सोलापूर

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा अपघात : वाहक गंभीर

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा अपघात : वाहक गंभीर..

'माझा महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ दे', मुख्यमंत्र्यांचे विठुरायाकडे साकडे

महापूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तसेच मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शेतकरी व वारकरी संप्रदायाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला...

अहिल्यादेवींच्या नावाने अध्यासन सुरु केल्यास निधी देणार - मुख्यमंत्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला..

आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरु राहणार...

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरात येत आहेत. प्रत्येक भाविकाला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे विनाविलंब दर्शन घेता यावे, यासाठी आज गुरुवार पासून मंदिर समितीने देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले केले...

माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन

विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून व विधानसभेतील एक अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख होती. २००९ साली माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी डोळस यांनी राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली..

नई जिंदगी भाग म्हणजे ‘मिनी पाकिस्तान’, प्रमोद गायकवाडचा खळबळजनक दावा

सोलापूरच्या नई जिंदगी भागाला मिनी पाकिस्तान म्हणाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोलापूर येथील नई जिंदगी भागात दि. ३० मार्चला प्रकाश आंबेडकर यांच्या कॉर्नर सभेवेळी हा वादग्रस्त दावा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

सुशीलकुमार शिंदेंना सोलापूरातून उमेदवारी

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदार संघातून लोकसभा लढवणार आहेत. ..

प्रकाश आंबेडकर सोलापूरातून लोकसभेच्या रिंगणात

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. आंबेडकर यांच्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससह आघाडीची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे...

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव

धनगर समाजाने या विद्यापीठाला अहिल्याबाईंच्या नावासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने केली होती. या आंदोलकांच्या लढ्याला अखेर यश आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे...

आर्ची पोलीस बंदोबस्तात देणार बारावीची परिक्षा!

रिंकु परिक्षा देणार असलेल्या परिक्षा केंद्र ज्या महाविद्यालयामध्ये आहे, त्या महाविद्यालयाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे...

विठ्ठल रुक्मिणी मंदिराची शहीद कुटुंबियांना मदत!

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्यातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याबाततची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली...

उद्यापासून सुरु होणार एसटीची ‘विठाई’

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन भक्तांना घेता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नवीन बससेवा सुरु करण्यात येत आहे...

वडार समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणार

“वडार सामाजाने देशभरात विश्वकर्माचे काम केले आहे. वडार समाजाच्या भरवशावर देशाची निर्मिती झाली. परंतु आज त्यांच्यातील बहुतांश समाज हा हलाखीचे जीवन जगत आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ..

थंडीनिमित्त विठू माऊलीला उबदार पोशाख

पंढरपूरच्या विठू माऊलीला या थंडीचा कडाका बसू नये म्हणून विठू माऊलीच्या मूर्तीला उबदार रजई, शाल देण्यास सुरुवात करण्यात आली आहे...

मराठा आरक्षणासाठी सोलापुरात चक्का जाम

सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाकडून आज सकाळपासून चक्का आंदोलन सुरु करण्यात आले असून पुणे-सोलापूर महामार्गावर मराठा समाजाकडून 'रास्ता रोको' करण्यात आला आहे. ..

मराठा आंदोलन : पुणे-सोलापूर महामार्गावर ४ एसटी बस फोडल्या

पंढरपूरच्या वारीसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मराठा आंदोलनातून आणि बंदमधून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता...

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षणाला होत असलेल्या विलंबणावरून मराठा समाजातील काही तरुणांनी पंढरपुरात एसटी बसेसची तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे...

इंद्रायणीच्या तुकोबांना नीरेचे स्नान

नीरा नदीच्या कडेला असलेल्या सराटीमध्ये मुक्काम केल्यानंतर आज सकाळी पालखी सोहळा सकाळची पहाटपूजा उरकून नीरेच्या किनारी आला होता...

सोलापूर जिल्हयातील ३५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित : हेमंत टकले

कर्जमाफीतील जाचक अटींमुळे व सदोष कार्यपद्धतीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत असे टकले यावेळी म्हणाले...

सोलापुर बाजार समितीत सहकार मंत्र्यांचा पराभव

हकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री देशमुख, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित होत सर्वपक्षीय आघाडी केली होती. ..

सोलापूरात लिंगायत समाज रस्त्यावर

सोलापूरमधील काही धर्मगुरूंसह जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपलीकडील देखील नागरिक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते...

अजितदादांवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही : धनंजय मुंडे

उद्धव ठाकरेंनी ‘सामना’तून अजित पवारांवर टीका केली. यांना गांडूळ म्हटले तर यांना राग आला. मी उद्धव ठाकरे यांना लाथ मारणारे जनावर भेट देणार आहे, जे शिवसेनेला शिकवेल सरकारला लाथ कशी मारायची, असे मुंडे यावेळी म्हणाले...

धनगर आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केली : राष्ट्रवादी

भाजपने अनेक आश्वासने दिली होती. मात्र, आश्वासनांची पूर्तता करण्यास या सरकारला यश आले नाही असे तटकरे यावेळी म्हणाले...

कृषी राज्यमंत्र्यांच्या गाड्यांवर दगडफेक

ज्याला संसारच करता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांनी समाजाचा संसार कसा करावा हे सांगू नये...

सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा 'जवाब दो' मोर्चा

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून भाजप सरकारच्या निषेधार्थ काल सोलापूर महानगरपालिकेवर 'जवाब दो' मोर्चा काढण्यात आला. केंद्रात, राज्यात आणि आता महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची सत्ता असताना सोलापूरचा विकास का होत नाही ? या प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हजोरांच्या संख्याने कॉंग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते...

सोलापूर विद्यापीठ नामांतर : लिंगायत समाजाकडून 'सोलापूर बंद'ची हाक

सोलापूरमधील शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव समाजातील इतर संघटनांकडून आज सोलापूर बंदची हक्क देण्यात आली आहे. या बंदला शहरातील विविध संस्था, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटनांनी आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे शहरातील लिंगायत समाजातील दुकाने, वाहने, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत...

अतुल भोसले यांची पंढरपूर संस्थानच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समस्त वारकरी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकारने नव्या समितीच्या स्थापना केली आहे. या ९ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असलेले मंदिर संस्थानाला आत स्वतंत्र समिती मिळाली आहे. ..

जलयुक्त शिवारचा असाही फायदा , तुकोबांच्या पादुकांना तीन वर्षातून नीरा स्नान

तुकोबांच्या पादुकांना इंदापूरच्या पुढे अकलूजजवळ नीरेच्या पाण्याने स्नान घातले जाते. रंतु गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे तुकोबांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याचा स्पर्श झाला नव्हता...

जलयुक्त शिवार अभियान आता जनतेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसहभाग हाच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले...

सोलापुरात मुख्यंमंत्र्यांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी सोलापूर दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भाजप पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कोण आहेत हे नेते?..

मोदींनी मानले सोलापूरकरांचे आभार

केंद्र सरकारच्या गिव्ह इट अप या योजनेला सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याची दखल घेत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती गॅसचे अनुदान नाकारलेल्या लोकांचे केंद्र सरकारतर्फे विशेष आभार मानण्यात आले...