कोविड योद्धा

दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५ ’चे आ.गणपत गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन

‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५' या विशेषांकाचे प्रकाशन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी, दि. १७ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारे, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्याम पाटील तसेच ‘दै. मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी सुधीर लवांडे उपस्थित होते. प्रकाशनानंतर आ.गणपत गायकवाड यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले. ..

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते आणि नगरसवेक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते गुरुवार, दि. १७ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात करण्यात आले...

प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जाणारा महाराष्ट्रातील एकमेव लढवय्या

राज्य चालविण्याची जबाबदारी असतानाही सत्ताधारी पक्षांतील अनेक नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाच्या भीतीने घरात बसून राहिले. मात्र, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी प्रत्येक ‘हॉटस्पॉट’ला भेट देत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तो म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवेसाठी आयुष्य वेचणारे फडणवीस यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा लेख... ..

जनतेचा विश्वास हेच माझे बळ!

कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या दूर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद दिला. आपल्या मतदारसंघात विविध सेवाकार्ये चालविली, त्यामुळे गरजूंना त्याचा मोठा लाभ झाला. स्वत: सेवाकार्यांमध्ये उतरून पूनम महाजन यांनी कार्यकर्त्यांसह जनतेचाही विश्वास जिंकला. ..

अन्यायग्रस्तांचा बुलंद आवाज!

कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधींनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यामध्ये प्रामुख्याने गरजवंतांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यावर प्रामुख्याने भर होता. तेव्हा, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी महामुंबईतील प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जात अन्यायग्रस्तांविरोधात सातत्याने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

कोरोना देवदूत

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र आहे. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही ठाकूर यांची प्रतिमा जनमानसावर कोरली गेली. जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.....

कर्तव्यदक्ष नेता...

कोविडचा काळ हा केवळ जनतेचीच नव्हे, तर सरकार आणि लोकप्रतिनिधींचीही सर्वार्थाने परीक्षा पाहणारा होता. या संकटसमयीच जो जनतेच्या मदतीला धावून जातो, तोे कर्तव्यदक्ष नेता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे त्यापैकीच एक. गरजूंना मदत असो ‘निसर्ग’ चक्रीवादळातून कोकणवासीयांना दिलासा द्यायचा असो, दरेकर यांनी जनतेला सर्वार्थाने आधार दिला. अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा परिचय करुन देणारा लेख... ..

युद्ध ‘कोरोना’ विरूद्ध!

नवी मुंबई महानगराने साधलेल्या आजवरच्या लखलखीत विकासात मागील ३० वर्षे या शहराचे सत्ताधारी म्हणून आ. गणेश नाईक यांच्या दूरदर्शी ध्येय-धोरणांचा निर्विवाद मोठा वाटा आहे. लोकनेता तोच जो खऱ्या अर्थाने संकटकाळी जनसेवेला तत्पर असतो. आ. गणेश नाईक आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते जनसेवेसाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा, नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या कोरोना लढ्यातील योगदानाबद्दल माहिती देणारा हा लेख.....

‘क्यूंकी काम बोलता हैं।

’कोरोनासारख्या जागतिक महामारीने मुंबईसह महाराष्ट्रात हाहा:कार माजविला असताना राज्यातील सत्ताधारी पक्षांतील नेत्यांवर विसंबून न राहता, प्रत्येक वेळी ‘वर्क फ्रॉम फ्रंट’ तत्त्वाचा अवलंब करून कांदिवली पूर्व मतदारसंघासह मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरोनाच्या विरोधातील लढाईत स्वतःला झोकून देणारे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा आढावा घेणारा हा लेख... ..

यज्ञ मदतीचा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपत्तीच्या काळात केलेले कार्य ध्यानात घेत मदतकार्याचा आराखडा तयार केला. आ. निरंजन डावखरे यांच्याबरोबरच आ. संजय केळकर यांच्यासह ठाण्यातील २४ नगरसेवक, ११ मंडल अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मदतीच्या यज्ञात सहभागी झाले. त्याविषयी.....

उद्यमशील योद्धा

उद्योजकांना अडचणीच्या काळात मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या ठायी होती. मदतीची तीव्र आसक्ती आणि दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याची मनी असणारी तळमळ ही पेशकार यांना या काळात स्वस्थ बसू देईना. पेशकार यांनी ‘लॉकडाऊन’ काळात नागरिकांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांचे दु:ख हलके करण्याचा यथोचित प्रयत्न या काळात केला. ..

समायोजित नेतृत्व

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत सर्वच कार्यकर्त्यांना मदतीची दिशा दाखविणे, मदतकार्य करणे, ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या नात्याने सर्व रिकाम्या जागा भरण्याचे काम नाशिक शहरात पार पडले. त्यासाठी अग्रभागी होते ते भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे. तेव्हा, कोरोनाकाळातील गिरीश पालवे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरामध्ये केलेल्या एकूणच मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

आरोग्यरक्षक प्रथम नागरिक

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी खर्‍या अर्थाने नाशिककरांचे पालकत्व निभावले. कुलकर्णी यांनी नाशिकनगरीतील नागरिकांच्या जागरूकतेसाठी ‘लॉकडाऊन’च्या प्रारंभीच्या काळात समाजमाध्यमांतून जनजागृतीपर व्हिडिओ, ध्वनिफितीद्वारे जनजागृती करण्यावर भर दिला. कुलकर्णी यांनी या काळात घेतलेली भूमिका ही नाशिककर जनतेच्या आरोग्याचे हितरक्षण करणारी ठरली...

कर्तव्यप्रिय समाजसेवी नेता

नाशिक प्रशासनासमोर कोरोनाचा फैलाव रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान झोपडपट्टी व दाटीवाटीच्या भागांमध्ये होते. अशातच या भागात मोठ्या संख्येने गरीब, मजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने या नागरिकांसमोर आरोग्याबरोबरच रोजच्या जगण्याचेही गंभीर प्रश्न या काळात उभे राहिले. अशावेळी नागरिक व प्रशासनाला मदतीचा हात देणार्‍या भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांचा कोरोनालढ्यातील योगदानाचा घेतलेला आढावा.....

सेवा परमो धर्म:

जनतेच्या सेवेसाठी भारतात दोन वर्ग हे कायम कार्यरत असतात. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरे म्हणजे शासकीय सेवक. याचीच प्रचिती या काळात आली. स्वतः कोरोनाबाधित होऊनदेखील अविरत सेवाकार्य सुरू ठेवून नागरिकांना मदत करणारे सेवक म्हणून नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांचे कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे...

लोकसेवेचे महानायक

‘सेवा परमो धर्म:’, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा आयुष्याचा संकल्प मानून राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणारे सेवाव्रती म्हणजे खा. मनोज कोटक. कोरोनाकाळात कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे ईशान्य मुंबईच्या रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. मनोज कोटक यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी कोविड काळात केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा... ..

समाजसेवा हेच साध्य

समाजसेवा हे साध्य आहे, तर लोकप्रतिनिधित्व हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. या साधनाचा उपयोग करून जनसामान्यांची सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मात्र, बोरिवली मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील दत्तात्रेय राणे यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केलेले व्यापक मदतकार्य त्यांच्या मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या या मदतकार्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा... ..

कुलाबाकरांचा कैवारी

‘प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’ या भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वाचे पालन सर्वच कार्यकर्ते करतात. असाच एक हाडाचा कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक आकाश राज पुरोहित. कोरोनाच्या संकटात ते पायाला भिंगरी लावून कुलाबा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या मदतीला धावत होते. या काळात गरजूंना त्यांनी लागेल ते साहाय्य करत खूप मोठा दिलासा दिला. तेव्हा, ‘कोविड’ संकटात त्यांनी केलेल्या कामाचा हा आढावा... ..

लोकसेवेचा अविरत वारसा

कोरोनाच्या संक्रमण काळात मैदानात उतरून सर्वसामान्य जनतेत जाऊन प्रत्यक्ष मदतीचा हात देणे जितके जिकिरीचे तितकेच धाडसाचे. मात्र, सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याला निश्चयाचे बळ देत, मदतीचा हात तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी केले. कोरोना संकटकाळातील त्यांच्या कामावर दृष्टिक्षेप टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न. ..

रंजल्या-गांजल्यांचा तारणहार

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात झोपडपट्टी, चाळीत राहणारे, हातावर पोट असणारे अशा सर्वांसमोर जीवन जगण्याचे संकट उभे ठाकले. मात्र, भाजप नेते विनोद शेलार यांनी या कठीण काळात समाजातील रंजल्या-गांजल्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले, कोरोना रुग्णांना बिल कमी करणे, वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, अशाप्रकारची मदत केली. तेव्हा, त्यांच्या या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... vinod shelar..

आव्हानाचा सामना

कोरोना हे जागतिक महामारीचे संकट म्हणजे कार्यकर्त्यांना आव्हानच होते. तो कुठून येईल आणि कोणाला विळखा घालेल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे सजग राहणे आणि लोकांना जागरूक ठेवणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून सुधा सिंग यांनी आपले कर्तव्य मानले आणि कार्यकर्त्यांच्या बळावर गल्लोगल्ली फिरून कोरोना प्रतिबंधासाठी अविरत लढा दिला. गरजूंना सर्वोपरी मदतीचा हात दिला. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

सत्ता स्वार्थासाठी नव्हे, सेवेसाठी...

कोरोनाच्या काळात लोकांना लागेल त्या मदतीसाठी नगरसेवक प्रकाश गंगाधरे हे रस्त्यावर उतरले. अक्षरश: २४ तास जनतेच्या सेवेस सिद्ध झाले. सर्वात प्रथम लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती आणि कोरोनाबद्दलचे गैरसमज दूर करणे गरजेचे होते. प्रकाश गंगाधरे यांनी वस्ती पातळीवर अशा प्रकारे नियोजन केले की, वस्तीतील लोकांशी तत्काळ संपर्क होईल. तेव्हा, प्रकाश गंगाधरे यांच्या कोरोना महामारीच्या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..

आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे लोकप्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकामी दि. २४ मार्च रोजी १५ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच नगरसेविका प्रियंका माने व त्यांचे पती धनंजय भास्करराव माने यांनी २७ मार्चपासून त्यांच्या माध्यमातून मदतकार्याचा श्रीगणेशा केला. त्यांच्या या मदतकार्यामुळे अनेक गरजूंचे रोजच्या आयुष्यातील प्रश्न काही अंशी का होईना मार्गी लागले. तेव्हा, त्यांनी केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

ज्योत एक सेवेची!

आणीबाणीपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले संजय केळकर ठाण्यात दीर्घकाळ भाजपचे काम करत आहेत. ठाण्याच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले आहेत. कोरोना संकटात ठाणे आणि ठाणेकरांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ते उभे राहिले. ‘आपला माणूस, हक्काचा माणूस’ अशी ओळख असलेल्या ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी कोरोना आपत्तीत केलेल्या कामावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख. ..

संकटात सेवेची संधी

‘कोरोना’ या जागतिक महामारीच्या संकटाने उच्च-नीच भेद गळून पडले. सारे एका पातळीत आले. पण, या संकटात सापडलेल्यांना संजय पांडे यांनी मदतीचा हात दिला. कुठलाही भेदाभेद न बाळगता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणुकीनुसार रंजल्या-गांजल्यांची सेवा संजय पांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याचा मोबदला म्हणजे जनतेने दिलेले अनेकानेक आशीर्वाद आणि प्रेम. तेव्हा, त्यांच्या या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख.....

संकटकाळी जनसेवेसाठी तत्पर

कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नेते व ‘ठाणे गौरव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, ‘पीपीई किट’, औषध वितरणाची मदत नौपाड्यासह गरजेच्या प्रत्येक ठिकाणी केली. त्यामुळे गरीब-गरजूंना मोठा आधार लाभला. त्यांच्या या कोविडकाळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

तळागाळातल्यालोकांचा हक्काचा माणूस

हरिष भांदिर्गे... तळागाळातल्या लोकांचा हक्काचा माणूस आणि नगरसेवक म्हणून परिसरात ओळख. मूळ पिंड समाजसेवकाचा असल्यामुळे कोरोनाच्या काळात हरिष भांदिर्गे स्वयंस्फूर्तीने लोकांच्या मदतीला खर्‍या अर्थाने रस्त्यावर उतरले. कुणालाही कुठच्याही प्रकारची मदत करण्यास ते आणि त्यांचे कार्यकर्ते २४ तास तत्पर होते. तेव्हा, त्यांनी या महामारीच्या काळात केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

सजग नेतृत्व!

महामारीचे संकट ज्यावेळी अवघ्या देशावर ओढावले होते, त्याचवेळी ठाणे महापालिका क्षेत्रातही कोरोना हातपाय पसरत होता. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर जाऊन सार्‍यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी ओळखत ठाणे महापालिकेचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुंबरे यांनी मदतकार्याचा धडाका लावला. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या वाटपावर भर न देता, ते खरोखरी एक ‘कोविड योद्धे’ म्हणून कित्येकांच्या मदतीला धावून गेले. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा... ..

मुंबादेवीचा कोरोना रक्षक

मुंबादेवीवरून मुंबई शहराचे नामकरण झाले. व्यापारी आणि कामगारांनी प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी परिसरालाही कोरोनाचा विळखा बसला. अशा परिस्थितीत खचून न जाता, येथील नगरसेवक अतुल शहा खंबीरपणे उभे राहिले. कोरोनामुळे त्रासलेल्या व्यक्तींना त्यांनी धीर दिला. मदत केली. गरजूंना आसरा दिला. त्यांचे हे सेवाकार्य आजही अविरतपणे सुरु आहे. तेव्हा, त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा.....

रुग्णसेवेचा पाईक

‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥’ तुकोबारायांच्या या अभंग पक्तींचा प्रत्यय समाजातील अनेक माणसं प्रत्यक्ष कृतीमधून अमलात आणत आहेत. समाजातील अशाच रंजल्या-गांजल्या लोकांना आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे एक व्यक्ती म्हणजे ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’चे संस्थापक सत्यवान नर. त्यांनी हाती घेतलेल्या समाजकार्याचा वसा खऱ्या अर्थाने ‘कोविड’ संक्रमणाच्या काळात लोकहितास पडला...

अवघे धरू सुपंथ!

कोरोनाकाळात हजारो गरजूंना सर्वतोपरी मदत करणारे विशाल कडणे हे मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक असून उच्च विद्याविभूषित आहेत. DCE, BE, ME, AMIE, FIV अशी शैक्षणिक गुणवत्ता असलेले विशाल हे पेशाने इंजिनिअर आहेत. त्यांनीही कोरोनाकाळात समाजासाठी महत्त्वपूर्ण सेवाकार्य केले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला.तेव्हा, या कोविड योद्ध्याच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

तत्पर, ऊर्जस्वी ‘कोविड योद्धा!

’ठाणे नगरीतील महान सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या स्व. अरविंद पेंडसे यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या मृणाल पेंडसे आज कोरोनाच्या काळात एक नगरसेविका म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक ‘कोविड योद्धा’ म्हणून करत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा व्यक्तिमत्त्व असलेल्या नगरसेविका मृणाल पेंडसे म्हणजे तत्पर, ऊर्जस्वी ‘कोविड योद्धा’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या कार्याचा घेतलेला आढावा. ..

संकटकाळात मदत हे आमचे ब्रीद!

संकटकाळात संस्थेचे काम आणि माणसातली माणुसकी, याचा प्रत्यय येत असतो. कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाने प्रत्येक जण हादरून गेला असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लोकसेवेला वाहून घेतले. या संकटकाळात त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यापैकीच एक म्हणजे भाजयुमो, उत्तर मुंबईचे अध्यक्ष अमर शहा. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

मानव सेवा हीच खरी भक्ती

कोरोनाच्या संकटात सेवाकार्य झाले आहेच. अजूनही गरजेनुसार होत आहे. यथाशक्ती अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय जनता पक्षाचे ठाणे नौपाडा मंडल अध्यक्ष, प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक सुनेश जोशी यांनी पुढाकार घेऊन ‘लॉकडाऊन’च्या पूर्ण कालावधीत नौपाडा परिसरात विविध प्रकारची कामं केली आहेत. ‘कोरोना योद्धा’ होऊन सुनेश जोशी कार्यरत आहेत. नगरसेवक सुनेश जोशी यांनी केलेल्या कार्याचा आढावा... ..

कार्यकर्त्यांचे बळ हीच मोठी शक्ती

कोरोना हे जागतिक महामारीचे संकट होईल आणि जगाचे अर्थचक्र ठप्प होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, जसजसे या आजाराने गंभीर रूप धारण केले, तसे या आजाराची भयानकता लोकांच्या लक्षात यायला लागली. पण, अशा संकटातही लोकांना धीर देत, त्यांना या आजाराशी सामना करण्यासाठी बळ दिले ते प्रभाग क्र. ५२च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी. तेव्हा, या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

युवाशक्तीचा सेवाभावी आविष्कार

‘कोविड’च्या संकटात गरजूंना खर्‍या अर्थाने मदतीचा हात मिळाला तो म्हणजे युवकांचा. अनेक युवा संघटना आपल्याला या काळात रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या. ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ही यामध्ये कुठेही मागे राहिला नाही. खास करून मोर्चाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष शंतनू अगस्ती यांनी या काळात धडाडीने काम केले. त्यांनी या कोरोनाच्या संकटसमयी केलेल्या विविध कामांचा आढावा घेणारा हा सविस्तर लेख.....

जनआकांक्षांची ‘अक्षता’पूर्ती

‘कोविड’संकटाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झपाटून काम केल्याचे आपण पाहिले. यामधीलच एक नाव म्हणजे, पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर. माहिम विधानसभा क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी नवख्या असणाऱ्या तेंडुलकर यांनी लोकांचा विश्वासग्रहण केला आहे. त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा......

यापुढेही समाजासाठी काम करतच राहणार...

कोरोनाचे संकट हे अगदीच अचानक आले. कोणाच्या ध्यानीमनी नसलेल्या या संकटामुळे सुरुवातीच्या काळात सर्वच अगदी भयभीत झाले होते. त्यात हातावर पोट असलेल्या मजुरांची, फेरीवाल्यांची स्थिती सर्वाधिक गंभीर होती. मात्र, तरीदेखील गोरेगाव येथील भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या प्रभागात मदतकार्य सुरू केले, ते आजही सुरूच आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

गरजूंसाठी ‘कृष्णाश्रय’

आजच्या युगात यावी, असं काम कृष्णा पाटील आणि नंदा पाटील या ठाण्यातील नगरसेवक दाम्पत्याने कोरोना कालावधीत केले आहे. प्रभागात आरोग्य शिबिरांचा रतीब घालून समाजातील विविध स्तरांतील गरजूंसाठी हे दाम्पत्य सरसावल्याचे दिसून आले. ‘कोविड योद्धा’ ठरलेल्या या दाम्पत्याच्या दातृत्वाचा हा छोटेखानी आलेख. ..

समाजस्नेही जनसेविका

राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पती रमेश आंब्रे यांची सहचारिणी बनून समाजकारण करत असताना लोकप्रतिनिधी पदाची संधी उपलब्ध झाली अन् भाजपच्या माध्यमातून उच्चभू्र, तसेच गोरगरीबबहुल प्रभागाच्या नगरसेविका बनून जनसेवेचा त्यांनी वसा घेतला. त्यानंतर, सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजस्नेही जनसेविका बनलेल्या स्नेहा रमेश आंब्रे; अर्थात ‘एसआरए’ यांनी ‘कोविड’काळातही आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. ..

आरोग्यदायी वारे,किसन कथोरे

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्या प्रत्येक निराधार व बेघर नागरिकांना मदतीचा हात भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांनी दिला. समाजातील शेवटचा घटक आपल्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यांची काळजी कथोरे यांनी कायम घेतली. त्यांच्या कोरोनाकाळात घेतलेल्या मदतीचा आढावा...

‘नरही नारायण’

कोरोनाच्या संकटकाळात समाजातील अनेक व्यक्तींनी अगदी निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले. त्यामध्ये मोठा वाटा आहे तो लोकप्रतिनिधींचा. मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक आदींनी आपल्या कर्तव्याला स्मरून जनतेची अगदी निरपेक्ष भावनेने सेवा केली. चारकोप विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ३१ चे कर्तव्यदक्ष नगरसेवक कमलेश यादव यांनी ‘नरही नारायण’ ही उक्ती सार्थ ठरवत आपल्या प्रभागात सेवाकार्य अविरत सुरूच ठेवले आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

समाजातील सर्व घटकांचा आधारस्तंभ

‘लॉकडाऊन’च्या या कालावधीत समाजातील वंचित घटकांना सहकार्याची, मदतीची आवश्यकता असल्याने अनेक राजकीय, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे नेते आणि समाजसेवक मदतीसाठी पुढे आले. त्यातीलच एक म्हणजे ठाण्यातील सीताराम राणे होय. ‘कोविड’ काळात ठाणे ते कोकणसह महाराष्ट्रातील सोसायट्या असा सर्वदूर मदतीचा हात देणार्‍या सीताराम राणे या ‘कोविड योद्ध्या’चा आढावा घेणारा हा लेख. ..

‘कोरोना’वर मात करणारे ‘रोल मॉडेल’

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत कठोर परिश्रम, जीवनमूल्ये आणि सत्य या तत्त्वावर चालत इतरांसाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरलेले भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोनाकाळात गरजूंना मदतीचा हात दिला. लहानपणापासून गरिबांचे चटके सहन केल्याने गरिबी काय असते, ते त्यांना चांगलेच ठावूक आहे. म्हणूनच गरिबांना मदतीचा हात देणारे गणपत गायकवाड यांनी ‘कोविड’काळात केलेल्या मदतकार्याचा आढावा...

जनसेवेचा खरा कार्यकर्ता

नागरी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये राष्ट्रवादी विचाराने भारावलेले भाजपचे भटके-विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक नरेंद्र बाबूराव पवार यांनी, आपले आयुष्य नागरिकांची सेवा करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ म्हणत, त्यांनी कोरोनाकाळात अनेकांचे दुःख दूर सारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र, या लढाईत कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ते जनसेवेत रुजू झाले. ..

कोरोना हरणार आपण जिंकू!

करुणा हा धम्माचा गाभा आहे. ती करुणा, ती संवेदना आणि ती माणुसकी जपत योजना ठोकळे यांनी कोरोना काळात कार्य केले. गेली कित्येक वर्षे समाजासाठी काम करत असताना समाजाचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. त्यामुळेच कोरोनाने समाजात भयावह वातावरण झाले. त्यावेळी योजना ठोकळे आपल्या ‘आधार महिला संस्थे’द्वारे समाजाला आधार देण्यासाठी उभ्या ठाकल्या. समता परिषद तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी समाजाला सहकार्य केले...

रुग्णमदतीसाठी धडपडणारा रामभाऊ

सरकारने पुनश्च ‘हरिओम’ म्हणत, ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले असले, तरी ‘लॉकडाऊन’चा भयावह प्रवास अजून संपलेला नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडील आरोग्य यंत्रणा खूप तोकडी असल्याचा अनुभव सध्या येत आहे. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी धडपड करण्याचे काम भाजपचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर (रामभाऊ) पातकर यांनी केले आहे. त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा...

आरोग्यव्रती

जिथे आपली रक्ताची माणसेदेखील मदतीला येत नाहीत, अशा परिस्थितीत आपण घेतलेले सामाजिक कार्याचे व्रत निभावण्यासाठी डोंबिवली शहर मंडलाचे भाजप उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी गरजूंना मदतीचा हात दिला. ‘कोविड’च्या महामारीत गरजूंच्या मदतीसाठी धाव घेणार्‍या म्हात्रे यांची पावलं आजही थांबलेली नाहीत. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

मदतकार्याचा श्रीगणेशा

कोराच्या काळात नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड व त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी नागरिकांना मदतीचा हात देऊ केला. दु:खितांचे अश्रू मदतीच्या रूपाने पुसण्याचे सर्वात पहिले काम या दाम्पत्याने केले. नाशिक शहरात गायकवाड दाम्पत्याने सर्वात आधी मदतीचा श्रीगणेशा केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

एक हात मदतीचा

कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने कुणी गावाकडची पायवाट धरली, तर कुणी बंद दाराआड उपासमारीची वेदना सहन केली. या सगळ्याच गरजूंना कल्याण पूर्व भाजप मंडल अध्यक्ष व कडोंमपा परिवहन सदस्य संजय मोरे यांनी मदतीचा हात दिला. आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांची गरज ओळखून त्यानुसार त्यांना मदत केली. पोलीसमित्रांचीही त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

कोरोनाशी दोन हात करणारे योद्धे

कोविड महामारीच्या काळात जे समाजसेवक प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले होते, त्यांना कोरोना संसर्गापेक्षा आपल्यास कोरोना झाल्यास मदतकार्य थांबण्याची देखील चिंता सतावत होती. अशाच एक ‘कोरोना योद्ध्या’ म्हणजे माधुरी गणेश बोलकर. त्यांना व त्यांच्या पतीला कोरोना संसर्ग होऊन देखील त्यांनी आपल्याद्वारे करण्यात येत असलेल्या मदतकार्यात कोणत्याही स्वरूपाचे विघ्न येणार नाही, याची विशेष काळजी घेतली. त्यांच्या मदतकार्याचा हा परिचय... ..

‘त्याने’ धरली मायेची सावली...

कोरोनाच्या सातत्याने कानावर येणार्‍या बातम्या ऐकून अनेकांचे धैर्य खचले. त्यातही आपल्या घरात कोरोना रूग्ण आढळल्यास कुटुंबीयांना मानसिक आधाराची गरज भासते. कोरोनाच्या काळात आपलीच माणसे एकमेकांपासून दुरावली. या परिस्थितीत कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मायेची सावली धरण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे ठाणे ग्रामीणचे माजी महासचिव व भाजपचे अंबरनाथमधील नेते संजय आदक यांनी केले आहे...

बळीराजाचे मदतकार्य

बळीराजा हा नागरिकांसाठीच्या अन्नधान्यांची अविरत तजवीज करण्यात व्यस्त असतो. ‘लॉकडाऊन’च्या काळात गरीब आणि गरजवंतांसाठी सेवक म्हणून कार्य करणाराही एक बळीराजाच होता. नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. 15च्या नगरसेविका अर्चना थोरात व त्यांचे पती चंद्रकांत थोरात यांनी सेवकाच्या भूमिकेतून नागरिकांची सेवा केली. मुळात शेतकरी असणारे हे कुटुंब आपल्या शेतात पिकलेल्या अन्नधान्यासह गरजवंतांच्या मदतीला धावून गेले...

अंबरनाथकरांचा हक्काचा माणूस

संपूर्ण मानवजातीवर आलेल्या महामारीच्या संकटात जात-पात-धर्म विसरून तन-मन-धन अर्पण करून सेवा देणारे अंबरनाथचे सर्जेराव माहूरकर. त्यांनी समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून गंभीर संकटाशी खंबीरपणे सामना करण्याचे ठरविले होते. तातडीने जनजागृती मोहीम त्यांनी सुरू केली. आरोग्याबद्दल नागरिकांना जागरूक करण्याची जबाबदारी पार पाडली. तेव्हा, त्यांनी केलेल्या या व्यापक सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..

आपला माणूस

अचानक कोसळलेल्या कोरोनाच्या संकटात आपल्या समाजबांधवांचे दुःख दूर करण्यासाठी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अथक प्रयत्न केले. वनवासीबहुल जिल्हा असलेल्या पालघरच्या दुर्गम गाव-पाड्यांपासून ते वस्तीवर जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची मदत पोहोचविण्याचे काम नंदकुमार पाटील व सहकाऱ्यांनी केले, तसेच कोरोना आजारामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या छायेतील जनतेला त्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृतीपर मोहीमही राबविली...

सेवाभाव सर्वोपरी...

कोरोनामुळे सगळीकडे हाहा:कार उडाला. अशा काळात गरजूंना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी विभाग, सहसंयोजक पायल कबरे यांनीही कोरोच्या काळात विविध प्रकारचे मदतकार्य तर केलेच, शिवाय महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर बनविण्याची योजना आखली, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची काळजीसुद्धा घेतली, त्याविषयीचा आढावा......

मदत व प्रबोधनकारी सेवक

कोरोनाकाळात समाजातील नागरिकांना अनेकांनी मदत केली. वस्तू, अन्न, कपडे व इतर माध्यमातून करण्यात आलेली मदत ही नक्कीच आवश्यक अशीच होती. मात्र, त्याचबरोबरीने नागरिकांना कोरोनाबाबत माहिती देणे आणि त्यांचे प्रबोधन करत त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणेही आवश्यक होते. इतर मदतीबरोबरच प्रभाग क्र.२३ (अ) च्या नगरसेविका रूपाली यशवंत निकुळे यांनी केलेले कार्य हे नक्कीच वाखाणण्याजोगे असेच आहे...

भरतभाईंची मदतभरारी...

मुंबई आणि आसपासच्या शहरांबरोबरच पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. डहाणूचा शहरी-ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही. रोजंदारीवर काम करणार्‍यांपासून ते विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत हे या काळात गरजूंच्या मदतीसाठी धावून गेले. तेव्हा, भरतभाईंच्या या मदतभरारीचा घेतलेला हा आढावा.....

सेवा समाजहिताची!

कोरोना पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ काळात समाजातील सर्वच घटकांना मदतीची आस होती. समाजाचे हित साधणारी सेवा या काळात होणे हे अत्यावश्यक होते. सामाजिक निकड लक्षात घेऊन नगरसेविका छाया देवांग यांनी समाजाचे हित साधणारे कार्य करण्यास सुरुवात केली आणि त्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, छाया देवांग यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

कोरोना काळातील ‘विश्वदीप’

‘कोविड’ काळात अनेक गरजूंना अन्नधान्य आणि जेवण पुरविण्याचे काम भाजपच ‘फ’ प्रभागाचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक विश्वदीप सुभाष पवार यांनी केले आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. हे दान करताना पवार यांनी कोणताही फोटो काढला नाही. अन्नदान केल्यावर ते कोणाला सांगूही नये, अशीच पवार यांची धारणा आहे. प्रसिद्धीपासून लांब असलेला हा ‘कोविड योद्धा’ त्यांच्या या गुणांमुळेच इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ..

‘लक्ष्मी’ची पावले!

गेल्या ३० वर्षांपासून भाजपमधील सक्रिय कार्यकर्ता असलेल्या आणि आता वयाची ६० वर्षं पूर्ण केलेल्या लक्ष्मीदेवी हजारी, या स्वत: मधुमेह रुग्ण असतानाही कोविड काळात रस्त्यावर उतरुन गरजूंच्या मदतीसाठी तत्पर होत्या. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी शक्य तेवढी मदत पोहोचविण्याचा विडा उचलला. अन्नधान्यापासून सॅनिटायझेशनपर्यंत त्यांनी सर्वप्रकारची मदत गरजूंना केली. तेव्हा, त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

खर्‍या गरजवंतांचे सेवक

कोरोनाकाळात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आल्यानंतर समाजाची आर्थिक स्थिती कमालीची खालावली होती. अनेकांचे रोजगारही बुडाले. मध्यमवर्गीय कुटुंबंही हलाखीच्या परिस्थितीचा सामना करू लागली. हातावर पोट असणार्‍या नागरिकांचे हाल तर अवर्णनीय असेच होते. अशा वेळी अन्नधान्य, लहानग्यांसाठी दूध आदींचे मोठे प्रश्न समाजात निर्माण झाले होते. गरजवंत असलेले अनेक जण समाजात दिसत होते. त्यापैकीच एक म्हणजे नाशिकच्या दीपाली सचिन कुलकर्णी.....

‘मी’ पणा बाजूला सारून कार्य करणारे सेवक

‘लॉकडाऊन’मच्या काळात मदतीचे अनेक हात या काळात नागरिकांच्या समोर आले. नागरिकांनाही त्यामुळे आधार मिळाला. मात्र, या काळात करण्यात आलेल्या मदतीचे काही हात असे होते की, त्यात ‘ही मदत मी केली,’ असे सांगणे त्यांना अयोग्य वाटत होते. आपण एकट्याने मदत केल्यास ‘मी’पणाचा लवलेश त्यात दिसून येईल, त्यामुळे त्यांनी अनेकांच्या मदतीने सेवाकार्य करण्यास प्राधान्य दिले. त्यातीलच एक नाव म्हणजे चंद्रकांत खोडे...

‘भरत’ एक लढवय्या कोरोनावीर

स्थानिकांसह परप्रांतीय स्थलांतरित मजुरांसाठी सदैव मदतीचा हात देणारे भाजप नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक आणि ‘न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघा’चे संस्थापक व ‘तारामाउली सामाजिक सेवा संस्थे’चे संस्थापक भरत अभिमन्यू चव्हाण यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, होमियोपॅथिक औषध वितरणाची मदत केली. ‘कोविड’ काळात भरत चव्हाण यांनी केलेल्या या मदतकार्याचा हा सविस्तर आढावा... ..

मदतीचा ध्यास ‘साई’ला

कोरोनामुळे गाव, शहर, काम आणि दाम सारेच बंद झाले. एकीकडे रोजगार नसल्याने उपासमार, तर दुसरीकडे नियतीशी लढताना अनेकांचे श्वास बंद झाले. काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. या सगळ्यांना मदतीचा हात दिला तो भाजपचे प्रभाग क्रमांक ४६ चे माजी नगरसेवक स्नेहल (साई) शेलार यांनी दिला. दातृत्व हाच त्यांचा ध्यास असल्याने त्यांनी सर्व नागरिकांना वैयक्तिक मदत केली. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा...

शेतकरी दादा

कोरोना महामारी आणि ‘लॉकडाऊन’मध्ये संपूर्ण जग थांबले होते. या काळात बळीराजा कायम राबत होता. त्याला आधार देण्याची गरज होती. आस्मानी संकटही डोक्यावर उभे होते. शेतमाल जागीच सडून जातो की काय, अशी भीती होतीच. याच वेळी भाजपचे नाशिक कामगार आघाडी प्रदेश सचिव विक्रम नागरे यांनी शेतकर्‍याचा माल थेट गरजूंपर्यंत पोहोचवून एक नवा आदर्श जगासमोर ठेवला. त्यांच्या मदतकार्याचे हे मॉडेल एक आदर्श ठरत आहे...

त्यांनी आणला आयुष्यात गोडवा...

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दसर्‍याला प्रत्येकाच्या घरात गोडधोड बनावे या हेतूने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सदस्य व प्रभाग क्र. ६६ आयरे गावचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी श्रीखंडाचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या कामाचा घेतलेला आढावा.....

स्वयंसेवकाचे सेवाव्रत

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक लागलेला ‘लॉकडाऊन’ आणि सर्वकाही ठप्प झाल्यानंतर आपल्या परीने सर्वसामान्यांना धीर देण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वितरण, भाजीपाला वितरण व मजुरांना अन्नदान करणारे भाजपचे ठाणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीकांत राजपूत. त्यांच्या मदतीमुळे कित्येकांच्या जीवनावश्यक गरजांचा प्रश्न मार्गी लागला. तेव्हा, श्रीकांत राजपूत यांनी कोरोनाकाळात केलेल्या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..

दुर्बलास साहाय्यकारी

कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्यावर सर्वात जास्त फटका बसला तो कष्टकरी वर्गालाच. ‘दाने दाने पे लिखा हैं, खानेवाले का नाम’ असे जरी आपण म्हणत असलो, तरी या काळात खाणारे ‘अनेक’ आणि ‘दाना’ मात्र ‘नावालाच’ अशी सामाजिक स्थिती निर्माण झाली होती. अशावेळी नागरिकांच्या अपेक्षा समजून घेत आणि खर्‍या गरजवंतांच्या मदतीसाठी जीवाचे रान केले ते हर्षा व त्यांचे पती आशिष फिरोदिया यांनी...

वंचितांचा आधारवड

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नातीगोती, आप्तस्वकीय किंबहुना मित्रपरिवारांमध्येही वितुष्टयेण्याचे अनेक प्रसंग घडले. अशा सुन्न वातावरणात सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचा धडाही कोरोना महामारीने साऱ्यांना शिकवला. या ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार, गरजू व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे बोईसर येथील भाजप उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे संपूर्ण बोईसरवासीयांसाठी वंचितांचा आधारवड ठरले आहेत...

कोरोनावर मात करणारी ‘मनीषा’

डोळ्याला न दिसणार्‍या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले, ते अद्याप संपुष्टात आलेले नाही. ‘आमचे काम, हीच आमची ओळख’ म्हणत भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांनी कोरोनाकाळात गरजूंना मदत केली. स्वत:ला कोरोनाची लागण होईल ही भीती मनात कधी बाळगली नाही. नि:स्वार्थी भावनेने काम करीत प्रसिद्धीपासून दूर राहत ‘कोविड’ काळात मनीषा धात्रक यांनी केलेल्या कार्याचा आढावा...

संकटकाळातला दिलदार

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरीसारख्या वनवासी व दुर्गम, सर्वच सोयी-सुविधांची वानवा असलेल्या भागातील रहिवाशांचे बिकट हाल झाले. मात्र, भाजपचे आदिवासी आघाडी, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले यांनी या संकटाच्या काळात आपल्या समाजबांधवांच्या मदतीला धावून जात त्यांना दिलासा दिला. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, तसेच मास्क, सॅनिटायझर व औषधांचेही वितरण केले...

‘हाच’ खरा समाजव्रती

कोरोना या रोगावर कोणतेही औषध नसल्याने सरकारने प्रत्येकाला घरातच थांबण्याचे आवाहन केले. पण, सामाजिक व्रत हाती घेत एका ध्येयाने झपाटलेले मांडा-टिटवाळा येथील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष परेश गुजरे घराबाहेर पडले, ते गरजूंच्या मदतीसाठी. घरातून बाहेर पडल्यावर कोरोनाची लागण होऊ शकते, याची पूर्ण जाणीव असतानाही त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

जनमानसाप्रति अशीही ‘वि’नम्रता

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसेवक पती जयेंद्र कोळी यांच्या सोबतीने समाजकारणाचे धडे गिरवता गिरवता लोकप्रतिनिधीची धुरा त्यांच्या शिरावर पडली. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका बनल्यानंतर मागे वळून न पाहता जनमानसाप्रति आपली ‘वि’नम्रता त्यांनी सिद्ध करून दाखवली. अशा या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी ‘कोविड’काळात केलेल्या समाजसेवेची ही चित्तरकथा सार्‍यांनाच भावणारी आहे. ..

भलामाणूस

कोरोना महासंकटात माणुसकीला जागणारे अनेक हात पुढे आले. विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांनी आपापल्या परीने हजारो-लाखो गरजूंना मदतीचा हात दिला. ‘कोरोना’ महामारीच्या काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता, संपूर्ण कुटुंबासह जनसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे वसई-विरार शहराचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी ‘कोविड’च्या संकटकाळात केलेल्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

अविरत सेवाभाव

‘लॉकडाऊन’च्या काळात गरीब, कामगार व मजूर वर्ग यांच्या मदतीला धावून जात भिवंडी महापालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते नगरसेवक यशवंत टावरे यांनी माणुसकीच्या नात्याने प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य, जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भिवंडीसह आजूबाजूच्या गावांतदेखील केले. त्याचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा लेख.....

कोविड काळात आशेचा ‘किरण’

राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना केवळ समाजसेवेची आवड असल्याने लोकप्रतिनिधी बनलेल्या ठाण्यातील भाजप नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी ‘कोविड’ काळात गोरगरिबांसह उच्चभ्रू नागरिकांसाठी फार मोठे कार्य केले. त्यांच्या या मदतीचा अनेक गरजूंना लाभ झाला. त्यामुळे सर्वांसाठीच त्या आशेचा ‘किरण’ ठरल्या. पती डॉ. किरण मणेरा यांच्या साथीने अर्चना यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची घेतलेली ही दखल... ..

‘नामा’ म्हणे येथे दुजा नको भाव...

कोरोनामुळे सुरु झालेल्या टाळेबंदीमुळे कामगार, मजूर, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होऊ लागले. अशा परिस्थितीत नगरसेवक नामदेव ढाके यांनी एक समाजसेवक म्हणून गरजूंना मदतीचा हात दिला. अन्नाची पाकिटे असो वा भोजन व्यवस्था किंवा अगदी ज्येष्ठ नागरिकांना औषधे आणून देणे, या कामांची नगरसेवक नामदेव ढाके यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागात सुरुवात केली. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

‘शीतल’छाया

‘लॉकडाऊन’ च्या काळामध्ये झोपडपट्टी परिसरातील गरीब, कामगार तसेच गरजू, अत्यावश्यक सेवा देणार्‍यांच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १९चे नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी समाजाप्रतिची माणुसकी तर जपलीच, शिवाय मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वितरणही केले. तसेच प्रभागामध्ये गरजवंतांना प्रत्येक ठिकाणी मदत केली. त्यांच्या कोरोना काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख.....

उष:काल होता होता..

‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळामध्ये गरीब, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नगरसेविका उषा मुंडे यांनी आपली माणुसकी जपत अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणासह व्यापक स्वरुपात मदतकार्य हाती घेतले. त्यांनी केलेल्या व्यापक मदतकार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात युवा, सुशिक्षित महिला ज्यावेळी सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा आपल्या कार्यशैलीतून समाजावर आलेल्या कुठल्याही संकटावर त्या मात करू शकतात. याची प्रचिती नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती गुरखे-साटम यांनी कोविड महामारी काळात केलेल्या मदतीतून मिळते. महामारी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत समाजव्रत म्हणून त्यांनी केलेल्या मदतकार्याचा हा आढावा.....

‘कैलासा’एवढा मदतीचा ध्यास!

कोरोनाच्या काळात काही लोक समाजसेवेचा वसा घेऊन पणतीरूपी प्रकाशाने कोरोनारूपी महाभयंकर मृत्यूच्या काळोखात प्रकाश पेरण्याचे काम करत होते. त्यापैकीच एक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वार्ड क्रमांक २३, थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे. काळ-वेळ, दिवस-रात्र असा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला मदतकार्यात झोकून घेतले. तेव्हा, त्यांनी ‘कोविड’ काळातील केलेल्या कार्याचा घेतलेला हा आढावा.....

संकटमोचक महेश

अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटाच्या काळात भाजप आमदार महेश बालदी उरण तालुक्यातील गरजवंतांच्या पाठीशी उभे राहिले. महेश बालदी व भाजप कार्यकर्ते तसेच सहकार्‍यांनी जीवनावश्यक वस्तू, मास्क, ‘पीपीई’ किटचे वाटप केले, तसेच स्थलांतरित मजुरांनाही धीर दिला व त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. परिणामी, तालुक्यातील सर्वांच्याच मनात कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास निर्माण झाला...

सेवा धर्म सर्वोपरी...

‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळात कर्तव्य म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने गरजूंच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा गोरखे भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या प्रभाग क्र. १० मध्ये व्यापक स्तरावर अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरण केले. प्रत्येक ठिकाणी गरजूंना लागेल ती मदत त्यांनी केली. तेव्हा, त्यांच्या कोविड काळातील मदतीचा परिचय करुन देणारा हा लेख.....

सुजाताताईंचे सेवाकार्य

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे क्षणार्धात सगळे ठप्प पडले. माणसाच्या हालचालींबरोबरच औद्योगिक चक्रही मंदावले. गरीब, मजुरांपुढे तर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. अशा कठीण समयी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता पालांडे गरजूंच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी सामान्यांना धीर दिला आणि शिवाय भरीव मदतही केली. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याची ओळख करुन देणारा हा लेख.....

‘कोशिश’ - एक आशा

पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी ‘लॉकडाऊन’ परिस्थितीत हजारो नागरिकांना मदत केलीच; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमालाही महत्त्व दिले. कोरोनाकाळात लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी ‘कोशिश फाऊंडेशन’च्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कामाचा आढावा घेणारा हा लेख... ..

देणाऱ्याने देत जावे...

‘मै उस प्रभू का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं।’ या पंक्तीप्रमाणे आजन्म सेवाव्रत घेतलेल्या माजी नगरसेवक डॉ. जयाजी कृष्णा नाथ यांनी कोविड काळात एक डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणून झपाटून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मदतीमुळे हजारो गरजूंच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या जीवनाला प्रकाशमान केले. तेव्हा, डॉ. जयाजी कृष्णा नाथ यांच्या महामारीच्या काळातील कार्याला दिलेला हा उजाळा.....

मदतीला धावून आले भगत!

कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल पांडुरंग भगत यांनी आपले योगदान दिले. ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... ..

सेवायोगी

‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, गरीब, कामगार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध पातळीवर मदतकार्य राबविले. त्यांच्या मदतकार्यामुळे कित्येकांचे ‘लॉकडाऊन’च्या काळातील आयुष्य अगदी सुसज्ज होण्यास मदत झाली. तेव्हा, योगिता नागरगोजे यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

जनसामान्यांचा ‘कोविड योद्धा’

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात सामान्य जनतेची या महामारीच्या विळख्यापासून सुरक्षित राहून जगण्याचा संघर्ष सुरु झाला. जनसामान्यांच्या या संघर्षाला शासकीय यंत्रणांसोबतच अनेक नेतेमंडळी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तिमत्त्व यांनी पाठबळ दिले. असेच एक समाजसेवेचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय दिनकर भोपी. त्यांच्या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..

मदतीचा भक्कम ‘दुर्ग’

गेली अनेक वर्षे समाजसेवा आणि राजकारण करत असताना ‘लॉकडाऊन’ काळामध्ये गरीब, कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत, भाजपचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री राजू दुर्गे यांनी आपल्या समाजसेवेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा परिचय करुन दिला. त्यांनी आपल्या प्रभागात केलेल्या सेवाकार्यामुळे कित्येकांच्या चेहर्‍यावर हास्य उमलले. तेव्हा, दुर्गे यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

दिघ्याचे दादा...

कोरोनाच्या संकटात जात-पात, पक्ष, समाज, स्त्री-पुरुष, असा कुठलाही भेदाभेद न ठेवता, आपली माणसं म्हणून त्यांच्यासाठी धावून येणारा दादा माणूस, अशी ओळख नवीन गवते यांनी निर्माण केली. नवी मुंबईतील दिघा भागात लोकांना लागणारी हवी ती मदत त्यांनी पोहोचविली. त्यामुळे गरीब-गरजूंना त्यांच्या या मदतीचा मोठा आधार मिळाला. तेव्हा, नवीन गवते यांच्या मदतकार्यातील काही निवडक आणि प्रेरणादायी क्षण... ..

बहुजन हिताय, बहुजन सुखाय।

कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी यांनी समाजकार्यात योगदान दिले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत ही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... ..

सर्वसामान्यांचा आधारस्तंभ

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात कामगार, गरीब, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत भाजप शहर उपाध्यक्ष व ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, औषध वितरणाची मदत प्रभागासह अन्य शहरांमध्येही ठिकठिकाणी केली. या मदतकार्यामुळे हजारो नागरिकांना अगदी आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळाला. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

मदतीचे ‘अमर’कार्य

कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी मदतकार्यात आपले योगदान दिले. ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यांवर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही या प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... ..

माणुसकीची भिंत

कोरोना संकटात मजूर, विद्यार्थी तसेच अन्य लोकांना जेवणाची सोय करण्यापासून ते रुग्णांना ऑक्सिजनची सोय, रक्तदान शिबिरांचे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक राहुल खाडे यांनी आयोजन केले. तसेच आपल्या प्रभागात वेगवेगळ्या लोकोपयोगी योजनाही राबविल्या. त्यांनी केलेल्या समाजकार्याचा प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तेव्हा, आपल्या मदतकार्याच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उभारणार्‍या राहुल खाडे यांच्याविषयी.....

सेवाव्रती

कोरोनापेक्षा त्याची भीती नागरिकांमध्ये पसरण्याचे प्रमाण प्रारंभी काळात जास्त होते. या काळात गरज होती ती नागरिकांना धीर देण्याची आणि लागेल ती मदत करण्याची. म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आपल्या विभागात जनजागृती करत, नागरिकांना धीर देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ‘कोविड’काळातील त्यांनी केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

जबाबदार जनसेवक

कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक व तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मदतीचा हात दिला. अनेक गरीब कुटुंबावर संकट कोसळले होते. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... ..

या, जीवन आपुले सार्थ कराया!

कोरोनासारख्या महामारीच्या काळात कोविड योद्ध्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाताना आपला फारसा विचार केला नाही. अशीच महामारीच्या काळात मदत करत असतानाच, त्यांना ‘कोविड’ची लागण झाली. मात्र, ४९ वर्षांचे ‘कोविड योद्धा’ असलेले गणेश गंगाराम म्हात्रे यांनी कोरोनालाही हरवले आणि त्यांच्या विभागातील नागरिकांसह संकटांनाही तोंड दिले. दुहेरी संकटावर धैर्याने मात करणाऱ्या जनसामान्यांच्या म्हात्रे साहेबांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

गरजवंतांचा आधारस्तंभ

कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ चे नगरसेवक बबन मुकादम यांनी मदतकार्य केले. कोरोनामुळे समाजातील विविध स्तरातील लोकांसमोर अनेकविध प्रश्न उपस्थित झाले. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत ही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... ..