सलामी जोडीला 'सलाम' : शहिदांच्या कुटूंबियांना करतात 'अशी' मदत
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग फलंदाज म्हणून धडाकेबाज मात्र, मैदानाबाहेर अत्यंत हळवा, असा माणूस. त्याच्या याच दायित्वाचे दर्शन नुकतेच घडले. त्यांच्या अनोख्या कामामुळे देशभरातील नेटीझन्सनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांना मोफत क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. विरूने शब्द पाळत त्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात केली. याबद्दलची माहिती त्यांने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली...