महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला ? असा खोचक सवाल त्यांनी विचारत सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला...

मुंबई विद्यापीठाच्या वन क्लॉक टॉवरला युनेस्कोचा पुरस्कार

मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान समारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला...

अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ..

राज ठाकरे ईडी चौकशी : मनसे नेते संदीप देशपांडे ताब्यात

राज ठाकरे ईडी चौकशी : मनसे नेते संदीप देशपांडे ताब्यात..

'श्रावण क्वीन डोंबिवली' : 'ती'च्याकडून 'ती'च्यासाठीचे सर्वात मोठे व्यासपीठ

'श्रावण क्वीन डोंबिवली' : 'ती'च्याकडून 'ती'च्यासाठीचे सर्वात मोठे व्यासपीठ..

जागावाटपावरून आंबेडकर-ओवैसींत ठिणगी?

२६ ऑगस्टला हैदराबादेत बोलावली बैठक..

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून राणे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राणे यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे...

आरेतील वनवासी पाडे 'मेट्रो'पासून दूर अंतरावर : भाजप नगरसेवक अभिजित सामंत

उपजीविका वनसंपदेवर अवलंबून नाही : अभिजित सामंत..

केवळ ट्विटर हाताळण्यासाठी ६ कोटींची उधळपट्टी! पालिकेचे दररोज ५० ते ६० हजार खर्च होणार

जनसंपर्क विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग आणि माध्यम सल्लागार विभाग असतानाही केवळ माहितीचा जलद स्रोत म्हणून ट्विटर हाताळण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे दिवसाला सुमारे ५० हजार याप्रमाणे तीन वर्षांसाठी सहा कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची विरोधकांतर्फे मांडण्यात आलेली उपसूचना बहुमताने फेटाळून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.मुंबईकरांना पालिकेच्या विकासकामांची माहिती व तक्रारी ऐकण्यासाठी पालिकेत विविध माध्यमे उपलब्ध असताना पालिकेने याच धर्तीवर आता केंद्रीय सोशल मीडिया ..

कर्नाळ्याच्या 'या' निसर्गपर्यटन आराखड्यास मान्यता : वनमंत्री मुनगंटीवार

कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या ११.६५ कोटी रुपयांच्या निसर्गपर्यटन आराखड्यास तत्वत: मान्यता..

देशात बहुसंख्य हिंदू असल्याने देश त्यांच्या मतानुसार चालणार : चंद्रकांत पाटील

'देशात बहुसंख्य हिंदू नागरिक राहतात. त्यांच्या मताप्रमाणेच देश चालणार आहे. अधिकारीही हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत, त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील. प्रशासन तुम्हाला त्रास देण्यासाठी बसलेले नाही. तुमच्या सर्व मागण्यांवर प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढू', असे विधान पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले...

कोकणातील रस्त्यांची दुरुस्ती करावी : राज्यमंत्री रर्वींद्र चव्हाण

गणेशोत्सवानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा..

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात असुरक्षितता

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदार सुरू आहेत. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबता थांबत नाही. बुधवारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांच्या मनात राजकीय कारकिर्दीबद्दल असुरक्षितता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले...

पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन - चंद्रकांत पाटील

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन लोकांना दिलासा दिला. ..

खुनाच्या प्रकरणामध्ये छोटा राजन दोषी

२०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले..

एमआयडीसीतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत

एमआयडीसीतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत..

‘हिंदुत्व आणि झिओनिझम’विषयावर चर्चासत्राचे आयोजन

'इंडो-इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशन’ आणि इस्राईलचे वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने 'हिंदुत्व आणि झिओनिझमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादाविषयी नेत्यांच्या संकल्पना’ या विषयवार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे..

भाजपचा 'पंच' : महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदी पाच नव्या नेत्यांची नियुक्ती

मुंबईतून माजी खासदार किरीट सोमया यांचा समावेश..

'मुंबई तरुण भारत'च्या दिवाळी अंकास 'मराठी वृत्तपत्र लेखक संघा'चा पुरस्कार जाहीर

दै. 'मुंबई तरुण भारत'च्या दिवाळी अंकास 'प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक' पुरस्कार जाहीर..

नुकसानीचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश : पंकजा मुंडे

पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत..

पूरग्रस्तांसाठी बच्चन, अंबानींचा मदतीचा हात

पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून ५ कोटींची तर अमिताभ बच्चन यांनी ५१ लाखांची मदत केली..

प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीजचे भूमिपूजन

‘प्रा. बाळ आपटे सेंटर फाॅर स्टडीज इन स्टुडंट ॲंड युथ मूव्हमेंट’ या केंद्राचे भूमिपूजन रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले..

मुंबईतून पावसाची माघार; उकाडा मात्र वाढणार

मुसळधार पावसानंतर राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये कोरडे हवामान दिसून येत आहे...

श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरीसाठी तिनशे ज्यादा बस

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे. ..

धुळ्यात एसटी बसचा भीषण अपघात : १३ ठार

धुळ्यातील दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद-शहादा एसटी बस आणि कंटेनर यांच्या धडकेत १३ जण ठार झाले. तर २० जण जखमी असून त्यापैकी ६ प्रवासी गंभीर आहेत, ..

'ग्रंथसंपदेला नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

प्राचीन इतिहास, संस्कृती वारसा आणि संतांची सांस्कृतिक मूल्याधिष्ठित विचारधारा ही महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. जुने संत साहित्य आणि त्यांचे निरुपण, भावार्थ नवीन पिढीसाठी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथसंपदेला डिजिटलायजेशन सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले...

'काम करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करू' : नितीन गडकरी

आठ दिवसात समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेल असा इशारा आपण परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच आपण लालफितीच्या कारभाराच्या विरोधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ..

योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' निमित्त योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग ..

प्लास्टिकमधून होणार इंधननिर्मित, पुणे महापालिकेचा प्रकल्प

प्लास्टिक कचर्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या कचर्यावर प्रक्रिया करून त्यामधून इंधननिर्मिती केली जाईल. ..

गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको, गणेशोत्सव समन्वय समितीची ‘आचारसंहिता’

देशभरासह जगाचे आकर्षण असलेल्या मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, सजावटीसाठी वारेमाप खर्च न करता त्यातील निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा, अशी आचारसंहिताच सावर्जनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तयार केली असून मंडळांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आहे..

सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृध्द - विनोद तावडे

सोशल मिडिया म्हणजे करमणूक अथवा वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे उत्तम मूल्यनिर्मिती, समृध्द विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे...

मुंबईतील एक खड्डा १७ हजारांचा

२०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षात तब्बल ८,८७९ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने १५ कोटी ७१लाख २९ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे एका खड्ड्यावर तब्बल १७ हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज १७ आणि १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी १० वाजता कोविंद यांचे भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. ..

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मदतीची तीन वाहने पाठवण्यात आली आहेत. ..

गावगाडा उभा राहण्यासाठी कर्ज वाढले तरी चालेल

ग्रामीण भागातील गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे, अजून कर्ज झाले तरी चालेल पण गावगाडा उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका शासनाची आहे, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले...

प्रदूषण सरकारसमोरील मोठे आव्हान : नितीन गडकरी

प्रदूषणाची समस्या गंभीर असून जल आणि वायु प्रदूषणाची समस्या आमच्या सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाकडून (मँग्रोव्ह सेल) बोरिवलीच्या गोराई खाडीत उभारण्यात येणार्‍या कांदळवन उद्यानाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी त्यांनी देशातील प्रदूषणाच्या समस्येबाबत भाष्य करत मुंबई प्रदूषणमुक्त करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मुंबई महानगरपालिकेच..

'रोलींग स्टॅाक मेट्रो'च्या मॅाडेलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड कॅारिडोरमधील मेट्रो 3 मधील मेट्रो गाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी अनावरण झाले. ..

श्रावणातल्या पूजा करू लखलखीत आणि मंगलमय !

तांब्या-पितळ्याला स्वच्छ आणि लख्ख करण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी वापरली जाते . परंतु आता पितांबरी चांदीलाही नव्यासारखी चमक देते. इतकंच नव्हे तर पितांबरी शायनिंग पावडरमुळे आता तांबं , पितळ, चांदी, अल्युमिनियम आणि लोखंड अशा पाच धातूची भांडी नव्यासारखी लख्ख होतात..

मिसेस मुख्यमंत्री बनल्या 'विश्वशांतीदूत'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'विश्वशांतीदूत' नामांकन जाहीर करण्यात आले आहे. विश्वशांतीरक्षक आंदोलनाचे संस्थापक डॉ. ह्यूज यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला...

खुशखबर : मुंबई -पुणे रेल्वेसेवा पुन्हा रुळावर

जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा काही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती..

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात, तेलंगणात जाणारे पाणी बोगद्यातून नळगंगेत; मुंबई : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्य..

महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात !

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. अमृता फडणवीस यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. यावेळी निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

सावरकर स्मारकाचे स्वप्नील परब यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींचे प्रशिक्षक स्वप्नील दत्ताराम परब यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहर क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी करुन जिल्ह्याचा मान वृद्धिंगत केल्याबद्दल 'गुणवंत क्रीडा मार्गदर्शक' म्हणून हा पुरस्कार दिला गेला आहे...

महाराष्ट्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रवासीयांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. ..

वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांमुळे कलम ३७० रद्द : सरसंघचालक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण..

'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९'निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम

'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम..

प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन..

मुंबईत भारतीय कौशल्य संस्था उभारण्यात येणार- केंद्रीय कौशल्यविकास मंत्री

भारतात जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय यांनी म्हटले आहे. मुंबईत आज राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ..

महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना सेवा पदक

तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात..

‘गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...

राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ! केसरकरांचे राणेंना प्रतिउत्तर

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नऊ कोटींचा निधी आणला. माझ्या काळात साडेचार वर्षात जिल्ह्यासाठी ५६ कोटींचा निधी आणला...

उद्ध्वस्त किल्लारी उभारणारे प्रवीण परदेशी सांगलीत

महापुराच्या अस्मानी संकटानंतर पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना देण्यात आली आहे...

लघु उद्योग भारतीचा १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान रजत जयंती महोत्सव

लघु उद्योग भारतीच्या रजत जयंती महोत्सवास आयोजन नागपूर येथे १६ ते १८ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात सूक्ष्म आणि लघु उद्योगांशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे...

एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी कडक कायदे करावे : रामदास कदम

अवैधरित्या होणाऱ्या एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्याचा मासेमारी नियमन कायदा सुधारित करण्यात यावा. तसेच अशा पद्धतीने मासेमारी करणारे जहाज जप्त करण्याची तरतूद करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. ..

५ लाख पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील ५ लाख, ६० हजार, ९५३ पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली...

पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारकडून ६८१३ कोटींची मदत

राज्यातील पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने ६८१३ कोटींची मदत करणार असल्याची घोषणा आज केली. ..

'डीएसके'चे दुसरे बंधू पोलिसांच्या ताब्यात

डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांचा अमेरिकेला पलायन करण्याचा होता बेत..

लवासामुळे निसर्गाची हानी ; संभाजी भिडे

टीका करत पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले..

लवासामुळे निसर्गाची हानी : संभाजी भिडे

टीका करत पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले..

ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंच्या पूर्वतयारीसाठी 'ही' घोषणा

महाराष्ट्रातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी राज्य सरकारने केली महत्वाची घोषणा..

देशातील पहिल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन

आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना एकाच मंचावर आणून या क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे हे भारतातील सर्वात पहिले आयुष संमेलन भरणार आहेत. नवी मुंबईत सिडको विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावने यांनी ही माहिती दिली...

पूरबाधितांसाठी राज्यात ४४१ तात्पुरती निवासस्थाने

पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख, ६६ हजार, ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ..

'भाजप लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे': महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे...

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानकडून १० कोटींची मदत

साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी माहिती दिली..

'पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करणार': पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले. त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर सांगितले...

सांगली, कोल्हापूर ओसरतोय... पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य

सलग ७ दिवस बंद असलेला पुणे - बंगळुरू महामार्ग पुन्हा सुरु..

पूर ओसरतोय, आता सामना रोगराईशी

कृष्णा, पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाण्यात घट होऊ लागल्याने सांगली-कोल्हापूरमधील पुराचे पाणी आता हळूहळू ओसरत आहेत. परंतु, पूरपरिस्थिती निवळल्यानंतर आता आव्हान रोगराईचे असणार आहे. पूरग्रस्त भागात अतिसार, कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, ताप आदी साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्था-संघटना युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. ..

सांगलीत दीड लाख नागरिकांचे पूर्नवसन

३६ हजार जनावरांना चारा छावणी उपलब्ध ..

अतिवृष्टीमुळे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्या, अशी काळजी

सध्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूर परिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर, लेप्टोस्पॉयरोसीस आणि ताप या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ..

साथीचे आजार टाळण्यासाठी पुराच्या पाण्यात जाणे टाळा !

साथीचे आजार टाळण्यासाठी पुराच्या पाण्यात जाणे टाळा !..

बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा..

हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण म्हणजेच हिंदुत्व : सावरकर अभ्यासक अक्षय जोग

यंदा टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे, तर २०२३ साली लोकमान्य सेवा संघाची स्थापना शताब्दी आहे. यानिमित्ताने लोकमान्य सेवा संघाने दर महिन्याला एक अशा बाराही महिने चालणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. शनिवारी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी गुंफले. ..

आयआयटी मुंबईचा ५७ वा दीक्षांत सोहळा संपन्न

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) ५७ वा दीक्षांत सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल 'निशांक' प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रमुख भाषण झाले...

चूक दाखवा पण राजकारण नको! : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन..

चिंतामणी मंडळाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

चिंतामणीला कोल्हापूर सांगलीमधील पूरस्थिती 'लवकरात लवकर निवळू दे' असे साकडे..

महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्त भागात तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

महाराष्ट्रात सध्या पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यावर वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७ तर सांगली जिल्ह्यात ११७ तात्पुरते निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. ..

प. महाराष्ट्रासह कोकणात जाणाऱ्या खासगी बस रद्द

प. महाराष्ट्रामधील पूर्वपरिस्थितीमुळे खासगी बस मालकांनी घेतला निर्णय..

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कलाकारांनीही कंबर कसली

काळाची गरज लक्षात घेऊन लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे, क्षिती जोग, हेमंत ढोमे, श्रुती मराठे, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर अशा अनेक सृजनशील कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत कार्यात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ..

मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात

महाराष्ट्रात एकीकडे सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती ओढवली आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात अजूनही पावसाचे चिन्ह दिसत नाही. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कालपासून सुरूवात झाली. ..

जनकल्याण समितीतर्फे मदतीसाठी आवाहन

या मदतकार्यात रा. स्व. संघ, जनकल्याण समिती व शेकडो कार्यकर्ते, संस्था-संघटना पुढाकाराने सहभागी झाल्या आहेत..

कठीण समय येतां, संघ कामास येतो...

सांगली-कोल्हापुरातील मदतकार्यात रा. स्व. संघातर्फे अथक परिश्रम..

'नागला' वनपरिक्षेत्रातील अवैध दारुभट्टीवर वनविभागाचा छापा

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या 'नागला' वनपरिक्षेत्रामध्ये अवैध्यरित्या दारूभट्टी लावणाऱ्या इसमास येऊर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ..

पूरस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

अडीच लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले..

'जागतिक आदिवासी दिना'निमित्त वाड्यात भव्य शोभायात्रा

आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरांचं दर्शन..

चिपळूण शहराला मगरींचा वेढा

मगरींची सुखरूप सुटका करण्यासाठी वनविभाग तत्परतेने काम करत असून गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागांमधून नऊ मगरींचा बचाव करण्यात आला आहे...

कांदा उत्पादकांना ३१ ऑगस्टपूर्वी दुसर्‍या टप्प्याचे अनुदान

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारने बुधवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना ३१ ऑगस्टपूर्वी दुसर्‍या टप्प्याचे अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी ही माहिती दिली...

गणेश मंडळांना पालिकेचा दिलासा

गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून मिळणार्‍या ऑनलाईन परवानग्यांमध्ये ‘पासवर्ड’चा निर्माण झालेला घोळ दूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे...

तिरुपती देवस्थानास मुंबईत जागा

तिरुमला तिरुपती देवस्थानास मुंबईतील वांद्रे उपनगरात शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...

'बेस्ट' कर्जमुक्तीच्या दिशेने...

११३६.३१ कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी..

कृष्णा, कोयना, पंचगंगेचा कोप कायम

सांगली, कोल्हापूर जिल्हे अजूनही जलमय, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी..

राष्ट्रीय आपत्तीप्रमाणेच कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत : मुख्यमंत्री

पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात घेतली पत्रकार परिषद..

पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), प्रादेशिक सेना (टेरिटोरियल आर्मी), कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथक, कोस्ट गार्डच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात दाखल

सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती अद्याप कायम असून हजारो नागरिक पूराच्या पाण्यात अडकले आहेत. बजावकार्याही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर-सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरात दाखल झाले असून हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आदी मंत्रीही उपस्थित आहेत...

महापूर : सांगलीत बोट उलटून १४ जण बुडाले

महापूर : सांगलीत बोट उलटून १४ जण बुडाले..

राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात उभारणार १०० ई-चार्जिंग स्टेशन

मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई. एस एल कंपनी शंभर ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान दीडशे जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले...

पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका : कोल्हापूर, सातारा, सांगलीत जनजीवन विस्कळीत

पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाने घातलेल्या धूमशानामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूरात मात्र, परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. साताऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात येत असून लष्कर, नौदल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ..

महाविद्यालयीन निवडणुका लांबणीवर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय..

कोल्हापूरमधील पूरस्थिती गंभीर ; मुख्यमंत्री

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा..

विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रासाठी खुशखबर; मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात आज दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. आज पूर्व-विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्..

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीचा कायदा

सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठीची एक तज्ज्ञ समिती जाहीर केली..