राष्ट्रीय

पी. चिदंबरम यांना ईडीकडून अटक

सक्तवसुली संचलनालयाने कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. त्यापूर्वी चौकशी पथकातील तीन अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात जाऊन त्यांची चौकशी केली. आत्तापर्यंत चिदंबरम यांना सीबीआय कोठडी देण्यात आली होती. दिल्ली न्यायालयाला ही माहिती देण्यात आली असून चिदंबरम यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे...

अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्थान

दक्षिण काश्मीरच्या पजलपोरा आणि अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, या चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे. चकमक थांबल्यानंतर जवानांनी या परिसराची तपासणी सुरू केली आहे. दहशतवादविरोधी कारवाईत या ठिकाणचे पोलीस, सैनदल आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्र येत मोहीम उघडली आहे...

अयोध्या सुनावणी : मुस्लिम पक्षाच्या वकिलाने कागदपत्रे फाडली

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती, प्रतिपक्षाचे वकील म्हणून राजीव धवन यांना देण्यात आल्या होत्या...

अयोध्या सुनावणी : 'अयोध्येत ५०-६० मशिदी, मुस्लीम कुठेही नमाज अदा करू शकतात'

अयोध्या सुनावणी : 'अयोध्येत ५०-६० मशिदी, मुस्लीम कुठेही नमाज अदा करू शकतात' ..

काश्मीरमधील फोनसेवा पूर्ववत; परंतु एसएमएस सेवा बंद

एसएमएस सेवा बंद करण्यात आली. आज झालेल्या हल्याच्या पार्श्वभूमीवर हि सेवा बंद करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी सांगितले...

दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार : प्रफुल पटेल यांना ईडीचे समन्स

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार केल्या प्रकरणी त्यांची ईडीतर्फे चौकशीही केली जाणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. दाऊदचा सहकारी ईकबाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे...

संघ स्वयंसेवकाला न्याय द्या : भाजप समितीचे राष्ट्रपतींना निवेदन

राज्यात सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पक्षाचे नेते कैलास विजय वर्गीय यांच्या नेतृत्वात बीजेपीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ..

स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांद्वारे भारताला सर्वोच्च स्थानी न्या : संरक्षणमंत्री

'मेक इन इंडिया' अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांद्वारे भारताला या आघाडी क्षेत्रात आघाडीवर न्या, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. डीआरडीओच्या ४१ व्या वार्षिक संमेलनादरम्यान ते बोलत होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व आणि भारताचे सशक्तीकरण या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त त्यांनी श्रद्धांजली वाहिली...

'फेसबुक ट्रोलर'ची रवानगी पोलीस कोठडीत करणारे न्यायाधीश अडचणीत

पोलिसांनी धार्मिक भावना भडकवणे, दंगल भडकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. जेव्हा हे गुन्हे दाखल झाले तेव्हा कर्नाटकात कुमारस्वामींचे सरकार होते. ..

निवडणूक आयोगाकडून 'एक्झिट पोल'वर बंदी ?

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहापर्यंत माध्यमांवरच्या मतदाराचा कौल (एक्झिट पोल) सांगणाऱ्या कार्यक्रमांवर भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) बंदी घातली आहे. ..

खासगी सुरक्षा कंपनी मालक सलीम खानची कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण

खासगी सुरक्षा कंपनीत आपल्याच कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सलीम खान या कंपनी मालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...

मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक

रा. स्व. संघातील कार्यकर्त्याच्या कुटुंबियांसह झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ..

पीएमसी बॅंकेच्या ग्राहकांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

पीएमसी बॅंक खातेधारकांना आता सहा महिन्यांत ४० हजार रुपये इतकी रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार रुपये इतकी होती. वित्तीय अनियमिततेच्या प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध आणले होते. यानंतर केवळ एक हजार रुपये प्रत्येक खातेधारकाला काढण्याची मुभा होती. ती मर्यादा आता ४० हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे...

काश्मीरमुद्द्यावर 'सीरिया'ही भारतासोबत

सीरियाचे भारतातील राजदूत रियाद अब्बास यांनी म्हटले आहे की ,"भारत सरकारने घटनेचा कलम ३७० हटविणे ही देशातील अंतर्गत बाब आहे. जगातील कोणत्याही देशाला आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलण्याचा अधिकार आहे", असे म्हणत त्यांनी भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले...

'मिसाईल मॅन' कलाम यांचे देशभरातून स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिवंगत माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आणि देशासाठीच्या त्यांच्या योगदानाचे स्मरण केले...

अयोध्या सुनावणी : सुब्रमण्यम स्वामींना न्यायालयात पाहून मुस्लीम पक्षाचे वकील अस्वस्थ

अयोध्या सुनावणी : सुब्रमण्यम स्वामींना न्यायालयात पाहून मुस्लीम पक्षाचे वकील अस्वस्थ ..

भारतीयांसाठी अभिमानास्पद ! अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर

जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ इस्टर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे...

राम मंदिर सुनावणीवर संत-महंत म्हणतात, "शुभ घडी आ गई है"

अयोद्ध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान अयोद्ध्येत जनजीवन सुरळीत सुरू आहे. अयोद्ध्येत सर्वसामान्यांच्या चर्चेचा मुद्दाही हाच बनला आहे. अयोद्ध्या आणि फैजाबादमध्ये सुरक्षा रक्षा वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने १० डिसेंबरपर्यंत या भागाची सुरक्षा वाढवली आहे. इथल्या संत-महंतांचे म्हणणे आहे कि, "आता प्रतीक्षा संपणार आहे." ..

मध्यप्रदेशमध्ये कार अपघातात चार हॉकीपटूंचा मृत्यू

मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये सोमवारी सकाळी एका कार अपघातात चार राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा मृत्यू झाला. त्यापैकी तिघे गंभीर आहेत. होशंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्यानचंद ट्रॉफी स्पर्धेसाठी इटारसी येथून येत होते. होशंगाबादच्या राष्ट्रीय महामार्गानजीक ६९ रेसलपूर गावात ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेत कारचा चुराडा झाला आहे. ..

अयोध्येत कलम १४४ लागू

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेवरील मालकी हक्काच्या वादावर मागील सलग ३७ दिवसांपासून सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. सोमवापासून या सुनावणीचा निर्णायक टप्पा सुरू होणार आहे. दरम्यान, अयोद्ध्या आणि परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे...

हिंदू संस्कृतीमुळे भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी : सरसंघचालक मोहनजी भागवत

जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी आहेत. भारतातील हिंदू संस्कृतीमुळे केवळ मुस्लिमच नाही, तर इतर धर्मातील लोकांनाही भारतात आश्रय घ्यावासा वाटतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले...

मोदींच्या हातात 'प्लॉगिंग' करताना काय होते ?

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या स्वागतानंतर शनिवारी पहाटे मामल्लापुराम येथील किनारपट्टीला भेट दिली. यावेळी समुद्र किनारी पडलेला प्लास्टीक कचरा पंतप्रधानांनी गोळा केला. मात्र, त्यांच्या हातात ..

राफेल असते तर एअर स्ट्राईकसाठी पाकिस्तानात जावे लागले नसते : राजनाथ सिंह

भारताकडे राफेल असते तर बालाकोट हवाई हल्ल्यावेळी पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची गरज भासली नसती. भारतातूनच 'जैश-ए-मोहम्मद'चे तळ उध्वस्त करणे शक्य झाले असते, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. राफेल शस्त्रपूजनावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करतारपूर कॉरिडॉरचे उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला डेरा बाबा नानक येथील दरबार साहिब गुरुद्वाराला जोडणार्‍या साडेचार किलोमीटर लांबीच्या करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करणार आहेत...

भारत- चीन चर्चेतून ‘काश्मीर’मुद्दा आऊट

चीनने जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानच्या प्रयत्नांनंतरही कोणतीही चर्चा केली नाही...

मोदींना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजीव भट्टचे पितळ उघडे

मोदींना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजीव भट्टचे पितळ उघडे..

पारंपरिक पेहरावात मोदींनी केले जिनपिंग यांचे स्वागत

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले असून चेन्नईजवळील मामल्लपुरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट घडली...

नानाजी देशमुख देहदान करणारे पहिले भारतीय ठरले होते

राष्ट्रसेवक, महान समाजसेवक, जनसंघाचे नेते भारतरत्न नानाजी देशमुख यांची आज १०३ वी जयंती. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना अनोखी आदरांजली वाहिली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, "महान सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रसेवक नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटीकोटी नमन. खेडी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचे योगदान देशवासीयांसाठी सदैव प्रेरणा राहील."..

राफेल शस्त्रपूजा : संरक्षणमंत्री म्हणतात, 'अलौकिक शक्तीवर आमचा विश्वास'

राफेल शस्त्रपूजेप्रकरणी टीका करणाऱ्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'मी जे केले ते माझ्या दृष्टीने योग्यच होते. यापुढेही करते. टीका करणारे करतील. हा आमच्या आस्थेचा विषय आहे. ब्रम्हांडात एक अलौकीक शक्ती आहे, यावर आमचा विश्वास आहे. लहानपणापासून माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. कुठल्याही धर्माच्या लोकांना त्यांच्या मान्यतेनुसार पूजा-प्रार्थनेचा अधिकार आहे. कॉंग्रेसची याबद्दल वेगळी मानसिकता आहे.', असा टोलाही त्यांनी लगावला...

मिनिटाला ६ पैसे : नेटीझन्सनी जिओला केले ट्रोल

या कारणासाठी जिओकड़ून शुल्कआकारणी..

पाकिस्तानात पुन्हा हिंदू मुलीचे जबरदस्ती धर्मांतर

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आणखी एका हिंदू मुलीचे जबरदस्तीने इस्लाम धर्मांतर झाले. हि मुलगी सिंध प्रांतातील टंडो मोहम्मद खान येथील रहिवासी असून या मुलीचे नाव पायल आहे...

नंदनवनाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दोन महिन्यांने सरकारने खोऱ्यातील पर्यटकांवरची बंदी उठवली आहे. ..

संघ स्वयंसेवकांसह कुटूंबियांची निघृण हत्या : सीबीआय चौकशीची मागणी

विजयादशमी उत्सवानिमित्त घरात उत्सव सुरू असतानाच रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकासह त्यांची गर्भवती पत्नी आणि आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंधु प्रकाश पाल, असे त्यांचे नाव असून ते पेशाने शिक्षक होते. पोलीसांना घटनास्थळी धारदार शस्त्र आढळले आहेत. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. घटनास्थळाहून हत्येनंतर एक तरुण पसार झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकाराची ..

सलग दोन दिवस राहुल गांधी मारणार कोर्टाच्या फेऱ्या

आधीच पक्षनेतृत्व न सांभाळता आल्याने स्वतःच्याच पक्षातून टीकेचे धनी होत असलेल्या राहुल गांधी यांना आता सलग दोन दिवस न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. ही दोन्ही प्रकरणे मानहानीची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अजय पटेल यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी दोन्ही खटले दाखल करण्यात आले होते. ..

काँग्रेसला राफेलची पूजाही खुपतेय! : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राफेल मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला केला असून काँग्रेसने आता राफेलच्या पूजेलाही विरोध सुरू केला. तसंच काँग्रेस कलम ३७०च्या बाजूने आहे की विरोधात? हे स्पष्ट करावे, असे म्हटले आहे...

रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्राशी निगडित सामंजस्य कराराला केंद्राची मंजूरी

रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजूरी दिली आहे...

विस्थापित काश्मिरी कुटुंबांना केंद्र सरकारची मोठी मदत

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात विस्थापित झालेल्या कुटुंबियांना केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ५३०० कुटुंबे भारतात विस्थापित झाली आहेत. या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून ५.५ लाखांचा मदतनिधी जाहीर केला आहे...

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

केंद्र सरकारने बुधवारी केंद्र १ कोटी १० लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता (DA) हा पाच टक्के इतका वाढणार असल्याने सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९०० ते १२ हजार ५०० इतकी वाढ होणार आहे...

शस्त्रपूजा करून पहिले राफेल भारताच्या ताफ्यात दाखल

भारतीय हवाई दलाचे बळ वाढविणारे पहिले राफेल विमान फ्रान्सकडून भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हे विमान ताब्यात घेतले. ..

समाजातील प्रत्येक घटकांना जोडणारी राष्ट्रभावना म्हणजेच हिंदुत्व : सरसंघचालक

राष्ट्रीय विविधतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे ! ..

आरेप्रकरणी मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नाही [आदेश सविस्तर वाचा]

आरेप्रकरणी मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नाही [आदेश सविस्तर वाचा]..

राहुल गांधी बॅंकॉक दौऱ्यावर एकटे जाणार नाहीत ! 'हे' आहे कारण...

विदेश दौऱ्यावर असतानाही नियम बंधनकारक ..

आरे प्रकरणात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालाही सामाविष्ट करा : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेड सुनावणीत आता केंद्रीय मंत्रालयालाही पक्षकार म्हणून सामाविष्ठ करा, असे आदेश न्यायमूर्ती तुषार मेहता यांनी दिली. त्यामुळे आता पुढील सुनावणीवेळी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पक्षकारही यावेळी उपस्थित असणार आहेत...

आरे वृक्षतोडीला तूर्त स्थगिती : सर्वोच्च न्यायालय

आरे कारशेड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तूर्त स्थगिती दिली आहे. गोरेगावमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात काही विधी विद्यार्थ्यांच्या मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहीले होते...

आरे कारशेड प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या खंडपीठासमोर उद्या १० वाजता सुनावणी..

जम्मू-काश्मीरमध्ये नवरात्रीचा जल्लोष, पूंछमध्ये भव्य रामलीला सोहळा

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यांनतर काश्मीरमधील वातावरणात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे...

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'राफेल'ची शस्त्रपूजा

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग दसऱ्याच्या दिवशी राफेल विमाने ताब्यात घेणार आहेत...

'आपल्या प्रार्थना स्वार्थाच्या नाहीत, तर कल्याणाच्या' : सहसरकार्यवाह श्री कृष्णगोपालजी

आपल्या प्रार्थनादेखील स्वार्थाच्या नाहीत, तर सर्वांच्या कल्याणाच्या असतात,” असे उद्गार रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह श्री कृष्णगोपालजी यांनी दिल्ली येथे काढले...

खाद्यपदार्थांच्या पाकीटांवर असणार 'हा' लोगो

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचा ‘ट्रान्स-फॅट फ्री’ लोगो लॉन्च..

अनंतनाग येथे दहशतवादी हल्ला ,१० गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे १० जण गंभीर जखमी झाले. ..

काश्मीर खोऱ्यात सैन्य भरतीचा जोश

गुरुवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दोन दिवसीय सैन्यात भरतीसाठी सुमारे ३०० तरुण भरतीसाठी दाखल झाले. भरतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये उत्साह आणि जोश होता...

बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यगाथा सांगणारा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध

बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यगाथा सांगणारा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध भारतीय हवाई दलाकडून प्रसिद्ध करण्यात आला. ..

अर्बन नक्षल गौतम नवलाखा सुनावणीतून आणखीन एका न्यायमूर्तींची माघार, काय असावीत कारणे ?

गौतम नवलखा यांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण ही सुनावणी प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वीच चर्चेत राहण्याचे मुख्य कारण आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या सुनावाणीपासून स्वतःला वेगळे करण्याचा निर्णय केला आहे. ..

"तुरुंगातल्या जेवणाची सवय नाही! चार किलो वजन घटले" : चिदंबरम

१७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ ..

'कलम ३७०' हटवल्याने विकासकामांना गती : काश्मीरची रेल्वे कन्याकुमारीपर्यंत धावणार

रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी भारतीय रेल्वे मार्गाला १५ ऑगस्ट २०२२पर्यंत काश्मीरशी जोडण्याचा संकल्प केला आहे. कटरा ते बनिहार स्थानकांपर्यंत मार्गाचे काम तसेच चिनाब पूलाचे कामही वेगाने होत आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे अनेकदा कामात अडथळे येत होते. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर ही कामे वेगाने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ..

हनी ट्रॅप स्कँडल : 'कोडवर्ड' वाचून पोलिसही शरमले !

मध्य प्रदेशच्या हनी ट्रॅप प्रकरणाची पाने एकामागून एक उलगडत जात आहेत आणि त्यातून समोर येणारे चित्र आणखी धक्कादायक होत आहे. अटक केलेल्या महिलांची चौकशी करता असताना एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) च्या हाती एक डायरी लागली ज्यामध्ये वसूल केलेली रक्कम आणि थकबाकी तसेच वापरलेल्या कोडवर्डचा तपशील आहे...

गुजराती, कन्नड नव्हे तर 'या' पोस्टरमुळे आदीत्य जास्त 'ट्रोल'

नेटीझन्स म्हणतात - 'ही नवी शिवसेना'..

राष्ट्रपित्याला नमन...

आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही संकल्प सोडला आहे. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या महापुरुषाला नमन", या शब्दांत महात्मा गांधींना आदरांजली वाहीली. कामाविना संपत्ती, अंतरात्म्याविना उपभोग, चरित्राविज्ञा अर्जित ज्ञान, नैतिकतेविना व्यापार, मानवतारहीत विज्ञान, त्यागाविना सिद्धांत, राजकारण, या गोष्टींपासून दूर राहण्याचे विचार गांधींनी दिल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले...

इस्त्रोच्या शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू

एस. सुरेश कुमार यांचा मृतदेह पोलीसांच्या ताब्यात..

'घरचे जेवण द्या', चिदंबरम यांची न्यायालयाला विनंती

तीन ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीसंबंधी सुनावणी होणार आहे...

आरबीआयकडून २६ बिगर बॅंकींग संस्थांची नोंदणी रद्द

या' संस्थांवर कारवाई ..

"बाबरी मशीद मुस्लीम कायद्यानुसार अवैध"

हिंदू पक्षाने मुस्लीम कायद्याच्या दृष्टीने बाबरी ढांचा कसा अवैध आहे, याचा उहापोह करणारा युक्तिवाद केला होता. निजाम पाषा यांनी म्हटले कि, "मशिदीचा निर्णय मुस्लीम कायद्यानुसार होणार का?" या देशात कुराणाचा कायदा चालत नाही, असही निजाम पाशा म्हणाले.....

राकेश कुमार सिंह भदौरिया बनले २६ वे वायुदलप्रमुख

नवी दिल्ली :  राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सोमवारी वायुदलप्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. भदोरिया हे वायुसेनेचे २६ वे प्रमुख बनले. माजी वायुदल प्रमुख बीएस धनोआ यांचे स्थान त्यांनी घेतले. आपल्या पदाचा कारभार सांभाळल्यानंतर लगेचच त्यांनी च..

फारूख अब्दुल्ला यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेन्सचे खासदार फारूख अब्दुल्ला यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात फारूख अब्दुल्ला यांनी अटकेविरोधात दाखल केलेली याचिका खारीज केली आहे. कलम ३७० रद्द झाल्य..

...‘ती’ वेळ अखेर आली!

निवृत्त शासकीय अधिकारी संघटनेच्या वतीने नवी दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी काश्मीरच्या विषयाला हात घातला...

स्त्री सन्मानासाठी 'भारत कि लक्ष्मी' अभियान : पं. नरेंद्र मोदी

दिवाळीला 'भारत कि लक्ष्मी' हे विशेष अभियानाची चालवण्याचे आवाहन केले. ..

देशाला आणखी ५० उपग्रहांची गरज : डॉ. ए. एस. किरण कुमार

डिजिटल भरारी घेत असताना भारतासारख्या देशाला आणखी पन्नास उपग्रहांची आवश्यकता असल्याचे मत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी व्यक्त केले. ..

रा. स्व. संघ नेत्यांच्या मारेकर्‍यांचा लष्कराच्या जवानांनी घेतला बदला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकात शर्मा आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार व त्यांचे भाऊ अजित परिहार यांच्या मारेकर्‍यांचा रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला. ..

'संघ आणि भारत एकच हा संदेश जगभरात पोहोचवल्याबद्दल इम्रान खान यांचे आभार'

सहसरकार्यवाह कृष्णगोपाळ शर्मा यांचे प्रकिस्तानला प्रत्युत्तर..

मुस्लीम पक्षकारांना न्यायालयाने फटकारले

वेळेच्या मर्यादेशी कोणतीही तडजोड नाही : सरन्यायाधीश..