आत्मनिर्भर भारत

‘आत्मनिर्भर भारत’ अभियान - एक क्रांतिकारी संकल्पना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेले ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान अतिशय आकर्षक, सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ भुरळ पडेल असेच आहे. देशाची मान ताठ करणारी, अभिमानाने छाती फुलून येणारी, ‘आम्हीसुद्धा कोणीतरी आहोत,’ असे दर्शविणारी ही घोषणा. भारताच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणित करणाऱ्या या घोषणेमधून पंतप्रधानांना काय अपेक्षित आहे, हे नंतर त्यांनी संपूर्ण विवेचनाद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशवासीयांसाठी घोषित केले. एकूण २० लाख कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ म्हणजे देशाच्या राष्ट्रीय ..

‘स्वदेशी’ आणि ‘मेक इन इंडिया’मधून ‘आत्मनिर्भर भारता’चे बीजांकुरण

आपल्याला हा सर्व विषय आता नवीन वाटत असला तरी, त्याची सुरुवात केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच हाती घेण्यात आला होता. २०१४च्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात त्यांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला होता. त्यावेळेस यंत्रयुक्त वाघाची प्रतिकृती तयार करुन त्यावर ‘मेक इन इंडिया’ असे लिहिलेला लोगो तयार करण्यात आला होता. ती खरी ‘आत्मनिर्भर भारता’ची सुरुवात होती...

आत्मनिर्भर भारत : अवश्यम्भावी संकल्पना

‘आत्मनिर्भरता’ या शब्दाचा आवाका विस्तृत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ घडवायचा असेल, तर सर्वात आधी आत्मबोध झाला पाहिजे. आत्मविस्मरणाचा दुर्धर रोग झालेल्या या राष्ट्राला जागृत करायचे असेल, तर आत्मगौरव जागृत करणारे वातावरण, व्यवस्था व सामाजिक मन तैयार करावे लागेल, आपण काय होतो, आपली ओळख काय होती, जगाची आपल्याकडे पाहायची दृष्टी कशी होते, याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे...

‘आत्मनिर्भर भारत’ योजना आणि आणि चीनची नाकेबंदी

आपल्या देशातील उद्योजकांनी जर असा दृढनिश्चय केला आणि दूरदृष्टी ठेवून योजनांची आखणी केली, तर भविष्यात आपण नक्कीच चिनी उत्पादनांना शह देऊन जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी किमतीमध्ये उत्पादित करू शकतो. केवळ ‘इम्पोर्ट सबस्टिट्यूड’ नाही, तर ही उत्पादने आपण निर्यात करून खराखुरा भारत ‘आत्मनिर्भर’ करून चीनची नाकेबंदी करू शकतो. ..

कृषी आणि ग्रामीण क्षेत्र ‘आत्मनिर्भरते’कडे

शेतकरी ‘ई-नाम’द्वारे आपल्याला जिथे योग्य भाव मिळेल, तिथे आपले उत्पादन सूचिबद्ध करून देशभरात कुठेही विकू शकतात. पण, ही व्यवस्थादेखील बाजार समित्यांच्या परिघातच आहे. कृषी उत्पादन क्षेत्र खर्‍या अर्थाने खुले, मुक्त आणि सर्वार्थाने समृद्ध करण्याच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी धोरणात्मक निर्णय ’आत्मनिर्भर भारत’ योजनेमध्ये घेण्यात आले आहेत...

‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘एमएसएमई’

लघु उद्योगांना शक्ती देण्यासाठी सरकारनेदेखील आपल्या उद्योगनीतीत तशा पद्धतीचे कोणते बदल करता येतील, हे पाहिले पाहिजे. प्रशासन हे नेहमी नियंत्रकाच्या भूमिकेत असते, त्याऐवजी उद्योग करणे सुकर होण्यासाठी मदत करणार्यांच्या भूमिकेत असायला हवे. कोणते बदल अपेक्षित आहे, हे मांडण्याचे प्रयत्न करतो...

‘आत्मनिर्भर भारत अभियान’ आणि कामगार क्षेत्र

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’त कामगार क्षेत्रासाठीच्या तरतुदी आणि सदरचे अभियान रोजगार निर्मितीला कसे पोषक ठरेल, या विषयाचा ऊहापोह करणारा लेख... ..

‘आत्मनिर्भर कॉर्पोरेट’ क्षेत्रासाठी...

कोरोना विषाणू महामारीने अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याच्या परिणामस्वरूप टाळेबंदी आणि सर्वसामान्य लोक, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रावर जगभरात विविध बंधने लादण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भारत सरकारने दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि वस्तू पुरविणाऱ्या संस्था वगळता इतर सर्व आस्थापने तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्ष कार्यालये बंद ठेवण्यात आली. सर्व कर्मचारी दुर्गम भागातून, वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करीत आहेत. मात्र, समन्वयाचा अभाव तसेच कार्यालयीन सुविधेतील ..

विस्तारणारी गगनभरारी...

आता ‘इस्रो’ने केवळ संशोधन आणि विकास याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, त्यामुळे खासगी उद्योगांना अंतराळ क्षेत्र खुले करण्याचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाचा ठरणार, यात कोणतीही शंका नाही. ..

‘आत्मनिर्भर भारत’ आणि भारतीयांची भूमिका

आमचं ज्ञान, विज्ञान, संस्कृती किती महान आहे. पण हे सिद्ध व्हायला, आम्हाला हे काय परकीयांनीच सांगितलं पाहिजे का? आमचे आम्हीच हे का मानू शकत नाही. इथे पण मानसिकतेमध्ये बदल होणं आवश्यक आहे. हा बदलच आम्हाला ‘आत्मनिर्भरते’कडे घेऊन जाईल...

‘आत्मनिर्भर भारत’ योजना आणि सरकारसमोरील आव्हाने

‘आत्मनिर्भर भारत’ ही योजना क्रांतीकारी आणि पथदर्शी असली तरी त्याचे व्यापक स्वरुप पाहता, या योजनेची प्रत्यक्ष काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे निश्तितच सरकारसाठी मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आव्हानांचा सामना मोदी सरकार कशाप्रकारे करते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...

आर्थिक स्वतंत्रतेच्या दृष्टीने वाटचालीचा संकल्प...

पुढील २० वर्षांत भारताच्या प्रगतीचा रथ कोणी रोखू शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा त्याच्या बरोबरीने मला माझाही उत्कर्ष साधायचा आहे, असा विचार नव्हे, संकल्प प्रत्येकाने आज करण्याची गरज आहे. येत्या १० किंवा २० वर्षांत माझ्या आयुष्यात आर्थिक स्वतंत्रता आलीच पाहिजे, याचा विचार करणे आवश्यक आहे...

आत्मनिर्भरता आणि भविष्यातील भारत

‘आत्मनिर्भर भारत’ धोरणातील विविध क्षेत्रातील तरतुदी आणि योजना या निश्चितच भविष्यातील आधुनिक, सशक्त आणि स्वयंपूर्ण भारताची मुहूर्तमेढ रोवणार्‍या आहेत. या ‘आत्मनिर्भर भारता’तच भविष्यातील भारताचा उदय दडलेला आहे. तेव्हा, ‘आत्मनिर्भरते’च्या मार्गावर वर्तमानात मार्गक्रमण केल्यास कसा असेल भविष्यातील भारत, याचा आढावा हा घेणारा हा सविस्तर लेख.....