काँग्रेसला ओबीसींची मते घेण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी देशाची आणि ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. आधीच जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक होती, या राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. शनिवार, २६ जुलै रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
Read More
४,०७८ ही केवळ संख्या नव्हे, मोदी का काम, हर पल देश के नाम..' या ध्येयाची ही विक्रमी फलश्रुती आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत.
कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन कुठलीही मागणी पूर्ण होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहारणीच्या घटनेवर ते बोलत होते. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ठाकरे बंधूंनी शनिवार, ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ११ जून रोजी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दरम्यान, आता त्यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभागाचा निधी कुणीही पळवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
( no retirement rule after the age of 75 in BJP Chandrashekhar Bawankule ) “भाजपमध्ये ७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे,” असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी केले.
( maximum compensation to farmers in national highway land acquisition Minister Chandrashekhar Bawankule ) शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा विचार असून भूसंपादनाबाबत याबैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ते कुटुंबासह हाँगकाँगच्या ट्रीपवर गेले होते.