मंथन

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग दोघही महान क्रांतिकारक. भगतसिंग निरिश्वरवादी किंवा नास्तिक आणि सावरकरवादी हे हिंदुत्ववादी असले तरी दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता आणि वेळीवेळी दोघांनीही तो व्यक्त केला होता...

वेध नव्या महाराष्ट्राचा

"येत्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्र भारतातील इतर राज्यांशी नव्हे तर प्रगत देशांशीच स्पर्धा करेल," असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. सा. 'विवेक' आयोजित 'वेध नव्या महाराष्ट्राचा' या थेट संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतील दलाल स्ट्रीट स्थित मुंबई शेअर बाजाराच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक उद्योगपतींनी सहभाग घेतला. प्रथम नव महाराष्ट्राची भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास ..

माझ्या माहेरीचा उंट...

कुठल्याही विषयावर आणि कुठल्याही वेळी, भाजपाशी संबंधित खोटेपणा करण्याला आजकाल पुरोगामी पुण्यकर्म ठरवले जात असते. साहजिकच तपासाशी असहकार्य करण्याला चिदम्बरम् कायद्याचा सन्मान करणे म्हणतात आणि पुरोगामी शहाणे नंदीबैलासारखी मान हलवून त्याला दाद देत असतात...

देण्यासारखे काहीतरी...

असल्या डावपेचातून कुठले बीज आपण राजकारणात रुजवीत आहोत, त्याचे भान शरद पवारांनी कधी ठेवले नाही. मिळेल त्या पक्षातून व मिळेल त्या आमदाराला फोडण्याला ते धूर्तपणा समजत राहिले. आज त्यांचेच डावपेच त्यांचे विरोधक वापरत असतील, तर त्यावर वैचारिक टिप्पणी करण्यात अर्थ नाही. पण विषय गंभीर इतकाच आहे, की त्यांच्याच अनुयायांचा पवारांवर विश्वास उरलेला नाही...

कॉंग्रेसचे भवितव्य...

नड्डा असोत की बिर्ला, शाह असोत; त्यांनी तरुण वयात संघ वा पक्षाच्या युवा संघटनेत काम केलेले आहे. त्याला विचारसरणीचे संस्कार म्हणतात. चिदम्बरम्, कपिल सिब्बल वा राजीव शुक्ला अशापैकी किती ज्येष्ठ कॉंग्रेसनेते तळागाळातून कार्यकर्ता म्हणून भरती होऊन या पदापर्यंत पोहोचले आहेत? त्यांना आपल्या पक्षाचे विचार वा संस्कारही ठाऊक नाहीत. इतिहासाची ओळख नाही. पुरोगामी वा सेक्युलर अशा शब्दांची पोपटपंची करण्यापलीकडे त्यांना कॉंग्रेस ठाऊक नाही...

कॉंग्रेस हा पक्ष नाही!

यावेळी लोकसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारत असा शब्दही उच्चारला नाही. कारण आता हळूहळू लोकांनाही कॉंग्रेस म्हणजे एक पक्ष नसून, ती एक विकृत मानसिकता असल्याचे लक्षात आलेले आहे. म्हणून तर मतदाराने ज्या पद्धतीने मतदान केले, त्यातून न..

हुंडाबळीचे समर्थक पुरोगामी...

अगोदर कोण कोणाला मारतो, त्यावर जगण्याच्या स्वातंत्र्याचा निवाडा होत असतो. कारण जगलात तरच पुढली सगळी स्वातंत्र्ये असू शकतात किंवा उपभोगता येत असतात. ज्यांना त्यात गल्लत करायची असते, ते पुरोगामी आणि जिहादी घातपाती यात तसूभर फरक असू शकत नाही. जिहादी घातपाती दूरचा शत्रू असतो आणि असा दिवाळखोर पुरोगामी जवळचा शत्रू झाला आहे...

काकाला मिश्या नसल्या तर?

मतदान यंत्राविषयी बेछूट थापा मारणारा शुजा हुसेन असो, मोदींना पराभूत दाखवणारा कुठला मतचाचणीचा कल्पनविलास असो, त्यात रममाण होणारा एक बुद्धिवादी अभ्यासकवर्ग आपल्याकडे आहे आणि त्याला खूश करण्यासाठी असला खेळ चालत असतो...

सन्मान, की अपमान?

सन्मान, की अपमान?..

संस्कृतीतला फरक

विरोधी पक्षनेता म्हणून वाजपेयींनी कधी तो विषय संसदेत काढला नाही, की पंतप्रधान राव किंवा सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाची कोंडी करण्यासाठी हा मुद्दा वापरला नाही. उलट अडचणीची वेळ आली तेव्हा विरोधी नेता असूनही सरकारला मदतच केली होती. आजच्या कॉंग्रेस अध्यक्षांना वा त्यांच्या अन्य ज्येष्ठ नेते, सहकार्‍यांना तो प्रसंग ठाऊक नसेल कदाचित. असते तर त्यांनी गोव्यात भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याच्या असल्या असंस्कृत खेळी करणार्‍यांना वेळीच रोखले असते...

पीरफ़कीर इमरान खान

शनिवारी पाकिस्तानचा बाविसावा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा शपथविधी पार पडला. त्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये नखशिखांत आपला देह झाकून घेतलेली एक महिला उपस्थित होती. तिचे नाव बुशरा मनेका. ही इमरानची नवी आणि तिसरी पत्नी आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा निकाह पार पडला. बुशराला आधीच्या पतीपासून पाच मुले आहेत, आणि तिच्याच प्रयत्नांनी इमरान याने दुसरा विवाह तलाकमध्ये परिवर्तित केला, असे म्हटले जाते...

बफर्स आणि बोफोर्स...

बफर्स निकामी झाले, मग रेल्वेगाडीचे नुकसान होतेच आणि त्यातल्या प्रवासी किंवा सामानाचे रुळावर गाडी असूनही भीषण नुकसान होत असते. आजच्या कॉंग्रेसची जी दुरवस्था दिसते, त्याचे नेमके तेच कारण आहे. या शतायुषी राजकीय पक्षामध्ये जी बफर्स व्यवस्था योजलेली आहे, ती बाहेरून येणारे हल्ले थोपवणे वा पहिला धक्का आपण सोसणे, याच्या पलीकडे गेलेली आहे...

‘फ़िदायिनी’ राजकारण.

‘फ़िदायीन’ म्हणजे आत्मघातकी योद्धा- जो आपल्या मृत्यूला कवटाळून शत्रूचे नुकसान करून घेण्यात आपले हौतात्म्य शोधतो! मुंबईत दहा वर्षांपूर्वी आलेली अजमल कसाब टोळी वा कश्मिरात नित्यनेमाने मारले जाणारे पाकिस्तानी जिहादी, त्या मानसिकतेचे असतात..

एक मालवणी किस्सा

घरातलीच गोष्ट आहे. घरातली म्हणजे कुटुंबातली. माझ्या वडिलांकडे जुन्या काळातली एक डॉज गाडी होती आणि तिचे पंक्चर झालेले चाक बदलण्याच्या कामात ते गर्क झालेले होते. तेव्हाच त्यांचा एक मित्र घरी आलेला आणि थोड्या वेळात चाक बदलून मोकळा होतो..

वादग्रस्त आणि निर्विवाद...

गेल्या काही दिवसांपासून न्यायमूर्ती लोयांच्या शंकास्पद म्हणजे वादग्रस्त मृत्यूवरून खूप खळबळ उडवून देण्यात आली आहे. अगदी गतवर्षीच्या अखेरीस, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनीही बंडाचा झेंडा हाती घेताना त्यावरून पुरोगामी वादळ उठवले होते. अर्थात, कुठल्याही शंकास्पद मृत्यू वा हत्येबद्दल प्रश्न विचारले जाणे चुकीचे म्हणता येणार नाही. पण, अशा शंका वा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ व कारणही तितकेच महत्त्वाचे असते. तो संदर्भ सोडून अशा प्रश्नाकडे न्यायाची मागणी म्हणून बघता येणार नाही. जेव्हा अशाच स्वरूपाच्या ..

चिदंबरम् यांची आराधना

अमिताभच्या आधीचा सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना याला आराधना चित्रपटाने खूप मोठा करून ठेवले. त्यात त्याचा डबलरोल होता. यापैकी पुत्र राजेशची प्रेयसी म्हणून फरिदा जलालने अप्रतिम काम केले होते. पण, आज तिचे स्मरण त्या अभिनयापेक्षाही त्याच चित्रपटातील एका गीतामुळे होते. काहीसे संवादमय असलेल्या या गीतामध्ये राजेश आपल्या प्रेयसीकडून प्रेम कबूल करण्याच्या प्रयत्नात असतो आणि ती त्यात शब्दाने फसायला तयार नसते, असे गीत होते. बागो में बहार है? असे प्रश्न तो विचारत जातो आणि नकळत तिने होकार द्यावा, असा मध्येच प्रश्न ..

‘मर्यादा पुरुषोत्तम’ - ओवैसी!

हैदराबादचे लोकसभा सदस्य असाउद्दीन ओवैसी हे आज देशातील मुस्लिमांचे सर्वाधिक बोलके नेता झालेले आहेत. कुठल्याही विषयावर ते अखंड मुक्ताफळे उधळीत असतात. तिहेरी तलाक असो किंवा अयोध्येतील रामजन्मभूमीचा विषय असो, त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकारच आहे. कारण त्यांनी राज्यघटनेने दिलेला अधिकार वापरून मुस्लिमांचे नेतृत्व पत्करलेले आहे. पण, हे विषय सोडूनही ओवैसी कुठल्याही बाबतीत कायम बकवास करीत असतात. त्यांचे उद्दिष्ट ठरलेले आहे. लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे व वक्तव्यातून धुरळा उडवणे, हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. ..