावरील एसी नियंत्रित करणारा 'नॉब'च मुळात सदोष बांधणीचा!