संपादकीय

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी सावत्र होमियोपॅथी भाग-२

मिश्रचिकित्सा पद्धतीचा योग्य वापर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने उशिरा जरी घेतला असला तरी तो सामाजिक हिताचा आहे. परंतु, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या भरतीपासून होमिओपॅथी डॉक्टरांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे...

होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २७

रुग्णाच्या रोगाचा 'गाभा' जाणून घेत असताना, त्या आजाराची प्रदर्शित होण्याची प्रवृत्ती जाणून घेण्याचा मुख्य प्रयत्न असतो. जसा शारीरिक बांधा हासुद्धा माणसाची प्रकृती दर्शवत असतो, तसेच अजून काही महत्त्वाचे घटकही असतात...

मनचक्षूंच्या चष्म्यातून...

ऐहिक जगात जीवन जगताना आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात. वर्षानुवर्षे त्या जशा या जगात स्थिर असतात, तशाच त्या नव्या नवलाईने घडतही असतात. या नव्या-जुन्या गोष्टींप्रमाणेच अनेक घटना-प्रसंगही असतात. या गोष्टीत शहरं व शहरातील राहणीमान असतं. या गोष्टी गावाकडच्या नैसर्गिक जीवनाचा अशा रोजच्या जगण्याशी व माणसाच्या ‘असण्याशी’ जोडलेल्या असतात, त्या कधी श्रीमंती थाटाच्या, आर्थिक भरभराटीच्या असतात, कधी त्या झोपडपट्टीच्या स्वरूपात, गरिबीच्या अंधाराच्या असतात, कधी बजबजाटाच्या असतात, तर त्यात कधी स्मशान शांतता असते...

ममतादीदी, उगाच कशाला लोकांना भडकविता?

दुर्गापूजा मिरवणुकांवर निर्बंध, 'जय श्रीराम' घोषणा देणार्‍यांवर केली जात असलेली कारवाई, यामुळे हिंदू मतदार आपल्या पक्षावर नाराज होत असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झाली आहे. त्यातूनच दुर्गापूजा मंडळांना प्राप्तिकर खात्याने पाठविलेल्या नोटिसांचे भांडवल करून, हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे...

व्यापारयुद्ध आणि अवमूल्यन

चीनच्या धटिंगणपणातूनच अमेरिकेबरोबर सुरू झालेले व्यापारयुद्ध आता त्या देशालाच अडचणीत आणत असल्याचे दिसते. नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल वक्तव्य केले, जे चांगलेच परिणामकारक ठरू शकते. "चीन व्यापारयुद्धावर तोडगा काढू इच्छितो, कारण कित्येक दशकांनंतर त्यांच्यासाठीचे हे सर्वात वाईट वर्ष आहे. परंतु, चीनची अवस्था यापेक्षाही वाईट आणि अधिकाधिक वाईट होणार आहे. हजारो कंपन्या चीनमधून पलायन करत आहेत, आपला व्यवसाय बंद करत आहेत...

जम्मू-काश्मीर : नवा केंद्रशासित प्रदेश

५ ऑगस्ट २०१९ पूर्वी भारतात २९ राज्यं होती व सात केंद्रशासित प्रदेश होते. आता २८ राज्यं झालेली असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या नऊ झाली आहे. स्वतंत्र भारतात आजपर्यंत असे कधी झाले नव्हते. त्याविषयी.....

चिंतातूर जंतू महाराष्ट्रातही

काही नतद्रष्टांच्या मते त्यांचे हे नाटक आहे. कारण कोणे एकेकाळी परप्रांतीयांना क्रूरपणे मारहाण करणारे त्यांचे अनुयायी होते. पण कालांतराने काही महिन्यांपूर्वीच हे महाशय गंगाकिनारी मुलुख असणाऱ्यांच्या संमेलनाला गेले होते. ..

एक साहाय्यक 'सुरेख' कारकीर्द

वयाच्या ७४ व्या वर्षी 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री' म्हणून पुरस्कार मिळालेल्या एक चिरतरुण अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या विशेष कार्याबद्दल जाणून घेऊया.....

वसुंधरेकडेही लक्ष हवे

पंचमहाभूतांच्या तत्त्वातून सृष्टीची निर्मिती झाली आहे. या पंचतत्त्वात पृथ्वी अर्थात वसुंधरा हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. याच वसुंधरेच्या कुशीत आदिम काळापासून मानवी जीवन फुलले. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या युगात जेथे आपला अधिवास आहे, ते ठिकाण सोडून विश्वातील अन्य ठिकाणच्या प्रजातीचा, परिस्थितीचा तेथील हवामानाचा, पाण्याचा शोध घेण्याची सवय आपल्याला जडली आहे. असे जागतिक पटलावरील सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता वाटते. ..

३७० वर काँग्रेसच्या बिनडोक प्रतिक्रिया

वास्तविक, मोदी सरकारने उचललेले पाऊल आपल्याला का उचलता आले नाही, याचा विचार करणे दूरच, उलट पावलोपावली आपल्या मूर्खपणाचे प्रदर्शन मांडून त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे. त्या प्रयत्नात आपल्या हातून देशाचे नुकसान होऊ शकते, पक्षाचे तर हसेच होऊ शकते, याचे भानही त्याला नाही. कशाला हा पक्ष आणि कसले हे त्या पक्षाचे नेते? नेते कसले अक्षरश: बाजारबुणगेच म्हणाना...

'कलम ३७०' पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे, तसेच काश्मीर समस्येचे मूळ असणारे घटनेतील '३७०' हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय धाडसी निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इतिहास घडवला आहे. 'कलम ३७०' काढल्यामुळे देशाचे आणि काश्मिरी जनतेचे अनेक फायदे होणार आहेत. परंतु, एक महत्त्वाचा फायदा म्हणजे काश्मीरमध्ये आर्थिक विकासाचा दर वाढेल. यामुळे युवकांना रोजगार मिळेल आणि यामुळे त्यांचे दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल...

प्राचीन भारतीय संस्कृतीतील, धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत

प्रतीकशास्त्र आणि चिह्नसंकेतांच्या अभ्यासाच्या अंतिम टप्प्यावर आपण प्राचीन भारतीय संस्कृतीतील चिह्ने आणि त्यांच्या संकेतांचा परिचय करून घेऊया. 'प्राचीन भारतीय संस्कृती' या संबोधनाचा संदर्भ खूपच व्यापक आहे. आपल्या या संस्कृतीत, मानवी इतिहासातील प्रतीके आणि चिह्नांचा वापर सर्वप्रथम सुरू झाला. लिखित साहित्य, शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, रंग, बुद्धिबळ-सारीपाट यांसारखे मनोरंजक आणि उद्बोधक बैठे खेळ, अध्ययन, अध्यापन, दैवत संकल्पना, उपासना पद्धती, शब्द-नाद-ध्वनी इतक्या व्यापक व्यवस्थेत अशी प्रतीके आणि चिह्ने ..

राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी भाग-१

संस्कृत शब्दांचा अनोखा विलास असलेली एक नक्षी टिळकांच्या नोंदवहीत सापडते. पोरवयातून तारुण्याकडे झेपावताना संस्कृतच्या वाचनाने टिळक 'सु-संस्कृत' होत होते. प्राचीन भाषेबद्दलच्या व्यासंगातून, ग्रंथांच्या अभ्यासातून स्वधर्म, संस्कृती आणि स्वराष्ट्र याबद्दलच्या ठाम निष्ठा टिळकांच्या मनात निर्माण झाल्या. त्याला इतिहासाच्या अभ्यासाची योग्य जोड मिळाली. गतकाळातील पूर्वजांचा पराक्रम आणि वर्तमानातील समाजाला आलेले शैथिल्य यांच्या तुलनेतून टिळकांच्या जाणिवा जागृत झाल्या. यातून त्यांना कार्यप्रवण होण्याची प्रेरणा ..

'एनआरआय' नाही, 'येणाराय' मोदीच!

जागतिक राजकारणात अशा मैत्रीला व व्यक्तिगत संबंधांना खूप महत्त्व असते आणि त्या मैत्रीसंबंधांचा मोक्याच्या क्षणी निर्णायक लाभ उठवता येत असतो. म्हणून तर त्याच ट्रम्प प्रशासनाने पाकचे दु:ख ऐकून घेण्यापेक्षा त्यालाच 'आगाऊपणा करू नका,' म्हणून सुनावलेले आहे, तर दुबईने 'भारताचा अंतर्गत मामला' म्हणून पाकला झटकून टाकलेले आहे. परदेश दौऱ्याचा खर्च मोजणाऱ्यांना अशा पाठिंबा वा समर्थनाची काही किंमत कळू शकणार आहे का? 'एनआरआय' आणि 'येणाराय' हे दोन्ही एकाच उच्चाराचे शब्द होतात. पण, आशय किती बदलतो ना?..

नमस्ते शारदेदेवी काश्मीरपुरवासिनी...

अशा राष्ट्रपुरुषाचा मुकुट म्हणजे काश्मीर! काश्मीर म्हणजे शारदापीठ. माता सरस्वतीचे स्थान. शारदादेश म्हणजेच काश्मीर म्हणजे ज्ञान आणि बुद्धीचे माहेरघर आहे. म्हणूनच म्हणतात....

आप्पा पाटणकर

आठवड्याच्या मधल्या वारी सकाळी जरा लवकरच आमच्या कोपर्‍यावरच्या इराण्याकडे चहा घेत बसणं हा माझा तरुण वयातला छंद... छंद कारण ते करताना मला एक छान ‘फिलिंग’ येतं. हातात शोभेला एक वर्तमानपत्र घेऊन चांगलं तास-दीड तास बसता येतं...

अस्मानी संकटात गोदाकाठ

गोदावरी नदीच्या किनारी वसलेले तीर्थक्षेत्र नाशिक. या आठवड्यात गोदाकाठ सर्वात जास्त चर्चिला गेला, तो गोदावरीला आलेल्या पुरामुळे. नाशिकमधील काही जाणकारांच्या मते अनेक वर्षानंतर गोदावरी नदीने हे रौद्ररूप धारण केले होते...

महाराष्ट्र-कर्नाटकचा समन्वय की संघर्ष?

महाराष्ट्रातील कोयना धरण भरल्यानंतर त्या धरणातून पाणी सोडावेच लागते आणि आलमट्टी धरण भरल्याशिवाय कर्नाटक पाणी खाली सोडत नाही, असे हे त्रांगडे. याबाबत दोन्ही राज्यांतील राज्यकर्त्यांना जलसमन्वय ठेवून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवल्यास निश्चितच त्याचे रुपांतर संघर्षात होणार नाही...

सन्मान व्हावा मातृत्वाचा...

जगभरातल्या घटना लक्षात घेतल्या तर एक जगाच्या पाठीवरचे सत्य समोर येते ते म्हणजे अपरिहार्य समस्येमुळे संसदेमध्ये बाळाला घेऊन येणाऱ्या खासदार महिला होत्या. वडील असलेल्या खासदारांना असले काही करण्याची गरजच पडली नसेल का?..

ओझ्याची फुकट गाढवं!

देशभक्तीचं आवाहन आणि दिवसाला नक्की मिळणारा ५० सेंट्सचा पगार यामुळे अनेक तरुण भरती झाले. अशा प्रकारे एकंदरीत सुमारे ५५ हजार लोक रबर सैनिक बनले...

हरपलेले सामाजिक भान...

होळकर पुलाला १०० वर्ष लोटली आहेत. त्यावर मार्गस्थ होणारी वाहने, उभी असणारी वाहने, असंख्य नागरिक यांचा भार आणि खालून वेगवान पाण्याचा प्रवाह यांचा मारा अशा स्थितीत होळकर पूल असताना त्यावर गर्दी करणे, हे एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण ठरले असते, याचे भान राखणे आवश्यक होते...

भारतीय रसायनशास्त्राचा जनक

देशातील सर्वात पहिली फार्मा कंपनी सुरू करणाऱ्या आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचा जन्मदिन गेल्या आठवड्यात साजरा करण्यात आला. भारतीय रसायनशास्त्रातील त्यांच्या योगदानाविषयी.....

१७९ रुपये पगार ते ३० कोटींचा व्यवसाय

फक्त प्राण्यांचं औषध मिळणारं हे मुंबईतील एकमेव औषध दुकान. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा कळतं 'हे' दुकान एका मराठमोळ्या माणसाचं आहे. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पाटील...

वैचारिक योद्धयाचे अभिष्टचिंतन

आज दि. ९ ऑगस्ट. क्रांतिदिन. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांचाही आज वाढदिवस. पतंगे सरांनीही स्वतःच्या प्रतिभेने, जिज्ञासेने पारंपरिक धोपट विचारांमध्ये क्रांती केली. प्रतिकूल परिस्थितीमध्येही ध्येयवाद न सोडणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना आयुष्याचे मंत्र मानणाऱ्या रमेश पतंगेसरांना दै. 'मुंबई तरूण भारत'तर्फे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!..

पाकी डॉक्टरांना 'चले जाव'

नुकतेच सौदी अरेबियाने आपल्या देशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी डॉक्टर्सना 'चले जाव'चा आदेश दिला. हे सर्वच डॉक्टर 'एमएस' आणि 'एमडी' ही वैद्यकीय पदवी घेतलेले आहेत. मात्र, सौदीने पाकिस्तानात दिले जाणारे वैद्यकीय शिक्षण शेकडो वर्षांपूर्वीचे जुनाट आणि कालबाह्य असल्याचे म्हटले...

'कलम ३७०' नंतर बावचळलेला पाकिस्तान

मोदी सरकारने '३७०' आणि '३५ अ' 'कलम' केल्यानंतर संतापाची एकच लाट पाकिस्तानात उसळली. राष्ट्रपतींनी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून सर्वपक्षीय तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला. इतकेच नाही तर भारताशी व्यापार बंद करण्याबरोबरच राजनयिक संबंध समाप्तीच्या दृष्टीनेच इमरान खान सरकारने पावली उचलली. एकूणच, भारताच्या या जोरदार धक्क्याने पाकिस्तान पूर्णपणे बावचळला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर 'काश्मीर'चे रडगाणे सुरु केले आहे...

हे 'महापौर' की 'महापोर'?

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एका महिलेचे हात पिरगळतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्याने 'हे महापौर की महा'पोर' असाच प्रश्न उपस्थित होतो...

पराभूतांना आमदारकीची स्वप्ने

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांची धामधूम जोराने सुरू झाली आहे...

कुवार रानवाटांचा वाटाड्या...

वन्यजीव संशोधन आणि निरीक्षणाच्या निमित्ताने जे जंगलात भटकंती करतात, त्यांना 'अरण्यविद्या' अवगत हवी. ही विद्या अवगत असलेला माणूस म्हणजे डॉ. जयंत सुधाकर वडतकर...

फूल भी थी, चिंगारी भी!

भाजयुमोच्या अध्यक्ष खा. पूनम महाजन यांच्यासाठी घरात त्यांचे वडील प्रमोद महाजन आदर्शस्थानी होतेच, पण एक महिला म्हणून सुषमाजींचा आदर्श सदैव डोळ्यासमोर होता. तेव्हा, प्रमोदजींच्या समकालीन असलेल्या सुषमाजींनाही अगदी जवळून पाहिलेल्या पूनम महाजन यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या या भावना.....

अटलजींच्या प्रभावळीतील तेजपुंज तारा निखळला!

सुषमाजींच्या जाण्याने प्रत्येकाला आपले जवळचे कुणीतरी गेल्यासारखे का वाटतंय, त्याचं उत्तर अनेक प्रसंगांमध्ये दडलंय. विलक्षण तेजस्वी डोळे आणि तसेच मनाला भिडणारे धारदार शब्द... लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदावर असतानाची त्यांची कामगिरी आणि योगदान कोण विसरेल? त्यांच्या जाण्याने अटलजींच्या प्रभावळीतील आणखी एक तेजपुंज तारा निखळला आहे.....

पाकिस्तानचे चार तुकडे होणार?

आपल्या ताटात जेवढं वाढून ठेवलं आहे ते अगोदर खायचं सोडून आम्हाला काश्मीर पाहिजे, सांगत उसनं अवसान आणायची सवय पाकिस्तानला जडली आहे. पाकिस्तानमध्ये असलेले गिलगिट-बाल्टिस्तान, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, सिंध प्रांत व फेडरली अ‍ॅडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया (फाटा) यांसारख्या प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करता आली नाही...

सर्वात लोकप्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री!

सध्याच्या सरकारमध्येही मंत्रिपद स्वीकारणे सुषमाजींना शक्य होते. पण, परराष्ट्र विभागाचे २४ x ७ काम करण्यासाठी शरीर साथ देत नाही, हे ओळखून त्यांनी सन्मानपूर्वक वाट मोकळी करून दिली. त्यामुळे सुषमाजींना शपथविधी सोहळ्याला पाहुण्यांमध्ये बसलेले पाहून अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांची तब्येत लवकरच सुधारेल आणि त्यांना पुन्हा संसदेत भाषण करताना पाहता येईल, असे वाटत होते. पण ती फोल ठरली...

कार्यकौशल्याचा ठसा कायम

आमच्या पक्षात सुषमाजींचा सर्वांशी उत्तम संवाद होता. विरोधकांशी सौहार्दाचे संबंध होते. पक्षात कितीही कठीण प्रसंग आला तरी कठोरपणा कायम राहत असे. मतभेदांच्या क्षणी योग्य बाजू ठामपणे मांडत. समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धोरादात्तपणे त्या सामोऱ्या गेल्या. विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांशी त्यांचा नियमित संवाद होता. नकारात्मक गोष्ट सांगण्याची एक शैली होती...

जिहाद आणि देवबंद

माजी केंद्रीय मंत्री आणि तलाकच्या संदर्भात राजीव गांधी मंत्रिमंडळातून बाणेदारपणे राजीनामा देणारे अरिफ म. खान यांच्या मुलाखतीचे वृत्त दै. 'मुंबई तरुण भारत'च्या दि २६ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यांनी 'देवबंद' या इस्लामी जगात नावाजलेल्या 'दारूल उलूम देवबंद' या संस्थेत अभ्यासले जाणारे 'अश्रफ अल हिदाया' हे पुस्तक, त्यातून कशाप्रकारे 'जिहाद'विषयक शिकवणूक तेथे शिकणाऱ्या व पुढे जाऊन मौलवी होऊन धार्मिक प्रवचने देणाऱ्या विद्यार्थ्यांवर ठसविली जाते, याची माहिती दिली होती. त्या 'देवबंद' संस्थेत पसरविल्या ..

जिनके सपनों मे जान होती हैं...

स्वत:पासून सुरू झालेल्या विकासाची प्रेरणा ही समाजोत्थानाचा केंद्रबिंदू झाली. नि:स्वार्थी प्रेरणेने केलेले काम समाजात पोचपावती मिळवतेच आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रुझच्या 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम. वस्तीतील लोकांसाठी शौचालय असावे, या जिद्दीने वस्तीतील काही युवक एकत्र आले आणि त्यांच्या समाजकार्याची महती वैश्विक स्तरावर पोहोचली...

सुळेबाई, तुम्ही आहात कुठे?

काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतेचा नंगानाच चालू असताना फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि गिलानी वगैरेंनी काय दिवे लावले हे तमाम भारतीयांना माहिती आहे. पण, सुळेबाईंना लोकभावनेशी काय देणेघेणे...

अनाथांची 'कल्याणी'

अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर अमृता करवंदे या तरुणीने असे काम केले की, जे वर्षानुवर्षे अनेकांच्या स्मरणात राहील. अनाथ मुलांच्या आयुष्याला आधार देणाऱ्या अमृता करवंदे हिच्या आयुष्याविषयी.....

एक बाण पाकिस्तानलाही...!

मुफ्ती आणि अब्दुल्ला हे लुटारू राज्यकर्ते असल्यामुळे आणि ममताचे मानसिक संतुलनच बिघडलेले असल्यामुळे, राहुल गांधींना कोणती दिशा नसल्याने, त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्यावे असे वाटत नाही. या लेखात फक्त पाकिस्तानला हा बाण कसा लागला आहे, एवढेच फक्त बघायचे आहे...

गहिरे पाणी...

'वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट'ने (डब्ल्यूआरआय) नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, भारतासह एकूण १७ देश म्हणजेच जगाची तब्बल एक चतुर्थांश लोकसंख्या तीव्र जलसंकटाच्या गर्तेत सापडली आहे...

‘कलम ३७०’ हटविण्यामागचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’

तालिबान आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानच्या पुढाकाराने वाटाघाटी होत असताना पाकिस्तानने दहशतवादाचा भारताविरोधात वापर केल्यास अमेरिकेसमोर बिंग फुटण्याचा धोका आहे आणि नाही केला तर फुटीरतावाद्यांपासून दुरावण्याची भीती आहे. काश्मीर प्रश्नावर मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारला असला तरी आगामी काळ परीक्षेचा आहे...

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी..

कण कण वाढे वायुप्रदूषण...

मुंबईच्या वायुप्रदूषणात अतिसूक्ष्म कणांची पातळी धोकादायक अवस्थेत पोहोचली असून त्यामुळे वायुप्रदूषणात वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ही समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख.....

समाज 'आपला' आहे...

खरेच आहे, संतोष यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. अंबरनाथ येथे संतोष आदक यांना गुरुस्थानी मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा.....

चीनभेदी 'ट्रम्प'कार्ड

१९८७ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रिगन व रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी आयएनएफ करारावर हस्ताक्षर केले होते. सदर करारानुसार दोन्ही देश पारंपरिक आणि अण्वस्त्रसज्ज मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालतील, असे म्हटले होते. परंतु, अमेरिका व रशियातील कटुतेमुळे आता हा करार तुटला...

पुन्हा 'रिमोट कंट्रोल'?

पंतप्रधानपद इतर नेत्यांना दिल्यानंतरही अनेक महत्त्वाचे निर्णय गांधी घराण्यातील व्यक्तींना विश्वासात घेतल्याशिवाय होत नसल्याने काँग्रेसचे सरकार 'रिमोट कंट्रोल'द्वारे चालत असल्याची टीका व्हायची. ..

भाजप सरकारने ३७० कलम रद्द करून दाखविले...!

भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. अखेर भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कणखर भूमिका घेऊन हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला...

कापूसशिल्पाचा अनंत शिल्पकार!

कापसाची ओळख म्हणजे समईच्या वातीचा धागा, तुपाच्या निरांजनातील ज्योत ते रुग्णांच्या चिकित्सेसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा बोळा, अशीच आपल्याला माहिती आहे. मात्र, याच कापसाच्या माध्यमातून कोणी जर आकर्षक शिल्प तयार करत असेल तर... होय, कापसाचे शिल्प आणि तेही मजबूत आणि टिकाऊ असे. ही किमया गेल्या ३२ वर्षांपासून नाशिकमध्ये स्थित असलेले आणि मूळचे पालघर जिल्ह्यातील जव्हारचे रहिवासी अनंत नारायण खैरनार साधत आहेत...

वंदना : पर्वतांची 'स्नो'राणी

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या स्कीईंग या अनोख्या खेळामध्ये सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे उत्तराखंडच्या छोट्याशा खेड्यातून आलेली वंदना पंवार.....

पेरावे तसे उगवते

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदतीसाठी याचना केल्याचे वृत्त आहे. यावेळी मात्र, आयएमएफने पाकबाबत कठोर भूमिका घेत आधीच आर्थिकदृष्ट्या विविध समस्यांचा सामना करत असलेल्या पाकला यापुढील काळात आर्थिक मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त आहे...

वाचव रे देवा, अल्ला, येशू

काही वर्षांपूर्वी नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचा 'यंग,' 'चार्मिंग,' 'डॅशिंग' वगैरे अध्यक्ष होऊ घातलेला नेता मीच होतो. 'तसे आमचे ठरले होते.' माझ्यासमोर कुणी उभे राहू शकत होते का?..

भाजप-सेनेवर राजकारण्यांची 'अतिवृष्टी'

विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमधून या महापुराचे पाणी भाजप-सेनेच्या आवारात एवढ्या प्रचंड प्रमाणात घुसत आहे की, शेवटी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा प्रवाह थोपविण्यासाठी पुढे यावे लागले आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांच्या नावाने आणाभाका घेण्यास भाग पाडण्यात आले...

सिंहावलोकनाची गरज का?

स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी केलेले वैचारिक प्रबोधन हा एका भारतीय लोकयुगाचा प्रारंभ ठरला. भारताचे 'राष्ट्र' म्हणून पुनरुत्थान व्हावे, असा टिळकांचा ध्यास होता. अखिल भारतीय पातळीवर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे टिळक हे पहिले नेते! अशा एका बहुआयामी लोकनेत्याच्या विचारांचा आणि जीवनशैलीचा जागर करण्याचा आजपासून सुरू झालेल्या या लेखमालेतून आमचा हा प्रयत्न. दुर्मिळ ऐतिहासिक साधनांतून केलेली टिळकांच्या व्यक्तिमत्वाची ही मांडणी नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन प्रदान करेल, तसेच आक्षेपाचे निराकरणही करेल. ..

बदलापुरातील जलप्रलय आणि रा. स्व. संघाचे मदतकार्य

आपत्ती नैसर्गिक असो वा मानवी, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक सदैव मदतीसाठी तत्पर असतात. याचाच प्रत्यय दि. २६-२७ जुलै रोजी झालेल्या बदलापूरमधील मुसळधार पावसादरम्यानही आला. त्यावेळी स्वयंसेवकांनी राबविलेल्या मदतकार्याची माहिती देणारा हा लेख.....

विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत

बोलताना आपल्या तोंडातून निर्माण होणारा आवाज- उद्गार, शब्द या संबोधनाने ओळखला जातो. अशा असंख्य उद्गारांचे म्हणजे शब्दांचे एक वाक्य तयार होते आणि ते वाक्य आपल्याला काही निश्चित संकेत देत असते आणि अर्थ सूचित करत असते. असे शब्दसुद्धा प्रतीकशास्त्र म्हणजेच चिह्न संस्कृतीचा एक भाग आहेत...

वाघ आणि आव्हाड

आपण नेते व पवारसाहेबांचे नाईकांच्या पक्षविरोधी कृती व उचापतींकडे वारंवार लक्ष वेधले. पण, उपयोग झाला नाही. कोणीही काही केले नाही की कारवाई झाली नाही, असे आव्हाड सतत ठामपणे सांगत होते. याचा अर्थच पवारसाहेब पक्षातल्या अशा हानीकारक कारवायांना पाठीशी घालत होते किंवा त्याला प्रोत्साहन देत होते, असाच होतो ना? मग चित्राताई काय वेगळे सांगत आहेत? मग ज्यांनी पक्षांतर केले, त्यांचा दोष काय? त्यांना पक्षात कुठला आवाज नव्हता की, त्यांच्या साध्या तक्रारीही कोणी दूर करीत नसेल, तर राष्ट्रवादीत राहायचे कशाला?..

मोठे पाऊल...

व्यवहारासाठी आणि स्वार्थासाठी लोक एकत्र राहतात. असा लोकसमूह ‘राष्ट्र’ होत नाही. ‘तिहेरी तलाक विधेयक’ म्हणजे ‘समान नागरी संहिता’ नाही, हे जरी खरे असले तरी ‘समान नागरी संहिते’च्या दिशेने ते टाकलेले फार मोठे पाऊल आहे. एका अर्थाने हे विधेयक म्हणजे आपल्या राष्ट्र जीवनातील मैलाचा दगड ठरणारी घटना आहे...

यात्रा, रॅली, सभा आणि परिषदा...

सध्या महाराष्ट्रात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला मिळत असलेल्या जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विरोधक अक्षरशः हबकून गेले आहेत. तशा यात्रा मग इतर पक्षांनीही सुरू केल्या आहेत. भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'च्या आधी निघाली ती शिवसेनेची 'जनआशीर्वाद यात्रा', तर सत्ताधारी दोन्ही पक्ष यात्रा काढतात, हे बघून राष्ट्रवादी काँग्रेसनेही या 'यात्रा महोत्सवा'त उडी घेतली...

नेदरलँड्समधील छुपा दहशतवाद

नुकतेच नेदरलँड्स मध्येही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याला अर्थात बुरखा घालण्याला प्रतिबंध केला आहे. बुरखा घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. इतकेच नव्हे तर तसे केले तर १५० युरोंचा दंडही ठोठावण्यात येणार आहे...

संवर्धन आवश्यकच

राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू दिमाखाने उभ्या राहत आपला गौरवशाली इतिहास आजमितीस सांगत आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्येदेखील अनेक पुरातन मंदिरे असून त्यांनादेखील ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे...

कथा ही नरा-वानराची...

पॅथॉलॉजी म्हणजे रोगनिदान करण्याचं शास्त्र म्हणजे तसे इथे वेगवेगळ्या मानवी रोगांवर प्रतिबंधक अशी लस वगैरे शोधण्याचे प्रयोग होणारच होते. पण, खरा 'ग्रँड प्लॅन' होता तो 'वानर-नर' बनवण्याचा.....

भारताची 'टायगर राजकुमारी'

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त देशभरातील वाघांची संख्या वाढल्याचे आकडेही समोर आले. तेव्हा, अशाच एक व्याघ्रअभ्यासक आणि वन्यजीव शास्त्रज्ञ लतिका नाथ यांच्याविषयी.....

होय, इस्लाम खतरे में है...

नुकताच चीनने राजधानी बीजिंगमधील इस्लामी प्रतीकांना हटविण्याचा निर्णय घेतला व आपला राष्ट्रवादी बाणा दाखवून दिला. मुळात कम्युनिस्ट हुकूमशाही अस्तित्वात असली तरी चीन 'राष्ट्र' ही संकल्पना मानतो आणि देशाच्या सुरक्षेला महत्त्वही देतो...

दुसऱ्या तळ्याच्या शोधात...

सत्तेवर असताना शरद पवार यांनी पक्षफोडीचे राजकारण केले नाही काय? छगन भुजबळ यांना शिवसेनेतून कोणी फोडले? गणेश नाईक यांना कुणी पळविले? जसे कर्म करावे, तसे कर्मफळ मिळते. कधी ना कधी याची सव्याज परतफेड केली जाईल, हे लक्षात ठेवावे लागते. हा सृष्टीचक्राचा अबाधित नियम आहे. जे पेराल तेच उगवेल...

मंगळसूत्र गहाण ठेवून आज कोटींची उलाढाल करणारी 'भैरीभवानी इंटरप्रायजेस'

'भैरीभवानी' हे गंगाराम सनगले यांच्या कुलदैवतेचे नाव. देवीचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे, अशी श्रद्धा गंगाराम यांची असल्याने त्या कृतज्ञतेपोटी त्यांनी कुलदैवतेच्या नावाने कंपनीचे नामकरण केले. कंपनी छोटी मोठी कामे करू लागली. पुढे मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्याचं काम खाजगी कंपन्यांना देऊ लागल्या...

जमाना ई-वाहनांचा

देशभरात ई-वाहनांना प्रोत्साहन देणारे धोरण केंद्र सरकारने आखले असून हे शासनाने उचललेले हे एक योग्य पाऊल म्हणावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना ई-वाहनांच्या उद्योगांसाठी, खरेदीसाठीच्या काही सवलतीही जाहीर केल्या. तेव्हा, एकूणच ई-वाहनांची उपयोगिता विशद करणारा हा लेख.....

राधेयचा मृत्यू- भाग १

विजेप्रमाणे लखलखत आणि आगीचे लोळ ओकत ते अस्त्र अर्जुनाकडे झेपावले. सारेजण श्वास रोखून पाहत होते. पांडवांनाही क्षणभर वाटले की, आता अर्जुन काही वाचत नाही...

मग 'त्या' धर्मस्थळांचे काय?

जर खरेच मुस्लिमेतर धर्मीयांबद्दल पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपुलकी आहे, तर त्यांच्यावर होणार्‍या अन्याय-अत्याचारांचे काय? हजारोंच्या संख्येने अजूनही बंद पडून असलेल्या मंदिर आणि गुरुद्वारांचे काय?..

विमानभेदी ‘आर-27’

भारताने रशियाकडून ‘एस-400’ ही विमानभेदी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर अमेरिकेने आक्षेप घेतला होता. अमेरिकेला वाटत होते की, भारताने रशियाच्या ‘एस-400’ प्रणालीऐवजी आपली थाड ही प्रणाली घ्यावी..

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊंच्या शाहिरीचा बाज हा माणसाच्या जगण्याचा विषय होता. हा विषय धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणिवेचा जागर होता. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावापुढे आपोआपच ‘लोकशाहीर’ ही उपाधी लागली...

समाज संघटन

दासबोधाच्या सुरुवातीस जरी समर्थ रामदास स्वामी म्हणाले की, ‘बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले।’ तरी त्यांच्या मनात लोकांना केवळ अध्यात्मज्ञान सांगावे, असा उद्देश नव्हता. त्यांना लोकांना ‘शहाणे’ करायचे होते. ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका।’ असे स्वामींनी म्हटले आहे. ..

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ या दोघांना एकमेकांपासून वगळताच येणार नाही. अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचा, वैचारिकतेचा आणि साहित्यिकतेचाही कस शाहिरी रूपात पुढे आला, तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये...

पहा, जवळी तो त्र्यंबक !

‘त्रि+अम्बक’ म्हणजेच तीन कामे करणारी ती महान अंबा म्हणजे आई. ही जगदंबा आपल्या महनीय प्रसवशक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाला जन्माला घालते. म्हणूनच ती ‘ब्रह्मा’ आहे. केवळ जन्म देऊन ती आपल्या बाळांना वार्‍यावर सोडत नाही, तर सर्वांचे पालन करणारी ती ‘विष्णू’ आहे आणि शेवटी सर्वांना आपल्या कुशीत घेणारी म्हणजेच प्रलय करणारी ती ‘महेश’ पण आहे...

‘फकिरा’ कादंबरीतील सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय विचार संपदा!

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ‘फकिरा’ (१९५९) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी समजली जाते. अण्णा भाऊ लिखीत ही ‘मास्टरपीस’ कादंबरी ऐतिहासिक व समकालीन आहे. ‘फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राष्ट्र, राजकीय व्यवस्था, प्रेम अशा उच्च मूल्यांची पेरणी करताना दिसतात. याचबरोबर दिनदलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा, राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांचीही शिकवण देतात म्हणून ‘फकिरा’ सामाजिक व राष्ट्रीय उदात्त व उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला दस्तऐवज ठरतो...

अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका

स्त्रीने कसे असावे, याचे ठोकताळे समाजमनाने त्याचे त्यानेच ठरवलेले असतात. ते कालही ठरवलेले होते, आजही आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या 'ठरवलेपणाला' या 'साचेबद्धपणा'ला अलगद नाकारत स्वत:चे अवकाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणार्‍या आहेत. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. ..

शिवराय आणि अण्णा भाऊ

महाराष्ट्रही वीरांची, थोरांची भूमी... छत्रपती शिवाजी महाराज ते अगदी अण्णा भाऊ साठेंपर्यंत ही नामावली आहे. अण्णा भाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांची महती अगदी परेदशात गायली. त्याचा संदर्भ.....

उभयसृपांचा अवलिया पालक

उभयसृपांचा अवलिया पालक..

समाज घडविणारे महापुरुष : अण्णा भाऊ

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माझे अल्प विचार मांडत असताना मला अतिशय आनंद होत आहे. अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी, समीक्षकांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांना अण्णा भाऊ जसे दिसले तसे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

अण्णा भाऊ कम्युनिस्ट नव्हते!

‘अण्णा भाऊ कम्युनिस्टच होते,’ असे सांगण्याची धडपड काही लोक सातत्याने करताना दिसतात. हेतू हाच की, अण्णा भाऊंना मानणाऱ्या समाजाने ‘लाल बावटा’ हातात घ्यावा. अण्णा खरोखरच कम्युनिस्ट होते का? त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर उत्तर स्पष्ट येते की, ते कम्युनिस्टांसोबत होते, पण ते कधीही कम्युनिस्ट नव्हते...

अण्णा भाऊंच्या साहित्यातील समाजदर्शन

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय, समूहाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे.हे अण्णा भाऊ जाणतात आणि माणसाला केंद्रस्थानी लिखाण करताना त्यांच्या आसपासच्या सर्व गोष्टींची नोंद अण्णा भाऊ घेताना दिसतात. त्यामुळे विविध समाजगटाचे दर्शन अण्णा भाऊंच्या ..

समाजपुरुषाला विनम्र अभिवादन

समाजपुरुष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने त्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला वंदन. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आज अभिमानाने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. महामंडळावर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अण्णा भाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाचे हित साधायचे आहे. आज महामंडळापुढे अनेक प्रश्न असले तरी त्या प्रश्नांचा मागोवा घेताना मला एकटे वाटत नाही. कारण, महामंडळासोबत माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अपूर्व नेतृत्व आहे. तसेच मंत्री चंद्रकांतदादा ..

शुभेच्छा आणि मौन

सर्व विरोधी पक्ष संपून जातात की काय, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात सध्या वर्तवली जात आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारचा कारभार जरी चांगला असला तरी विरोधी पक्षांची एवढी वाताहत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते...

भारत सरकारची ‘जलशक्ती’ अभियान मोहीम

सद्यस्थितीनुसार ग्रामीण भागातील सुमारे 80 टक्के घरांमध्ये नळाचे पाणी मिळण्याची वानवा आहे. देशातील प्रत्येक घरामध्ये 2024 पर्यंत नळातून पाणी मिळावे, या उद्देशाने 1 जुलै 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलशक्ती अभियाना’ची घोषणा केली. त्याविषयी.....

समाज उत्थानाचा शिवगोरक्ष आदेश

राईनपाडा येथे लोकांचा गैरसमज झाला आणि डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेकरी तरुणांना नाहक जीवाला मुकावे लागले. समाज भिक्षेकरी आहे. पालात राहतो. त्याचे पालातले वास्तव्य संपून त्याच्या हातातील भिक्षेकऱ्यांची झोळी जाऊन ते खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न, स्वावलंबी बनावे यासाठीचे विचारमंथन समाजातील मान्यवरांनी केले. त्यातूनच मग भटक्या जमाती संघाची स्थापना करण्यात आली...

गुंजन : एक लढवय्यी ‘कारगिल गर्ल’

अनेक वीरांचे हौतात्म्य आणि शौर्याची किंमत चुकवून भारताने कारगिल युद्ध जिंकले. या युद्धात शेकडो जवानांचे प्राण वाचविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या लढवय्या ‘कारगिल गर्ल’च्या आयुष्याविषयी.....

बोरिस जॉन्सन ‘ब्रेक्झिट’ देणार का ‘एक्झिट’ घेणार?

महासंघ आणि थेरेसा मे सरकारने वाटाघाटी करून मान्य केलेला मसुदा ब्रिटनच्या संसदेने तब्बल तीन वेळा अमान्य केल्याने त्याची परिणिती मे यांच्या राजीनाम्यात झाली. २२ जुलै, २०१९ रोजी बोरिस जॉन्सन यांची हुजूर पक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड झाली आणि त्यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला...

आणखीन एक 'अण्णा भाऊ'

'क्लास वन ऑफिसर' म्हणून निवृत्त झालेले तुकाराम साठे आज शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक ऐक्य यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यातील मानवी संवेदनांच्या भावनांचा हिंदोळा घेणारा हा लेख.....

...अहो राव, यात नवे काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली...

खासगी क्षेत्रातील आरक्षणाची मागणी आणि राजकारण

आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण जाहीर करुन भारतीय राजकारणात आणि समाजकारणात एक नवीन पायंडा घातला. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून याच धर्तीवर सत्तेत आल्यास आरक्षण देण्याची गोष्ट पुढे केली. परंतु, ही मागणी नवीन नसून जुनीच आहे...

मेहबूबा मुफ्ती, एवढा आक्रस्ताळेपणा कशासाठी?

मेहबूबा मुफ्ती म्हणतात, "काश्मीरला विशेष दर्जा देणारे 'कलम ३५ अ' आणि 'कलम ३७०' यांना धक्का लावल्यास एखादा बॉम्ब शिलगावल्यासारखे ते ठरेल. 'कलम ३५ अ' रद्द करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास हाहाकार माजेल." त्यांचे हे वक्तव्य आक्रस्ताळेपणाचेच म्हणावे लागेल...

नक्षल्यांचा शहीद आठवडा

गडचिरोलीमधील गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी, रतन उर्फ मुन्ना, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरिना उर्फ शांती दानू होयामी, मीना धूर्वा, भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो या सहा नक्षल्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. सर्वांना पकडण्यासाठी सरकारने लाखोंची बक्षिसे लावली होती. ..

'स्पॅरोमॅन ऑफ इंडिया'

चिमण्यांच्या संरक्षणासाठी आजवर तब्बल ९० हजारांहून अनेक घरट्यांचे वाटप करणार्‍या जगत किनखाबवाला यांचा प्रयोग १० टक्के जरी यशस्वी झाला, तर त्यांच्या कामाचे चीज झाले, असे ते समजतात. ..

व्यर्थ न जावो बलिदान!

कितीही मोठे तंत्रज्ञान आले, तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले, तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो...

देण्यासारखे काहीतरी...

'देण्यासारखे काही नाही' म्हणणे आणि 'असलेल्यातला मोठा हिस्सा बळकावून बसण्याला' 'गुरूमंत्र' म्हणता येणार नाही. किंबहुना, जेव्हा तुमच्या नावाने वा नेतृत्वाने जिंकता येत नसते, तेव्हा लढवय्यांना अधिक प्रोत्साहन म्हणून संधी द्यायची असते. त्याचीच वानवा असेल, तर त्यांना अन्यत्र वाट शोधावी लागते. संधी शोधत इतरत्र मुलूखगिरी करावीच लागते. निदान शरद पवारांना जे समजत नसेल का? अजितदादांची गोष्ट वेगळी आहे...

दंडाबरोबर दंडकही हवा!

शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे तर ते शहर आपलेसे असते. तसेच, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकानेदेखील हे शहरदेखील आपलेच आहे, असा विचार केला तर अस्वच्छतेचा लवलेशही भारतातील कोणत्याही शहरात दिसणार नाही. ..

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय होणार?

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ याही 'घड्याळ' काढून हाती 'कमळ' घेणार आहेत. त्यामुळे आकाशाला कुठे ठिगळ लावावे, अशी भयाण परिस्थिती या दोन काँग्रेसी पक्षांवर ओढवली आहे. 'पवार' कुटुंबीय सोडून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने भाजप-शिवसेनेत प्रवेश केला, तर कोणालाही आश्चर्य वाटायलो नको, अशी सध्याची परिस्थिती आहे...

मराठमोळा लढवय्या अधिकारी

नुकतीच भारताच्या उपलष्करप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती जाहीर झाली. त्यानिमित्ताने या मराठमोळ्या लढवय्या सैन्याधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.....

ध्वज विजयाचा उंच धरा रे...!

२६ जुलै, १९९९ या दिवशी 'ऑपरेशन विजय' सफल संपूर्ण झालं. तेव्हापासून दर वर्षी २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्य आणि वायूदलाच्या पराक्रमाची ही शौर्यगाथा.....

जंगलातला 'शिक्षक'

एरवी शिक्षणापासूनही वंचित असणार्‍या वनवासींसाठी केरळच्या एका अवलियाने मात्र चक्क ग्रंथालय सुरु केले. अशा या 'जंगलातले शिक्षक' म्हणून ओळखल्या जाणार्‍या पी. व्ही. चिन्नातम्बी यांची ही प्रेरणादायी कहाणी.....

कोस्टल रोड : उपकारक की अपकारक?

मुंबई उच्च न्यायालयाने अनेक कारणांमुळे मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पावरील विविध आक्षेप आणि उपाययोजना यांचा नीट अभ्यास करायला हवा...