बबन वाळके

नाव : बबन झोलबाजी वाळके, वय ६२ वर्षे
जन्मतिथी : ८ डिसेंबर १९५५
अनुभव : ३५ वर्षे पत्रकारिता
आवड : गुन्हेगारीविषयक व न्यायालय बातम्या, शोध पत्रकारिता.
नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक तरुण भारतात गेल्या ३२ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत पत्रकारिता.
आकाशवाणीवर सात वर्षे नैमित्तिक वृत्तवाचक म्हणून सेवा. दूरदर्शनसाठी ‘वेठबिगारांची समस्या व उपाय’ आणि ‘अतिधोकादायक कारखान्यातील कामगारांचे प्रश्न’ या दोन वृत्तपटांसाठी संहिता लेखन.
हे दोन्ही वृत्तपट राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित झाले आहेत.
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचा चार वर्षे सरचिटणीस.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा चार वर्षे अध्यक्ष, एक वर्ष सरचिटणीस.
महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर सदस्य तसेच पत्रकारांसाठी पेन्शन योजना समिती, अधिस्वीकृतीसाठी नियम उपसमिती, राज्यशासनाच्या पत्रकार पुरस्कार योजना, पोलिस-पत्रकार समन्वय समिती व अन्य शासकीय समित्यांवरही सेवा.

निवास : बी २-२९, दुसरी इमारत चौथा माळा, पत्रकार सहनिवास, अमरावती मार्ग, सिव्हिल लाईन्स, नागपूर-१
भ्रमणध्वनी क्रमांक : ९८८१७१७८२१