नवी मुंबई कोविड योद्धा

युद्ध ‘कोरोना’ विरूद्ध!

नवी मुंबई महानगराने साधलेल्या आजवरच्या लखलखीत विकासात मागील ३० वर्षे या शहराचे सत्ताधारी म्हणून आ. गणेश नाईक यांच्या दूरदर्शी ध्येय-धोरणांचा निर्विवाद मोठा वाटा आहे. लोकनेता तोच जो खऱ्या अर्थाने संकटकाळी जनसेवेला तत्पर असतो. आ. गणेश नाईक आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते जनसेवेसाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा, नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या कोरोना लढ्यातील योगदानाबद्दल माहिती देणारा हा लेख.....

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात युवा, सुशिक्षित महिला ज्यावेळी सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा आपल्या कार्यशैलीतून समाजावर आलेल्या कुठल्याही संकटावर त्या मात करू शकतात. याची प्रचिती नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती गुरखे-साटम यांनी कोविड महामारी काळात केलेल्या मदतीतून मिळते. महामारी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत समाजव्रत म्हणून त्यांनी केलेल्या मदतकार्याचा हा आढावा.....

देणाऱ्याने देत जावे...

‘मै उस प्रभू का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं।’ या पंक्तीप्रमाणे आजन्म सेवाव्रत घेतलेल्या माजी नगरसेवक डॉ. जयाजी कृष्णा नाथ यांनी कोविड काळात एक डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणून झपाटून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मदतीमुळे हजारो गरजूंच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या जीवनाला प्रकाशमान केले. तेव्हा, डॉ. जयाजी कृष्णा नाथ यांच्या महामारीच्या काळातील कार्याला दिलेला हा उजाळा.....

दिघ्याचे दादा...

कोरोनाच्या संकटात जात-पात, पक्ष, समाज, स्त्री-पुरुष, असा कुठलाही भेदाभेद न ठेवता, आपली माणसं म्हणून त्यांच्यासाठी धावून येणारा दादा माणूस, अशी ओळख नवीन गवते यांनी निर्माण केली. नवी मुंबईतील दिघा भागात लोकांना लागणारी हवी ती मदत त्यांनी पोहोचविली. त्यामुळे गरीब-गरजूंना त्यांच्या या मदतीचा मोठा आधार मिळाला. तेव्हा, नवीन गवते यांच्या मदतकार्यातील काही निवडक आणि प्रेरणादायी क्षण... ..

सेवाव्रती

कोरोनापेक्षा त्याची भीती नागरिकांमध्ये पसरण्याचे प्रमाण प्रारंभी काळात जास्त होते. या काळात गरज होती ती नागरिकांना धीर देण्याची आणि लागेल ती मदत करण्याची. म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आपल्या विभागात जनजागृती करत, नागरिकांना धीर देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ‘कोविड’काळातील त्यांनी केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

या, जीवन आपुले सार्थ कराया!

कोरोनासारख्या महामारीच्या काळात कोविड योद्ध्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाताना आपला फारसा विचार केला नाही. अशीच महामारीच्या काळात मदत करत असतानाच, त्यांना ‘कोविड’ची लागण झाली. मात्र, ४९ वर्षांचे ‘कोविड योद्धा’ असलेले गणेश गंगाराम म्हात्रे यांनी कोरोनालाही हरवले आणि त्यांच्या विभागातील नागरिकांसह संकटांनाही तोंड दिले. दुहेरी संकटावर धैर्याने मात करणाऱ्या जनसामान्यांच्या म्हात्रे साहेबांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

संवाद आपुलकीचा...

कोरोनाकाळात जीवनावश्यक गोष्टींबरोबरच नागरिकांना गरज होती ती मानसिक व भावनिक आधाराची. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या सर्वसामान्यांना नैराश्याकडे नेणारी होती. अशावेळी आपल्या प्रभागातील नागरिकांमध्ये जनजागृती करत, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणारे ‘कोविड योद्धे’ भाजप नेते अशोक पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

माझा प्रभाग, माझी जबाबदारी

कोरोनाच्या कठीण प्रसंगात कुटुंबप्रमुखाची भूमिका घेत, आपल्या ऐरोली व कोपरखैरणे प्रभाग क्र. ४४ व ५२ मधील नागरिकांच्या पाठीशी अ‍ॅड. भारती रविकांत पाटील खंबीरपणे उभ्या राहिल्या. भारतीय जनता पक्ष व ‘शिवाजीराव अण्णासाहेब पाटील महिला सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या अ‍ॅड. भारती रविकांत पाटील यांच्या कोरोनाकाळातील कार्याचा आढावा घेणारा लेख.....

जनसेवी नेता...

कोरोनाकाळात जीवनावश्यक गोष्टींबरोबरच नागरिकांना गरज होती ती मानसिक व भावनिक आधाराची आणि कोविड योद्धा असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या या जबाबदारीचे प्रामाणिकपणे निवर्हनही केले. अशावेळी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नागरिकांशी आपुलकीने संवाद साधणारे वाशीतील ‘कोविड योद्धे’ भाजप नगरसेवक शशिकांत राऊत यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

जनसेवा हाच धर्म

कोरोना व ‘लॉकडाऊन’च्या काळात स्थानिक रहिवासी, गरीब कुटुंबाच्या मदतीला धावून जात, ‘हाजी फकीर मोहम्मद पटेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून नागरिकांसमोरचे रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडविले ते भाजप नेते व नवी मुंबईतील मा. नगरसेवक मुनावर फकीर मोहम्मद पटेल यांनी. अन्नधान्याच्या वाटपापासून ते रुग्णवाहिकेपर्यंत पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वोपरी साहाय्य केले. तेव्हा, कोरोनाकाळातील त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

अनुभवाची शिदोरी...

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांपासून ते अगदी लोकप्रतिनिधींचाही कस लागला. कारण, ही परिस्थिती, हे संकट नवीन होते व त्याच्याशी नेमका कसा सामना करायचा, याची फारशी कुणाला कल्पनाही नव्हती. पण, या कोरोना व ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वसामान्यांच्या मदतीला भाजप नेते सुरज पाटील धावून गेले. गरजूंच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा कोरोनाकाळातील मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

जबाबदार समाजसेवक

देशासह नवी मुंबईमध्येही एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. अशामध्ये अनेक प्रभागांमध्ये कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे भीतीचे वातावरण पसरले होते. लोकांमध्ये पुढे काय होणार ही भीती आणि नियमांबाबतचा संभ्रमही कायम होता. यावेळी नवी मुंबईमधील प्रभाग क्र. ८४च्या नागरिकांसाठी समाजसेवक विकास पालकर आणि माजी नगरसेविका स्नेहा पालकर हे धावून आले. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

मदतकर्ता

कोरोनाच्या प्रादुर्भावाने नवी मुंबईमध्ये थैमान घातले असताना, अनेक नागरिकांना ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनाच्या महामारीचा सामना करावा लागला. कित्येकांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली. अनेकांना रोजगार गमवावे लागले. या सगळ्यांच्या मदतीसाठी धावून आले ते कोविड योद्धे. या कोरोनायुद्धात नागरिक आणि कोरोनामध्ये ढाल बनून उभे असलेल्या माजी नगरसेवक अमित मेढकर यांच्या कार्याचा हा आढावा.....

समाजसेवेस सदैव तत्पर

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे त्रस्त झालेल्या गरजूंना सॅनिटायझर, मास्कचे वाटप आणि इतर मदत करून माजी नगरसेवक आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या जैवविविधता समितीचे सभापती अनंत लक्ष्मण सुतार यांनी ऐरोली भागातील १० व १२ प्रभागातील कुटुंबांची आपल्या परिवारासारखी काळजी घेतली. कुठलीही गोष्ट त्यांना कमी पडणार नाही, यासाठी कटाक्षाने लक्ष दिले. तेव्हा, अनंत सुतार यांच्या कोरोनाकाळातील अशा या सेवाकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी

कोरोनामुळे सामान्य नागरिक, छोटे व्यापारी तसेच अनेक गटांची दैना उडाली. परंतु, या कोरोनासारख्या भीषण महामारीसमोर एक भिंत बनून नागरिकांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या जनतेच्या प्रतिनिधीने आपल्या नागरिकांना कोरोनाच्या राक्षसाशी लढण्यास मदत केली. त्यांना धीर दिला आणि सर्वोपरी साहाय्यही केले. तेव्हा, जाणून घेऊया नवी मुंबई प्रभाग क्रमांक ५८चे माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या कोरोना लढ्याबद्दल.....