वसुंधरा

पक्षी स्थलांतर - एक आश्चर्य

जगाला जोडणाऱ्या पक्ष्यांचा आढावा ..

एका विषाची गोष्ट , भाग -१; कॅरी गिलम आणि मोन्सॅन्टो

२०१८ साली कृषी-जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ‘मोन्सॅन्टो’ ही बलाढ्य अमेरिकन कंपनी ‘बेयर’ या अतिबलाढ्य जर्मन कंपनीने विकत घेतली. तेव्हापासून या दोन्ही कंपन्यांची कुप्रसिद्धी आणखीनच वाढली. ‘बेयर’चा समभाग ४६ टक्क्यांनी घसरला. पण हे असे का व्हावे? त्याची कथा एका तणनाशकाभोवती गुंफलेली आहे.....

'रामसर' दर्जाचे 'हतनूर'

खानदेशातील सर्वात मोठ्या हतनूर धरण जलाशयाला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे...

कांदळवन - एक समृद्ध परिसंस्था

गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कांदळवनांविषयी जनजागृती झाली आहे. कांदळवनांची कुठे तोड होत असल्यास किंवा त्यावर भराव टाकला जात असल्यास नागरिकांकडून त्याविषयी आवाज उठवला जातो. ही कांदळवने एवढी का महत्त्वाची आहेत, त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख.....

जागतिक पेंग्विन जनजागृती दिवस; राणीबागेतील पेंग्विन्सची संख्या वाढविण्याचे ध्येय !

राणेबागेतील पेंग्विन कक्षाच्या पशुवैद्यक डॉ. मधुमिता काळे-वझे यांची मुलाखत..

पक्षीमित्रांची वारी - महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन

‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ हे पक्षीमित्रांचे संघटन व सातत्याने होणारे पक्षीमित्र संमेलन हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. ..

सडा : विज्ञान आणि समाज

पावसाळ्यात कोकणात गेलं की मन मोहवून टाकतात ते रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलेले विस्तीर्ण सडे! जंगल, नद्या, महासागर या जशा भरघोस पर्यावरणीय सेवा देणार्‍या परिसंस्था आहेत, तशीच 'सडा' हीसुद्धा एक मौल्यवान, परंतु फारशी दाखल घेतली न गेलेली परिसंस्था आहे. सड्यांवरचा निसर्ग, त्यामागचं विज्ञान लोकसहभागातून ही मौल्यवान परिसंस्था टिकवण्याची गरज हे सगळं उलगडणारी पुण्याच्या वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा वाटवे यांची विशेष मुलाखत.....

'काजवे' विनाशाच्या दिशेने

सध्या समाजमाध्यमांवर 'काजवा महोत्सवा'च्या आयोजकांनी धुमाकूळ घातला आहे. या इवल्याशा जीवाची 'इकोलॉजी' समजून न घेता या महोत्सवांचे आयोजन होत आहे. याचे गंभीर परिणाम आता नाही. पण, येत्या पुढील काळात नक्कीच पाहायला मिळतील...

संरक्षित सागरी जीवांकडेच दुर्लक्ष

आपण जंगलाची भम्रंती करून वाघ, बिबट्या, हत्तीसारख्या संरक्षित जीवांना आवर्जून पाहतो. मात्र, कधीच मासळी उतरविण्याच्या बंदरांवर जाऊन वाघ-बिबट्यांसारख्याच संरक्षित दर्जाच्या मृत सागरी जीवांना पाहण्याची किंवा त्याबाबत जनजागृती करण्याची तसदी घेत नाही. असे का होते?..

'सिटीझन सायन्स' म्हणजे काय रे भाऊ?

आज जगावर माणसाची मक्तेदारी असून तो जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आर्थिक आणि औद्योगिक विकासाबरोबर वाढत्या लोकसंख्येचा परिणाम निसर्गावर होत आहे. मात्र, या परिणामाचे मोजमाप नाही. मानवी हस्तक्षेपातून होणारी जंगलतोड, मातीची झीज, वाढते प्रदूषण याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे...

प्रदर्शनप्रवृत्ती आणि पर्यावरण

प्राण्यांच्या बाबतीत शारीरिक सौंदर्य आणि सुदृढता हा जोडीदार मिळवण्यासाठी जसा प्राथमिक निकष ठरतो, तसाच माणसाच्या बाबतीत 'श्रीमंती' हा प्राथमिक निकष बनला आहे. वस्तूंचा अमर्याद वाढलेला उपभोग आणि त्यामुळे संसाधनांची होणारी अपरिमित हानी यामागे ही 'प्रदर्शनप्रवृत्ती' कारणीभूत आहे...

'दोहन' आणि 'शोषण'

वरील उदाहरणांमधून अर्थतज्ज्ञ हर्मन डॅले यांनी सांगितलेले पहिले तत्त्व सिद्ध होते - 'पुनर्नवीकरणीय संसाधनांच्या वापराचा वेग त्याच्या पैदाशीच्या वेगापेक्षा जास्त नसावा.' उत्तर कन्नडच्या संदर्भात स्थानिक लोकांकडून जी बांबूची तोड होत होती, ते निसर्गाचे 'दोहन' होते; तर कागद कारखान्यांकडून जी बांबूची तोड झाली ते निसर्गाचे शोषण होते...

स्वप्नामधील गावां... एक सिंहावलोकन

मला बसचा प्रवास करताना वाचन करायला मुळीच आवडत नाही. झोप येते. पण, त्या दिवशी पुणे ते रत्नागिरी या आठ तासांच्या प्रवासात झोप आली नाही. कारण, माझ्या हातात जे पुस्तक होतं, ते झोप आणणारं नव्हतं. दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचं ‘स्वप्नामधील गावां’ हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचताना मी बसमध्ये आहे, याचं भानच राहिलं नव्हतं. मी शरीराने जरी बसमध्ये असलो तरी, मनाने एका गावात गेलो होतो...

चिपको आंदोलन

मागील लेखात झाडं वाचवण्यासाठी इ. स. १७३० साली राजस्थानातल्या बिश्नोई लोकांनी केलेलं प्राणांचं बलिदान पाहिलं. या बलिदानातून प्रेरणा घेऊन १९७३ साली अशीच एक मोठी चळवळ उभी राहिली जी जगभर 'चिपको आंदोलन' म्हणून गाजली...

ग्रहीय भूशास्त्राची संक्षिप्त माहिती आणि लेखमालेचा समारोप...

गेल्या ८-९ महिन्यांपासून आपण पृथ्वी आणि पृथ्वीवरील निरनिराळ्या नैसर्गिक गोष्टींची, घटनांची माहिती घेत आलो. पृथ्वीवरील खडक, नद्या, खंड आदी विविधांगांनी आपल्या माहितीत भर घालणाऱ्या या लेखमालेचा आजचा अखेरचा भाग असून इथेच लेखमालेचा समारोप करत आहोत...

विहिरी, झरे आणि भूजलाचे पुनर्भरण...

मागील लेखात आपण भूजलाचे विविध स्रोत कोणते आणि त्यांचा शोध कसा घेतला जातो हे बघितले. या लेखात आपण विहिरी आणि झरे यांची माहिती घेऊ...

गोष्ट एका हत्याकांडाची...

मोठ्या संख्येने बिश्नोई लोक तिथे जमू लागले आणि झाडांना मिठ्या मारू लागले. अभयसिंगाचा सरदार कोणालाही दयामाया दाखवायला तयार नव्हता. एकामागून एक माणसं आणि माणसांमागून झाडं कापली जात होती. या हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या सुमारे ८० गावांमधून हजारोंच्या संख्येने बिश्नोई तिथे गोळा झाले. एकूण ३६३ बिश्नोईंची कत्तल झाली...

भूजलाचा शोध

मागील लेखात आपण भूजल म्हणजे काय? भूजलाचे विविध स्रोत आणि त्याचे फायदे बघितले. या लेखात आपण भूजलाचे साठे आणि ते साठे शोधण्याच्या विविध पद्धतींची माहिती घेऊ.कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करताना पहिल्यांदा त्याच्या महत्त्वाच्या संज्ञांचा अभ्यास करणे आवश्यक तसेच उपयुक्त असते. म्हणून आपणही पहिल्यांदा काही संज्ञांची माहिती घेऊ...

मेक्सिकोचे ‘पिशाच्च’!

मराठीत काही ठिकाणी तिला ’ओसाडी’ म्हणतात. या वनस्पतीला 'Mexican Devil’ म्हणण्याचं कारण ही मूळची मेक्सिको देशातली वनस्पती आज जगात अनेक देशांमध्ये बेसुमार फोफावून तिथल्या जैवविविधतेला घातक ठरत आहे. Asteraceae कुळातली ही वनस्पती मूळची मेक्सिकोची. हिरवी त्रिकोणी पानं आणि पांढरी फुलं येणारी ही वनस्पती एक ते दोन मीटर उंचीपर्यंत वाढते. याची मुळे पिवळसर असून त्यांना उग्र वास असतो. याची पांढरी फुलं दिसायला सुंदर असल्याने ही वनस्पती शोभेसाठी म्हणून अनेक देशांमध्ये नेऊन तिथल्या बागांमध्ये लावली गेली...

भूजल म्हणजे काय ?

मागील लेखात आपण सर्व खंडांची माहिती घेऊन संपवली होती. आत्तापर्यंत आपण जेवढे लेख बघितले, त्यातील बर्‍याचशा लेखांमध्ये मिळवलेली माहिती कितीही चित्तवेधक आणि सामान्यज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त असली (असे माझे मत आहे, तरी चूकभूल द्यावी घ्यावी!), तरी सैद्धांतिक होती. बर्‍याचशा माहितीचा आपल्या सामान्य जीवनाशी तसा काही थेट संबंध नव्हता. मात्र, या आणि यापुढील लेखांमध्ये आपण जी माहिती बघणार आहोत, ती माहिती आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. ही माहिती आपल्या एका महत्त्वाच्या गरजेबद्दल आहे. ती गरज म्हणजे पाणी...

विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये (अंक तिसरा)

मागील लेखात आपण दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका या खंडांची माहिती घेतली असून एकूण पाच खंडांची माहिती आपली घेऊन झाली आहे. या लेखात आपण उरलेल्या दोन खंडांची माहिती घेऊन खंडे हे प्रकरण संपवू. ..

‘जीवितनदी’ एक प्रवाही चळवळ

पुण्याच्या मुळा-मुठा नद्यांना एकेकाळी असलेलं स्वच्छ, शुद्ध आणि प्रवाही रूप पुन्हा मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेली ‘जीवितनदी’ संस्था ही ‘नदी पुनरुज्जीवन’ या पर्यावरणातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेची जननी ठरली आहे. २०१४ साली स्थापन झालेल्या या एका सकारात्मक पर्यावरण चळवळीचा प्रवास जाणून घेऊया ‘जीवितनदी’च्या संस्थापक सदस्या शैलजाताई देशपांडे यांच्याकडून... ..

मुठा नदी-वनस्पती

जलीय परिसंस्थेचे (Aquatic ecosystem) मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समुद्री परिसंस्था (Marine Ecosystem) आणि दुसरी गोड्या पाण्यातील परिसंस्था (Freshwater Ecoystem). यामध्ये नदी, तळी, तलाव, इ. चा समावेश होतो...

विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये अंक दुसरा

गेल्या वेळेस प्रकाशित झालेल्या खास लेखात आपण आपल्या लेखमालेपासून दूर जाऊन जम्मू-काश्मीरमधील नद्यांमधील आपले पाणी कसे वाचवता येईल हे पाहिले...

भारताकडून पाकिस्तानची पाणीकपात... पण कशी?

आज आपण आपल्या लेखमालेपासून थोडे दूर जाऊन भारत सरकारच्या एका मोठ्या निर्णयावर काही माहिती घेणार आहोत. तो निर्णय म्हणजेच सिंधु करारानुसार जम्मू-काश्मीर राज्यातून व पुढे पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे भारताच्या वाट्याचे पाणी वापरणे, हा होय. ..

मुठाई माऊली माझी

भारतीय नद्यांचा इतिहास काही कोटी वर्षे जुना आहे. मुठा नदीच्या इतिहासाबद्दल या लेखात जाणून घेऊ...

विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये

मागील लेखात आपण पृथ्वीच्या इतिहासातून वर्तमानकाळात आलो होतो. आता आपण पृथ्वीवरील सर्व खंडांची भूशास्त्रीय माहिती घेऊ...

मुठाई माऊली माझी - भाग २

मुठा नदीचं मूळ नाव ‘मुठा.’ पण तिला मातेसमान मानून ‘मुठाई’ असं संबोधलं जातं. ‘निसर्गाप्रति कृतज्ञताभाव’ ही आपल्या भारतीय संस्कृतीची थोरवी. प्राचीन भारतीय माणूस नद्यांशी भावनिकदृष्ट्या कसा जोडला गेलेला होता, हे आपण आजच्या लेखात पाहू. ..

भूशास्त्रीय कालमापन-अंक दुसरा..

आपण पृथ्वीच्या इतिहासातील विविध कालखंडांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. पृथ्वीच्या जन्मापासून सुरुवात करून आपण जवळजवळ ३.८ अब्ज वर्षे वर्तमानकाळाकडे आलो होतो व सुमारे ५५० दशलक्ष वर्षांवर येऊन थांबलो होतो. या सगळ्या काळाला ‘प्रीकँब्रियन इऑन’ असे म्हणतात हेही आपण पाहिले. या लेखात आपण ‘प्रीकँब्रियन इऑन’च्या शेवटापासून आत्ताच्या क्षणापर्यंतचा इतिहास बघू. मागच्याच लेखात म्हटल्याप्रमाणे आपण काही ठराविक कालखंडच निवडणार आहोत...

भूशास्त्रीय कालमापन

मागील लेखात आपण पृथ्वीच्या नकाशात कालपरत्त्वे कसा फरक पडला, याची माहिती घेतली. आता आपण ऐतिहासिक भूशास्त्राच्या दुसऱ्या एका शाखेत जाऊ व तिची माहिती घेऊ...

मुठाई माऊली माझी

शहरात प्रवेशण्यापूर्वी टेमघर आणि खडकवासला ही दोन भलीमोठी धरणं मुठा नदी पार करते. मुंबईची लोकल जशी शहराचे 'ईस्ट' आणि 'वेस्ट' असे दोन भाग करते, तशीच पुण्याची मुठा नदी शहराचे दोन भाग करते. ..

भारतातील पाणथळींचे भवितव्य

२ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. या परिषदेत सहभागी देशांमध्ये एक करार करण्यात आला. ..

पृथ्वीच्या नकाशाचा मागोवा घेताना...

मागील लेखात आपण पृथ्वीच्या इतिहासाचा एकत्रित (As a Whole) अभ्यास केला. या लेखात आपण या अफाट इतिहासाच्या एका लहानशा भागात शिरू व पृथ्वीच्या प्राकृतिक नकाशात कालपरत्त्वे काय व कसा फरक पडला याची माहिती घेऊ...

शहरं आणि पर्यावरणपूरक जीवनशैली

कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या वस्तू आधी वेगळ्या कराव्या लागतात. त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि ऊर्जा लागते. तरीसुद्धा १०० टक्के वर्गीकरण होत नाही. ओल्या कचऱ्यात प्लास्टिकचे बारीक कण मिसळले जातात. याला उपाय एकच. कचऱ्याचं वर्गीकरण हे घरातच व्हायला हवं, जे सहज शक्य आहे. ..

गुरेचराई : एक निरीक्षण

एखाद्या परिसरातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी तिथल्या मोकाट गुरेचराईवर बंदी घालावी का? यावरून पर्यावरण अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. याबद्दलच्या चर्चेचा एक भाग म्हणून कोकणात सर्वसाधारणपणे होणाऱ्या मोकाट गुरेचराईचे हे एक ढोबळ निरीक्षण... ..

पृथ्वीचा इतिहास

मागील लेखातच आपण रचनात्मक भूशास्त्राची माहिती घेतली. आता आपण पृथ्वीच्या इतिहासात डोकावून बघू. ..

संधीसाधू...

मागील लेखात आपण रचनात्मक भूशास्त्रामधील एका महत्त्वाच्या घटकाची म्हणजेचस्तर - भ्रंशाची माहिती घेतली. या लेखात आपण रचनात्मक भूशास्त्र म्हणजे काय ते पाहूया. ..

काळोखातील सोनेरी किरणे

२०१८ हे वर्ष सरताना अनेक पर्यावरणवाद्यांनी आजच्या मानवाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. समुद्रातील पाणी पातळीत वाढ, तापमानवाढ, हिमनद्यांचे वितळणे आणि वन्य प्रजातींची संख्या सातत्याने घटत जाणे, हे सर्व चिंता वाढविणारे आहे. ..

भाजावळ

कोकणातले शेतकरी पिढ्यान्पिढ्या जमिनीची भाजावळ करतायत आणि त्याचे फायदे अनुभवतायत. ‘भाजावळ सर्वथा अयोग्य आहे,’ असा कृषी विद्यापीठांकडून आणि पर्यावरणवाद्यांकडून जो एकांगी प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. याच्या दोन्ही बाजू बघितल्या जायला हव्यात. ..

हा कुणाचा फॉल्ट? अंक दुसरा...

मागील लेखात आपण स्तर-भ्रंश म्हणजेच फॉल्ट्सचा अभ्यास सुरू केला होता. या लेखात आपण तोच अभ्यास पुढे सुरू ठेऊन स्तर-भ्रंशाचे उरलेले वर्गीकरण व नंतर भारतातील व जगातील उदाहरणे बघू...

पानगळीचं शास्त्र

पानगळ हा वनस्पतीच्या जीवनचक्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. पानगळीची कारणं ही वनस्पतीपरत्वे आणि हवामानपरत्वे बदलतात. पानगळीच्या शास्त्राविषयी थोडंसं.....

हा कुणाचा फॉल्ट?

मागील लेखातच आपण ‘वलींच्या वळवळी’पासून स्वतःची सुटका करून घेतली. आता आपण वलीसारख्याच दुसऱ्या एका रचनेचा अभ्यास करू. ही रचना म्हणजेच ‘स्तर-भ्रंश.’ ..

वलींची वळवळ

मागील लेखामध्ये आपण वलींविषयी माहिती घेतली. तथापि, सर्व माहिती देता आलेली नाही. ती आपण या लेखात बघूया. मागील लेखात आपण वलींच्या वर्गीकरणाचे ४ प्रकार बघितले. या लेखात आपण उरलेले २ प्रकार बघू. ..

वलींची वळवळ

अभिविसंगतींवरील लेख प्रकाशित झाल्यानंतर काही वाचकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या, आम्हाला काहीच कळलं नाही! ‘रचनात्मक भूशास्त्र’ हा थोडासा किचकट व फारच सैद्धांतिक विषय आहे. काही गोष्टी यात आपल्याला मानून चालावे लागते तसेच सर्व गोष्टींची छायाचित्रे लेखात देताही येत नाहीत. त्यामुळे मी असा सल्ला देईन की, जर काही समजले नाही पण, समजून घ्यायची इच्छा असेल, तर इंटरनेटवर शोधा. यासाठीच मी प्रत्येक लेखात सर्व पारिभाषिक शब्दांची इंग्रजी प्रतिनामे दिलेली आहेत व यापुढेही देत राहीन. ..

तपकिरी सोनं!

शहरात झाडांची वाळलेली पानं सर्रास जाळून टाकली जातात. त्यामुळे अगोदरच होत असलेल्या हवेच्या प्रदूषणात आणखी भर पडते. पुण्याच्या अदिती देवधर यांनी या समस्येवर एक रामबाण उपाय शोधला आहे आणि यशस्वी करून दाखवला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.....

पृथ्वीवरील विविध रचना

मागील तीन लेखांमध्ये आपण समुद्रांबद्दल माहिती घेतली. आता आपण पृथ्वीवर असलेल्या निरनिराळ्या रचनांची माहिती घेऊया. ..

वनस्पतींचा साम्राज्यवाद

मागच्या दोन लेखांमध्ये आपण ‘काँग्रेस गवत’ आणि ‘जलपर्णी’ या कधीकाळी परदेशातून भारतात आलेल्या आणि इथे बेसुमार फोफावून स्थानिक परिसंस्था उद्ध्वस्त करणाऱ्या वनस्पतींची माहिती घेतली. या लेखात वनस्पतींच्या ‘साम्राज्यवादी’ (Invasive) होण्याच्या गुणधर्माबद्दल सर्वसाधारण माहिती घेऊ...

दुधारी जलपर्णी

भारतात जलपर्णी सर्वप्रथम १८ व्या शतकात बंगालमध्ये आणली गेली, असं मानलं जातं. इथलं उष्ण-दमट हवामान तिला अनुकूल असल्याने आसेतुहिमाचल तिने आपला साम्राज्यविस्तार केला आहे. केरळमधील अनेक सरोवरं जलपर्णीची शिकार बनली आहेत. जिथे जिथे जलपर्णी फोफावलेली आहे तिथे तिथे ती हटवण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत.....

महासागरांची महती... भाग १६

मागील लेखात आपण जगातील विविध समुद्रांची माहिती घेतली. याशिवाय पृथ्वीवर सर्वांत मोठे असे पाच महासागर आहेत - प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर व आर्क्टिक महासागर. आजच्या लेखातून या प्रत्येक महासागरांबद्दल जुजबी माहिती व त्यांची भूशास्त्रीय वैशिष्ट्ये बघूया.....

‘काँग्रेस’ हटाव!

लेखाचे शीर्षक वाचून हा लेख राजकीय आहे की काय असे वाटेल. परंतु, या लेखाचा काँग्रेस पक्षाशी सुतराम संबंध नाही. या लेखात आपण माहिती घेणार आहोत, कधीकाळी परदेशातून भारतात आलेल्या आणि येथील परिसंस्थेला उपद्रवी ठरलेल्या ‘काँग्रेस गवत’ या एका वनस्पतीची...

जगातील काही समुद्र...

मागील लेखात आपण सागराच्या उदरात डुबकी मारून सागराच्या अंतरंगाची माहिती घेतली. या लेखात आपण जगातील काही सागर व महासागरांची ओळख करून घेणार आहोत...

वृक्षपूजा: भाग ७ आपटा, औदुंबर, कडुनिंब, करंज, केळं, चंदन, पारिजात, मंदार, रुई

गेले सात आठवडे सुरू असलेल्या ‘वृक्षपूजा’ या लेखमालेचा हा शेवटचा भाग. या शेवटच्या भागात जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पूज्य ठरलेल्या आपटा, औदुंबर, कडुनिंब, करंज, केळ, चंदन, पारिजात, मंदार आणि रुई या वृक्षांबद्दल.....

सागराच्या उदरात... भाग १३

मागील लेखात आपण नद्यांची व हिमनद्यांची माहिती घेतली. या लेखात आपण सागर व महासागरांची माहिती घेणार आहोत. आजच्या लेखाचे नाव ‘सागराच्या उदरात’ या मराठी पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे. ..

नद्या व हिमनद्या : भाग १३

मागील लेखात आपण गाळाच्या व रूपांतरित खडकांबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण नद्या व हिमनद्यांविषयी माहिती घेऊ. नदीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांना परिचयाचे आहेच. जगातील अनेक पुरातन संस्कृती नदीकिनारीच उदयास आल्या. इथपासून नद्यांना येणार्‍या पुरांमुळे झालेल्या हाहाकारापर्यंतची माहिती ढोबळमानाने सगळ्यांनाच असते. आता आपण नदीचे भूशास्त्रीय कार्य बघू...

वृक्षपूजा भाग ६- आंबा, आवळा, कदंब, पळस आणि रुद्राक्ष

आंबा, कदंब, पळस आणि रुद्राक्ष हे वृक्ष भारतात वेदकाळापासून पूज्य ठरत आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या पूजनीयतेबद्दल.....

गाळाचे व रूपांतरित खडक...

मागील लेखात आपण अग्निजन्य खडकांची माहिती घेतली. या लेखात आपण गाळाच्या व रूपांतरित खडकांबद्दल जाणून घेऊया...

वृक्षपूजा : बिल्ववृक्ष, अशोक आणि शमी

बिल्ववृक्ष म्हणजे बेलाचं झाड. ‘बिल्व’ हे त्याचं संस्कृत नाव. यालाच हिंदीत ‘बिली’, गुजरातीत ‘बीली’, कानडीत ‘बेला’ तसंच संस्कृतमध्ये ‘त्रिपत्रक’ आणि ‘शिवद्रुम’ म्हणतात. ..

खडकांचा अभ्यास... भाग ११

मागील लेखात आपण खनिजशास्त्राची व विविध खनिजांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या विविध उपयोगांचीही माहिती घेतली. या लेखात आपण याच विषयाशी संबंधित पण, थोड्याशा वेगळ्या शाखेत हात घालू. ती शाखा म्हणजे खडकशास्त्र (Petrology)...

वृक्षपूजा- तुलसीपूजन

अनंत औषधी उपयोग असलेली, वातावरण शुद्ध ठेवणारी ‘तुळस’ आज जवळजवळ प्रत्येक भारतीय माणसाच्या घरी दिसते, ती तिच्या धार्मिक पावित्र्यामुळेच...

खनिजशास्त्र... भाग १०

मागील लेखात आपण भूस्खलनांची माहिती घेतली. या लेखात आपण एका पूर्णपणे भिन्न अशा शाखेत हात घालू. ही शाखा म्हणजे ‘खनिजशास्त्र’ (Mineralogy)...

वृक्षपूजा- वटवृक्ष

ऋग्वेदात याच्या नावाचा जरी उल्लेख नसला तरी त्याचं वर्णन आढळतं. प्राचीन काळापासून आर्यांना हा वृक्ष परिचित असल्याचं प्राचीन वाङ्मयावरून कळतं. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिल्यीय अर्थशास्त्र, रघुवंश इत्यादी अनेक संस्कृत ग्रंथांतून याचा उल्लेख आलेला आहे...

भूस्खलनांबद्दल थोडेसे

भूस्खलन ही क्रिया भूकंप व ज्वालामुखी यांच्यासारखीच विनाशकारी आहे. मात्र, याचे अनुमान काढणे बाकीच्यांपेक्षा तुलनेने सोप्पे आहे. कारण, भूस्खलन हे उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. तसेच काही वेळा भूस्खलनाचा वेग बराच कमी असतो व त्यामुळेही स्वतःचा जीवही वाचवणे यात शक्य असते...

भारतातील व जगातील ज्वालामुखीयता

ज्वालामुखींच्या रचनेचा अभ्यास केल्यानंतर आपण आता भारतातील ‘ज्वालामुखीयता’ (Volcanism in India) तसेच भूतकाळात जगात झालेल्या काही महत्त्वाच्या ज्वालामुखींचे उद्रेक पाहू...

ज्वालामुखींची रचना व इतर माहिती...

मागील लेखात आपण ज्वालामुखी म्हणजे काय व त्यांचे प्रकार यांची माहिती घेतली. या लेखात आपण ज्वालामुखींची अंतर्गत रचना, उद्रेकाची कारणे व परिणाम यांची माहिती घेऊ. ..

खाडीकिनाऱ्यावरून...

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी अणसुरे खाडी ही सागरी संरक्षित क्षेत्रासाठी निवडलेल्या कोकणातील तीन ठिकाणांपैकी एक आहे. या खाडीकिनाऱ्यावरून एक फेरफटका मारला की इथलं लोभसवाणं निसर्गसौंदर्य आणि विपुल जैव विविधता पाहायला मिळते...

ज्वालामुखींच्या जगात... भाग ६

‘भूकंप’ हे प्रकरण संपवून आपण आता दुसर्‍या एका अतिशय संहारक, पण अत्यंत नयनरम्य अशा गोष्टीकडे येऊ. आपण जाणून घेणार आहोत ते अर्थात ज्वालामुखी (Volcano) बद्दल...

‘सडा’: एक परिसंस्था

मानवी अतिक्रमणं थोपवून ‘ही’ मौल्यवान परिसंस्था टिकवणं, काळाची गरज आहे...

स्थानिक बीजसंवर्धन: एक लोकचळवळ

महाराष्ट्र हा कृषिजैवविविधतेने समृद्ध असून, विविध पिके आणि त्यामधील वाणांची विविधता ही फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे...

धामण

धामण हा साप शेतातील उंदीर फस्त करून, तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकर्‍याचा मित्र ठरतो. ..

उंडल

नारळासारखंच हे एक बहुउपयोगी झाड. हा एक सदाहरित वृक्ष आहे. फणसाच्या पानाच्या आकाराची याची पानं गर्द हिरवी असतात. ..