तुम्हारे सियासत के कारनामे कहाँ नहीं थे? गंदे पानी में, शराब की बोतलो में, दिल्ली दंगल रोहिंग्या के आगमन में और दुषित हवाओ में। काय म्हणता, माझ्या कारकिर्दीमध्ये हे सगळे घडले? असू दे बदनाम हुआ तो क्या हुआ? नाम तो हुआ!! आता काय दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता माझ्या या कारनाम्यांचा समाचार घेणार का? कधी कधी वाटतं, ‘हवा भी शामिल हैं उनके साजिश में।’ हो, त्याशिवाय का माझी दिल्लीतली सत्ता गेल्या गेल्या दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारली. मी असेपर्यंत तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण होते. मी गे
Read More
AAP government पंजाबमधील शेतकरी प्रतिनिधींच्या गेल्या आठवड्यात छावण्या पाडण्यात आल्या असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता पोलिस आणि पंजाब आप सरकारवर सामानाची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रमुख निदर्शके जगजीत सिंग दलेवाल यांचे उपोषण रविवारी ११८ व्या दिवशीही सुरू होते. ट्रॅक्टर, ट्रेलर, अगदी रेफ्रिजरेटर, एसी, इन्व्हर्टर, पलंग आणि गॅस सिलिंडर - पोलिसांच्या निगराणीखाली असलेले सर्व काही आता आप आमदारांच्या समर्थकांच्या घरात सापडले असल्याचा आरोप बीकेयूचे सचिव असलेले सचिव गुरदीप सिंग चहल यांनी केला आहे.
( Organizational Change in Aap party ) आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत अनेक मोठ्या नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्षाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. तर, गोपाळ राय यांना गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) पंजाबमधील पक्षसंघटनेमध्ये असलेल्या असंतोषाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली.
नवी दिल्ली : “देशातील नागरिकांचे जीवन सुखकर करणे, हेच केंद्र सरकारचे ध्येय आहे. त्यामुळेच मी सत्तेचा वापर चार कोटी नागरिकांना घरे बांधून देण्यासाठी केला, स्वतःसाठी ‘शीशमहाल’ बांधण्यासाठी नव्हे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारवर नाव न घेता केला आहे.
नवी दिल्ली : भाजपने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारविरोधात ‘आरोपपत्र’ जारी केले. भाजपने भ्रष्टाचार आणि यमुना प्रदूषणासह ( AQI ) अनेक मुद्द्यांवरून ‘आप’ला लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीला सध्या प्रदूषणाने ( Delhi Pollution ) वेढले आहे. राजधानीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या उत्तरांवर समाधानी नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
(Delhi Air Quality Index ) दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक (एक्यूआय) ४३० इतका नोंदवला गेला. ही पातळी आरोग्यासाठी हानिकारक आहे. दिल्लीतील अनेक भागात एक्यूआय ४०० च्या पुढे आहे. फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा आणि नोएडा येथेही वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत राहिले.
दिल्ली सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी विनंती दिल्लीतील भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. राष्ट्रपती भवनाने संबंधित पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवले आहे.
स्वामी मालीवाल प्रकरणी माध्यमांनी प्रश्न विचारताच, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत केजरीवालांनी त्यावर बोलणेच टाळले. पण, त्यांचे मद्यघोटाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही त्यावर हेच केजरीवाल चक्क मतदारांची दिशाभूल करताना दिसले. म्हणूनच केजरीवाल नामक ढोंग्याचा हा ढोंगीपणा मतदारांच्याही नजरेतून सुटला नसून, मतपेटीतून त्याचे त्यांना उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही, हेच खरे!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून अटक करण्यात आली. दरम्यान, केजरीवाल ईडी कोठडीतून सरकार चालवित असून आता त्यांच्या पत्नी सुनीता यांनी मद्य घोटाळाबाबत वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा कुठे गेला याबाबत केजरीवाल दि. २८ मार्च रोजी खुलासा करतील.
'ईडी’चा फेरा चुकविण्यासाठी अरविंद केजरीवालांचे विपश्यना, ध्यानधारणा, चौकशीला दांड्या असं सगळं करून झालं; मात्र ‘ईडी’चा ससेमिरा काही सुटलेला नाही. आता त्यांनी काँग्रेसला दणका देत, पंजाब तसेच चंदीगढ लोकसभेच्या सर्व जागा एकट्याने लढण्याचे जाहीर केले.
वक्फ मंडळाच्या जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपाप्रकरण सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी आम आदमी पक्षाचे (आप) दिल्लीतील आमदार अमानतुल्लाह खान यांच्या निवासस्थानी छापेमारी केली.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे सत्ता मिळवण्यासाठी रेवडी संस्कृती रुजवली. केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रत्यक्षात किती आली, हा वेगळाच प्रश्न आहे. तथापि, या रेवडी संस्कृतीला बळी पडली, ती दिल्लीतील सामान्य जनता. अनधिकृत बांधकामे तसेच यमुनेची न झालेली स्वच्छता यामुळे दिल्लीवर पूर परिस्थिती ओढवली. जनता यातून बोध केव्हा घेणार, हाच प्रश्न आहे.