कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.
Read More
तैवानच्या वेदर ब्युरोने म्हटले आहे की रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी तैवानमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. आग्नेय किनार्यावरील ताइतुंग जवळ ७ किलोमीटरच्या परिघात हा भूकंप झाला. ताइतुंगच्या जवळ असलेल्या हुआलियनमधील काउंटी सरकारने सांगितले की, युलीमध्ये कोसळलेल्या सुविधा स्टोअरच्या इमारतीत दोन लोक अडकले होते, कोसळत्या पुलावरून पडलेल्या तीन लोकांसाठी बचावाचे प्रयत्न सुरू होते. चीन ने तैवान लगतच्या समुद्रात आण्विक स्फोटकांची चाचणी केल्यामुळे हे भूकंप झाले असावेत, अशी चर्चा सुरू असल्याचे दिसून आले आहे.