पितृतुल्य विष्णुदादा...
आज प्रत्येकाच्याच हृदयात दादा तुम्ही घर केलं आहे. आज फक्त देहरूपाने तुम्ही आमच्यात नाहीत, पण तुमचा सहवास, तुमचे सत्विचार, तुमचा शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे आणि असेल. मी १९८७ साली इयत्ता पाचवीत तलासरी केंद्रात प्रवेश घेतल्यापासून आबा (माधवराव काणे), चिंतामणदादा वनगा, विष्णुदादा सवरा, आदरणीय अप्पा, वसुधाताई, आदरणीय कुंदाताई, अशा अनेक सत्-पुरुषांचा सहवास मला लाभला, हे मी माझे भाग्य समजते. कैलासवासी आबा, आदरणीय अप्पा, वसुधाताई या त्रिमूर्तींच्या सत्विचाराने प्रेरित झालेले चिंतामणदादा, विष्णुदादा ..