बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या ‘विशेष सघन पुनरावृत्ती’ (Special Intensive Revision) प्रक्रियेत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, असा महत्त्वपूर्ण संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या निवडणुकीत आधार ओळखपत्र वगळण्याच्या निर्णयाबाबत उत्तर देण्याचे निर्देश गुरुवार दि. १० जुलै रोजी भारतीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी 'केवायसी' (ओळख पडताळणी) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी चार पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली पश्चिम माजी मंडल अध्यक्ष समीर चिटणीस यांच्या वतीने उद्या सोमवार दि. २३ जून ते बुधवार दि. २५ जून या कालावधीत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील अंबिका नगर भागातील चिटणीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर चालणार आहे.
भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्ड केवायसी साठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. पुढच्या काही तासांत ही मुदत संपणार आहे. ज्या रेशनकार्ड धारकांनी अद्याप केवायसी केली नसेल तर त्यांच्यासाठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना रेशनच्या दुकानात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ई-केवायसीसाठी आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.
Sudhir Salvi पक्षांतर्गत नियोजन शून्य, पण चमकोगिरी अधिक करणाऱ्या माजी खा. विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचे पंख छाटण्यात आले आहेत. ‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती करीत, प्रस्तापितांना सूचक इशारा देण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ घालण्यात आली आहे.
New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.
(Disha Salian Case) दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियान यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आधीच्या एसआयटीला चौकशीदरम्यान हा डेटा मिळाला होता. या डेटामुळे, दिशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागे तिच्या वडिलांशी झालेला वाद कारणीभूत होता का, या दिशेने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
तुम्हारे सियासत के कारनामे कहाँ नहीं थे? गंदे पानी में, शराब की बोतलो में, दिल्ली दंगल रोहिंग्या के आगमन में और दुषित हवाओ में। काय म्हणता, माझ्या कारकिर्दीमध्ये हे सगळे घडले? असू दे बदनाम हुआ तो क्या हुआ? नाम तो हुआ!! आता काय दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता माझ्या या कारनाम्यांचा समाचार घेणार का? कधी कधी वाटतं, ‘हवा भी शामिल हैं उनके साजिश में।’ हो, त्याशिवाय का माझी दिल्लीतली सत्ता गेल्या गेल्या दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारली. मी असेपर्यंत तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण होते. मी गे
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
(Disha Salian Case) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian)आणि त्यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
( Disha Salian Case) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेऊन दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
Fake Aadhaar update उत्तर प्रदेशातील मुरादाबादेतील बिलानी नगरमध्चे अवैधपणे सुरू असणाऱ्या एका आधारकार्ड केंद्रात परवान्याशिवाय आधारकार्ड अपडेट केले जात होते. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आहे. बनावट आधारकार्ड केंद्र सील करण्यात आले. .या संदर्भात, पोलिसांनी ऑपरेटरविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे, त्याला अटकही करण्यात आली आहे आणि संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे, ही घटना साहू कुंजमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
(Manisha Kayande on Aaditya Thackeray) स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामरा प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आहेत. दरम्यान, कुणाल कामरावर कारवाई होणार असल्याने विरोधकांनीही याप्रकरणी कुणाल कामराची पाठराखण करत आक्रमक भूमिका घेतली. उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामराची पाठराखण केल्यानंतर शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या डॅा. मनीषा कायंदे यांनी त्यांच्
( Election ID card and Aadhaar will be linked ) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रमुख अधिकारी आणि तांत्रिक तज्ञांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 'आप'ला पाणी पाजत कमळ फुलले. त्यामुळे आता आपच्या उतरत्या कळेला प्रारंभ झाला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. अशातच आता मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आले आहे. गेली काही महिने वीज बिल भरले नसल्याने आता आप च्या कार्यलयाला कुलूप लावण्यात आले आहे.
माहितीचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य आधारसामग्री’ धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. डेटा ही आजच्या काळातील सर्वांत मौल्यवान संपत्ती असल्याचे मानले जाते. या माहितीचा योग्य पद्धतीने वापर केला, तर त्याचा जनतेला मोठा फायदा होणार आहे.
AAP पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अशातच पंजाबमध्ये एका आपच्या नेत्याला कोणतेही मंत्र्याचे खाते दिले नाही. मात्र, ते सुधारणा विभागाचे मंत्री म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे नाव कुलदीप धीलवाल असून संबंधित प्रकरणाची माहिती चव्हाट्यावर आली आहे. याचपार्श्वभूमीवर पंजाब सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एका अधिकाऱ्याने एक पोस्ट शेअर केली होती. या आदेशानुसार, त्यांनी लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि सेवादारांशी सबंधित होता. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाशी
CAG report दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीत भाजपचं कमळ फुललं आहे. यानंतर आता दि : २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मंगळवारी कॅग अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात मद्य धोरणामुळे २ हजार २६ कोटींहून अधिक महसूलात तोटा निर्माण झाला आहे. दिल्लीतील जनतेच्या आरोग्याशीही या धोरणामुळे तोटा निर्माण झाला. या अहवालात केवळ मद्य धोरणातील अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन उघड करण्यात आले नाही तर दिल्ली परिवहन महामंडळासह इतरही क्षेत्रातील मोठ्या अर्थिक अनियमिततेकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
Arvind Kejriwal आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभेत पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशातच शीशमहालच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली असल्याचे आदेश १३ जानेवारी रोजी देण्यात आली.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही, हे तसे सर्वश्रूत. यापूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला होताच. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा घाट घालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी या संघर्षाची ठिणगी पडून, प. बंगालमध्ये राजकीय खेला रंगलेला दिसेल.
Arvind Kejriwal नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आपला पराभवाचा फटका बसला आहे. गेली दोन टर्म आपने दिल्लीत सत्ता मिळवली होती. मात्र आता दिल्लीकरांनी केजरीवालांच्या कामावर नाराजी दर्शवत भाजपला भरघोस मतदान करत भाजपला सत्तेवर बसण्याची संधी दिली. मात्र आता आम आदमी पक्ष हा एक्स हँडेल सोडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुखातून संजय राऊतांची भाषा बाहेर पडू लागली आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जेथे जाईल, तेथे पोखरायला सुरुवात करतो,” असे निर्लज्ज विधान त्यांनी नुकतेच केले. राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर सातत्यपूर्ण पराभवामुळे आलेल्या राजकीय वैफल्यातून त्यांनी हे विधान केले असावे. पण, आपण कोणाविषयी बोलतो आहोत, याचे भान ठाकरेंनी बाळगायलाच हवे.
Aam Aadmi Party दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या शोधात दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. त्यावेळी पोलीसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. अमानतुल्लाहने तो स्वत: दिल्लीत असल्याचा दावा केला.
दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून तब्बल २६ वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच दिल्लीच्या निवडणूकीचे पुढे येत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे कृपया मला फोन करू नका, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झाला. निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजप २७ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आलाय आम आदमी पक्षाची अवस्था फारच बिकट होणार असल्याचा कल दिसून आला. दरम्यान, २०१३ पासून सातत्याने आपले वर्चस्व असलेल्या मुस्लिमबहुल भागातही आम आदमी पक्षाला मते मिळाली नसल्याचे सांगण्यात येतं. यामागील काही कारणे आता समोर आलेली आहेत.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे अडकणार?
Chief Minister Atishi दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले आहेत. काही तासानंतर मतदार आपल्या लोकशाहीचा अधिकार बजावणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असताना मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीमध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या कालकाजीमध्ये ३ फेब्रुवारी २०२५ रोजी बराच वेळ गोंधळ उडाला. अखेर गोविंदपुरी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi Vidhansabha 2025 वाल्मिक समाज आणि वंचित महापंचायतच्या सदस्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Vidhansabha 2025) पार्श्वभूमीवर आपविरोधात आंदोलन केले आहे. या निदर्शनादरम्यान, दिल्लीतील लेडी हार्डिंग हॉस्पिटलजवळून जात असलेल्या आपच्या निवडणूक प्रचार करणाऱ्या वाहनाची आंदोलकांनी तोडफोड आंदोलकांनी तोडफोड केली.
Delhi Assembly election दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
Arvind Kejriwal हरियाणातील यमुना नदीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला. हरियाणा भाजपने हे सर्व कृत्य केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. याचपार्श्वभूमीवर आता हरियाणा न्यायालयाने केजरीवाल यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणा सरकारने दाखल केलेल्या एका प्रकरणाबाबत हा आदेश देण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभेत ‘आप’चा पराभव होण्याचे स्पष्ट संकेत मिळताच, केजरीवाल यांनी भाजपवर बिनबुडाच्या आरोपांचा झपाटाच लावलेला दिसतो. याच केजरीवाल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलन करत, रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यावेळीही ते अराजकतावादी होते आणि आजही तीच गत!
वनवासी पाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जीवन आधार संस्था’ कार्यरत आहे. या संस्थेने दोन वनवासी पाडे दत्तक घेतले आहेत. तसेच, डोंबिवली शहरातील एक शाळा दत्तक घेतली आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
Delhi Assembly Election 2025 आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये गलगितुरा रंगला आहे. काही दिवसांआधी भाजपचे आपले आश्वासनपर पत्र जारी केले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही पत्रक जारी केले. त्या पत्रकामध्ये त्यांनी यमुना नदी साफ करण्याचे आश्वासन दिले. हे अश्वासन याआधी अनेकदा दिले होते. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा भाजप सरकारच पाण्यात विष मिसळत असल्याने नदीचे पात्र साफ होत नसल्याचा निरर्थक तर्क लावला आहे.
नवी दिल्ली : हरियाणाने दिल्लीत वाहत येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा अतिशय दुर्दैवी आहे. आम आदमीं पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली असून पराभवाच्या भितीने ते असे आरोप करत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi about AAP ) यांनी बुधवारी केला आहे.
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
Amit Shah दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचे ठराव पत्र ३.० जारी केले आहे. यावेळी त्यांनी ठरावपत्राबाबत भाष्य केले. ठराव हा एक विश्वास आहे. आमची पोकळ आश्वासने नाहीत. १ लाख ८ हजार लोक आणि ६ हजार गटांच्या सूचनांवर हे ठराव पत्र तयार करण्यात आले. यानंतर आता अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. नंतर आपण निष्पाप असल्याचे
दिल्ली विधानसभेसाठीच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच इंडी आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा आणि दिल्ली काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षाच्या मद्य घोटाळ्याची पोलखोल केली आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी एक ध्वनिफित ऐकवली, ज्यामध्ये आम आदमी पक्षाचे नेते आमदार शरद चौहान याच मद्य घोटाळ्याच्या संर्दभात भाष्य करीत आहेत.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर 'इंडी' आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काँग्रसेचे वरिष्ठनेते संदीप दीक्षित यांनी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी दिवाणी आणि फौजदारी मानहानीचे खटले दाखल केले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी २६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत दीक्षित यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी आम आदमी पक्षाचा पराभव करण्यासाठी भाजपकडून कोट्यावधी रूपये घेतले आहेत. दीक्षित यांनी हा आरोप फेटाळत आम आदमी पक्ष
Arvind Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य घोटाळ्याशी निगडीत मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदियावर मद्य घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लाँड्रिंगमध्ये सहभागाबद्दल प्रतिबंधक कायद्यांतर्गत अंतर्गत खटला चालवण्याची अंमलबजावणी केली आहे. याप्रकरणाचा हवाला एका वृत्तसंस्थेने बुधवारी दिला आहे.
दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सगळ्याच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसल्याचे बघायाला मिळतं आहे. अशातच आता निवडणुकीच्या प्रचारामुळे एकतेचा बनाव करणाऱ्या इंडी आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासहीत विविध पक्षांनी काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व सोडावे असा प्रस्ताव घटक पक्षातील नेत्यांच्या समोर ठेवला आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत असे म्हटले की राहुल गांधी हे काँग्रेस वाचवण्यासाठी लढत आहेत, पण मी दिल्ली वाचवण्यासाठी लढतो
delhi vidhansabha कोणता पक्ष विजयी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या तीन पायांच्या शर्यतीत सध्या जरी, आम आदमी पक्ष पुढे दिसत असला, तरी आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक जिंकणे ही अशक्यप्राय गोष्ट ठरणार आहे. ‘आप’ची जागा भाजप घेईल की काँग्रेस, इतकाच आता प्रश्न आहे.
आम आदमी पक्षाचे ( AAP ) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील झोपडपट्टीवासीयांवरील गत दहा वर्षांतील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित करत, अन्यथा “मी निवडणूकच लढवणार नाही,” असे विधान केले आहे. निवडणूक जवळ आली की, नवे मुद्दे काढणे, स्वतःला पीडित दाखवून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नौटंकी करणे, हे केजरीवाल यांचे नेहमीचे राजकारण झाले आहे, त्यात नावीन्य असे काहीच नाही. केजरीवाल यांना आलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुळक्यामागचे राजकीय गणित समजून घेणेही गरजेचे आहे. दिल्लीमधील झोपडपट्टी हा एक मोठा मतपेटीचा
आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीमध्ये सत्तेत असताना हाउसिंग स्कीमच्या माध्यमातून त्यांनी झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून लाखो रूपये उकळले. त्यांना राहायाला पक्कं घर मिळेल असं खोटं आश्वासन दिलं. परंतु आपच्या नेत्यांनी या गरिबांना फसवलं असून त्यांचे पैसे लुबाडले असा आरोप भाजपनेते पर्वेश वर्मा यांनी केला आहे. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलताना पर्वेश वर्मा यांनी दिल्लचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहालचा घोटाळा समोर आल्यानंतर, अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे समोर येत आहेत. कॅगच्या अहवालानुसार दिल्ली सरकारच्या कथित मद्द घोटाळ्यामुळे सरकारच्या २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. या मद्द घोटाळ्यामुळे आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरूंगवास भोगावा लागला. खुद्द अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सदर धोरण ज्यावेळेस न्यायालयीन अडचणींमध्ये सापडले, त्यावेळेस रद्द करण्यात आले.
Bangladeshi दिल्लीमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच आता दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार महेंद्र गोयल यांच्याविरोधात नोटीस जारी केली असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात आली. अवैध बांगलादेशी नागरिकांच्या कागदपत्रांशी संबंधित प्रकरण असून आमदार महेंद्र गोयल यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.