शाश्वत गांधी

...कारण भारतात गांधी होते!

भारतीय स्वातंत्र्यलढा साम्यवादाच्या लाल छायेतून मुक्त ठेवण्यात महात्मा गांधींनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करावेच लागेल. गांधींचे देश स्वतंत्र करण्यात जितके योगदान आहे, तितकीच देश घडविण्यात भूमिका आहे. भारत एक निरंकुश साम्यवादी राजसत्ता म्हणून आकारास येण्याऐवजी, एक मुक्त लोकशाही गणराज्याच्या रूपाने उदयास आला, याचे श्रेय महात्मा गांधींनादेखील आहेच...

हिंदू धर्मविचार आणि गांधी

महात्मा गांधीजींचे हिंदू धर्माविषयीचे विचार काय होते, त्यांची मते काय होती, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. सोबतच गांधीजींचा हिंदू धर्मविचार व संकल्पनांपर्यंतचा प्रवास कसा झाला, स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेणारे गांधी सर्वधर्मसमभावाची संकल्पनाही सांगत, पण ती हिंदू जीवन दर्शनाच्या आधारेच, पण कशी, हाही एक मुद्दा आहेच. अशा महात्मा गांधीजींच्या धर्मविषयक विविध मुद्द्यांना स्पर्श करणारा हा लेख......

ख्रिश्चन मिशनरी व गांधीजींचे आक्षेप

महात्मा गांधींजींचे नाव घेऊन सर्वधर्मसमभावाचा जप करणारे अनेक लोक सध्या दिसतात. अशा लोकांना हिंदूंच्या धर्मांतरावर आक्षेप नसतो, उलट तेही धर्मांतरे योग्य मानतात. परंतु, महात्मा गांधीजींनी आपल्या हयातीत ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कोणत्याही प्रकारे केल्या जाणाऱ्या मग शिक्षणाच्या वा आरोग्य सेवेच्या रूपातील का असेना-धर्मांतराला विरोधच केला. महात्मा गांधींनी अखेरपर्यंत हिंदू व हिंदुत्वालाच शिरोधार्ह, आचरणयोग्य मानले आणि ख्रिस्तीमतालाही हिंदुत्वाकडून शिकण्याची सूचना दिली...

नामदार गोपाळराव

महात्मा गांधीजी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानत असत, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरू होते. सदरच्या लेखातून रानडे आणि गोखले या गुरुशिष्यांबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली असून महात्मा गांधी व गोपाळकृष्ण गोखले या गुरुशिष्यांमधले वैचारिक साम्य, मतभेदही सांगितले आहेत...

पुणे करार : अस्पृश्यता निर्मूलनाच्या मार्गातला महत्त्वाचा टप्पा

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित समाजाविषयीचे विचार काय होते, त्यांच्यात मतभिन्नता होती की साम्यता होती, आताचे काही अभ्यासक ‘गांधी विरुद्ध आंबेडकर’ असा संघर्ष मांडण्याचाही उद्योग करतात. पण, तो खरेच तसा होता का आणि पुणे कराराच्या माध्यमातून भारताचे, इथल्या समाजाचे एकता-अखंडत्व अबाधित राखण्यात गांधीजींनी नेमकी कोणती भूमिका निभावली, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.....

भारताची अर्थनीती-गांधींच्या दृष्टिकोनातून

गांधीजींचे विचार बर्‍याचदा तात्कालिक असल्याचे म्हटले जाते किंवा तसा आरोपही त्यांच्या विचारांवर होतो. ‘हिंद स्वराज्य’ या गांधींजींच्या पुस्तकात मात्र त्यांनी आपले उद्योग, अर्थव्यवस्था, गाव-खेडी, गोरक्षण, यांत्रिकीकरण, शेती वगैरे विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. त्यातील कितीतरी विचार आजही शाश्वतच वाटतात. सदर लेखातून गांधीजींच्या या विचारधनाचा आढावा घेतला आहे...

गांधीजींची अहिंसा व सत्य आजच्या संदर्भात

पोरबंदरचे मोहनदास करमचंद गांधी विश्वस्तरावर 'महात्मा' म्हणून अमिट छाप उमटवतात, तेव्हा त्यांनी अंगीकारलेल्या सत्य आणि अहिंसा व्रताचे महत्त्व शब्दातीत, अमूल्य होते. सत्य आणि अहिंसेची ताकद मोहनदास करमचंद गांधी नावाच्या भारतीयाला कोट्यवधी दुर्बलांचे आशास्थान, प्रेरणास्थान बनवते. गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सत्य व अहिंसेचे आजचे परिमाण शोधताना घेतलेला आढावा.....

गांधी आजच्या संदर्भात

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरतेच महात्मा गांधी प्रासंगिक होते का? गांधीजींच्या विचारांनुसार वागणे त्यानंतर शक्यच नव्हते का? महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व काळात तर प्रमुख होतेच. पण, आजच्या संदर्भात त्यांचे विचार उपयुक्त आहेत का, असे अनेक प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले जातात. तेव्हा, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे...

संघ आणि गांधीजी

महात्मा गांधीजी आणि रा. स्व. संघात काय साम्यस्थळे आहेत? दोघांच्या विचारांत कोणता सारखेपणा आहे? महात्मा गांधीजींना जे अभिप्रेत होते, तेच संघ नेमके कसे प्रत्यक्ष जीवनात करताना दिसतो? असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात असतील. विरोधकांकडून महात्मा गांधी संघविरोधी असल्याचे ठसवले जाते, तर संघाकडून गांधीजींना प्रातःस्मरणीय मानले जाते. परंतु, महात्मा गांधीजींशी संघाचे नाते काय? हेच सदर लेखात समर्पक शब्दांत मांडले आहे...

धर्म : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि महात्मा गांधींचा

सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी व स्वातंत्र्यवीर सावरकरांना परस्परांचे विरोधक म्हणूनच ओळखले जाते, किंवा जनतेच्या मनात तशीच प्रतिमा निर्माण केल्याचे-झाल्याचेही पाहायला मिळते. परंतु, गांधी व सावरकर हे दोन्हीही महापुरुष एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या धर्मविषयक विचारांत साम्यही आढळते. दोघांनाही हिंदू धर्माचा पराकोटीचा अभिमान वाटे आणि दोघेही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, अस्पृश्यता आदींच्या विरोधातच होते...

‘गांधी’ नावाचे मिथक

गांधीवाद म्हणजे काय? गांधींची विचारप्रणाली नेमकी कोणती होती? गांधीवाद हा मार्क्सवाद वा इतर समूहवादांहून भिन्न कसा? गांधीवादाने कोणती सकारात्मक ऊर्जा जागवण्याचे निश्चित केले? असे अनेक प्रश्न. त्याचबरोबर राष्ट्रवाद, युद्ध वगैरे मुद्देही आपल्या अवतीभवती असतात. अशा सर्वच विषयांचा सदर लेखात विचार केला आहे. ..

महात्मा गांधी आणि हिंदू जीवन दर्शन

महात्मा गांधी हे स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत असत. भगवान श्रीकृष्णाने अजुर्र्नाला कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचे महात्मा गांधींच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान होते. सोबतच वेद, उपनिषदे आदींवरही त्यांची आस्था होती. महात्मा गांधींचे हिंदू जीवन दर्शन आध्यात्मिक अंगाने जाणारे होते. सदर लेखात गांधीजींच्या याच पैलूचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे...

गांधी : काल, आज आणि उद्या...

महात्मा गांधींचे कार्य ते हयात असताना जसे कित्येकांना प्रेरणा देणारे होते, तसेच ते नसतानाही तितकेच प्रेरणादायी आहे. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, अस्तेयाच्या तत्त्वांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठी चळवळ उभी केली. विनोबा भावेंसारखे वैयक्तिक सत्याग्रही त्यातूनच तयार झाले. गांधी विचारांची प्रासंगिकता जशी त्या काळात होती तशीच आजही आहे व हे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारी उदाहरणेही अस्तित्वात आहेत. ..