जळगाव

‘हंगामा है क्यों बरपां!’

माणूस आपल्या सोयीचे असते त्याचे अनुकरण करतो आणि मग त्या प्रथा, प्रघात म्हणून स्वीकारतो, असे फ्रॉईड म्हणाला होता. ही मानसिकता आहे. आपली शिक्षण आणि प्रशासनाची प्रणाली इंग्रजांची आहे. त्यांना इकडचा उन्हाळा सहन होत नव्हता म्हणून त्यांनी शिक्षण, न्यायालये आणि प्रशासनातही उन्हाळी सुट्या (समर व्हॅकेशन) सुरू केल्या. वास्तवात भारतीय हवामानातला हंगाम पावसाळ्यात असतो. मोठ्या अडचणी पावसाळ्यातच असतात, कृषी प्रधान देश आहे त्यामुळे पावसाळ्यात सुट्या हव्या होत्या. आश्रम शिक्षण पद्धतीत त्या तशा होत्या. इंग्रजांचे ..

केजरीवालांची नय्या पैलतिरी

दिल्ली किसकी? यासाठी सुरू असलेला खेळ संपलेला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले गेलेले दावे-प्रतिदावे किती पाण्यात होते, हे जनतेने मतदानातून दाखवून दिले आहे. निरनिराळ्या एक्झिट पोलने मतदानानंतर जे अंदाज व्यक्त केले होते, ते सारे एकजात खरे ठरवून या तंत्राची उपयुक्तता आणि महत्त्वदेखील पटवून दिले आहे. गेली पाच वर्षे दिल्लीच्या सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकत दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा महाविश्वास व्यक्त केला आहे. एका अर्थाने केजरीवाल ..

उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना धडा शिकवाच!

ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली (पीएसए) स्थानबद्ध करण्याच्या आपल्या निर्णयाचे जम्मू-काश्मीर प्रशासनाने समर्थन केले आहे. यासाठी जी कारणे देण्यात आली, ती पाहता कुणीही राष्ट्रभक्त नागरिक या दोघांच्या स्थानबद्धतेचे समर्थनच करेल...

जाहिरातीच त्या...

‘धन्नो चुडीयॉं नही, सपने बेचतीं है...’ असा एक संवाद ‘काला पत्थर’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्या तोंडी आहे. कोळशाच्या खाणीत दर आठवड्याला चार-दोन मजुरांचा मृत्यू होत असतो आणि बांगड्या विकणारी धन्नो, तिच्या बांगड्या ल्यायणारी अखंड सौभाग्यवती होते, असे सांगत बांगड्या विकते. दर आठवड्याला मजुरांच्या घरात सौभाग्यवतींचा आक्रोश अन्‌ मग दगडावर बांगड्या भरलेले हात आदळणे हे ठरलेलेच असताना, धन्नोच्या बांगड्या बायका घेतात... स्वप्नातही जे सत्य होणार नाहीत, अशी स्वप्नं दाखविणार्‍या त्या जाहिराती असतात. ..

शाहीनबागची फटफजिती!

नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीनबाग येथे दीड महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेले आंदोलन आता दिशाहीन झाले आहे. नागरिकता दुरुस्ती कायदा रद्द करावा, ही मागणी कोणत्याही स्थितीत मान्य करता येण्यासारखी नाही. नागरिकता दुरुस्ती कायदा हा संसदेने बहुमताने पारित केलेला आहे. यासंदर्भातील विधेयकावर संसदेत चर्चा सुरू असताना सर्व राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले होते. एकदा संसदेने एखादा कायदा पारित केल्यानंतर तो मागे घेण्याची मागणी करणे मूर्खपणाचे तसेच अव्यवहार्य आहे. पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तानात ..

व्हिजन आणि अँक्शन

देशाच्या दुसर्‍या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी काल दुसर्‍यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त वेळ वाचला गेलेला अर्थसंकल्प म्हणून त्यांच्या भाषणाची नोंद आज झाली. तब्बल पावणेतीन तासांचे त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण शेरोशायरीयुक्त नसले तरी त्यात त्यांंनी हिंदी, उर्दू आणि तामीळ भाषेतील कविता आणि दोह्यांचा पुरेपूर उपयोग केला. एक महिला घराचे अर्थव्यवस्थापन करताना जशी चौफेर विचार करते, नियोजन करते, आखणी करते आणि त्याचा अंमल करते अगदी त्याच धर्तीवर त्यांनी ..

बंद करा हा मतपेटीच्या सौदागरांचा तमाशा!’

नागरिकत्व सुधारणा कायदा, अर्थात सीएएला विरोध करण्यासाठी कॉंग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांचा विरोध आहे आणि हिंसक आंदोलनं करून त्यांनी तो व्यक्तही केला आहे. वास्तविक, सीएएमुळे भारतात राहणार्‍या कुठल्याही नागरिकाला कोणताही धोका नाही आणि मुस्लिम असो वा हिंदू, कुणीही घाबरण्याचे कारण नाही. परंतु, स्वत:ची मतपेटी मजबूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि इतरांनी सीएएला विरोधाच्या नावाखाली देशात नंगानाच घातला आहे. सीएएला विरोध करण्यासाठी जी आंदोलनं सुरू आहेत, त्या आंदोलकांना केरळातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात ..

नवा झेंडा, नवी दिशा!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे ज्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, त्या महाराष्ट्र निर्माण सेनेने (मनसे) कात टाकली असून, गुरुवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महाधिवेशनात या पक्षाने आपला झेंडा बदलविला आणि व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या समवेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला स्थान देण्यात आले होते. मनसेने ही टाकलेली कात म्हणा किंवा घेतलेले वळण, महाराष्ट्राच्या राजकारणात तरी लक्षणीय ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत...

सावधान! मनसे आक्रमक होतेय्‌...

सावधान! राज ठाकरेंची मनसे नव्याने आक्रमक होणाराय्‌! हो. ज्यांच्या अस्तित्वाची पाळंमुळंच आक्रमकतेत रुजलेली असल्याचा साक्षीदार सारा महाराष्ट्र राहिला, त्याच महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या जनतेला, तीच मनसेना नव्यानं चवताळून उठलेली बघायला मिळणार आहे. मराठी माणसांसाठीचा तो करारी बाणा, परप्रांतीयांविरुद्धचा निम्नस्तरीय लढा लढत झालेले ते खालच्या दर्जाचे राजकारण, गेल्या निवडणुकीच्या मुहूर्तावर केंद्रातल्या धुरिणांविरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेतल्यागत प्रचंड उत्साहात मांडलेला तो थयथयाट, त्यानंतरही मतपेट्यांम..

फाशीचे राजकारण...

अशी एक कविता ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या नाटकात अनिल बर्व्यांनी दिली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या वीरभूषण पटनायक या फाशीचा कैदी असलेल्या नायकाच्या संदर्भात ही कविता आलेली आहे. नायक क्रांतिकारी आहे आणि आपल्याला असे कोल्ह्या-कुत्र्यासारखे फासावर लटकवू नये, वीरमरण यावे, अशी त्याची इच्छा असते. अखेर जेलर ग्लाड त्याला छातीवर गोळ्या घालून मरण देतो. (ठार नाही करत!)..

जगतप्रकाश नड्‌डा यांचे अभिनंदन!

भाजपा हा ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून ओळखला जाणारा पक्ष आहे. देशात अनेक राजकीय पक्ष आहेत, मात्र राजकीय पक्षांच्या या भाऊगर्दीत भाजपाने आपली वेगळी ओळख जपली आहे. म्हणूनच आज भाजपा हा भारतातीलच नाही, तर जगातील सर्वाधिक सदस्यसंख्येचा पक्ष झाला आहे. अशा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणे हा, रा. स्व. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेले नड्‌डा यांच्यासाठी मोठा बहुमान आहे. नड्‌डा, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. भाजपा सांसदीय मंडळाचे सचिव म्हणूनही ते आतापर्यंत ..

इंडिया की भारत?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध भाषा, प्रांत, पंथ, धर्म, चालीरीती अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला जगाच्या पाठीवरील एकमेव देश म्हणजे भारत! हजारो वर्षांपासून भारताची संस्कृती टिकून आहे. तिच्यावर अनेक आघात झाले, पण सगळे आघात सहन करूनही भारतीय संस्कृती दिमाखात वाटचाल करते आहे. वैविध्य असल्याने कोणत्याही मुद्यावर सगळ्यांचे एकमत होणे शक्य नाही. शिवाय, आपल्या संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे. ते अबाधित आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विचारभिन्नता ..

वाङ्‌मयीन क्षेत्रातील जातीयवाद...

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे स्पष्टवक्ते आहेत. उस्मानाबादच्या 93 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी साहित्यक्षेत्रातील जातीयवादाचा मुद्दा उपस्थित केला. वाङ्‌मयाच्या क्षेत्रात उघडउघडपणे जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे. त्याचा पुरस्कार केला जात आहे. वाङ्‌मयीन क्षेत्राच्या दृष्टीने ही भयानक अवस्था असून, जातीयवादाने सबंध साहित्यच पोखरले जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. जातीयवाद वाङ्‌मयीन क्षेत्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आपण ..

जे खळाची व्यंकटी सांडो...

साहित्य संमेलने आणि वाद हे काही अनपेक्षित, अस्थानी असे समीकरण राहिलेले नाही. तसे ते यंदाच्या उस्मानाबाद साहित्य संमेलनाच्या बाबतही घडले. या वादांचा निनाद संमेलनाध्यक्षांच्या निवडीपासूनच व्हायला सुरुवात झाली होती. त्या तुलनेत प्रत्यक्ष संमेलन शांततेत पार पडले आहे, असे म्हणता येईल. उद्घाटक आणि संमेलनाध्यक्ष प्रत्यक्ष संमेलनात होते आणि नव्हतेदेखील. एकतर हे दोघेही प्रकृतीच्या कारणास्तव ग्रंथिंदडीत सहभागी झाले नाहीत. उद्घाटनाच्या सत्रात दोघेही होते. त्यांची भाषणेही झाली आणि नंतर हे दोघेही पुन्हा प्रकृतीच्या ..

जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल...

सहा महिन्यांपूर्वीच लोकसभेमध्ये दणदणीत यश मिळविलेल्या आणि तत्पूर्वीही राज्यात ठिकठिकाणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाजी मारलेल्या भारतीय जनता पार्टीला, 7 जानेवारीला झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जबरदस्त फटका बसला आहे. धुळे, नंदूरबार, पालघर, अकोला, वाशीम आणि नागपूर या सहा ठिकाणी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये म्हणायला हा पक्ष मोठा ठरलेला आहे. गेल्या वेळच्या(53) तुलनेत दुप्पट म्हणजे 103 जागा मिळवून या पक्षाने पहिला क्रमांक पटकाविला असला, तरी ..

निर्भयाला न्याय?

आजपासून सुमारे सात वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या ‘त्या’ घटनेने सारा देश हादरला होता. हळहळला होता. नव्हे, सुन्न झाला होता. निर्भयावरील अत्याचाराची कहाणीच इतकी दाहक होती की, आज इतक्या वर्षांनी तिच्या मारेकर्‍यांना फाशी होणार म्हटल्यावर या देशातील सर्वसामान्य माणसाच्या मनात कुठेतरी आनंदाची भावना निर्माण झाली आहे. एका धावत्या बसमध्ये चौघांनी केलेले निर्भयावरील अनन्वित अत्याचार, तिच्या इभ्रतीचे लचके तोडले जाण्याचा घृणास्पद प्रकार आणि उपभोगून झाल्यावर तिचा घात करण्याचा प्रकार खरोखरीच चीड आणणारा होता. सारा ..

स्वयंघोषित पुरोगाम्यांचे बुरखे फाडा...!

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या जे काही सुरू आहे, ते वेदनादायक आहे. शैक्षणिक शुल्कात सवलती घेत शिकणारे विद्यार्थी धुडगूस घालतात आणि विद्यापीठाचा आखाडा करतात, हे दुर्दैवी होय. विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईषी घोष हिच्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, जावेद अख्तर यांच्यासारखे अनेक जण संतापले आहेत. अख्तर यांनी संतापण्याचे कारण काय? जावेद अख्तर हे गीतकार आहेत, त्यांच्यावर तर कारवाई ..

हे असे असले तरीही...

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे...’ या उक्तीची यथार्थ जाणीव महाआघाडीच्या कर्त्यांकडे असल्याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राला येतो आहे. तीन विविध मानसिकता (वैचारिक भूमिका असे यात अनुस्यूत नाही) असलेल्या पक्षांनी मिळून सत्ता स्थापना केली आहे. या पक्षांची मानसिकता आणि स्थिती वेगळी आहे. कॉंग्रेस म्हणजे कृतिशून्य विचार, शिवसेना म्हणजे विचारशून्य कृती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे विचारान्ती कृती असला चाणाक्ष पक्ष आहे. या तिघांनी सोबत येऊन सत्ता स्थापन करायची, असा विचार मांडला गेला आणि मग कॉंग्रेसने ..

मनोबल वाढवणारे निर्णय...

संरक्षणक्षेत्रात झालेल्या दोन महत्त्वाच्या बदलांकडे देशाचे लक्ष सध्या वेधले गेले आहे. पहिला बदल म्हणजे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांची भारताचे पहिले चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती होणे आणि दुसरा बदल म्हणजे नवे लष्करप्रमुख म्हणून मनोज मुकुंद नरवणे यांनी सूत्रे स्वीकारणे. सरकारद्वारे केला गेलेला किंवा कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रात केला जाणारा बदल हा सद्य:परिस्थितीतील सुधारणेचे द्योतक मानला जाण्याची परंपरा आहे. त्या अर्थाने या दोन्ही बदलांचे स्वागत केले जायला हवे...

थंडी, अवकाळी पाऊस आणि आम्ही!

नागपूर-विदर्भात अचानक थंडीची लाट आली आहे. लोकांना हुडहुुडी भरली आहे. जिकडेतिकडे या थंडीचीच चर्चा आहे. थंडीसोबतच अवकाळी पाऊसही आला आहे आणि या पावसाने रबी पिकांचीही नासाडी केली आहे. यंदा आधीच ओला दुष्काळ पडल्याने शेतकर्‍यांच्या हातून खरिपाची पिकं गेलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कर्जमाफीची घोषणाही केली. ही कर्जमाफी शेतकर्‍यांना तारेल की नाही, याची काहीच शाश्वती नसताना, आता डिसेंबर-जानेवारी महिन्यात आलेल्या पावसाने गहू, हरबरा आणि अन्य पिकांची प्रचंड नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल ..

घराणेशाहीची छाप असलेले मंत्रिमंडळ!

संपूर्ण राज्याला ज्याची प्रतीक्षा होती, ती घटना अखेर घडली. गंगेत घोडं न्हालं! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती देत, परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पािंठब्याने मुख्यमंत्रिपद उधार घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी अखेर परवा सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारावर पूर्णपणे घराणेशाहीची छाप असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकाला पालखीत बसवीन असे म्हणता म्हणता स्वत:च पालखीत बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील अनेक दिग्गजांचे पत्ते ..

ऋतुचक्राच्या फेर्‍यांत अडकलेले वर्ष...

सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असताना अचानक थंडी अवतरली आहे. गेल्या वर्षाचा ताळेबंद मांडत असताना नव्या वर्षाच्या जमा-खर्चाची योजना तयार होते आहे. गेले वर्ष तसे भारतासाठी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेगळे आहे. सामाजिक या शब्दसंकल्पनेला ‘राष्ट्रीय’ असा नवा आणि यथायोग्य आयाम गेल्या वर्षाने दिला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत आले. एखाद्या अनुभवी फलंदाजाने नव्या चेंडूची चकाकी घालवत, चेंडूवर नजर पक्की करत पहिली काही षट्‌के खेळून काढावीत आणि नंतर धावगती वाढवावी तसेच केंद्रातल्य..

झारखंडचे निकाल

   झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी धक्कादायक म्हणावे लागतील. सध्या निवडणूक निकालाचा जो कल आहे, तो कायम राहिला तर झारखंडच्या रूपात भाजपाला आणखी एक राज्य गमावावे लागणार आहे. याआधी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. या मालिकेत आता झारखंडमध्येही भाजपाचा पराभव झाल्याचे दिसते आहे. राज्यात झामुमो आघाडीला 49, तर भाजपाला 21 जागा मिळाल्या आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्येही भाजपाच्या पराभवाचे संकेत मिळाले होते. आतापर्यंतच..

कर्जमाफीची सुगी आणि बरेच काही...

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा सोपस्कार आटोपला आहे. अर्धवट सरकार चार दिवस नांदले आणि गेले. हा ‘इव्हेंट’ पार पडला तो अर्थात प्रशासनाच्या इतक्या वर्षांच्या अनुभवामुळेच. अगदी वैदर्भीय भाषेतच सांगायचे झाल्यास, बाकी तामझाम चांगला होता. म्हणजे नेहमीच्या पठडीतला होता. लहान मुलंही भावला-भावलीच्या लग्नाचा खेळ खेळायची; तेव्हा त्यात मोठीही नकळत सामील व्हायची आणि मग माहोल अगदी खर्‍या लग्नासारखा उभा राहायचा. म्हणजे बाहुलीला सासरी जाण्यासाठी निरोप देताना वधूमाय खरोखरीच रडायची. तसेच या अधिवेशनाचेही ..

मी नवा आहे! मी नवा आहे!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांचे पिताश्री म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आणखी एक ‘शब्द’ दिल्याचे गुरुवारी विधानसभेत उघड झाले. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन’ हा पहिला शब्द दिला होता, हे आधीच कळले होते. आता ‘भाजपाची पालखी कायम वाहणार नाही,’ असा दुसराही शब्द दिल्याचे समजले. तसेही, पालखीचे भोई बनण्यात खूप काही कमीपणा आहे, असे नाही. पन्हाळगडाहून रात्री भरपावसात ‘लाखाचा पोिंशदा’ छत्रपती शिवरायांना विशाळगडावर सुखरूप नेणारे पालखीचे भोईच होते. इतिहासात त्यांचे नाव नसेल; परंतु अखिल हिंदुस्थान ..

आंदोलनाआड अस्तित्वलढा!

नागरिकता कायद्यावरून देशात विरोधाचे सूर उमटत आहेत. विविध ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनांना प्रारंभ झाला असून, या कायद्याच्या विरोधात अनेक जण रस्त्यांवर उतरले आहेत. रस्त्यावर उतरणार्‍यांमध्ये विशेषतः कॉंग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, मुस्लिम लीग, एआयएमआयएम आदी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे वरकरणी दिसत असले, तरी यामागे काम करणारी डोकी लक्षात घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ..

रसिकमन पोरकं झालं...

इंग्रजी पहिलीत शिकत असताना, शाळेच्या स्नेहसंमेलनातल्या नाटिकेत मंचावरील प्रवेशापूर्वी पायांचा थरकाप अनुभवणारी, समोर प्रेक्षकांची गर्दी बघून गांगरणारी व्यक्ती, नंतरच्या काळात स्वत:त बदल घडवत नेते. इतका की, मेडिकल कॉलेजमधील प्रवेशापर्यंत नाटक विभागाचा विद्यार्थिप्रमुख काय, नाटक बसविण्यासाठीचा पुढाकार काय, ती तालीम, तो कसलेला अभिनय, संवादांची ती धारदार फेक... कधीकाळी मंचावर जायला घाबरणारा तो ‘हाच’ आहे, यावर विश्वासच बसू नये! पण, खरं सांगायचं तर हे असलं जगावेगळेपण आहे ना, ते डॉ. श्रीराम लागू यांनी आयुष्यभर ..

कळलेले आणि आकळलेले...

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी परवा दोन विधाने केलीत, एक दिल्लीच्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जो उच्छाद मांडला आहे, त्या संदर्भात आहे आणि दुसरे, माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात एका याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्या प्रमुखत्वाखालील खंडपीठाने निर्णयाप्रत येताना केलेल्या सुनावणीदरम्यान दिलेले वक्तव्य म्हणण्यापेक्षा मांडलेली निरीक्षणे आहेत. न्या. बोबडे, बी. आर. गवई, सूर्या कांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर अॅड्‌. प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्य..

दीड दिवसांचे माहेर!

हुर्डा पार्टी, यात्रा, जत्रा, ऊरुस अन्‌ काय काय संभावना केले जाणारे विधिमंडळाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. दरवर्षीच या अधिवेशनाची अशीच काहीशी चर्चा होत असते. नागपूर करारात ठरल्यानुसार तितक्या कालावधीत हे अधिवेशन सहसा होतच नाही. त्यामुळे उगाच उपचार म्हणून नागपुरात सरकार का हलविले जाते आणि त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा तो खर्च विदर्भाचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी का वापरला जात नाही, असा सवाल (परखड!) विचारला जातो. अर्थात, दरवर्षी असला प्रश्न विचारणारे धाडसी बोरूबहाद्दर ..

प्रतिमाभंजनाला लगाम!

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलींची चौकशी करणार्‍या नानावटी आयोगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच्या त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही या अहवालात निर्दोष घोषित करण्यात आले आहे. दंगलीदरम्यान आवश्यक तितके पोलिस संख्याबळ आणि शस्त्रास्त्रे नसल्याने काही ठिकाणी जमावाला नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आले. परंतु, पोलिसांकडून कुठलाही हलगर्जीपणा झाला नाही; तसेच राज्यातील कुणाही मंत्र्याने, कुणाला दंगलीसाठी प्रवृत्त केल्याचे ..

एवढुसा गडू... विनाकारण रडू!

यंदा पुन्हा एकदा कांद्याचा वांधा झालेला आहे. त्यावरून नासीर ताजमीची गुलाम अली यांनी गायलेली गज़ल आठवते- ‘हंगामा है क्यों बरपां, थोडीसी तो पी ली है...’ कांद्याचे भाव वाढले की आक्रंदन केले जाते. त्यासाठी मग मोले घातले रडाया, या उक्तीनुसार रडण्यासाठी, ओरडा करण्याचीही कंत्राटेच दिली जातात. त्यावरून सरकारेही पडल्याची उदाहरणे अगदी इंदिरा गांधी यांच्या काळापासून आहेत. दरवर्षीच नेमके या काळात कांद्याचे दर वाढतात. कधी ते वाढलेत, असे म्हणावे इतके नसतात. ही दरवाढ सौम्य असते. महागाईची सवयच झालेल्यांना हे दर जास्तही ..

नागरिकत्व विधेयकाची स्वागतार्ह मंजुरी!

अखेर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा मार्ग मोकळा झाला. जणूकाय सरकार या देशाविरुद्ध पाऊल उचलायला निघाले असल्याच्या थाटात त्या विधेयकाला मांडताक्षणीच विरोध सुरू झाला होता. संसदेत विरोधी बाकांवर बसलेल्यांनी सरकारला फक्त विरोधच करायचा असतो, अशा कुठल्याशा अफलातून, विचित्र कल्पनेतून राजकारण करायला निघालेल्या तमाम राजकीय पक्षांच्या धुरंधरांनी देशहित खुंटीला टांगून चालवलेली राजकारणाची तर्‍हा, दुर्दैवीच खरीतर! पण, त्याचीच री ओढली जातेय्‌ अलीकडे सर्वदूर. सरकारने घेतलेल्या एखाद्या निर्णयाची योग्यायोग्यता सखोल अभ्यासाअंत..

जबाबदार कोण? उपाय काय...?

मध्य दिल्लीतील फिल्मिस्तान भागातील अनाज मंडीत एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मनाला चटका लावणारी होती. आपल्या देशात अशा घटना वारंवार घडतात, घटना घडल्यानंतर दु:ख व्यक्त केले जाते, मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना नुकसानभरपाईची घोषणा केली जाते, लोक मोर्चे काढतात, निषेध करतात, मग आगीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले जाते आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते. झालेली घटना लोक विसरून जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे असेच सुरू ..

न्यायाला विलंब म्हणजे...

न्याय हा तातडीने मिळत नाही, तसेच तो सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याची जी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली, ती अतिशय योग्य आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावनाच याप्रकारे कोविंद यांनी व्यक्त केली आहे. न्याय हा देऊन चालत नाही तो मिळाला असल्याचे वाटले पाहिजे. पण, आपली विद्यमान न्यायव्यवस्था यात कमी पडत आहे. न्यायालयातून निकाल लागतो, पण न्याय मिळतोच असे नाही.राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करताना राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या ..

अजब तुझे सरकार...

क्रिकेटच्या भाषेत असं म्हणतात, नवा फलंदाज आला की त्याला रुळायला वेळ द्यायला हवा. खेळपट्टीचा मूड आणि त्यानुसार बॉलचा स्विंग यावर त्याचे डोळे खिळायला हवेत... अर्थात, हे चोचले कसोटी क्रिकेटमध्ये चालून जाणारे होते. आताचा जमाना एक दिवसीयच नाही तर थेट वीस-वीसचा आहे. त्यामुळे फलंदाजाला सेट होऊनच खेळपट्टीवर यावे लागत असते. ही गतिमानता केवळ क्रिकेटच्या खेळातच आलेली आहे, असे नाही. ती जीवनाच्या सर्वच अंगात आलेली आहे. गती हे आजच्या जीवनाचे प्राणसूत्र आहे. तुम्ही गतीशी जुळवून नाही घेतले, तर तुमची दुर्गतीच होत ..

घुसखोर आणि शरणार्थी...

राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि पुढील पाच वर्षांनंतर या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची केंद्रीय गृहमंत्र्याची हमी, ऊर अभिमानानं भरून यावा अशी आहे. पण, सार्‍याच बाबी राजकीय चष्म्यातून बघण्याची, जाती-धर्माच्या चाळणीतून चाळण्याची सवय जडलेल्या राजकारण्यांना त्यातील भल्याचा निचोड काढता येईल कसा? परिणाम हा की, देशहिताच्या या उपक्रमाविरुद्ध तुणतुणे वाजविणे त्यांनी सुरू ठेवले आहे. ज्या देशाची फाळणी नेहरू-गांधींसह संपूर्ण कॉंग्रेसच्या सहमतीने धर्माच्या आधारे झाली, त्याच देशात ..

औपचारिकच; पण...

परवा विधानसभेचे बहुमत सिद्ध करणारे अधिवेशन संस्थगित करण्याच्या प्रसंगी दिवसभर जी भाषणांची दळणे दळली गेली ती या सभागृहांत वाक्‌चातुर्याने डबडबलेली नेते मंडळी आहेत, हे सांगून जाणारेच होते. त्यातही मग त्यांचे राजकारण सोडून एकमेकांशी कसे छानसे संबंध आहेत, हेही दिसून आले. नवे मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते यांची प्रगाढ अशी मैत्री नव्या रूपांत पुन्हा एकदा प्रवाहित होताना दिसली. महाराष्ट्राच्या विधिमंडळांत आणि एकुणातच राजकारणांत वक्तासहस्रेशू म्हणावीत अशी बरीच नेतेमंडळी होती आणि आहेतही. त्यांचा खुमासदार ..

उद्धव ठाकरे यांचे घोडे गंगेत न्हाले, पण...!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. अपेक्षेप्रमाणे बहुमत सिद्ध केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे घोडे गंगेत न्हाले. पण त्यांच्या सरकारचा पुढील प्रवास सोपा नाही, याचा अनुभव ताज्या घटनाक्रमाने आला आहे. विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने 169 मते पडली. भाजपाने सभात्याग केल्यामुळे विरोधात एकही मत पडण्याचा प्रश्नच नव्हता. असदुद्दिन ओवैसी यांचा एआयएमआयएम, राज ठाकरे यांचा मनसे आणि माकपाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. विश्वासदर्शक प्रस्ताव पारित झाल्यामुळे उद्धव ठाकरे ..

आणखी एक निर्भया...

घटना घडून गेल्यावर आक्रोश करायचा, अगतिकता व्यक्त करत कुणावर तरी आगपाखड करायची की घटना घडण्याच्या आधी सावधानता बाळगायची, हा प्रश्न हैदराबादसारख्या घटना घडून गेल्यावर हमखास पडतो. दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर या प्रसंगांवर खूप मोठी आणि सखोल चर्चा झाली. देशभर आक्रोशही निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा सगळेच कसे शांत झाले. अशा घटना घडल्या की समाजमन सुन्न होते. एक असुरक्षिततेची भावना पसरते आणि ही आग आपल्या घरापर्यंत येऊ नये म्हणून लोक रस्त्यावर उतरतात. ‘आमच्याही पोटी लेकीबाळी आहेतच की!’ असेच म्हटले जाते. ..

गोष्टी तशा छोट्याच; पण...

कधी कधी असं होतं ना की डोस्क खराबं होतं. काही केल्या पेच सुटत नाही. बरं त्यात आपलं काहीच नसतं. या अवस्थेला आजच्या लोकभाषेत, ‘लेना ना देना, फिरभी...’ असे म्हणतात. तशी लोकभाषेत त्यासाठी एक म्हण आहे, घेनं ना देनं, फुक्कट कंदी लावनं... तर हे असं होतं कधीकधी सार्वजनिक जीवनांत. राज्यांतल्या राजकीय घडामोडींमुळे एक प्राध्यापक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर झाल्याची परवा बातमी होती. जे व्हायचे ते होणारच असते. आपण त्यात काहीच करू शकत नाही अन्‌ जे होतेय्‌ ते आपण केल्याने होतही नसते, तरीही फुक्कट कंदी लावतो ..

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळावे!

प्राथमिक शिक्षण तेलगूऐवजी इंग्रजी भाषेतून देण्याच्या, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्‌डी यांच्या निर्णयामुळे सध्या आंध्रप्रदेशमध्ये वादळ उठले आहे. तेलगू देसम्‌चे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून वर्ग एक ते सहापर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाची भाषा इंग्रजी करण्याचा निर्णय जगनमोहन रेड्‌डी यांनी घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्यात सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जात होते. ..

कुणी खुपसला जनादेशाच्या पाठीत खंजीर?

समर्थ रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी जे म्हटले होते, त्याचीच प्रचीती आज महाराष्ट्र घेतो आहे. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये सगळेच अनिश्चित असते, असे मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते, त्याचाही अनुभव राज्यातील जनता घेते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी दुसर्‍यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन्‌ सर्वांनाच आश्चर्यचकित केले. राज्यातील राजकारणात आलेला हा मोठा भूकंप होता. या भूकंपाच्या हादर्‍यात अनेक जण जखमी झाले आहेत, काही जण गंभीर जखमी झाले आहेत, काही कोमात गेले ..

एनआरसीचे सशक्त पाऊल!

जगातील कुठल्याही देशात जा, तेथे त्या त्या देशाची नागरिकता कोणत्या आधारावर ठरावी, याचे काही निकष, कायदेकानून ठरले असून, त्यानुसार कोणता नागरिक देशाचा रहिवासी असायला हवा आणि नको, हे ठरते आणि त्यानुसार त्याची नोंदही सरकारदरबारी होते. पुढे नागरिकांना मिळणारे विशेषाधिकार याच नागरिकता रजिस्टरनुसार ठरतात. जसे कुणाला मतदानाचा अधिकार द्यायचा, कुणाला शिष्यवृत्ती द्यायची, कुणाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार द्यायचा, कोण देशातील संवैधानिक पदांसाठी पात्र ठरू शकतो वगैरे वगैरे...

रात्रंदिन आम्हा क्रिकेटचा आनंद!

आशिया खंडात, त्यातल्या त्यात भारत देशात लोकांना क्रिकेटचे फार वेड आहे. आज क्रिकेट हा खेळ खेळणार्‍या देशांमध्ये सर्वाधिक देश आशिया खंडातील आहेत. यात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे प्रमुख देश असून, अलीकडेच संयुक्त अरब अमिरातचा संघही दणकेबाज कामगिरी करीत आहे. अशा या क्रिकेटने गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिकतेची कास धरल्यामुळे, आज विविध देशांमध्ये क्रिकेट संघटनांप्रमाणेच राज्यांमधील संघटनाही आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या आहेत. आधी कसोटी क्रिकेटचा जमाना होता. या काळात, लवकरच मर्यादित षट्‌कांचे ..

...तर लोकशाही अधिक प्रगल्भ होईल!

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि आपल्या संसदेची शानही आहे. त्यामुळे राज्यसभेचे वेगळे महत्त्वही आहे. राज्यसभेला वरिष्ठ सभागृहाचा दर्जा मिळाला आहे. तो घटनात्मक आहे. राज्यसभेत थेट जनतेतून निवडून आलेले सदस्य नसतात. ते आमदार आणि खासदारांकडून निवडले जातात, तसेच काही सदस्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असले तरी त्यात सगळेच ज्येष्ठ नागरिक असतात, असे समजण्याचे कारण नाही. पण, जे सदस्य राज्यसभेवर निवडून येतात वा नियुक्त केले जातात, ते अनुभवी असतात, विविध क्षेत्रातील ..

राज्यपालांची भूमिका दिलासादायक!

महाराष्ट्रात यंदा ओला दुष्काळ पडला आहे. शेती आणि शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच राज्यात सरकारही स्थापन होताना दिसत नाहीय्‌. शिवसेनेच्या बालहट्टापायी महायुतीला बहुमत मिळूनही सरकारची स्थापना झाली नसताना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत देणार कोण आणि ती कशी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांची भेट घेतली. शेतकर्‍यांच्या परिस्थितीबाबत त्यांना अवगत केले. शेतकर्‍यांना ..

या बांधावर...

कशाही गोष्टींची सवयच होऊन जात असते. किती लवकर सवयींचे व्यसन होईल, याचा काहीच नेम नसतो. नेम वरून तुम्हाला बाण अन्‌ मग पुन्हा बाणाचा नसत्या ठिकाणी लागलेला नेम आठवत असेल तर त्यात आमचा काहीही दोष नाही. आम्ही थेट अर्थाने नेम हा शब्द वापरला आहे... तर, मंडळी सवय आणि व्यसन यात फार काही अंतर नसते. मग ती माणसं असो की निसर्ग असो. निसर्ग आणि पर्यावरणालाही काही सवयी लागत असतात आणि त्यांचे व्यसन होत असते. व्यसन ही नैसर्गिक बाब आहे. म्हणजे निसर्गालाही व्यसन लागू शकते. अशी व्यसनं आम्हीच माणसांनी निसर्ग- पर्यावरणाला ..

अधू दृष्टीचा...?

एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. वेताळाने प्रश्र्न विचारले आणि विक्रम त्यावर उत्तर देत राहिला. कारण, तो वचनांना जागणारा होता. आज महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्र्न विचारतेय्‌ आणि त्याची उत्तरे देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. आता यांच्या 175 आमदारांच्या पाठिंब्यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी..

उद्धव आणि ‘बेताल’

पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे. सत्ता नको, मला माझा शेतकरी ..

मोदी-जिनपिंग भेटीचे फलित...

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीचे फलित काय, असा प्रश्न सहज निर्माण होतो. त्याचे कारण आहे. सध्याच्या घडीलाच नव्हे, तर अगदी चीनने भारतावर 1962 साली आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध हे तणावाचे राहिले आहेत. त्यात भर पडली ती अक्साई चीनचा भाग चीनने गिळंकृत करणे, लडाख आणि अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणे, मध्यंतरी डोकलामचा तिढा निर्माण होणे आणि नुकतीच 370 कलमावर चीनने पाकिस्तानची कड घेणे. 370 कलमावर गृहमंत्री अमित शाह..

विमानपूजन!

खरंच चुकलंच राजनाथसिंहांचं! तलवारी म्यान झाल्यात, धनुष्यबाण अर्थहीन ठरलेत, अग्नीपासून जलापर्यंत अन् वायूपासून भस्मापर्यंतची सारी शस्त्रास्त्रे ग्लान्त झाली असताना, या अत्याधुनिक युगात थेट विमानाची पूजा करायला निघाले देशाचे संरक्षणमंत्री! गंध, फुलं, अक्षता घेऊन फ्रान्सच्या वारीला निघालेत ते. देशाच्या संरक्षणदलात दाखल होऊ घातलेल्या र्रोंेल विमानांची विधिवत पूजा केली त्यांनी. छे! छे! चुकलंच संरक्षणमंत्र्याचं! असे करणे, या देशातल्या कॉंग्रेस धुरीणांच्या पसंतीस पडणार नाही..

विजयादशमीचे पाथेय...

विजयादशमीच्या, सरसंघचालकांच्या भाषणाकडे सार्या जगाचे लक्ष लागलेले असते, ही काही आजचीच बाब नाही. संघाशी संबंधित मंडळी सत्तेत आहेत म्हणून जग त्यांच्या भाषणाकडे डोळ्यांत जास्त तेल घालून बघते, असेही नाही. संघाच्या स्थापनेपासूनच ही परंपरा चालत आलेली आहे. अगदी डॉ. हेडगेवारांनी आपल्या 8-10 सवंगड्यांसह महालातील मोहिते वाड्याच्या मैदानावर संघाची स्थापना केली तेव्हापासूनच ही परिपाठी चालत आली आहे. सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण हे पुढील वर्षभरासाठी स्वयंसेवकांना पाथेय असते. पुढच्या वर्षीची दिशा मिळाल्याने स्वयंसेवक ..

निवडणूक आणि बंडखोरी...

निवडणूक महानगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो, की विधानसभा आणि लोकसभेची, प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी होतच असते. बंडखोरी हा लोकशाहीचा अपरिहार्य भाग झाला आहे. कारण, लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. लोकशाही तुम्हाला निवडणुकीत विजयी करण्याची खात्री देऊ शकत नाही, मात्र निवडणूक लढवण्याचा तुमचा अधिकारही नाकारू शकत नाही. महाराष्ट्र आणि हरयाणात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत. या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर होती, 5 ऑक्टोबरला ..

राजी-नाराजी

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा होताच, जवळपास सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी हे जिवंतपणाचेच लक्षण आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी, न्याय मिळावा, यासाठी लोकशाहीने दिलेल्या शस्त्राचा वापर करण्यात गैर काहीच नाही. बंडखोरांनी वर काढलेले डोके काही आजचेच नाही. दरच निवडणुकीत- मग ती लोकसभेची असो, राज्यसभेची असो, विधानसभेची असो की पंचायत समितीची, त्यात बंडखोरी ही होतच असते. हेच कशाला, आपल्याकडे वॉर्डातील पक्षकार्यकारिणीच्या निवडणुकीतही बंडखोरी होते आणि शाळांमध्ये ..

काश्मीरची वास्तव स्थिती!

वास्तव हे कटु असते, पण देशहितासाठी ते मांडावेच लागते. भारताच्या मुख्य धारेतील प्रसिद्धिमाध्यमे (मीडिया) नेमके हेच विसरले आहेत. या मीडियाचा उथळ व पोकळपणा काश्मीरच्या संदर्भात फारच प्रकर्षाने जाणवत आहे. 5 ऑगस्टनंतर काश्मीरची काय स्थिती आहे, हे सर्व जाणतातच. या दिवसानंतर जम्मू-काश्मीर हे राज्य न राहता, त्याचे दोन- जम्मू व काश्मीर आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि त्या पूर्वी संविधानातील कलम 370 निष्प्रभ करण्यात आले. याला विरोध होणार होता. तो हिंसकच राहण्याची शक्यता अधिक होती. म्हणून ..

मोदींचा बुद्ध, इम्रानचे युद्ध...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भाषण करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जे भाषण केले, ते पाहता एखादा दहशतवादीच भाषण देत आहे की काय, असेच जाणवले. दोन मुद्यांवर इम्रानने भर दिला. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चारलेल्या ‘रॅडिकल इस्लामिक टेररिझम’ आणि दुसरा आवडता विषय म्हणजे काश्मीर. पहिल्या विषयावरही ते खूपकाही बोलले. स्वत:ला एकीकडे शांतिदूत म्हणत असतानाच, कुख्यात क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याच्या विचारसरणीचाही त्यांनी पुरस्कार केला. ..

अर्ध्या जगाच्या आनंदबिंदूंचे ‘दृष्टी’दर्शन!

  जगात दोन संस्कृती नांदतात. एक संस्कृती जी भारतीय जीवनपद्धतीनुसार कार्य करते आणि दुसरी पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित आहे. दोन्ही संस्कृतींत अनेक आचार-विचारांबाबत साम्य असले, तरी वैयक्तिक जीवनातील स्वैराचारी आचार-विचारांना पाश्चात्त्य संस्कृतीत ठायीठायी स्थान मिळालेले दिसते. त्यामुळे त्या संस्कृतीतून प्रस्फुटीत झालेल्या संकल्पनांमध्ये भारतीय जीवनपद्धतीनुसार जगणार्या स्त्री-पुरुषांच्या आचार-विचारांशी अनुरूप, येथील परंपरा आणि संस्कृतीचा सर्वांगीण विचार करून कुठले अहवाल सादर होत नाहीत अथवा ..

उरलो बारामतीपुरता!

    महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे, पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योजकांचे तारणहार, जातीयवादी राजकारणाचे प्रणेते, सत्तेच्या राजकारणासाठी रचावयाच्या षडयंत्राचे संशोधक, माननीय शरद पवारसाहेब यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने बँक घोटाळ्यासंदर्भात गुन्हे दाखल करताच, अख्ख्या बारामतीच्या मर्यादित भौगोलिक परिसरात जी संतापाची लाट उसळलीय्, ती पुरेशी बोलकी आहे. देशपातळीवर पक्षाचे नेतृत्व करणार्या, वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणार्या, स्वपक्षीयांना दगा देण्याचा ..

डिजिटल जनगणनेचा क्रांतिकारी निर्णय!

विरोधी पक्ष आणि विरोधक बेंबीच्या देठापासून कितीही बोंबलत सुटले असले, तरी केंद्रातले मोदी सरकार देशातील जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षासह राज्याराज्यांतील विविध प्रादेशिक पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीने विरोधी पक्षांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातल्यानंतरही विरोधी नेत्यांची दृष्टी सुधारली नाही, ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब होय. ..

अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, अमेरिकेतील ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने इतिहास घडवला आहे! या कार्यक्रमाने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील मैत्रीवर फक्त शिक्कामोर्तबच केले नाही, तर ती आणखी दृढ केली आहे. यासोबतच या दोन देशांनी इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढाईचे रणशिंगही फेकले, हाही जगाला मोठा संदेश मानला पाहिजे. मोदी हे इतिहास घडवणारे नेते म्हणून ओळखले जातात, ..

सर्वात मोठे आर्थिक निर्णय!

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी परवा, आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला. यामुळे कार्पोरेट क्षेत्राला मोठा लाभ तर पोहोचेलच, शेअर बाजाराच्या प्रचंड उसळीमुळे आताच भागधारकांना सात लाख कोटींचा फायदा झाला आहे. विरोधकांचा मात्र या निर्णयामुळे तिळपापड झाला आहे. सध्या मोदी सरकारविरोधात कोणताही ठोस मुद्दा नसल्याने, सरकारने घेतलेल्या कोणत्याही चांगल्या निर्णयाला विरोध करणे, हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याजवळ आहे. डाव्यांचे एकवेळ समजू शकते. कारण, मोदी अमेरिकेच्या अधिक ..

निकाल निवडणुकीचा वाटे असाच असावा!

 एखादी कहाणी मग ती कुठल्याही रूपात तुमच्यासमोर येणार असो (नाटक, चित्रपट, कादंबरी) तिची सुरुवात, मध्य आणि शेवटही रसिकांना माहिती असावा अन् तरीही एकुणातच मांडणार्याची शैली इतकी छान असावी की तरीही ती कहाणी रोमांचक वाटावी. पुढे काय होणार हे माहिती असतानाही कुठेही कंटाळा येणार नाही... राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची पूर्ण कथाच अगदी सामान्य मतदारांना माहिती आहे. केवळ निकालासाठी सारे उत्सुक आहेत. या कथानकात विविध भूमिका निभावणार्या सर्वच पात्रांना आणि पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञांनाही निकाल ..

न्यायव्यवस्थेवर विश्वास

कुणीही ऐर्यागैर्याने उठावे आणि राममंदिरावर जीभ सैल सोडावी, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणे हाणता येईल, असा जो प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, त्याने विरोधकांना आणि विशेषत: मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना गुदगुल्या होत असल्या तरी, या प्रकारावर कठोर आघात होणे आवश्यक होते. गुरुवारी नाशिकच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत या तमाम लोकांचा जो व्यवस्थित समाचार घेतला, ते एका परीने बरे झाले. सर्वोच्च न्यायालय आणि त्यामधील काही न्यायाधीश, 2014 सालापासून सत्तेत आलेल्या ..

यंत्र सत्य की माणूस?

‘एकदा का तुम्ही यंत्रशरण झालांत की मग मानवी कार्यसंस्कृती आणि संस्कार संपतील आणि माणूस यंत्रांचा गुलाम होईल...’ असे महात्मा गांधी म्हणाले होते. भारत हा देश खर्या अर्थाने कळलेला हा महात्मा होता. हा देश 40 हजार खेड्यांत वसलेला आहे आणि एक गाव म्हणजे संपूर्ण देशच आहे, अशी ग्रामकेंद्री व्यवस्था त्यांना हवी होती. त्यामुळे माणसांनी माणसांची कामे करावीत आणि व्यवहार पूर्ण व्हावेत, असे त्यांचे मानणे होते. त्यांच्या दृष्टीने ही लोकशाही होती. त्यात नंतर बरेच बदल होत गेले. नेहरूंनीच ते केले. मोठी धरणे आलीत..

प्लॅस्टिक बंदी

गत काळात झालेल्या अभ्यासानुसार जगभरातील सुमारे 127 देशांनी प्लॅस्टिक वापराबाबत पर्यावरणपूरक विचार केलेला आढळून आला आहे. मार्शल आयलंड सारखा देश ज्याने प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातलीय्, तिथपासून तर मालडोवा, उझबेकिस्तान सारखे देश ज्यांनी यासंदर्भात काही कठोर पावलं उचलली आहेत, रोमानिया, व्हिएतनाम सारखे देश ज्यांनी पुन्हा वापरता येईल अशाच प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी दिली आहे, इथपर्यंत... सर्वच देशांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात याबाबतीत कायदे केले आहेत. उपाय योजले आहेत. नाही म्हणायला, भारतातही ..

नापिकी : निसर्गशोषणाचेच अपत्य!

    उत्क्रांती ही मानवी जीवनात सतत होत राहणारी अवस्था आहे. मनुष्यजीवन जसजसे उत्क्रांत होत गेले, तसतशा सोयीसुविधांची निर्मिती होत गेली. त्यामुळेच आज एकविसाव्या शतकापर्यंतच्या कालावधीत अनेकानेक शोध लागले आणि मानवी जीवन सुकर होत गेले. आज परिस्थिती अशी आहे की, प्रचंड यांत्रिकीकरणामुळे माणसाचे श्रम कमी झाले असून, तो भौतिकतेच्या अतिआहारी गेला आहे. यामुळे अनेक समस्या ‘आङ्क वासून उभ्या ठाकल्या. पाण्याचा, खतांचा, वाहनांचा, विजेचा मोठ्या प्रमाणात वापर, यांत्रिकीकरणावर निर्भरता वाढणे, प्रचंड ..

गाढवांचा बाजार...

पाकिस्तानातील लाहोर प्रांतातील एका गावात सध्या गाढवांच्या बाजाराने धूम उडवून दिली आहे. पाकमधील काही वाहिन्यांनी या बाजाराची ब्रेकिंग न्यूज दिली आहे, तर काहींनी विशेष वृत्त म्हणून बातमी दिली आहे. सार्या वाहिन्यांचे अँकर अगदी पोट धरून हास्यकल्लोळात या बातमीचे विश्लेषण करीत आहेत. आता कुणीही म्हणेल की, असे काय विशेष आहे या गाढवांच्या बाजारात. भारतात अनेक ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. अगदी आपल्या महाराष्ट्रातही. पण, लाहोरच्या या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. ..

गणपती नंतर आता सरकार बसवूया!

  काय म्हणता? तर आता बघता बघता गणपती आले अन् गेलेही. त्यांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या, असे आवतन त्यांना आपण देऊनही टाकले आहे. ‘चैन पडेना आम्हाला’ असेही आपण त्याला म्हणजे बाप्पाला सांगत असतो. नंतर मात्र नवरात्र येते. दिवाळी येते अन् ‘चैन पडेना’ म्हणणारे चैन करत असतात. बाप्पाचा उत्सव गेला असला, सरला असला तरीही उत्साह मात्र संपलेला नसतो. तो कधी संपतही नाही. तसा बाप्पाचाही ‘सीझन-टू’ येतोच. म्हणजे या दहा दिवसांत गणपतीची प्रतिष्ठापना करता आली नाही, ..

या रे या, सारे या...!

या रे या, सारे या. लगबग करा. पटापट या...! इतर कुठेही जाऊ नका! सध्या सत्तेत येण्याची शक्यता केवळ आणि केवळ भाजपा-सेनेचीच असल्याने, धरायचीच झाली तर फक्त त्याच पक्षांची कास धरा. निवडणूक तोंडावर असल्याने घाई करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. नवीन पक्षात प्रवेश करून स्वत:ची उमेदवारी अन् आमदारकी आरक्षित करून घ्या. तसेही, विचारांचे लोढणे खांद्यावर वाहिले नव्हतेच तुम्ही कधी. ..

मसूद अजहरची सुटका, पाकची नापाक कृती!

 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय भारताने घेतला आणि पाकिस्तान बिथरला. मुळात यात पाकिस्तानने बिथरण्याचे काही कारण नव्हते. कारण भारताने जम्मू-काश्मीरबाबत जो काही निर्णय घेतला तो त्याच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रातील आणि घटनेला धरून होता, पाकिस्तानातील कोणत्या प्रांताबाबत नव्हता. मात्र, पाकिस्तानची गेल्या काही दिवसांतील वागणूक ही पिसाळल्यासारखी आहे. पाकिस्तान आधीही भारतात घातपाती कारवाया घडवून आणत होता, आता तर त्याची वागणूक चेकाळल्यासारखी झाली ..