पुस्तक परिचय

त्या तिघी...

फक्त ‘तीन स्त्रिया’ एवढीच त्यांची ओळख? नाही! त्या तीन शक्तीचे प्रतीक होत्या. त्या म्हणजे, सावरकरांच्या घरातल्या तीन अतिशय धैर्यवान स्त्रिया.....

असीम श्रद्धेचा अविरत लढा; 'Flight of Deities and Rebirth of Temples'

इतिहासातील काळी आणि त्याचबरोबर सोनेरी पानेही उजेडात आणणारे हे पुस्तक अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांनी आवर्जून वाचायलाच हवे असे आहे...

अल्पसंख्याकवादाचे विच्छेदन

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीसमोर हा प्रश्न चर्चेत आला नसता तरच नवल झाले असते. सर्वधर्मसमभाव उपजतच रक्तात असलेल्या भारतीयांच्या तेव्हाच्या नेतृत्वाने घटनेत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला धरून कलम क्र. २५ ते ३० ते अंतर्भूत केली गेली. त्यातून बोकाळलेल्या अल्पसंख्याकवादाचा गेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा अशोक भिडे यांनी या पुस्तकात घेतला आहे...

‘मनू’चे अरण्य : मनस्वी निसर्गवाचन

‘मनू’ ही ‘अ‍ॅमेझॉन’च्या अनेक उपनद्यांपैकी एक. पेरू देशातून पुढे वाहत जात ती ‘अ‍ॅमेझॉन’ला मिळते. हा संपूर्ण भाग मिळून एक भव्य परिसंस्था (ecosystem) बनलेली आहे. डॉ. श्रोत्री यांनी या परिसंस्थेचा छोटा, परंतु महत्त्वाचा भाग असणार्‍या ‘मनू’च्या परिसरातल्या जंगलात पाच दिवस मनमुरादपणे केलेल्या भटकंतीचे वर्णन वाचताना आपल्यालाही स्तिमित व्हायला होतं...

एका वाटसरुचे ‘प्रवासवर्णन’

रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ हे पुस्तक त्याच धाटणीचे वाटल्यास आश्चर्य नाही. पण, त्याला केवळ ‘अनुभवकथन’ म्हणणे लेखकावर अन्याय ठरेल. आज रा. स्व. संघ भारतातील अग्रगण्य व अपरिहार्य संघटन आहे. रमेश पतंगे संघाचे स्वयंसेवक, विचारवंत आहेत. संघ स्वयंसेवकाचे विचार अनेक वर्षे त्यांनी मनमोकळेपणाने शब्दबद्ध केले आहेत. ..

'मोदीनॉमिक्स' सोप्या शब्दांत

भारतीय अर्थव्यवस्था ही 'पी हळद आणि हो गोरी' या प्रकारची मुळीच नाही. हे पटवून देत अर्थतज्ज्ञ आणि प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर टिळक यांनी 'मोदी अर्थकारण- नीती आणि रणनीती' या पुस्तकात विस्तृतपणे मांडले आहे...

पुस्तक परीक्षण: महाराजा यशवंतराव होळकर

वीरांच्या प्रभावळीतील नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांचे कौशल्यही वाखाणण्याजोगेच. परंतु, याच कालखंडातील बहुधा अखेरचे धडाडीचे आणि धडपडीचे नाव म्हणजे यशवंतराव होळकर!..

'चाकोरी'बाहेर जगण्यासाठी प्रत्येकाने वाचावे असे...

'तुमचा पगार म्हणजे तुम्ही पाहीलेली स्वप्न विसरण्यासाठी दिली जाणारी लाच आहे', असे इंग्रजीतील वाक्य मोजक्या शब्दात चाकोरीत अडकलेल्यांना वेगळा विचार करण्यासाठी प्रवृत्त करते. ..

‘मंज़िल- ए- मक्सूद पाकिस्तान ’ : बंद दार किलकिलं होतं तेव्हा...

'पाकिस्तान ' ही भारतीयांसाठी एक ठसठसती जखम आहे. त्या देशाचा नुसता उल्लेखदेखील मनात प्रचंड खळबळ निर्माण करतो. त्या खळबळीला असंख्य पदर आहेत. 'संताप' ही भावना या खळबळीमध्ये सर्वाधिक दृश्यमान असली तरी तिच्या तळाशी वेदना, विश्वासघात, दुःख, हताशा आणि सूडभावनादेखील असते. धर्मांध शक्तींच्या उन्माद आणि दहशतीमुळे आपल्या भारतभूमीवर कायमचा चरा उमटला आणि त्याने देशाचे तुकडे केले याची जाणीव आजही भारतीयांना अस्वस्थ करते...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक विशाल संघटन (समग्र दर्शन)

‘संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव,’ ‘संघटनेचे ध्येय आणि वाटचाल,’ ‘संघटनेची निर्मिती,’ ‘संघस्वयंसेवक,’ ‘संघप्रचारक,’ ‘व्यवस्थापन कार्यपद्धती आणि विस्तार,’ ‘संघाच्या उपलब्धी’ आणि ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले गेले आहे...

मानवता हाच सावरकरांचा समाजसुधारणेमागील उद्देश

सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक २८ मे, २०१९ मृत्युंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील संक्षिप्त भाग देत आहोत...

‘आज भी खरे हैं तालाब’ : आपला संपन्न जलवारसा

प्रस्तुत पुस्तकात भारतामध्ये गेल्या शेकडो वर्षांमध्ये तलाव बांधण्याचं शास्त्र कसं कसं रुजत गेलं, बहरत गेलं यावर प्रकाश टाकला आहे. राजस्थानसारख्या अल्प-स्वल्प पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही पाणी साठवण्याच्या क्लृप्त्या शतकानुशतकं टिकून आहेत, हे लेखकं अनुपम मिश्र यांच्या लक्षात आलं..

ते झिजले म्हणून...

देशाला परम वैभवाला नेण्याचे आणि उत्तम व्यक्ती व समाजनिर्मितीचे ध्येय गाठीशी घेऊन १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची लक्ष्मीबाई केळकर यांनी स्थापना केली आणि आजही समितीचे कार्य देशभरात उत्कृष्टपणे सुरू आहे. सुशीला महाजन यांनी आपल्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून राष्ट्र सेविका समिती, जनसंघ, पती मधुकरराव महाजन आणि एका विचाराला वाहिलेल्या परिवाराचा लेखाजोखा मांडला आहे. ..

सत्यसन्मान

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुरूप ‘पद्म पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली. ‘पद्मभूषण’च्या १४ सन्माननीय भारतीयांच्या यादीत एक नाव प्रकर्षाने लक्षवेधक ठरले ते नांबी नारायण यांचे...

कथा एका ध्येयसाधनेची : अविरत आरोग्यसेवेचा वसा

वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून स्वस्तात उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न बाळगून ४ जानेवारी, १९६६ रोजी ‘विवेकानंद रुग्णालय’हे रोपटं लावलं आणि सुरू झाला एक अखंड सेवायज्ञ!..

मंदिरप्रवेशापूर्वी...

शुक्रवार दि. २५ जानेवारी रोजी डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'राम मंदिरच का?' या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथे होणार आहे. ..

‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे पुस्तक

सत्तेचा मोह, नेतेपदाचा गर्व आणि नोकरशाहीला हवं तसे झुकवण्याची काही काँग्रेसी नेत्यांची हुकूमशाही वृत्ती यांचे या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन मनस्वी चीड आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे हे पुस्तक प्रत्येक हिंदू बांधवाने तर वाचलेच पाहिजे, शिवाय हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांची पुराव्यांसहित बोलती बंद करण्यासाठी या पुस्तकातील संदर्भ कामी येऊ शकतात...

तपासाची दिशा वळविण्याचे कारस्थान

हिंदू दहशतवादाची भ्रामक संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी मालेगाव स्फोट, समझोता एक्सप्रेस आदी घटनांचा तपास वळविण्याचा अभद्र उद्योग केला आहे. ..

‘हिंदू दहशतवादा’च्या भ्रामक संकल्पनेची पोलखोल

आरव्हीएस मणी यांचे ‘दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे...

गजाननभक्तांचे समग्र चित्रण

गजानन महाराज... केवळ महाराष्ट्रभूमी नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातूनही महाराजांच्या दर्शनाला शेगावला आवर्जून भेट देणारे भक्त आजही दिसतात..

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

महात्मा गांधींच्या हत्येमागे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर होते, अशा स्वरूपाच्या आरोपांची द्वेषरूपी जन्मठेप सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांना त्यांच्या उत्तर आयुष्यात, तर दिलेली होतीच, त्याशिवाय ती मरणोत्तरही चालू ठेवलेली आहे..

‘अशी पुस्तके होती’: विस्मृत पुस्तकांचा खजिना

‘अशी पुस्तके होती’ या नव्या पुस्तकात १८५० ते १९४५ या काळात प्रकाशित झालेल्या आणि आता वाचकांच्या स्मृतीआड गेलेल्या मराठी पुस्तकांबद्दल त्यांनी सविस्तर लिहीलं आहे...

‘कासवांचे बेट’ : डार्विनची नोंदवही

गालापगोस द्वीपसमूह पृथ्वीवर अगदी अलीकडे म्हणजेच फक्त तीस ते चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाला...

गांधीजींचा उदयास्त व भारत

देशाची फाळणी होऊन आज इतकी वर्षे लोटली, पण फाळणीची चिकित्सा, मीमांसा, चर्चा अजून थांबत नाही. त्याचे कारण ही जखम भारताच्या जिव्हारी लागलेली आहे. गांधीहत्या आणि फाळणी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...

जे.कृष्णमूर्ती : एक आनंद मेघ

जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर तत्त्वज्ञ होते. त्यांच्या विचारांचा गाभा या पुस्तकाच्या रुपाने वाचकांपुढे लेखिकेने ठेवला आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका पुढीलप्रमाणे आहे- मनातील संवेदनशीलता आणि करुणा जपत निरीच्छ, निर्व्याजवृत्तीचा वस्तुपाठ आमच्यापुढे ठेवणाऱ्या आमच्या वडिलांना, नरसिंह गोपाळ केसकर यांना सादर समर्पित...

गीताधर्मयोगी भिडेशास्त्री : डॉ. मीरा केसकर

आठव्या वर्षीच डोळ्यांपुढे कायमचा अंधार पसरलेला असता खेड्यात राहणारा एक मुलगा... कसा शिकतो, स्वावलंबी होतो आणि प्रगाढ विद्वान होऊन डोळस जगाचे डोळे दीपवणारा पराक्रम कसा करतो, याची ही कहाणी केवळ अद्भुत आहे. ती सत्यकथा आहे...

‘बौद्ध - मुस्लिम संबंध : आजच्या संदर्भात’ : ऐतिहासिक संघर्षाचा परामर्श

कालपटलाकडे दृष्टीक्षेप टाकला असता ‘धर्म’ या संकल्पनेबद्दलच्या मतभेदांमधून होणाऱ्या संघर्षाने प्रचंड मोठी मनुष्यहानी घडवून आणल्याचं दिसून येतं. धर्मांची निर्मिती आत्मिक उन्नती, सदाचरण अशा विविध उद्देशांतून झाली खरी पण एखादा धर्म, उपासनापद्धती मानणाऱ्या मनुष्यसमूहांनी ‘आपला धर्म, आपलं आचरण हेच आदर्श' या दृष्टिकोनातून दुसऱ्याला हीन ठरवायला सुरुवात केली. ..

शिवचलनाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख

नाणीसंग्राहकांची आपल्याकडे काही कमी नाही. काही संग्राहक हे संख्येवर भर देतात तर, काही दर्जा किंवा विशिष्ट प्रकारावर! पण एकूणच पाहता संग्राहकांचा कल हा फक्त नाणी गोळा करण्याकडे असतो आणि इथेच आशुतोष इतरांपेक्षा वेगळा ठरतो...

पुस्तक परिचय : 'प्रवास वर्णनांचा प्रवास : मराठी मुलुखगिरीचा धांडोळा'

पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती. ..

‘आम्ही आणि आमचे संविधान’

‘आम्ही आणि आमचे संविधान’ पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे आपल्या मनोगतात बेधडकपणे म्हणतात. एकूण १४ प्रकरणांचा आपण वादळी आढावा घेत लेखक रमेश पतंगेंचे पुस्तक पुढे जाते...

‘अमिलिया एयरहार्ट’ : आकांक्षांपुढती गगन ठेंगणे...

अमिलिया एयरहार्ट हे एक उदाहरण आहे की जिने पुरुषप्रधान असणाऱ्या वैमानिक क्षेत्रात एवढी विलक्षण चमक दाखवली की ते पाहून कित्येक महिलांनी आकाशात भरारी घ्यायची स्वप्नं पाहिली. प्रस्तुत पुस्तक अमिलियाच्या गगनभरारीचा प्रवास मांडतं. ..

'आंधळी' : फिटे अंधाराचे जाळे...

जन्मापासून माणूस काही ना काही ग्रहण करत असतो, आपल्या पंचेंद्रियांनी विश्वाचे तपशील प्राशून घेत असतो. प्रत्येक इंद्रिय त्याच्याकडे पोहोचवत असणाऱ्या ज्ञानबिंदूंची जुळवाजुळव करत तो आपल्या मेंदूत चित्रं रेखाटत असतो. जसजसे त्याचे अनुभव वाढत जातात तसतशी त्याच्या डोक्यातल्या विचार आणि धारणांची दिशा पक्की होत जाते. ..

वर्तमान संदर्भात सावरकर

१९९१ साली सोव्हिएत रशिया कोसळला आणि शीतयुद्ध संपले. अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. ही पोकळी भरून काढण्यासाठी चीन पुढे सरसावला. अफाट लोकसंख्या हाताशी उपलब्ध असणार्‍या आणि सर्वंकष साम्यवादी हुकूमशहा असणार्‍या चिनी सत्ताधार्‍यांना त्यांच्या देशांतर्गत कोणताच विरोध नव्हता..

‘मी, मनु आणि संघ' : समरसतेच्या ध्यासाचा प्रवास

पुस्तकाचं स्वरूप आत्मकथनपर असलं तरीही हे आत्मचरित्र नाही. हा आहे एका स्वयंसेवकाचा आधी कार्यकर्ता आणि पुढे तत्वचिंतक बनण्याचा असा प्रवास...

अस्सल अमेरिकेच्या आंबट-गोड आठवणी...

प्रवास हा आयुष्यालाही सर्वार्थाने प्रवाही करतो. नवे खूप काही शिकवून जातो. लोकांकडे, परिस्थितीकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोनही या प्रवासामुळे घडत असतो, बदलत असतो. हे पुस्तक वाचताना ही बाब अगदी प्रकर्षाने जाणवते...

'अष्टचक्री रोमायण' : वेडात मराठे वीर दौडले आठ !

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या प्रांतांमधला वैराण, मातकट, खडकाळ परिसर, जनतेची बेतास बात आर्थिक परिस्थिती इथपासून ते युरोपमधील सुजलाम सुफलाम वातावरणापर्यंत टोकाच्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या...

'मुद्रणपर्व' : भाषा, कला आणि मुद्रणतंत्राच्या आकलनाचा प्रवास

पुस्तकदिनाच्या निमित्ताने मुद्रणतंत्र आणि मुद्रणकला या दोन्हींच्या उत्क्रांतीचा सखोल आढावा घेणाऱ्या 'मुद्रणपर्व' या पुस्तकाविषयी जाणून घेणं सयुक्तिक ठरेल...

चीपर बाय दी डझन’ : लेकुरे उदंड झाली !

‘चीपर बाय दी डझन’ भावण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातली वैश्विकता. एका परक्या देशातल्या लोकांच्या राग, लोभ, प्रेम या मूलभूत भावना आपल्याहून यत्किंचितही वेगळ्या नाहीत...

‘वैभवशाली विजयनगर साम्राज्य’ : संपन्न वारशाचं देखणं दर्शन

आपल्या वैभवशाली इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणारं आणि आपल्या बुकशेल्फची शोभा द्विगुणित करणारं असं हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रहात असायलाच हवं !..

'मुक्तांगणची गोष्ट' : गर्तेतून बाहेर काढताना...

हजारो व्यसनांध माणसांचे आयुष्य रुळावर आणणारी संस्था. आपल्या नानाविध प्रयोगांमधून व्यसनमुक्तीचे काम अधिकाधिक प्रभावीपणे करत जाणाऱ्या या संस्थेचा प्रवास जाणून घेणं म्हणजे जगाच्या चांगुलपणावर आपला विश्वास अधिक दृढ करणं...

‘मेळघाटावरील मोहर’ : एक पालवी आशेची

‘मेळघाटावरील मोहर’ : एक पालवी आशेची..

'तांडव' : धर्मांध वादळात उद्ध्वस्त धर्मशाळा

गोव्यातल्या धर्मांधतेच्या नंग्या नाचाने जगण्याचे संदर्भच बदलून गेलेल्या आयुष्यांचा एका प्रतिभावान लेखकाने घेतलेला वेध म्हणजे म्हणजे ‘तांडव’ ही कादंबरी. ..

‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ : मराठी चित्रपटसृष्टीची सोनपावलं

चित्रनिर्मितीतील पाट्यांच्या इंग्रजी नावांची अडचण मा. विनायकांनी सांगताच सावरकर त्याला एकेक माराठी प्रतिशब्द सांगू लागले .....

मेट्रोमॅन श्रीधरन : कार्यक्षमतेचे दीपस्तंभ

श्रीधरन यांच्या निवृत्तीचा तपशील पुस्तकात येतो तेव्हा लक्षात येतं की अजून अर्धं पुस्तक बाकी आहे. त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य सांगणारा हा गमतीदार योगायोग. ..

द ब्लड टेलिग्राम : बांगलादेश युद्धामागच्या गुन्हेगारांचा पंचनामा

भारतीय उपखंड आणि खुद्द आपला भारतदेशही अमेरिकेच्या हीन दर्जाच्या डावपेचांमुळे होरपळून निघाला होता हे आपल्या चट्कन लक्षात येत नाही. या घटना होत्या १९७१ मधल्या, ज्यांना आपण ‘बांगलादेश मुक्तीसंग्राम’ या नावाने ओळखतो...

प्रिय रामू : हिमालयाच्या सावलीची चरितकथा

रमाबाईंच्या जीवनावर म्हणावा तितका प्रकाश पडलेला नाही असं वाटल्याने त्यांचे आयुष्य बारकाव्यांसह उभं करण्याचा ध्यास योगीराज बागुल यांनी घेतला...

एका कबुलीजबाबाची कथा...

‘उसबा’ म्हणजे काय? हाच प्रथम प्रश्न वाचकाला कादंबरीची पाने उलगडण्यास प्रवृत्त करतो...

जय महाराष्ट्र : एका वादळाचा जमाखर्च

शिवसेनेच्या प्रवासात आपुलकी आणि दहशत या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालत आल्या आहेत. ..

मार्क इंग्लिस : पायांचे ज्याच्या पंख झाले

जीवावर बेतू शकणाऱ्या संकटापासून ते एव्हरेस्ट चढाईची एकमेवाद्वितीय कामगिरी करून दाखवण्यापर्यंतचा हा सारा प्रवास प्रचंड थक्क करणारा आहे...

‘पांढऱ्या सोन्याच्या शोधात’ : वाळूच्या समुद्रातलं रोचक साहस

पुराणकथांमध्येही टिंबक्टूचा उल्लेख अतिदुर्गम प्रदेश म्हणून येतो. प्रवासाच्या सुरुवातीचं ठिकाणच असं, तर शेवटचं ठिकाण कशा परिस्थितीत असेल याची कल्पना आपल्याला यावी...

‘धागे आडवे उभे’ : ..... शंभर धागे दुःखाचे

कधीतरी हातात पडतं 'धागे आडवे उभे' सारखं पुस्तक, जे आपल्याला थोबाडीत देऊन आपल्या गुलाबी स्वप्नांमधून जागं करतं...

‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ : ग्रंथसागरातल्या सिंदबादच्या सुरस कहाण्या

ज्या ज्या वाचकांना 'घाटे एवढं कसं काय लिहू शकतात' असा प्रश्न पडत असेल त्या सर्वांसाठी प्रस्तुत पुस्तक हे उत्तर आहे. कारण हे पुस्तक 'लेखक निरंजन घाटें'ना इंधन पुरवणारे वाचक 'निरंजन घाटे' यांच्या वाचनप्रवाहाबद्दल आपल्याला अनेक रंजक गोष्टी सांगतं...

Now It Can Be Told : स्वातंत्र्याचा उषःकाल होतानाची काळरात्र ....

या १५ तारखेला भारतीय प्रजासत्ताक सत्तरीचे होत असताना आपण आजवर केलेल्या कामगिरीचे कौतुक करतानाच हे सगळं मिळवताना आपण काय गमावलं, त्याची किती किंमत मोजावी लागली आणि त्यामागची कारणं कुठली याची जाणीव मनात सतत जागी राहिली तरच मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल राहते आणि स्वैराचार होत नाही. Now It can be Told सारखी पुस्तकं त्यासाठीच वाचायची......

मी, वेलिंग्टन आणि रहस्य : नेहमीच्या ‘हू डन इट’ पलीकडे

काहीवेळा मुक्कामापेक्षा त्याकडे नेणारा रस्ता अधिक महत्वाचा असतो असं का म्हणतातते हे पुस्तक वाचताना लक्षात येतं...

पुस्तक परिचय : अंधु जाहला दीपस्तंभु

प्रज्ञाचक्षु गणपत महाराजांचं अकल्पनीय जीवन..

चित्र ज्ञानेश्वरी : अक्षरे नि प्रतिमा, येथ येती संगमा

वारी ! अशी एक अविरत परंपरा जी गेली आठशे वर्षे एक प्रवाह बनून वाहते आहे, महाराष्ट्राच्या भूमीला पावन करते आहे, जागृत ठेवते आहे. वारी म्हणजे भागवतधर्माची पताका वाहणाऱ्यांचे जणू स्नेहसंमेलनच. या भक्तिमंदिराच्या पायाचे रचियेते म्हणजे संत ज्ञानेश्वर. 'जो जे वांछिल तो ते लाहो ...' अशी प्रार्थना परमेश्वराकडे करणारे ज्ञानोबा म्हणजे गीतेची ज्ञानगंगा जनसामान्यांपर्यंत आणणारा भगीरथच ! जी गीता संस्कृत भाषेच्या तिजोरीत बंद होती ती 'ज्ञानेश्वरी' ग्रंथाद्वारे प्राकृतात आणून सर्वांसाठी खुली केली. फक्त गीतेचे भाषांतर ..

सचिनने (बि)घडवलेल्या आयुष्याची गोष्ट !

या पुस्तकामध्ये एकेका खेळाडूची क्रिकेटकडे पाहण्याची दृष्टी, सातत्याने स्वतःला उत्तमतेकडे घेऊन जाण्याचा ध्यास याबद्दल यात विस्ताराने लिहिलेलं आहे...

इतिशोध : शोध इतिहासाचा, शोध अस्तित्वाचा

‘इतिशोध’ हे तसे रूढार्थाने त्यांचे आत्मचरित्र नसले तरीही यातली प्रकरणं त्यांच्या उद्दिष्टासाठी झोकून दिलेल्या आयुष्याचा पट यातून ठळकपणे आपल्यासमोर येतो...

ब्रह्मदेश ते जपान - थरारक युद्ध स्मृती

"ब्रह्मदेश ते जपान - थरारक युद्ध स्मृती" या पुस्तकाचा हा पुस्तक परिचय ... ..

जगाच्या पाठीवर : बाबूजींच्या 'स्ट्रगल'चे दिवस

एक छान गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकरणं संपल्यावर पावलाचं चिन्ह आहे. जणू बाबूजींचा जगाच्या पाठीवरचा प्रवासच. परंंतु खटकते ती एकच गोष्ट - ती म्हणजे या पावलांची दिशा...

बापलेकी : अव्यक्त नात्याचा वेध

या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्यामध्ये काही मुलींनी वडिलांविषयी लिहिलेले लेख आहेत तर दुसऱ्यामध्ये काही वडिलांनी मुलींविषयी लिहिलेले लेख आहेत. ..

वाघ सिंह माझे सखे सोबती

जगप्रसिद्ध पशुशिक्षक दामू धोत्रेंच्या पराक्रमांचं तोंडात बोटं घालायला लावणारं पुस्तक म्हणजे 'वाघ सिंह माझे सखे सोबती'...

ब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा

'ब्रह्मपुत्रा' पुस्तकाचे स्वरूप कादंबरी सारखे आहे. अनेक ऐतिहासिक घटना लेखकाने आपल्या कल्पनेने संवाद व प्रसंग यांची भर करून अधिक फुलवल्या असल्याने ते रंजक आणि प्रवाही झाले आहे...

जोहड : पाणीवाल्या बाबाची संघर्षगाथा

काही पुस्तकं आपल्याला खळखळून हसवतात, काही विचार करायला प्रवृत्त करतात... 'जोहड' आपल्याला नतमस्तक करतं. ..

खंडाळ्याच्या घाटासाठी : दुवे सांधणाऱ्या रेल्वेची कहाणी

अनेकदा डोळ्यांना मोहवणाऱ्या गोष्टींमागे हजारो हातांचे कष्ट – आणि काही वेळेला जीवांचे बलिदानही - असते. तब्बल दीडशे वर्षांपूर्वी पहाडाच्या छाताडावर उभे राहून हा रेल्वेमार्ग बांधणाऱ्या हातांना अभिवादन करणारी एक छोटीशी सुरेख कादंबरी मराठीत उपलब्ध आहे, तिचे नाव ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’.....

वसंतलावण्य : एका जादुगाराची चित्तरकथा

वसंत प्रभू, वसंत देसाई यांच्यावरील चरित्रापाठोपाठ आलेले वसंत पवार यांचे ‘वसंतलावण्य’ हे चरित्र म्हणजे मधू पोतदार यांच्या प्रचंड अभ्यास व कष्टाचे संस्मरणीय मूर्त रूप आहे असेच म्हणावे लागेल !..

इंदिरा गांधी, आणीबाणी व भारतीय लोकशाही

इंदिराजीच्या निकटच्या सहवासात दीर्घकाळ राहूनही त्यांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे करण्यात पी. एन. धर यशस्वी झाले आहेत. पं. नेहरू व सुरुवातीच्या इंदिरा यांच्या व्यक्तिमत्वातील फरक आणि त्याच इंदिराजींचे पुढे जाऊन निर्णयक्षम पंतप्रधानपदात झालेले रूपांतर याबाबत त्यांचे निरीक्षण उल्लेखनीय आहे...

झोंबी : दुर्दम्य आशावादाची कहाणी

आनंद यादव अगदी परवा परवाच आपल्याला सोडून गेले, पण जाताना मागे दुर्दम्य आशावादाची ‘पॉवर बँक’ ठेवून गेले आहेत. ती अनुभवायलाच हवी .....

देव चालले : स्थित्यंतराची गोष्ट

दीर्घकथा म्हणता येईल असे या पुस्तकाचे स्वरूप. त्यातही घटना फार कमी. घालमेल आणि घुटमळणं मात्र बरंच.....

डॉ. खानखोजे : नाही चिरा ...

‘गदर’ हे स्वातंत्र्यलढ्यातले १८५७ च्या उठावाप्रमाणे अयशस्वी पण धगधगते पर्व ! या उठावाच्या सूत्रधारांपैकी अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. खानखोजे. अमेरिकेत संघटित होऊ लागलेल्या भारतीय क्रांतिकारकांना बॉम्ब बनवणे, गनिमी कावा वगैरेचे प्रशिक्षण सुरु झाले होते. आझाद-ए-हिंद पार्टीची स्थापना करण्यात आली आणि .....