महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत व्हॉट्सअॅपवर आधारित तिकीट सेवा सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत या उपक्रमाचे उद्घाटन महिला प्रवाशांच्या हस्ते अभिमानाने करण्यात आले. मेट्रो लाईन २ए आणि ७च्या प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासी थेट व्हॉट्सअॅपवरून तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅपची गरज नाही. त्यामुळे अधिक सोपी युझर-फ्रेंडली म्हणजे वापरकर्त्यासाठी सोयीची असलेली सेवा उपलब्ध होणार आहे.
Read More
(Mumbai Metro)नवरात्रोत्सवादरम्यान ‘मेट्रो-२अ’ आणि ‘मेट्रो-७’ वरील ‘मेट्रो ट्रेन’ सेवेच्या वाढीव फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणाच्यासुदीच्या काळात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक सेवेची वेळ वाढविण्याचे महत्व लक्षात घेत ‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’तर्फे (एमएमएमओसीएल) वाढीव फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेट्रो २अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो ७( दहिसर – अंधेरी ) मार्गिकेवर अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे. पावसाळ्यात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता दिवसाला ७ मिनिटांच्या वारंवारतेसह या मार्गिकांवर २४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली आहे.
मुंबईतील मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वर एकाच दिवसात २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत एका दिवसांतील प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला आहे. हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना सोमवार, दि. २० मे, रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाने घेतला होता. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ तब्बल ७६,५९६ प्रवाशांनी घेतल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली.