डीएमकेचे खासदार ए. राजा यांच्या मालकीची १५ हून अधिक स्थावर बेनामी संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मंगळवार १० ऑक्टोबर रोजी ईडीने ही माहिती दिली आहे. ईडीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, 'बेनामी' कंपनी कोवई शेल्टर्स प्रमोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर नोंदणीकृत आणि द्रमुक नेते ए. राजा यांच्याशी संबंधित असलेल्या या १५ स्थावर मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत.
Read More
देशातील जे प्रादेशिक पक्ष भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर तपास यंत्रणा कारवाई करणारच. जे जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, ते ते सर्व तुरुंगात जातील; अशा शब्दात भाजपने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविषयी विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.