मुंबई : हवामानबदलाशी ( Climate Change ) झगडण्याकरिता चांगल्या उपाययोजना करणार्या ६५ देशांच्या यादीत भारताला दहाव्या स्थानावर नामांकित करण्यात आले आहे. जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्कने प्रकाशित केलेल्या ’क्लायमेट चेंज पर्फोमन्स इन्डेक्स’ या अहवालात भारताला दहावे स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दहा क्रमाकांमध्ये ’जी-२०’ देशांमधील केवळ भारत आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. याच अहवालात भारत गेल्यावर्षी सातव्या क्रमांकावर होता.
Read More
टेटवली गावच्या नमिता भुरकुड, गीतांजली भुरकुड, अंजली फडवले, निकिता भुरकुड, अलका मेढा आणि जागृती फडवले या सहा महिला नुकत्याच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर पाड्यातील वंचित आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याचे सोने करणार्या केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या परिसस्पर्शाचेही मनोमन अभिनंदन. दहावी उत्तीर्ण होणार्या या भगिनींच्या यशाच्या पार्श्वभूमीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा (10th result) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आपला निकाल पाहता येणार आहे.
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाची (10th result) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल.
अॅप्पलनं आपल्या 10th जनरेशन आयपॅडच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीनं ह्या टॅबलेटची किंमत थेट ५००० रुपयांनी कमी केली आहे. नवीन आयपॅड वाय-फाय मॉडेल ३९,९०० रुपयांमध्ये विकत घेता येईल. फेस्टिवल सेलमध्ये ४००० रुपयांचा कॅशबॅकही मिळेल. हा टॅबलेट अॅप्पल स्टोर आणि पार्टनर स्टोरवरून विकत घेता येईल.
दहावी-बारावीच्या परिक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षामध्ये परीक्षा केंद्रांवर १० मिनिटे उशीर झाला तर तो ग्राह्य धरला जात होता. मात्र, आता जर उशीर झाला तर केंद्रात प्रवेश न देण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत. त्यामुळे वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. उशीर झाल्यास त्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.
डोंबिवलीतील पीएनटी कॉलनीतील होली एजंल्स या शाळेतील दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या विद्यार्थिनीने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत 99. 60 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच ती सीबीएसई बोर्डाची देखील टॉपर ठरली असल्याची माहिती शाळेचे संचालक ओमन डेव्हीड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र बोर्ड) एसएससी बोर्डाचा निकाल शुक्रवारी १७ जून रोजी जाहीर झाला.
ठाणे जिल्ह्यात बारावीपाठोपाठ दहावीतही सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहेत. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
सीबीएससी बोर्ड परीक्षांच्या संदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या बैठकीत याबद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून १० वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएससी १२ वीच्या वर्गाबद्दल १ जून रोजी परिस्थिती पाहून आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळणे बंधनकारक
जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर फुटला मराठीचा पेपर
महाराष्ट्राचे शालेय क्रीडा ,शिक्षण व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या कॅराव्हॅनचा लोकार्पण सोहळा आज मुंबईत पार पडला. ही व्हॅन प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना डिजिटल माध्यमातून अभ्यासक्रमाचे धडे देणार आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या १७ जुलैपासून घेण्यात येणार असल्याची माहीती राज्य शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यभरात एस.एस.एस बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इ.१० वी च्या प्रथम बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये घवघवीत यश संपादित केले. विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.
Jalgaon, Shanbag School, 10th Result, विशाखा कुलकर्णी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास मंदिर या सावखेडा, जळगाव येथील कर्णबधीर विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सीबीएसईच्या http://cbseresults.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी आज याविषयी आपल्या सोशल मिडीयावरून घोषणा केली आहे.
सी.बी.एस.ई. १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.
आज सकाळी १०.३० वाजल्यापासून परीक्षेला सुरुवात झाली आहे.