नाशिक कोविड योद्धा

उद्यमशील योद्धा

उद्योजकांना अडचणीच्या काळात मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या ठायी होती. मदतीची तीव्र आसक्ती आणि दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याची मनी असणारी तळमळ ही पेशकार यांना या काळात स्वस्थ बसू देईना. पेशकार यांनी ‘लॉकडाऊन’ काळात नागरिकांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांचे दु:ख हलके करण्याचा यथोचित प्रयत्न या काळात केला. ..

समायोजित नेतृत्व

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत सर्वच कार्यकर्त्यांना मदतीची दिशा दाखविणे, मदतकार्य करणे, ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या नात्याने सर्व रिकाम्या जागा भरण्याचे काम नाशिक शहरात पार पडले. त्यासाठी अग्रभागी होते ते भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे. तेव्हा, कोरोनाकाळातील गिरीश पालवे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरामध्ये केलेल्या एकूणच मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

आरोग्यरक्षक प्रथम नागरिक

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी खर्‍या अर्थाने नाशिककरांचे पालकत्व निभावले. कुलकर्णी यांनी नाशिकनगरीतील नागरिकांच्या जागरूकतेसाठी ‘लॉकडाऊन’च्या प्रारंभीच्या काळात समाजमाध्यमांतून जनजागृतीपर व्हिडिओ, ध्वनिफितीद्वारे जनजागृती करण्यावर भर दिला. कुलकर्णी यांनी या काळात घेतलेली भूमिका ही नाशिककर जनतेच्या आरोग्याचे हितरक्षण करणारी ठरली...

कर्तव्यप्रिय समाजसेवी नेता

नाशिक प्रशासनासमोर कोरोनाचा फैलाव रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान झोपडपट्टी व दाटीवाटीच्या भागांमध्ये होते. अशातच या भागात मोठ्या संख्येने गरीब, मजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने या नागरिकांसमोर आरोग्याबरोबरच रोजच्या जगण्याचेही गंभीर प्रश्न या काळात उभे राहिले. अशावेळी नागरिक व प्रशासनाला मदतीचा हात देणार्‍या भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांचा कोरोनालढ्यातील योगदानाचा घेतलेला आढावा.....

सेवा परमो धर्म:

जनतेच्या सेवेसाठी भारतात दोन वर्ग हे कायम कार्यरत असतात. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरे म्हणजे शासकीय सेवक. याचीच प्रचिती या काळात आली. स्वतः कोरोनाबाधित होऊनदेखील अविरत सेवाकार्य सुरू ठेवून नागरिकांना मदत करणारे सेवक म्हणून नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांचे कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे...

आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे लोकप्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकामी दि. २४ मार्च रोजी १५ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच नगरसेविका प्रियंका माने व त्यांचे पती धनंजय भास्करराव माने यांनी २७ मार्चपासून त्यांच्या माध्यमातून मदतकार्याचा श्रीगणेशा केला. त्यांच्या या मदतकार्यामुळे अनेक गरजूंचे रोजच्या आयुष्यातील प्रश्न काही अंशी का होईना मार्गी लागले. तेव्हा, त्यांनी केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

मदतकार्याचा श्रीगणेशा

कोराच्या काळात नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड व त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी नागरिकांना मदतीचा हात देऊ केला. दु:खितांचे अश्रू मदतीच्या रूपाने पुसण्याचे सर्वात पहिले काम या दाम्पत्याने केले. नाशिक शहरात गायकवाड दाम्पत्याने सर्वात आधी मदतीचा श्रीगणेशा केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

कोरोनाशी दोन हात करणारे योद्धे

कोविड महामारीच्या काळात जे समाजसेवक प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले होते, त्यांना कोरोना संसर्गापेक्षा आपल्यास कोरोना झाल्यास मदतकार्य थांबण्याची देखील चिंता सतावत होती. अशाच एक ‘कोरोना योद्ध्या’ म्हणजे माधुरी गणेश बोलकर. त्यांना व त्यांच्या पतीला कोरोना संसर्ग होऊन देखील त्यांनी आपल्याद्वारे करण्यात येत असलेल्या मदतकार्यात कोणत्याही स्वरूपाचे विघ्न येणार नाही, याची विशेष काळजी घेतली. त्यांच्या मदतकार्याचा हा परिचय... ..

बळीराजाचे मदतकार्य

बळीराजा हा नागरिकांसाठीच्या अन्नधान्यांची अविरत तजवीज करण्यात व्यस्त असतो. ‘लॉकडाऊन’च्या काळात गरीब आणि गरजवंतांसाठी सेवक म्हणून कार्य करणाराही एक बळीराजाच होता. नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. 15च्या नगरसेविका अर्चना थोरात व त्यांचे पती चंद्रकांत थोरात यांनी सेवकाच्या भूमिकेतून नागरिकांची सेवा केली. मुळात शेतकरी असणारे हे कुटुंब आपल्या शेतात पिकलेल्या अन्नधान्यासह गरजवंतांच्या मदतीला धावून गेले...

मदत व प्रबोधनकारी सेवक

कोरोनाकाळात समाजातील नागरिकांना अनेकांनी मदत केली. वस्तू, अन्न, कपडे व इतर माध्यमातून करण्यात आलेली मदत ही नक्कीच आवश्यक अशीच होती. मात्र, त्याचबरोबरीने नागरिकांना कोरोनाबाबत माहिती देणे आणि त्यांचे प्रबोधन करत त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणेही आवश्यक होते. इतर मदतीबरोबरच प्रभाग क्र.२३ (अ) च्या नगरसेविका रूपाली यशवंत निकुळे यांनी केलेले कार्य हे नक्कीच वाखाणण्याजोगे असेच आहे...

सेवा समाजहिताची!

कोरोना पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ काळात समाजातील सर्वच घटकांना मदतीची आस होती. समाजाचे हित साधणारी सेवा या काळात होणे हे अत्यावश्यक होते. सामाजिक निकड लक्षात घेऊन नगरसेविका छाया देवांग यांनी समाजाचे हित साधणारे कार्य करण्यास सुरुवात केली आणि त्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, छाया देवांग यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

खर्‍या गरजवंतांचे सेवक

कोरोनाकाळात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आल्यानंतर समाजाची आर्थिक स्थिती कमालीची खालावली होती. अनेकांचे रोजगारही बुडाले. मध्यमवर्गीय कुटुंबंही हलाखीच्या परिस्थितीचा सामना करू लागली. हातावर पोट असणार्‍या नागरिकांचे हाल तर अवर्णनीय असेच होते. अशा वेळी अन्नधान्य, लहानग्यांसाठी दूध आदींचे मोठे प्रश्न समाजात निर्माण झाले होते. गरजवंत असलेले अनेक जण समाजात दिसत होते. त्यापैकीच एक म्हणजे नाशिकच्या दीपाली सचिन कुलकर्णी.....

‘मी’ पणा बाजूला सारून कार्य करणारे सेवक

‘लॉकडाऊन’मच्या काळात मदतीचे अनेक हात या काळात नागरिकांच्या समोर आले. नागरिकांनाही त्यामुळे आधार मिळाला. मात्र, या काळात करण्यात आलेल्या मदतीचे काही हात असे होते की, त्यात ‘ही मदत मी केली,’ असे सांगणे त्यांना अयोग्य वाटत होते. आपण एकट्याने मदत केल्यास ‘मी’पणाचा लवलेश त्यात दिसून येईल, त्यामुळे त्यांनी अनेकांच्या मदतीने सेवाकार्य करण्यास प्राधान्य दिले. त्यातीलच एक नाव म्हणजे चंद्रकांत खोडे...

शेतकरी दादा

कोरोना महामारी आणि ‘लॉकडाऊन’मध्ये संपूर्ण जग थांबले होते. या काळात बळीराजा कायम राबत होता. त्याला आधार देण्याची गरज होती. आस्मानी संकटही डोक्यावर उभे होते. शेतमाल जागीच सडून जातो की काय, अशी भीती होतीच. याच वेळी भाजपचे नाशिक कामगार आघाडी प्रदेश सचिव विक्रम नागरे यांनी शेतकर्‍याचा माल थेट गरजूंपर्यंत पोहोचवून एक नवा आदर्श जगासमोर ठेवला. त्यांच्या मदतकार्याचे हे मॉडेल एक आदर्श ठरत आहे...

दुर्बलास साहाय्यकारी

कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्यावर सर्वात जास्त फटका बसला तो कष्टकरी वर्गालाच. ‘दाने दाने पे लिखा हैं, खानेवाले का नाम’ असे जरी आपण म्हणत असलो, तरी या काळात खाणारे ‘अनेक’ आणि ‘दाना’ मात्र ‘नावालाच’ अशी सामाजिक स्थिती निर्माण झाली होती. अशावेळी नागरिकांच्या अपेक्षा समजून घेत आणि खर्‍या गरजवंतांच्या मदतीसाठी जीवाचे रान केले ते हर्षा व त्यांचे पती आशिष फिरोदिया यांनी...