महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने घाटकोपर येथील मेसर्स खुशी ट्रेडिंग या दुकानाविरोधात एक्सपायरी झालेल्या अन्न उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात पुनर्पॅकेजिंग व पुनर्विक्री केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
Read More
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते गुरुवारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पोहोचले.
ठाणे : “लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता व्होट जिहाद... यामागे प्रचंड मोठी विदेशी ताकद आहे. तेव्हा, सकल हिंदू समाजाने एकत्र व्हायला हवे. या ‘व्होट जिहाद’ला उत्तर ‘व्होट महादेव’ने द्यावे लागेल,” असे परखड मत ज्येष्ठ संपादक, राजकीय-सामाजिक विश्लेषक, व्याख्याते, डॉ. उदय निरगुडकर ( Uday Nirgudkar ) यांनी व्यक्त करून या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर २:साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्रेक्षकांनी धर्मवीर १ ला जितका प्रतिसाद दिला तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रेम धर्मवीर २ ला मिळालं. चित्रपटगृहात उत्तुंग कामगिरी केल्यानंतर प्रसाद ओक, क्षितीज दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रसाद ओक याने फेसबूकवर पोस्ट करून ‘धर्मवीर २’ ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हि
प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर १'च्या यशानंतर नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनाही दुसऱ्याही भागाला उत्तुंग प्रतिसाद दिला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत तुफान कमाई केली आहे. प्रसाद ओक यांची प्रमुख भूमिका असणारा 'धर्मवीर २'चे सर्व शो हाऊसफूल होत आहेत.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट नुकताच मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित-लिखित या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यात अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत तर अभिनेता क्षितिज दाते माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्
७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात मराठी चित्रपटाने विशेष बाजी मारली असून मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. याच निमित्ताने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट दोन लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मिळवलेल्या यशानंतर आता पुढचा भाग अर्थात धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रविण तरडे दिग्दर्शित, लिखित या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांची असून अभिनेता प्रसाद ओक यांन
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर १ : मुक्कास पोस्ट ठाणे या चित्रपटानंतर आता दुसरा भाग धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ९ ऑगस्ट रोजी देशभरात मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यावेळी चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीज दाते याने पहिल्यांदा प्रसाद ओक यांना आनंद दिघेंच्या वेशात पाहिल्यावरचा अनुभव सांगितला आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिर्झापूर ३ कधी येणार याची उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वीच कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता. पण आता ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून एका कोड्यातून ती प्रेक्षकांनीच ओळखावी अशी वेगळी शक्कल लढवण्यात आली आहे.
मोतीबाग संघ कार्यालयाच्या वास्तूत ‘समरसता मंचा’चे सर्व महत्त्वाचे निर्णय झाले. सेवाकार्य करणार्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, सामाजिक परिषदा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील अभ्यासवर्ग, पहिली समरसता यात्रा, सामाजिक समरसता पुरस्कार, समरसतेचे पंचक करण्याचा निर्णय, असे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झाले. म्हणून मोतीबाग कार्यालयाला ‘समरसता विचारांची जन्मभूमी’ असे म्हटले पाहिजे.
मोतीबाग हे नुसते कार्यालय नाही. मोतीबाग हे ‘संस्कार’ देणारे केंद्र आहे. वास्तू उत्तम असणे, तिथे सोयीसुविधा असणे यापेक्षाही त्या ठिकाणाहून जी निर्मिती होते आहे- संघकार्याची निर्मिती, समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती - ती अधिक महत्त्वाची आहे. भविष्यकाळात मोतीबागेच्या माध्यमातून अशाच प्रकारे काम सुरू राहील. कारण, मनुष्य निर्मितीचे आणि चारित्र्य निर्मितीचे काम ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे...
स्वच्छता हीच सेवा मोहिमे अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास एकत्र” उपक्रमात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा सक्रीय सहभाग असणार आहे.
सर्वत्र सणांचे वारे वाहू लागले असून एक वेगळचं आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. आजचा दिवस देखील तसा खास आहे. आज दहीहंडी... बाल गोपाळांचा आनंदाने बागडण्याचा दिवस म्हणजे गोपाळकाला. देशभरात हा सण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. श्री कृष्णाचाच्या जन्मानंतर देशात विविध राज्यांमध्ये दहीहंडी फोडली जाते. गोपाळकालेचे स्वरुप शहर, गाव येथे वेगळ्या रुपात अनुभवण्यास मिळते. सामान्य माणसांपासून ते आबालवृद्ध आणि कलाकारांपर्यंत सगळ्यांसाठी दहीहंडीचा दिवस हा कल्ला करण्याचा असतो. अशाच काही मराठी कलाकारांनी त्य
शविरोधी कारवाया करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप आ. नितेश राणे यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करावी आणि आवश्यकता वाटल्यास न्यायलयीन प्रक्रियेतून त्यांची नार्को टेस्टही करावी जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, अशा आशयाचे पत्र भाजप आ. नितेश राणे यांनी राज्य एटीएस प्रमुखांना लिहिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावून गोध्रा किंवा पुलवामा सारखा हल्ला केला जाऊ शकतो. असे विधान केले. त्यावर नितेश राणे यांनी आक्रमर भुमिका घेतली आहे. संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करून दंगलीची माहिती घ्या. असे म्हणत राणेंनी एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना पत्र लिहिले आहे. पत्रातुन राणेंनी संजय राऊत यांचे देशविरोधी संघटनेशी संबंध असावेत. त्यांची नार्को टेस्ट करा, जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल. अशी मागणी एटीएसकडे क
पुण्याला बालेवाडीमध्ये तीन दिवसांचे घोष शिबीर होतं. नक्की साल आठवत नाही. त्यावेळेस मी पणव वादक म्हणून भाग घेतला होता. वसई तालुक्यातून घोष शिबिरात गेलो होतो. तिथे जयंतरावांची ओळख झाली. मी जुने प्रचारक अनंतराव देवकुळे, शिवरायजी तेलंग, वसंतराव केळकर, दामू अण्णा दाते यांसारखे प्रचारक अगदी जवळून पाहिले आहेत. जयंतराव अशाच जुन्या प्रचारकांसारखे मला वाटले. त्यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी एखाद्याचे मन सहज जिंकून घेत असे.
जयंतराव आज गेले, आपल्यातून गेले... हे वाक्यच इतक्या वेदना देणारं आहे. पण, त्यांनी सुमारे दहा महिने जी झुंज दिली, तीही तितकीच क्लेशकारक होती. केवळ त्याला आशेची सावली होती इतकच! अनेक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि संघ व्यवस्थापन यांनी शर्थीचे प्रयत्न केले. खरं तर ज्यांना इतका मोठा काळ ’जयंतराव बरे होण्यासाठी प्रयत्न करणे’ हे एकच ध्येय समोर होते. त्यांना आज ही पोकळी खूपच जाणवत असेल. आता केवळ एकमेकांचं सांत्वन करणं इतकच आपल्या हातात...
भैय्याजी जोशी आणि सुहासराव हिरेमठ यांचे मनोगत जनकल्याण समितीच्या प्रयोजनाचे आणि वाटचालीचे मर्म सांगणारे. प्रस्तुत स्मरणिका जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा मागोवा घेते. मात्र, त्याचे तेवढेच महत्त्व नाही. हजारो कार्यकर्ते अशा सेवाकार्यांत स्वतःस निरपेक्षपणे झोकून देतात; आपल्या तज्ज्ञतेचे क्षेत्र नसूनही अशी सेवाकार्ये देखील संघटनेच्या आणि तळमळीच्या जोरावर साकार करून दाखवितात आणि हे सगळे करीत असताना कोणताही गाजावाजा करीत नाहीत, हा यातील सर्वाधिक लक्षणीय भाग. गेल्या ५० वर्षांत जनकल्याण समितीची सेवाक
नाशिक : मनसे नेते राज ठाकरेंना पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची बातमी समोर येत आहे. तसे पत्र दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पाठवले होते. पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. तशी चर्चा नाशकात सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दिलीप दातीर यांनी राजीनामा का दिला याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. दिलीप दातीर हे राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यानंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता दिलीप
'संयुक्त कुटुंब पद्धत’ ही भारताने जगाला दिलेली देणगी. मात्र, अलीकडच्या काळात भारतातूनच ही पद्धत हद्दपार होते की काय, असे चित्रही निर्माण झाल्याचे दिसते. वाढत असलेली वृद्धाश्रमांची संख्या आणि लहान होणारा कुटुंबाचा आकार नक्कीच चिंताजनक आहे. एकीकडे भारतात मी आणि माझे कुटुंब, त्यात नवरा, बायको आणि मुलं यांचा समावेश. म्हातारे आई-वडिलांना यात असलेले स्थान हळूहळू कमी होत असल्याने मुलं असूनही निराधार आई-वडिलांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात दाखल होणार्यांची संख्याही वाढत आहे. ही बाब भारताच्या संयुक्त कुट
दि. ३ फेब्रुवारी ते ५ फेबृवारीदार्म्यान वर्ध्यात ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष साहित्यिक व लेखक भारत सासणे यांच्या हस्ते संमेलनाच्या पूर्व संमेलनाला ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग. त्र. माडखोलकर प्रकाशन मंचाचेही उद्घाटन करण्यात आले. संध्याकाळी ठीक ५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंचावर भारत सासणे यांच्यासोबत डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते.
डोंबिवली : समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावले जावे हा बदल घडण्यासाठी अजून खूप वेळ जाणार आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांची जडणघडण करतानाच त्यांना स्त्रियांना सन्मानाने वागावले पाहिजे हे शिकविण्याची गरज आहे. समाजात बदल घडेल तेव्हा मालिकामधून सोशिक स्त्री दाखविणे बंद होईल, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी व्यक्त केले.
मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कमबॅकमुळे पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आलेल्या गृहविभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या असून यात पुणे नाशिक नवी मुंबईसह इतर काही शहरांच्या पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.
राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ,अलीकेतून अनेक वर्ष महिलाप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनिता दाते 'मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको' असे म्हणत महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. १८ एप्रिल रोजी स्वराज्याची राजधानी मानल्या जाणार्या किल्ले रायगड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पुरातत्व विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा यांच्या संयुक्ताने ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
अनिश्चितेच्या भोवऱ्यात सातत्याने सापडलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची मुहूर्तघटिका अखेर आयोजकांना सापडली आहे. साहित्य संमेलन आयोजनाच्या नव्या तारखा आणि नवे ठिकाण अखेर स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजकांनी सोमवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. हे संमेलन कोरोना संसर्गामुळे लांबणीवर टाकण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने संमेलन आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार, येत्या दि. ३, ४ आणि ५ डिसेंबर र
नाशिक येथील निखिल दाते यांच्या साहित्यसेवेच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षं पूर्ण केली. त्यानिमित्त हा विशेष लेख...
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.त्यातच नवीन पोलीस आयुक्त कोण होतील या देखील चर्चेला उधाण आले आहे.
एक महिला आणि तीही बांधकाम व्यवसायात येऊ पाहत आहे, ही संकल्पनाच बर्याच जणांना धक्का देणारी होती. स्त्रीमुळे घराला घरपण येतं. त्यामुळे घर कसे असावे, हे एका स्त्रीशिवाय आणखी कोणाला चांगले समजणार? त्यामुळेच बांधकाम व्यवसायात आपले स्थान निर्माण केलेल्या ज्योती श्रीपाद दाते या ग्राहकांची नेमकी गरज ओळखून घर कसे असावे, याची आखणी करतात. त्यातूनच प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर मिळणे सोपे झाले. स्वप्नातील घर प्रत्यक्षात पाहिल्यावर अनेकांच्या गालावर खुललेली कळी पाहूनच ज्योती समाधानी होतात. तेव्हा, जागतिक महिला दिनान
सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे,
८ फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी
आयुषमान खुराना हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार त्याच्या चतुरस्त्र अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायमच चर्चेत असतो. त्याचा आगामी चित्रपट 'बाला' हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. बाला या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच त्याच्या प्रदर्शनाची तारीख आता बदलली असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी ताणली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जोपर्यंत ते थांबत नाहीत तोपर्यंत 'ती' देखील थांबणार नाही अशा आशयाचा 'मर्दानी २' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली.
राघव लॉरेन्स दिग्दर्शित 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित झाले आहे. अक्षय कुमार एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' पुढील वर्षी २२ मे ला म्हणजेच ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे देखील आज जाहीर करण्यात आले आहे.
गोपी पुथ्रण दिग्दर्शित 'मर्दानी २' च्या दिग्दर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली. याआधी मर्दानी चित्रपटामधून राणी मुखर्जीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडलीच होती आता तीच जादू पुन्हा एकदा पसरवण्यासाठी 'मर्दानी २' मधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
परिणिती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेल्या 'जबरिया जोडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक आठवडा पुढे ढकलण्यात आली असून आता चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित होईल.
साहो चित्रपट त्याच्या बदललेल्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे आधीच चर्चेत होता आणि आता त्याचे आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यातील जबरदस्त केमेस्ट्री दाखवणारे हे पोस्टर आज प्रदर्शित झाले.
बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचा घोषणा आज करण्यात आली. पूर्वनियोजित तारखेनुसार १५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र आता चित्रपटातील काही महत्वाच्या ऍक्शन सिक्वेन्सवर काम सुरु असल्यामुळे चित्रपट ३० ऑगस्टला प्रदर्शित करणार असल्याचे चित्रपटकर्त्यांनी प्रसारित केलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.
अनिल कपूर, करीन कपूर खान, रणवीर सिंह, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर अशी तगडी स्टारकास्ट घेऊन आपल्या भेटीस येणाऱ्या 'तक्त' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनावधानाने करन जोहर यांच्या इंस्टाग्रामवरील स्टेटसमधून आज उघड झाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. राकेश कुमार बंसल यांची निवड उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. रजत शर्मा यांना ५४.४ मते मिळाली आणि त्यामुळे त्यांचा दणदणीत विजय झाला. माजी क्रिकेटपटू मदनलाल यांचा पराभव करत रजत शर्मा यांनी विजय मिळवला.
ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने जीवनावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करण्यास सांगणारा हळवा आणि मृदू स्वर हरवला अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे आज मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.
चित्रपट, नाट्य, राजकीय, क्रीडा, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे.
आज सकाळी ११ वाजता आयोगाने आपल्या मुख्य कार्यालयामध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.