विचारविमर्श

बेजबाबदारपणा संपणार कधी ?

राजकीय मतभेद असले तरीही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मोदी सरकारविषयी सर्व पक्षांना विश्वास वाटतो, हेदेखील अधोरेखित झाले आहे. मात्र, काँग्रेसने या प्रश्नावर जे काही राजकारण केले ते पाहता देशातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या पक्षाचा बेजबाबदारपणा संपणार कधी, हा प्रश्न निर्माण होतो...

या नव नवल नयनोत्सवा

ब्रिटिशांनी जसं प्रदर्शनरुपात आपल्या नाटक आणि संगीताच्या प्रेक्षक-श्रोत्यांचा इतिहासच लोकांसमोर मांडला, तसं आपल्याला करता येईल का? याचा विचार करताना असं आढळतं की, अशा प्रकारची संग्राहक वृत्ती आपल्याकडे अभावानेच आहे...

अ‘हवालदिल’

फौजदारी न्यायविश्वासमोर असलेले प्रश्न, काळाची आव्हाने याविषयी आपल्याकडे उदासीनता असते. समित्या, विधी आयोग यांचे अहवाल सरकारी कपाटात जागा व्यापून राहतात. परंतु, कायद्यातील सुधारणेसाठी नेमलेल्या समितीच्या माध्यमातून हे चित्र बदलण्याचे संकेत दिसत आहेत...

दिव्यांगांना रोजगारातील समान संधी

कोरोनाकाळात दिव्यांगांच्या रोजगाराच्या प्रश्नाने अधिक गंभीर स्वरुप धारण केले. तेव्हा ‘सक्षम’ व इतर सामाजिक संस्थांनी याविषयी व्यापक मोहीम हाती घेतली असून दिव्यांगांना रोजगारातील समान संधीसाठी चालना दिली आहे. याविषयीचे कायदेशीर नियम आणि सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख.....

कलियुगातील शिशुपाल

शिशुपाल आपल्या कर्माने मेला, असे आपण म्हणतो. या देशात त्या शिशुपालाचे असंख्य अवतार आहेत. मोदी काही कृष्ण नाहीत आणि त्यांच्या हातात सुदर्शनचक्रदेखील नाही. कलियुगातील श्रीकृष्ण म्हणजे जनता जनार्दन आहे. तिच्या बोटावरील काळी शाई हे तिचे सुदर्शन चक्र आहे...

पाकिस्तानातील बालविवाहाची कुप्रथा

बालविवाह एक अमानवी प्रथा असून त्याचे सामाजिक आणि आर्थिक निहितार्थ आहेत. पाकिस्तानसारख्या देशात बालविवाहामुळे लोकसंख्यावाढीच्या समस्येने अधिक भीषण रुप धारण केले आहे. सोबतच यामुळे पाकिस्तानच्या दयनीय आरोग्यव्यवस्थेवरही याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो...

जखमी ‘ड्रॅगन’ अधिक धोकादायक!

गलवान भागात चीनला माघार घ्यावी लागली. पण, आपण झुकलो असे चित्र जगासमोर गेले तर ‘आसियान’मधील आपले छोटे शेजारीही आपल्याकडे डोळे वटारुन पाहतील, याची चीनला पुरती जाणीव आहे. त्यामुळे चीन लवकरच भारताची खोडी काढण्याचा प्रयत्न करेल...

राज्याचे हवाई धोरण वार्‍यावर...

राज्यात कोरोनापश्चात नवीन उद्योगधंदे येतीलही. पण, ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्यासाठी हवाईमार्गांची आणि पर्यायाने विमानतळांची रखडलेली कामे जलद गतीने सुरु करण्याची गरज आहे. तेव्हा, राज्यात नेमकी विमानतळांची काय परिस्थिती आहे, त्याचा घेतलेला हा आढावा.....

संयमित हिंदू समाजाचे दर्शन!

पंढरपूरची आषाढी यात्रा असो वा पुरीची जगन्नाथ रथयात्रा, या दोन्ही यात्रा विनाखंड याही वर्षी पार पडल्या. या यात्रांमध्ये सहभागी होता न आल्याचे दु:ख लाखो हिंदू भाविकांना झाले. पण, काही निर्बंध पाळून या यात्रा खंड न पडता पार पडल्या याचे समाधान या भाविकांच्या काहीशा हिरमुसल्या चेहर्‍यावर नक्कीच दिसून आले...

तामिळनाडूत पोलिसी अत्याचाराचा कहर

एका अंदाजानुसार, भारतात २०१९ साली १,७३१ लोकांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. सरासरी काढली तर दर दिवशी पाच लोकं या प्रकारे मरतात. हे फार भयानक आहे. कारण, जे रक्षक आहेत, तेच भक्षक झालेले दिसून येतात. म्हणूनच या घटनेची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त आहे...

प्रियांकाच्या आजीचे ‘मोठेपण’

आपण कितीही कर्तृत्वहीन असलो, तरीही आपल्या कर्तबगार पूर्वजांच्या पुण्याईवर अनेक पिढ्या नुसती चैन करणे, त्याचा भुर्दंड सामान्य जनतेच्या माथी मारणे इतकाच त्या तनख्याचा अर्थ होता. इंदिराजींनी त्यावरच हल्ला केला. अध्यादेश काढून तनखे रद्द केले आणि ते विधेयक राज्यसभेत नापास झाल्यावर पुन्हा आणून तो निर्णय अंमलात आणला होता. बाकीची आजी आठवते, तर अशा वडिलार्जित पुण्याईवर सर्वात आधी कोणी कुर्‍हाड चालवली, ते प्रियांका-राहुलना का आठवत नाही?..

केवळ महाराष्ट्र राज्य रखडले!

कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर पहिल्या पाचांमध्ये आला तरी त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला यश आले असते, तर संपूर्ण देशाची परिस्थिती खूप चांगली राहिली असती. आघाडी सरकारच्या अपयशामुळे महाराष्ट्र राज्य तर अडचणीत आलेच, पण त्याने देशालाही अडचणीत आणले. आघाडी सरकारने सक्रियतेने आणि प्रभावीपणे कोरोना रोखण्यासाठी काम केले, तरच या संकटातून राज्याची सुटका होईल; नाही तर बाकी राज्यात परिस्थिती सुधारली आणि फक्त महाराष्ट्र रखडला हे ..

‘युएसएस फिलाडेल्फिया’ आणि स्टिफन डिकॅटर

‘फिलाडेल्फिया’ पुन्हा कब्जात आणून बंदराबाहेर नेणं अशक्य आहे, असं दिसल्यावर डिकॅटरने तिथल्या तिथे निर्णय घेतला. जहाज नष्ट करायचं! डिकॅटर आणि त्याच्या हिकमती माणसांनी हे घडवून आणलं आणि ते जखमी, पण जीवंत स्थितीत आपल्या तळावर परतले...

रेखा : संघ बागेतील विकसित रोपटे

रेखा चव्हाणचे (राठोड) लग्न बालाजीबरोबर २८ जूनला यमगरवाडी येथे झाले. कन्येचा विवाह होणे, यात विशेष काय? दरवर्षी असे लाखांनी विवाह होत असतात, त्यातील हा एक विवाह. अशा प्रत्येक विवाहाचे सार्वजनिक कौतुक करीत नाही, तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परंतु, रेखाचा विवाह, म्हटला तर सामान्य विवाह आहे, पण तो तसा नाही...

या श्रमिकांनो, परत फिरा रेऽऽऽ...

देशभरात सध्या ‘अनलॉक’ची प्रकिया सुरु असून, कित्येक कंपन्या गावी परतलेल्या कामगारवर्गाला पुन्हा शहरात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तेव्हा, यासाठी नेमकी विविध कंपन्यांनी कशाप्रकारे व्यवस्थापकीय धोरणांचा अवलंब केला, त्याची माहिती देणारा हा लेख.....

बिल्ली चली हज को?

आपल्याच फुटीरतावादी सहकार्‍यांवर धार्मिक शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावल्याचा गिलानीने केलेला आरोप म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज को’ या प्रकारातला आहे. त्यात केंद्र सरकारला ‘हुर्रियत’चे नवे नेतृत्वही कसे नेस्तनाबूत करता येईल, याची काळजी घ्यावी लागणार आहे...

न दैन्यं न पलायनम्

हिंदूहिताची पत्रकारिता करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार पूर्वीपासून होत आहेत. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने व गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने गुन्ह्यांवर स्थगिती देण्याचे दिलेले आदेश सुखकारक असले तरीही समाधानकारक नाहीत...

सिंधचा सिंह...

विकसित चेतनेची अभिव्यक्ती पाकिस्तानची केवळ एक वसाहत ठरलेल्या सिंधमध्ये सातत्याने पाहायला मिळते. सिंधमधील याच चेतनेचा एक महत्त्वाचा आवाज होता, अत्ता मुहम्मद भांभरो आणि त्यांचेच यंदाच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात निधन झाले. त्यांच्याविषयी.....

जिथे लागते, तिथेच मारले!

अ‍ॅपद्वारे सेवा देणार्‍या अनेक भारतीय स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांनी गुंतवणूक करुन एक प्रकारचे चक्रव्यूह रचले आहे. सीमेवरील संकटामुळे हे चक्रव्यूह भेदायची सुसंधी चालून आली आणि ती मोदी सरकारने साधली...

‘हरित कोकण एक्सप्रेस-वे’ ठरेल का कोकणचा विकासमार्ग?

किती सरकारे आली अन् गेली, पण कोकणचा विकास मात्र आश्वासनांच्या भरती-ओहोटीत कायमच वाहून गेला. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारने नुकतीच घोषणा केलेला ‘हरित कोकण एक्सप्रेस-वे’ कोकणचा विकासमार्ग ठरेल का, याचा केलेला हा ऊहापोह.....

देशास सर्वोच्च प्राधान्य हे लक्षात कधी येणार?

सरकार एकीकडे चीनच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यामध्ये खोडा कसा घालता येईल, असा प्रयत्न काही विरोधी पक्ष, प्रसिद्धी माध्यमे करीत आहेत. ही माध्यमे भारतात आहेत की चीनमध्ये, अशी शंका त्यांचा जो व्यवहार दिसत आहे त्यावरून वाटते...

भावनाशून्य चीन

जगात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोक मेली आहेत. मात्र, चीनच्या भावना शून्य आहेत. उलट जिनपिंग म्हणतात, विनाशकारी कालखंड येऊन गेल्यानंतर नवीन परिवर्तन होत असते. असा हा चीन आणि अशा चीनशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तो करताना चीनपेक्षा अधिक ‘डिसेप्शनसिव्ह’ बनावे लागेल. भावनाशून्य देशाशी, तसाच व्यवहार करावा लागेल...

पवार, पडळकर आणि ‘कोरोना’

पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण, जे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दावे किती टाहो फोडून केले जात होते? त्याचा पुनरुच्चार खुद्द पडळकरांनी नंतर केलेला नाही. पण, वाहिन्यांच्या बातमीदारांनी पन्नासवेळा प्रत्येकी तेच वाक्य उच्चारलेले आहे ना? ते वाक्य सातत्याने बोलण्यातून त्यांना काय साधायचे होते? त्यावर चर्चाही झाल्या. त्यातही त्याचा पुनरुच्चार चालूच होता. नेमके वाक्य टाळूनही चर्चा व बातम्या होऊ शकल्या असत्या ना? की या पत्रकारांना व वाहिन्यांना आपल्या मनातली गरळ ओकण्यासाठी पडळकरांनी दिलेली ..

थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला...

उद्धवजी, आपण वहीपेन घेऊन नव्हे, खासदार राऊतांना, नव्हे संजयला सोबत घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचे व मरणार्‍या रुग्णांचे आकडे लिहीत बसा व शासनाच्या सक्रियतेची स्तुती करा! उगाचच नाही तुम्हाला ‘बेस्ट मुख्यमंत्री’ म्हणून पाचवा क्रमांक मिळाला. ही कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या आकड्यांचीच किंमत आहे. ..

कान्होबा, तुझी घोंगडी चांगली!

टॉर्बन नील्सन आणि अन्य डॅनिश शेतकर्‍यांनी १९९३ साली हा ‘मिंक फार्मिंग’चा व्यवसाय सुरू केला. आज २७ वर्षांनंतर हा प्रत्येक शेतकरी वर्षाला किमान ३ लाख ६५ हजार युरो एवढा निव्वळ नफा कमावतो आहे...

बिहारचा सामना रंगणार...

भाजपने नेहमीच नितीश कुमारांसोबत सामोपचाराचेच धोरण ठेवले आहे. त्यात आपल्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेला नितीश कुमारांनी कायमचीच वेसण घातली असल्याचे सध्या तरी जाणवते. त्यामुळे सध्या तरी बिहारमध्ये जदयु-भाजप-लोजप यांचे पारडे जड आहे...

‘कोरोना’ आणि कंपनी-कर्मचार्‍यांमधील बदलांची नांदी

कोरोनामुळे उद्योगजगतात व्यवसायाबरोबर कर्मचार्‍यांच्या कार्यशैलीतही आमूलाग्र बदल झाले. अनेक आव्हानांचा सामना करत कामकाजाचा वेग मात्र कायम राहिला. तेव्हा, आता या पहिल्या टप्प्यातील यशानंतर गरज आहे ती पूर्णपणे सावरण्याची आणि जिद्दीने उभं राहण्याची.....

स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्यलढा...

दि. २५ जून, १९७५ या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली आणि 1947 पासून देशात असलेली लोकशाही जणू स्थगित केली आणि जनतेची विचार, लेखन, अभिव्यक्ती, भाषण, मुद्रण, अशी सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्ये हिरावून घेऊन, आपल्या विरोधकांना तुरूंगात डांबून जवळजवळ दोन वर्षे पर्यंत सर्व देशाचाच एक मोठा तुरूंग बनविला होता. या घटनेला आता ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आणीबाणीच्या काळातील संघबंदी आणि स्वयंसेवकांच्या मनोधैर्याच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.....

परंपरेचा रथ!

सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ रथयात्रेच्या बाबतीत गेल्या आठवड्यात दिलेला स्वतःचाच निर्णय सोमवारच्या सुनावणीत फिरवला. रथयात्रेला आता परवानगी मिळाली असली तरीही निकालाचा अन्वयार्थ काही प्रश्नांवर गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे...

चिनी घुसखोरीमागची संभाव्य कारणे

चीनने हीच वेळ का निवडली? चीन आपली चतकोरी घुसखोरी ज्याला ‘सलामी स्लायसिंग’ म्हणतात, कुठवर सुरु ठेवणार आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला याबाबत केवळ अंदाज वर्तवण्यात येत आहेत. ..

पुढे धोका आहे!

गेल्यावर्षी मुंबईतील दाटीवाटीच्या डोंगरी परिसरातील शंभर वर्षं जुनी केसरबाई इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षीही अशाच काही मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याचा धोका कायम आहे. तेव्हा, या धोकादायक इमारतींच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा... ..

कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ‘आत्मनिर्भरते’कडे...

कृषी आणि ग्रामीण भाग ‘लॉकडाऊन’मध्येही कार्यरत आहे. पण, ‘आत्मनिर्भर भारत योजने’त आर्थिक तरतुदींसोबतच क्रांतिकारी ठरतील, असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत...

बदलाचे वारे

प्रश्न एक शक्सगम खोरे अथवा अक्साई चीन गमावण्याचा नसून जगामधली क्रमांक दोनची महासत्ता आणि आशियातील क्रमांक एकची सत्ता म्हणून मिरवू पाहणार्‍या चीनला भारताने युक्ती-प्रयुक्तीने नमवल्याचे चित्र उभे राहत आहे, त्याला चीन घाबरत आहे. हा प्रदेश म्हणजे क्षेत्रफळाच्या हिशेबामध्ये ‘किस झाड की पत्ती’ असूनही त्यासाठी चीन एवढा आटापिटा का करत आहे बरे? म्हणतात ना ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती?’ तसे आहे हे. ..

मुंगी उडाली आकाशी...

युती बहुमतात निवडून आली. युतीचे राज्य काही आले नाही. ते का आले नाही, हे आपण सर्व जाणतो. जर भाजपने शिवसेनेशी युती केली नसती, तर निश्चितपणे भाजपच्या २०० हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. ज्या राज्यात स्वतःच्या बळावर निवडून येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्ती ज्या पक्षात नाही, त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाने ‘शिवसेना भारताचा पंतप्रधान निश्चित करेल,’ असं म्हणणे म्हणजे, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी’ असं म्हणण्यासारखं आहे...

भित्यापाठी ब्रह्मराक्षस

अर्थकारणाला भारत जुमानत नाही म्हणून चिनी ड्रॅगनने सैनिकी फणा उगारला आहे. पण, सामान्य भारतीयातला कालियामर्दन जागा झाला, तर तो कितीही फणांच्या ड्रॅगनच्या माथ्यावर थयाथया नाचू शकतो, हे सत्य आहे. चिनी मालावरच्या बहिष्कारातून चिनी अर्थव्यवस्था उलथून पडणार नाही. पण, डळमळीत होऊ शकते आणि जेव्हा अर्थकारणाचाच तोल जातो, तेव्हा प्रशासन व सैनिकी बळाचाही तोल जाण्याला पर्याय नसतो...

असेही काही प्रश्न...

न्यायव्यवस्थेच्या मूल्यमापनाचा प्रश्न आला की, न्यायाधीशांच्या नि:पक्षतेला, निर्भीडतेला, त्यांनी लिहिलेल्या निकालपत्रांच्या चिकित्सेलाच विचारात घेतले जाते. मात्र, असेही काही प्रश्न न्यायव्यवस्थेसमोर आहेत, ज्यांची उत्तरे देशाच्या न्यायपूर्णतेचे मापदंड निश्चित करणारी असतील...

निरोगी राहायचंय? जीभ ताब्यात ठेवा!

‘फास्ट फूड’पेक्षा थोड्याशाच जास्त वेळात जर चांगलं, सकस अन्न बनवता येत असेल आणि निरोगी राहता येत असेल, तर तसं का करू नये; असं ‘स्लो फूडवाल्यां’चं म्हणणं आहे...

एका मोहात सर्व काही गमावले...

राजू शेट्टी यांनी बारामतीत जाऊन पवारांकडून आमदारकी स्वीकारावी याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे आपल्या आमदारकीवरून पक्षात वाद नको म्हणून आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले, तरी ते राजू शेट्टी यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे...

दिल्लीची कमान गृहमंत्र्यांच्या हाती...

संपूर्ण देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महिनाअखेरपर्यंत दिल्लीतील अनागोंदी संपुष्टात येईल, रुग्णालय व्यवस्था सुरळीत होईल, असे चित्र आहे...

‘कोरोना’ आणि कंपनी-कर्मचार्‍यांमधील बदलांची नांदी

कोरोनामुळे उद्योगजगतात व्यवसायाबरोबर कर्मचार्‍यांच्या कायशैलीतही आमूलाग्र बदल झाले. अनेक आव्हानांचा सामना करतही कामकाजाचा वेग मात्र कायम राहिला. तेव्हा, आता या पहिल्या टप्प्यातील यशानंतर गरज आहे ती पूर्णपणे सावरण्याची आणि जिद्दीने उभं राहण्याची.....

जॉर्ज फ्लॉएड आणि डाव्यांची ‘डबल पीएच.डी’

डाव्या मंडळींचा एक सुनियोजित ‘अजेंडा’ आहे. देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. ती निर्माण करण्यासाठी बंदुकीतील गोळी म्हणून, अनुसूचित जाती-जमाती आणि मुसलमान यांचा उपयोग करायचा...

नेपाळच्या मनात आहे तरी काय?

नेपाळच्या नव्या नकाशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली तर पुन्हा तो नकाशा मागे घेणे अवघड होईल. तेव्हा नेपाळ सरकारच्या या भूमिकेमागे देशात कोरोनाच्या संकटामुळे ढासळलेली परिस्थिती तसेच भारत-चीन संबंधांमधील तणाव असू शकतो...

वृक्षलागवडीतून जलव्यवस्थापन...

मान्सूनचा काळ हा शेतीबरोबरच वृक्षलागवडीसाठीही अत्यंत पोषक समजला जातो. तसेच या काळात अतिवृष्टीमुळे पूरस्थितीही उद्भवते. तेव्हा, खासकरुन नदीकिनारी पूरस्थिती नियंत्रणासाठी आणि जलसंधारणासाठी वृक्षलागवडीतून जलव्यवस्थापनाच्या केलेल्या काही प्रयोगांची ही यशोगाथा.....

...आता राजस्थान काँग्रेसमध्येही अस्वस्थता!

राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होत आहे. त्यातील कर्नाटकातील चार जागा बिनविरोध निवडून आल्याने आता १४ जागांसाठीच मतदान होणार आहे. सर्वांचे लक्ष प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमध्ये काय होणार, याकडे लागले आहे...

आरक्षण मूलभूत हक्क का नाही?

आरक्षण मूलभूत हक्क आहे की नाही, याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, गुरुवार, दि. 11 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यात आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असे ठासून सांगितले आहे. त्याविषयी सविस्तर.....

लडाखमध्ये चिनी अतिक्रमण आणि भारताचे प्रत्युत्तर (भाग-२)

लडाख सीमेवर सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये चीन जास्तीत जास्त किती सैन्य आणू शकतो, याचे विश्लेषण करूनच भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे चीनकडे इतर भागांमध्ये कितीही जास्त सैन्य असले, तरी भारत-चीन सीमेवर जेवढे सैन्य आणता येईल, त्याला तोंड देण्याची/हरवण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे...

‘डिप्रेशन वाड्रा’ची गोष्ट...

रोज उठून ‘ऑपरेशन कमल’ असल्या बाता मारण्यात अर्थ नाही. तुमचे नेते जगभरच्या दिग्गजांच्या व्हिडिओद्वारे मुलाखती घेत बसणार आणि तुमचे आमदार- नेते भाजपने एकत्र ठेवावे, ही अपेक्षा कशी असू शकते? पायलट व गेहलोत यांच्यातले वादविवाद भाजपने लावलेले नाहीत. पण, त्याचा राजकीय फायदा उठवणे, हेच तर विरोधी पक्ष म्हणून भाजपचे काम असते ना? ..

अराजकतावादी पुरोगामीच दिल्ली हिंसाचाराचे खरे गुन्हेगार!

दिल्लीमध्ये अराजकता पसरविणार्‍यांचा खरा चेहरा पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात उघड झाला आहे. कोरोनाचे हे संकट निश्चितच दूर होईल. मात्र, त्यानंतर हे अराजकतावादी पुन्हा डोके वर काढणार नाही, याची खात्री नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे ठरते...

मार्को आमचा, अलेक्झांडर आमचा, रुस्तम आमचा...

मार्को पोलो तुमचा की आमचा, यावरून इटालियन आणि क्रोशियन यांच्यात भांडण होतं. अलेक्झांडर तुमचा की आमचा, यावरून ग्रीस आणि मॅकेडोनिया यांच्यात जुंपते आणि रुस्तम-सोहराब हे वीर पुरुष मुसलमान नव्हते, हे तर आजचे मुसलमान मानायलाच तयार नाहीत...

करी गर्भाची ढाल!

दिल्ली दंगलीतील आरोपी सफूरा झरगरने गर्भवस्थेचे कारण पुढे करून स्वतःच्या सुटकेची मागणी केली. काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलग्रस्त प्रकरणातील एका आरोपीने असाच प्रकार केला होता. त्यावेळी नक्षलप्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर झाला होता, पण आज सफूराची सुटका होऊ शकलेली नाही, याला कारणीभूत आजचे सरकार आहे...

शिक्षण व व्यवसाय : पात्रता आणि मानसिकता

कोरोनाच्या या महामारीत अर्थचक्र मंदावल्यामुळे विविध क्षेत्रांत नोकरदारांवर पगारकपात आणि बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. तेव्हा, या निमित्ताने पुन्हा एकदा रोजगारक्षम शिक्षणाची गरज आणि कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराची निर्मिती याचा पुनर्विचार करावाच लागेल. ..

रोम जळतयं अन् निरो फिडल वाजवतोय!

माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीही म्हणाले होतेच की, “आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये असलो तरी हवे तसे निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याकडे नाही,” असे विरोधाचे सूर काँग्रेस आळवत असताना हे सरकार स्थिर कसे म्हणता येईल? हे तर ‘रोम जळत आहे व निरो फिडल वाजवित आहे’, असेच चित्र म्हणावे लागेल...

विनाशकाले वेतन वृद्धी...

कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत जनतेच्या जीवाची हमी नसतानाच साधनसंपत्तीच्या या लुटालुटीत पाकिस्तानी सैन्यदलांनीही उडी घेतली. कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच पाकिस्तानी सैन्यदलांनी सैनिकांच्या आणि अधिकार्‍यांच्या वेतनात २० टक्के वृद्धी मागणी केली आहे...

पुरोगामी पत्रकारितेच्या पंढरीतील बंडाळी

आपल्याला प्रतिगामी ठरवण्याच्या प्रयत्नांमुळे व्यथित झालेल्या बेनेटने मालकांची हुजरेगिरी करण्याऐवजी संपादक पदाचा राजीनामा दिला. या घटनेने ‘टाईम्स’चा उदारमतवादीपणाचा बुरखा फाटला असून स्वतःला सहिष्णू म्हणवणार्‍यांचा असहिष्णू चेहरा आणखी एकदा जगासमोर आला आहे. ..

‘निसर्ग’चा तडाखा अन् जगबुडीचा धोका

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीचे अतोनात नुकसान झाले. पण, वेळीच वातावरणीय बदल रोखण्यासाठी किनारी प्रदेशातील शहरांनी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबई, कोलकातासारख्या महानगरांना अशीच चक्रीवादळे आणि पूरस्थिती सर्वार्थाने बुडवू शकते...

राज्यसभा : गुजरात काँग्रेसमध्ये पुन्हा चलबिचल!

गुजरातमधील राज्यसभेच्या ज्या चार जागा रिकाम्या झाल्या, त्यातील तीन जागा भाजपकडे होत्या. भाजपला दोन जागा मिळणारच आहेत, पण तिसरी जागा मिळविण्यासाठी दोन मते कमी पडत आहेत, तर काँग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी चार मते कमी पडत आहेत. गुजरात विधानसभेत भाजपचे १०३, काँग्रेसचे ६५, राष्ट्रवादी काँग्रेस एक, अपक्ष एक आणि छोटू वसावा यांच्या भारतीय आदिवासी पक्षाचे दोन आमदार असे पक्षीय बलाबल आहे. २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यावेळी जनता दल संयुक्तमध्ये असलेल्या छोटू वसावा यांनी काँग्रेसचे नेते अहमद ..

शहरीकरणाच्या धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

आता कोरोनाचा उपयोग करून नवीन भारत, नवीन भारतातील शहरं, ग्रामीण भाग यांची पुनर्मांडणी करता येईल. यासंदर्भात ज्या महाभयानक चुका आपल्या योजनाकारांनी केल्या होत्या, त्या सुधारणेची संधी आता उपलब्ध झाली आहे. ..

परीक्षा हव्यातच कशाला?

परीक्षेसह वर्ग, वह्या, पुस्तके अशा गोष्टी कायमच्याच काढून टाकल्या तरी उत्तम! तेवढाच सरकारी तिजोरीवरचा खर्चही कमी करता येईल ना? शिवाय त्यात राज्यपाल वगैरेंची कटकटही परस्पर संपून जाईल. मागील काही दिवस हा परीक्षांचा वाद खूप रंगला आहे, म्हणून त्याविषयी ऊहापोह करणे भाग आहे...

लडाखमध्ये सीमेवरील चिनी अतिक्रमण

चीनने भारत-चीन सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे सैन्य तैनात केलेले नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच, तर सैन्य त्यांना चीनच्या इतर भागातून आणावे लागेल. यामुळे या भागांमध्ये लगेच सैन्याची तैनाती करणे सोपे नाही आणि जेव्हा चिनी सैन्य चीनमधून तिबेटमध्ये प्रवेश करायला लागेल, तेव्हा आपल्याला सॅटेलाईट आणि विमानाच्या मदतीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल..

या राम आणि कृष्णाचं काय बरं करावं?

इस्लामच्या असह्य रेट्यासमोर हिंदू पराभूत झाले, पण संपले नाहीत. काय होती त्यांची नि त्यांच्याबरोबर पाय रोवून उभ्या राहिलेल्या समाजाची प्रेरणा? ती होती रामायण-महाभारताची प्रेरणा!..

स्त्री-पुरुष कर्मचारीसंख्येतील तफावतीची कारणमीमांसा

सध्या कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे ‘वर्क फ्रोम होम’च्या पर्यायाचा जगभरात अवलंब होताना दिसतो. पण, अजूनही बरेच ठिकाणी पुरुष ‘वर्क’ मोडवर, तर महिला ‘होम’ फ्रंट सांभाळताना दिसतात. भारतीय उद्योगधंद्यांमध्येही स्त्री-पुरुष कर्मचारीसंख्येत ही तफावत स्पष्ट दिसून येते. तेव्हा, त्यामागील कारणांचा ऊहापोह करणारा हा लेख.....

शेतकर्‍यांना दिलासा, पण...

शेतकर्‍यांसाठी अन्य अनेक प्रभावी योजना आखणार्‍या आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍या मोदी सरकारने आता आणखी धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे...

पाकी अर्थव्यवस्थेला पोखरणारा चिनी व्हायरस

‘हायड्रो चायना’ आणि ‘थ्री गोरजेस’ या चिनी कंपन्यांची पवनऊर्जा निर्मिती योजनादेखील संशयाच्या भोवर्‍यात आहे आणि यातूनच भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणे बाकी असल्याचे स्पष्ट होते. कोरोना महामारी आणि पुढे पाकिस्तानच्या चीनबरोबरील संबंधांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ..

शिवरायांची न्यायव्यवस्था

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने हिंदू राजव्यवस्था नव्याने निर्माण केली. स्वराज्यातील राज्यकारभाराच्या पद्धती व अनेक निर्णय शिवरायांच्या कायदेविषयक जागरूकतेचे व न्यायतत्परतेचे दाखले देणारे आहेत...

संकटातील वरदान

कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत स्वत:चा जीव धोक्यात घालून लाखो तरुण रस्त्यावर उतरतात. वादळवार्‍यात संकटाची परवा न करता मदतीला जातात, हीच मानवता आहे आणि हाच मानवधर्म आहे. या संकटसमयी केवळ त्याचेच पालन आपल्याकडून व्हावे, अशीच परमेश्वराची इच्छा आहे...

...अन् भोपाळ गॅसगळतीची पुनरावृत्ती टळली!

दि. ७ मे रोजी विशाखापट्टणमधील प्लांटमध्ये झालेल्या स्टायरिन गॅसगळतीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. या चौकशी अहवालातून द. कोरियन कंपनीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. तेव्हा, भीषण भोपाळ गॅसगळतीसारख्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे...

‘वेदा निलायम’चे स्मारकात रुपांतर होणार का?

२०१९मध्ये चेन्नईच्या जिल्हाधिकार्‍यांनी या स्मारकास हिरवा कंदील दिल्याने त्या वास्तूचे स्मारकात रुपांतर करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. पण, मद्रास उच्च न्यायालयाने जयललिता यांच्या दोन भाचरांच्या बाजूने अनुकूल असा निकाल दिल्याने या स्मारकाबद्दल सध्या तरी अनिश्चिततेचे वातावरण आहे...

कोरोना साथ : इतर राज्ये आणि महाराष्ट्र

कोरोना काळात विविध राज्य सरकारे आपल्या अधिकारात आणि आपल्या युक्तीने नावीन्यपूर्ण योजना, निर्णय राबवत आहेत. अशा विविध राज्यांचा आणि त्या तुलनेत महाराष्ट्र कुठे आहे, याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख... ..

स्वा. सावरकर आणि पं. नेहरू

स्वा. सावरकर आणि पं. नेहरु या दोघांच्याही तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहाते...

चीनच्या आक्रमकतेला भारताचे जशास तसे उत्तर!

एकीकडे भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई चालू असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि चीनबरोबर संघर्षही वाढत आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या विरोधातील चकमकी वाढत आहेत आणि त्याच वेळी सीमेवर चीनबरोबरील तणाव वाढतो आहे. पण, भारताने चीनला जशात तसे उत्तर दिल्याने चीनने सध्या तरी नमते घेतलेले दिसते...