पालघर कोविड योद्धा

आपला माणूस

अचानक कोसळलेल्या कोरोनाच्या संकटात आपल्या समाजबांधवांचे दुःख दूर करण्यासाठी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अथक प्रयत्न केले. वनवासीबहुल जिल्हा असलेल्या पालघरच्या दुर्गम गाव-पाड्यांपासून ते वस्तीवर जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची मदत पोहोचविण्याचे काम नंदकुमार पाटील व सहकाऱ्यांनी केले, तसेच कोरोना आजारामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या छायेतील जनतेला त्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृतीपर मोहीमही राबविली...

भरतभाईंची मदतभरारी...

मुंबई आणि आसपासच्या शहरांबरोबरच पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. डहाणूचा शहरी-ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही. रोजंदारीवर काम करणार्‍यांपासून ते विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत हे या काळात गरजूंच्या मदतीसाठी धावून गेले. तेव्हा, भरतभाईंच्या या मदतभरारीचा घेतलेला हा आढावा.....

‘लक्ष्मी’ची पावले!

गेल्या ३० वर्षांपासून भाजपमधील सक्रिय कार्यकर्ता असलेल्या आणि आता वयाची ६० वर्षं पूर्ण केलेल्या लक्ष्मीदेवी हजारी, या स्वत: मधुमेह रुग्ण असतानाही कोविड काळात रस्त्यावर उतरुन गरजूंच्या मदतीसाठी तत्पर होत्या. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी शक्य तेवढी मदत पोहोचविण्याचा विडा उचलला. अन्नधान्यापासून सॅनिटायझेशनपर्यंत त्यांनी सर्वप्रकारची मदत गरजूंना केली. तेव्हा, त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

वंचितांचा आधारवड

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नातीगोती, आप्तस्वकीय किंबहुना मित्रपरिवारांमध्येही वितुष्टयेण्याचे अनेक प्रसंग घडले. अशा सुन्न वातावरणात सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचा धडाही कोरोना महामारीने साऱ्यांना शिकवला. या ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार, गरजू व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे बोईसर येथील भाजप उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे संपूर्ण बोईसरवासीयांसाठी वंचितांचा आधारवड ठरले आहेत...

संकटकाळातला दिलदार

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरीसारख्या वनवासी व दुर्गम, सर्वच सोयी-सुविधांची वानवा असलेल्या भागातील रहिवाशांचे बिकट हाल झाले. मात्र, भाजपचे आदिवासी आघाडी, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले यांनी या संकटाच्या काळात आपल्या समाजबांधवांच्या मदतीला धावून जात त्यांना दिलासा दिला. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, तसेच मास्क, सॅनिटायझर व औषधांचेही वितरण केले...

भलामाणूस

कोरोना महासंकटात माणुसकीला जागणारे अनेक हात पुढे आले. विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांनी आपापल्या परीने हजारो-लाखो गरजूंना मदतीचा हात दिला. ‘कोरोना’ महामारीच्या काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता, संपूर्ण कुटुंबासह जनसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे वसई-विरार शहराचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी ‘कोविड’च्या संकटकाळात केलेल्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....