नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम, अर्थ सभापती दिनकर दहिफळे, किनवट बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे तसेच ८ संचालकांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
Read More
( Financial assistance of Rs. 5 lakhs to families of those killed in Nanded accident ) नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
शरद पवार हे मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी नांदेड-हिंगोली दौरा करणार होते. परंतू, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी सर्व दौरे रद्द केले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध असल्यास तिथल्या लोकांशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. काही भागातून अगदीच विरोध असल्यास आम्ही त्याची दिशा बदलू. परंतू, लोकांवर हा प्रकल्प लादणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवार, ८ जानेवारी रोजी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
वैयक्तिक दु:खाचा बाऊ न करता समोर आलेल्या परिस्थितीशी समन्वय, संघर्ष करत स्वत:सोबतच समाजहित साधणार्या प्रा. सुरेखा किनगावकर यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने शीख समुदायासाठी एक अनोखे पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ५ गुरुद्वारांना भेट दिली जाईल. भारत गौरव ट्रेन चालवून हे दर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा दौरा नऊ रात्री आणि १० दिवस चालणार आहे. या दौऱ्यात नांदेड येथील श्री हुजूर साहिब, पाटणा येथील श्री हरमंदिर जी साहिब, आनंदपूर येथील श्री केशगर साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि भटिंडा येथील श्री दमदमा साहिबचे दर्शन घेतले जाईल.
राज्यातील अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर विदर्भातीलही अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सोमवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जालना-नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या सहा बांधकाम कंत्राटांसाठी मंगळवार, दि.२१ रोजी चार स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. जालना - नांदेड द्रुतगती महामार्गात जालना, परभणी व नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या महामार्गाची एकूण लांबी १८० कि. मी. आहे. विजेत्यांच्या यादीत APCO इन्फ्राटेक प्रा. लि., मॉन्टेकार्लो लिमिटेड (एमसीएल), पीएनसी इन्फ्राटेक आणि रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लि. (आरएसआयआयएल) यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण
एकिकडे निवडणुकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांचे पक्ष सोडण्याचे सत्र सातत्याने सुरु आहे. देशभरात अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून अनेक नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. शनिवारी तब्बल ५५ नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नांदेडमध्ये चव्हाणांचे भव्य स्वागत करण्यात आले.
भारतीय मजदूर संघ संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा १४ आक्टोबर स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथे समरसता दिनाच्या निमित्ताने कामगार मेळावा संपन्न झाला. नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर, सेक्रेटरी अनुप जोंधळे, बांधकाम कामगार संघांचे सरचिटणीस संजय सुरवसे, व प्रमुख वक्ते म्हणून सचिन मेंगाळे सरचिटणीस महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) प्रमुख वक्ते म्हणून होते.
राज्य सरकारच्या नाड्या दिल्लीच्या हाती असल्याची टीका उबाठाचे खासदार संजय राऊतांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, संजय राऊत काहीही बोलतात. असा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांची संघटना रामराज्याबद्दल बोलत आहे. पण, त्यांनी रामराज्याची संकल्पना आधीच सोडून दिली आहे. असंही फडणवीस म्हणाले.
नांदेड घटनेचे विरोधांकडून राजकारण सुरु आहे. उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी नांदेड घटनेवर बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. यावरुन आता फडणवीसांनी ठाकरेंचे कान टोचले आहेत. अशा प्रकारच्या घटना गांभिर्याने घेतल्या पाहिजेत. त्यांचे राजकारण करु नये. असा इशारा फडणवीसांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांची संघटना रामराज्याबद्दल बोलत आहे. पण, त्यांनी रामराज्याची संकल्पना आधीच सोडून दिली आहे. असंही फडणवीस म्हणाले.
नागपूर, नांदेड, संभाजीनगर रुग्णालयात मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. यावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, आणि त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत. असं संजय राऊत म्हणाले आहेत. नागपूर, नांदेड, संभाजीनगरमधील लोक मरण पावले ते औषधांच्या खरेदीतील ठेकेदारीमुळ मरण पावले आहेत. कमिशनबाजीमुळे मरण पावले आहेत. अशी ही टीका राऊतांनी केली आहे.
नांदेड, नागपूर, संभाजीनगर रुग्णालयातून मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत नांदेड प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आम्ही कोरोनाचा सामना केला. मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. राज्याच्या जनतेला विश्वास देणारं आज कुणीच नाही. जाहिराती करायला पैसे आहेत, रुग्णांसाठी पैसे नाहीत? असा सवाल ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
नांदेड, नागपूर, संभाजीनगर रुग्णालयातून मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत नांदेड प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोविड काळात आपण औषधं कानाकोपऱ्यात पोहोचवली. असं ठाकरे म्हणाले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आम्ही कोरोनाचा सामना केला. मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. असं ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत पवारांनी ठाण्यातील घटनेची आठवण करुन दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं राऊत म्हणाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर, चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा, एनआयएने देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या ४३ गुन्हेगारांची नावे आणि त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे अशी कोणतीही व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाकडे देण्याचे आवाहन नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. या आंदोलनाचे केंद्र जालन्यातील अंतरवली सराटी हे गाव असले तरी, राज्यभरात मराठा समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. काहीदिवसांपूर्वीच आंदोलकांनी शरद पवार यांचा ताफा अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. असाच काहीसा प्रकार आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत घडला आहे.
प्रत्येक राज्याची प्रगती आणि सर्वांगीण विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या स्थितीवर आणि एकंदर परिस्थितीवर अवलंबून असतो. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी आणि राज्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाहतूक, दळणवळणाची साधने आणि पायाभूत प्रकल्पांची स्थिती उत्तम असणे गरजेचे असते. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले गतीचे एक चाक इतर चाकांसोबत वेगाने धावत असून या प्रकल्पांमुळे ’वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची परिपूर्ती’ झाली आहे, असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गेल्या क
पुणे स्थानकावर झुरळांमुळे रेल्वे तब्बल दोन तास थांबण्यात आल्याची घटना घडली आहे. १७६१३ हा रेल्वे क्रमांक असलेल्या पनवेल- नांदेड एक्सप्रेसमधील बी१ या एसी कोचमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळे असल्याने नागरिक हैराण झाले. त्यानंतर हा डब्बा पेस्ट कंट्रोल करण्यात आला. रेल्वेतील प्रवासी कैलास मंडलापुरेंनी व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
राज्यात विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिली आहे. मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण हो
समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्तीय भागातील कर्नाटकातील नागरिकांनी मतदानासाठी जाता यावे यासाठी या भागात भरपगारी सुट्टी जाहिर केली आहे. हा आदेश कोल्हापुर,सांगली , सोलापूर , सिंधुदूर्ग , उस्मानाबाद, लातूर , नांदेड या जिल्ह्यातील कामागारांना लागू होणार आहे. तसेच हा आदेश शासनाच्या कामगार विभागाच्या अख्यारित येणाऱ्या सर्व सरकारी घटकांना बंधनकारक आहे. त्यामुळे कर्नाटकात जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंजाबमधून बेपत झालेला खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणार्यांवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येत आहे. अमृतपाल सिंग फरार असून पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभाग हद्दीत, बोरिवली स्थित श्रीकृष्ण नगरात, पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून दहिसर नदीवर पुनर्बांधणी होत असलेल्या वाहतूक पुलाचा पहिला टप्पा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज सायंकाळी समारंभपूर्वक खुला करण्यात आला.
राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासावर भर देण्यात आला असून पायाभूत सुविधांद्वारे पर्यटन, दळणवळण आणि उद्योगपूरक अशा सज्ज सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. पायाभूत सुविधांअंतर्गत समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. नागपूर गोवा महामार्गाची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यामुळे मराठवाड्याच्या अर्थकारणास बळ मिळणार असल्याचा विश्वास राज्य सरकारला आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी चक्क पैसे वाटले जात असल्याचा आरोप एका सहभागी कार्यकर्त्यानं केला आहे. यातील तरुणाच्या म्हणण्यानुसार, भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी तसेच विविध कामांसाठी पैसे दिले आहेत, असं या तरुणाचं म्हणणं आहे. तरुणाने स्वतः याबद्दल खुलासा केलेला आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर दाखविले जात असताना प्रत्यक्षात मात्र, अशी पोलखोल सहभागी तरुणानेच केल्याने याबद्दल वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्ही
महाराष्ट्रात ‘पीएफआय’शी संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये छापे मारण्यात आले. महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, भिवंडी, कोल्हापूर, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ‘एनआयए’ने 20 जणांना ताब्यात घेतले. संभाजीनगरमधून पाच, नांदेडमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ‘एनआयए’ने मध्यरात्री 3 वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर-23मधील ‘पीएफआय’च्या कार्यालयावर छापा मारला.
‘संस्कृतसेवा इति जीवनाभिलक्षम् !’ अर्थात संस्कृत भाषेची सेवा हेच ध्येय मानून, गेली सात दशके कार्यरत असलेल्या स्नेहल शशिकांत नांदेडकर यांच्याविषयी...
रझा अकादमी मोर्चाच्या हिंसाचार प्रकरणी डीसीपी मकानदार यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपतर्फे पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर रोजी रझा अकादमीचा पूर्वनियोजित मोर्चा निघाला त्यावेळी. पोलीस आयुक्त पदाचा प्रभार असलेले पोलीस उपायुक्त एमएम मकानदार यांनी हेतुपुरस्सर मुस्लिम मोर्चाच्या वेळी शहरात पोलीस बंदोबस्त लावला नाही, असे जनमत तयार झाले आहे.
नांदेडमधील गाडीपुरा भागात बुधवारी मध्यरात्री इस्लामी जमावाने हिंसाचार केला असून त्यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मरही उडाला आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांच्या फैरी सुरू असल्या तरीही समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूच आहे. एनसीबी मुंबईने नांदेडच्या कंधार जिल्ह्यातील एका ड्रग्ज युनिटचा पर्दाफार्श केला. या कारवाईत सुमारे १.५५ लाखांचे १११ किलो खसखस, १.४ किलो अफू जप्त करण्यात आले आहे. तसेच खसखस दळण्यासाठी वापरलेली २ ग्रायंडिंग मशीन जप्त केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी एक ई-स्केल नोट मोजण्याचे मशीन जप्त केले, अशी माहिती एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून, काहीही ठोस कार्य केलेले नाही. केवळ मतांचे राजकारण करण्याचे पाप केले जात आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दंगलीचे कृत्य करण्यात आले आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला.
राज्यातील या हिंसाचाराच्या विरोधात आणि या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावरील अमर जावं ज्योत या ठिकाणी विरोध प्रदर्शन आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपातर्फे देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील हिंसाचाराविरोधात मुंबई भाजपची निदर्शने
मालेगावमध्ये दगडफेक, नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ले, गाड्यांचीही तोडफोड
कोरोनाचा तो काळ जसा सगळ्यांसाठी भयानक होता, तसाच तो कानगुलकर कुटुंबीयांसाठीसुद्धा होता. आठ-दहाजणांचं कुटुंब. ‘लॉकडाऊन’मध्ये करायचं काय, हा मोठाच प्रश्न होता. मडकी विकण्याचा परंपरागत व्यवसाय या कोरोना काळात बंद होता. काहीतरी हातपाय मारलेच पाहिजे. आपण मसाला बनवून विकण्यास सुरुवात केली तर? विमलाबाईंच्या या प्रश्नावर कोणाकडेच उत्तर नव्हतं. कारण, मसाला तयार करण्यास जेवढा पैसा लागणार होता, तेवढा पैसा नव्हता. मग कुणीतरी ‘आयडिया’ सुचवली, बचत केलेल्या पैशांचा गल्ला फोडण्याची! पै न् पै जमवलेला गल्ला जेव्हा फोडला त्या
देगलूर-बिलोली पोटनिवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज देगलूर-बिलोली मतदारसंघात प्रचारसभा झाली.यावेळी केंद्रिय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनीही जनतेसमोर भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत मंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप खा. प्रताप पाटील चिखलीकर,आमदार बबनराव लोणीकर, आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे, महिला मोर्चा प्र
नांदेड जिल्हयाचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने देशाचे नवे वायुदल प्रमुख म्हणून विद्यमान उपप्रमुख एअर मार्शल विवेक चौधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत असून एअर मार्शल चौधरी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारतील.
राज्यपालांच्या दौऱ्यात राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा ठपका ठेवत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत चर्चा झाली आहे.
शहरालगतच्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने अखेर बुधवार, दि. ३० जून रोजी मंजुरी दिली. या २३ गावांच्या समावेशामुळे महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर झाली असून पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे.
नांदेडमध्ये झालेल्या हल्ला-महल्ला मिरवणुकीदरम्यान ४०० जणांनी पोलिसांवर केला हल्ला
नांदेडमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांची ठाकरे सरकारवर टीका
महाराष्ट्र पोलीस दल आणि गृहखात्यात अंतर्गत कलह सुरू असताना होला-मोहल्ला जुलूस दरम्यान पोलीसांवर भीषण हल्ला करण्यात आला होता. पोलीसांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात चारशेहून अधिक जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.