नागपूर

मोदी-जिनपिंग भेटीचे फलित...

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीचे फलित काय, असा प्रश्न सहज निर्माण होतो. त्याचे कारण आहे. सध्याच्या घडीलाच नव्हे, तर अगदी चीनने भारतावर 1962 साली आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध हे तणावाचे राहिले आहेत. त्यात भर पडली ती अक्साई चीनचा भाग चीनने गिळंकृत करणे, लडाख आणि अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणे, मध्यंतरी डोकलामचा तिढा निर्माण होणे आणि नुकतीच 370 कलमावर चीनने पाकिस्तानची कड घेणे. 370 कलमावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अक्साई चीन..

विमानपूजन!

खरंच चुकलंच राजनाथसिंहांचं! तलवारी म्यान झाल्यात, धनुष्यबाण अर्थहीन ठरलेत, अग्नीपासून जलापर्यंत अन् वायूपासून भस्मापर्यंतची सारी शस्त्रास्त्रे ग्लान्त झाली असताना, या अत्याधुनिक युगात थेट विमानाची पूजा करायला निघाले देशाचे संरक्षणमंत्री! गंध, फुलं, अक्षता घेऊन फ्रान्सच्या वारीला निघालेत ते. देशाच्या संरक्षणदलात दाखल होऊ घातलेल्या र्रोंेल विमानांची विधिवत पूजा केली त्यांनी. छे! छे! चुकलंच संरक्षणमंत्र्याचं! असे करणे, या देशातल्या कॉंग्रेस धुरीणांच्या पसंतीस पडणार नाही, याचीतरी जाणीव बाळगायला हवी होती ..

विजयादशमीचे पाथेय...

विजयादशमीच्या, सरसंघचालकांच्या भाषणाकडे सार्या जगाचे लक्ष लागलेले असते, ही काही आजचीच बाब नाही. संघाशी संबंधित मंडळी सत्तेत आहेत म्हणून जग त्यांच्या भाषणाकडे डोळ्यांत जास्त तेल घालून बघते, असेही नाही. संघाच्या स्थापनेपासूनच ही परंपरा चालत आलेली आहे. अगदी डॉ. हेडगेवारांनी आपल्या 8-10 सवंगड्यांसह महालातील मोहिते वाड्याच्या मैदानावर संघाची स्थापना केली तेव्हापासूनच ही परिपाठी चालत आली आहे. सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण हे पुढील वर्षभरासाठी स्वयंसेवकांना पाथेय असते. ..

निवडणूक आणि बंडखोरी...

निवडणूक महानगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो, की विधानसभा आणि लोकसभेची, प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी होतच असते. बंडखोरी हा लोकशाहीचा अपरिहार्य भाग झाला आहे. कारण, लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. लोकशाही तुम्हाला निवडणुकीत विजयी करण्याची खात्री देऊ शकत नाही, मात्र निवडणूक लढवण्याचा तुमचा अधिकारही नाकारू शकत नाही. महाराष्ट्र आणि हरयाणात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत. या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर होती, 5 ऑक्टोबरला ..

उपोषण, उपास पडणे आणि उपवास!

मनोज कुमार यांच्या ‘शोर’ या सिनेमातल्या गाण्याचा मुखडा आहे. खट्याळ जया भादुरी, उपोषणाला बसलेल्या मनोजकुमारला टोपी देते घालायला... टोपी म्हणजे हॅट असते. तो उपोषण करून मरेल, या भीतीने त्याच्यावर मनोमन प्रेम करू लागलेली ही भाबडी पोर त्याला टोपीत पोळ्या लपवून देते अन् खा, असे सांगण्यासाठी र्डें वाजवून गाणे म्हणते. त्यात मध्येच हे, ‘टोपी मे कि रोटी खाना हो बाबुजीऽऽऽ’ अशी एक ओळ येते... अर्थात, भारतकुमार यानेकी मनोजकुमार तिच्यावर रागावतात आणि मग ती हिरमुसते... तिच्या मते, चुपचाप पोळी खाऊन उपोषण केले तर जास्त ..

राजी-नाराजी

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा होताच, जवळपास सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी हे जिवंतपणाचेच लक्षण आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी, न्याय मिळावा, यासाठी लोकशाहीने दिलेल्या शस्त्राचा वापर करण्यात गैर काहीच नाही. बंडखोरांनी वर काढलेले डोके काही आजचेच नाही. दरच निवडणुकीत- मग ती लोकसभेची असो, राज्यसभेची असो, विधानसभेची असो की पंचायत समितीची, त्यात बंडखोरी ही होतच असते. हेच कशाला, आपल्याकडे वॉर्डातील पक्षकार्यकारिणीच्या निवडणुकीतही बंडखोरी होते आणि शाळांमध्ये ..

काश्मीरची वास्तव स्थिती!

   वास्तव हे कटु असते, पण देशहितासाठी ते मांडावेच लागते. भारताच्या मुख्य धारेतील प्रसिद्धिमाध्यमे (मीडिया) नेमके हेच विसरले आहेत. या मीडियाचा उथळ व पोकळपणा काश्मीरच्या संदर्भात फारच प्रकर्षाने जाणवत आहे. 5 ऑगस्टनंतर काश्मीरची काय स्थिती आहे, हे सर्व जाणतातच. या दिवसानंतर जम्मू-काश्मीर हे राज्य न राहता, त्याचे दोन- जम्मू व काश्मीर आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि त्या पूर्वी संविधानातील कलम 370 निष्प्रभ करण्यात आले. याला विरोध होणार होता. तो हिंसकच राहण्याची शक्यता ..

मोदींचा बुद्ध, इम्रानचे युद्ध...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भाषण करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जे भाषण केले, ते पाहता एखादा दहशतवादीच भाषण देत आहे की काय, असेच जाणवले. दोन मुद्यांवर इम्रानने भर दिला. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चारलेल्या ‘रॅडिकल इस्लामिक टेररिझम’ आणि दुसरा आवडता विषय म्हणजे काश्मीर. पहिल्या विषयावरही ते खूपकाही बोलले. स्वत:ला एकीकडे शांतिदूत म्हणत असतानाच, कुख्यात क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याच्या विचारसरणीचाही त्यांनी पुरस्कार केला...

अर्ध्या जगाच्या आनंदबिंदूंचे ‘दृष्टी’दर्शन!

जगात दोन संस्कृती नांदतात. एक संस्कृती जी भारतीय जीवनपद्धतीनुसार कार्य करते आणि दुसरी पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित आहे. दोन्ही संस्कृतींत अनेक आचार-विचारांबाबत साम्य असले, तरी वैयक्तिक जीवनातील स्वैराचारी आचार-विचारांना पाश्चात्त्य संस्कृतीत ठायीठायी स्थान मिळालेले दिसते. त्यामुळे त्या संस्कृतीतून प्रस्फुटीत झालेल्या संकल्पनांमध्ये भारतीय जीवनपद्धतीनुसार जगणार्या स्त्री-पुरुषांच्या आचार-विचारांशी अनुरूप, येथील परंपरा आणि संस्कृतीचा सर्वांगीण विचार करून कुठले..

उरलो बारामतीपुरता!

महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे, पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योजकांचे तारणहार, जातीयवादी राजकारणाचे प्रणेते, सत्तेच्या राजकारणासाठी रचावयाच्या षडयंत्राचे संशोधक, माननीय शरद पवारसाहेब यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने बँक घोटाळ्यासंदर्भात गुन्हे दाखल करताच, अख्ख्या बारामतीच्या मर्यादित भौगोलिक परिसरात जी संतापाची लाट उसळलीय्, ती पुरेशी बोलकी आहे. देशपातळीवर पक्षाचे नेतृत्व करणार्या, वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणार्या, स्वपक्षीयांना दगा देण्याचा दांडगा अनुभव गाठीशी ..

डिजिटल जनगणनेचा क्रांतिकारी निर्णय!

विरोधी पक्ष आणि विरोधक बेंबीच्या देठापासून कितीही बोंबलत सुटले असले, तरी केंद्रातले मोदी सरकार देशातील जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षासह राज्याराज्यांतील विविध प्रादेशिक पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीने विरोधी पक्षांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातल्यानंतरही विरोधी नेत्यांची दृष्टी सुधारली नाही, ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब होय...

अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, अमेरिकेतील ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने इतिहास घडवला आहे! या कार्यक्रमाने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील मैत्रीवर फक्त शिक्कामोर्तबच केले नाही, तर ती आणखी दृढ केली आहे. यासोबतच या दोन देशांनी इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढाईचे रणशिंगही फेकले, हाही जगाला मोठा संदेश मानला पाहिजे. मोदी हे इतिहास घडवणारे नेते म्हणून ओळखले जातात..

सर्वात मोठे आर्थिक निर्णय!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी परवा, आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला. यामुळे कार्पोरेट क्षेत्राला मोठा लाभ तर पोहोचेलच, शेअर बाजाराच्या प्रचंड उसळीमुळे आताच भागधारकांना सात लाख कोटींचा फायदा झाला आहे. विरोधकांचा मात्र या निर्णयामुळे तिळपापड झाला आहे. सध्या मोदी सरकारविरोधात कोणताही ठोस मुद्दा नसल्याने, सरकारने घेतलेल्या कोणत्याही चांगल्या निर्णयाला विरोध करणे, हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याजवळ आहे. डाव्यांचे एकवेळ समजू शकते...

निकाल निवडणुकीचा वाटे असाच असावा!

 एखादी कहाणी मग ती कुठल्याही रूपात तुमच्यासमोर येणार असो (नाटक, चित्रपट, कादंबरी) तिची सुरुवात, मध्य आणि शेवटही रसिकांना माहिती असावा अन् तरीही एकुणातच मांडणार्याची शैली इतकी छान असावी की तरीही ती कहाणी रोमांचक वाटावी. पुढे काय होणार हे माहिती असतानाही कुठेही कंटाळा येणार नाही... राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची पूर्ण कथाच अगदी सामान्य मतदारांना माहिती आहे. केवळ निकालासाठी सारे उत्सुक आहेत. या कथानकात विविध भूमिका निभावणार्या सर्वच पात्रांना आणि पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञांनाही निकाल ..

न्यायव्यवस्थेवर विश्वास

कुणीही ऐर्यागैर्याने उठावे आणि राममंदिरावर जीभ सैल सोडावी, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणे हाणता येईल, असा जो प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, त्याने विरोधकांना आणि विशेषत: मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना गुदगुल्या होत असल्या तरी, या प्रकारावर कठोर आघात होणे आवश्यक होते. गुरुवारी नाशिकच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत या तमाम लोकांचा जो व्यवस्थित समाचार घेतला, ते एका परीने बरे झाले. सर्वोच्च न्यायालय आणि त्यामधील काही न्यायाधीश, 2014 सालापासून सत्तेत आलेल्या ..

यंत्र सत्य की माणूस?

‘एकदा का तुम्ही यंत्रशरण झालांत की मग मानवी कार्यसंस्कृती आणि संस्कार संपतील आणि माणूस यंत्रांचा गुलाम होईल...’ असे महात्मा गांधी म्हणाले होते. भारत हा देश खर्या अर्थाने कळलेला हा महात्मा होता. हा देश 40 हजार खेड्यांत वसलेला आहे आणि एक गाव म्हणजे संपूर्ण देशच आहे, अशी ग्रामकेंद्री व्यवस्था त्यांना हवी होती. त्यामुळे माणसांनी माणसांची कामे करावीत आणि व्यवहार पूर्ण व्हावेत, असे त्यांचे मानणे होते. त्यांच्या दृष्टीने ही लोकशाही होती. त्यात नंतर बरेच बदल होत गेले. नेहरूंनीच ते केले. मोठी धरणे आलीत, कारखाने ..

प्लॅस्टिक बंदी

गत काळात झालेल्या अभ्यासानुसार जगभरातील सुमारे 127 देशांनी प्लॅस्टिक वापराबाबत पर्यावरणपूरक विचार केलेला आढळून आला आहे. मार्शल आयलंड सारखा देश ज्याने प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातलीय्, तिथपासून तर मालडोवा, उझबेकिस्तान सारखे देश ज्यांनी यासंदर्भात काही कठोर पावलं उचलली आहेत, रोमानिया, व्हिएतनाम सारखे देश ज्यांनी पुन्हा वापरता येईल अशाच प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी दिली आहे, इथपर्यंत... सर्वच देशांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात याबाबतीत कायदे केले आहेत. ..

नापिकी : निसर्गशोषणाचेच अपत्य!

    उत्क्रांती ही मानवी जीवनात सतत होत राहणारी अवस्था आहे. मनुष्यजीवन जसजसे उत्क्रांत होत गेले, तसतशा सोयीसुविधांची निर्मिती होत गेली. त्यामुळेच आज एकविसाव्या शतकापर्यंतच्या कालावधीत अनेकानेक शोध लागले आणि मानवी जीवन सुकर होत गेले. आज परिस्थिती अशी आहे की, प्रचंड यांत्रिकीकरणामुळे माणसाचे श्रम कमी झाले असून, तो भौतिकतेच्या अतिआहारी गेला आहे. यामुळे अनेक समस्या ‘आङ्क वासून उभ्या ठाकल्या. पाण्याचा, खतांचा, वाहनांचा, विजेचा मोठ्या प्रमाणात वापर, यांत्रिकीकरणावर निर्भरता वाढणे, ..

गाढवांचा बाजार...

पाकिस्तानातील लाहोर प्रांतातील एका गावात सध्या गाढवांच्या बाजाराने धूम उडवून दिली आहे. पाकमधील काही वाहिन्यांनी या बाजाराची ब्रेकिंग न्यूज दिली आहे, तर काहींनी विशेष वृत्त म्हणून बातमी दिली आहे. सार्या वाहिन्यांचे अँकर अगदी पोट धरून हास्यकल्लोळात या बातमीचे विश्लेषण करीत आहेत. आता कुणीही म्हणेल की, असे काय विशेष आहे या गाढवांच्या बाजारात. भारतात अनेक ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो...

गणपती नंतर आता सरकार बसवूया!

  काय म्हणता? तर आता बघता बघता गणपती आले अन् गेलेही. त्यांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या, असे आवतन त्यांना आपण देऊनही टाकले आहे. ‘चैन पडेना आम्हाला’ असेही आपण त्याला म्हणजे बाप्पाला सांगत असतो. नंतर मात्र नवरात्र येते. दिवाळी येते अन् ‘चैन पडेना’ म्हणणारे चैन करत असतात. बाप्पाचा उत्सव गेला असला, सरला असला तरीही उत्साह मात्र संपलेला नसतो. तो कधी संपतही नाही. तसा बाप्पाचाही ‘सीझन-टू’ येतोच. म्हणजे या दहा दिवसांत गणपतीची प्रतिष्ठापना करता आली नाही, ..

या रे या, सारे या...!

या रे या, सारे या. लगबग करा. पटापट या...! इतर कुठेही जाऊ नका! सध्या सत्तेत येण्याची शक्यता केवळ आणि केवळ भाजपा-सेनेचीच असल्याने, धरायचीच झाली तर फक्त त्याच पक्षांची कास धरा. निवडणूक तोंडावर असल्याने घाई करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. नवीन पक्षात प्रवेश करून स्वत:ची उमेदवारी अन् आमदारकी आरक्षित करून घ्या. तसेही, विचारांचे लोढणे खांद्यावर वाहिले ..

मसूद अजहरची सुटका, पाकची नापाक कृती!

    जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय भारताने घेतला आणि पाकिस्तान बिथरला. मुळात यात पाकिस्तानने बिथरण्याचे काही कारण नव्हते. कारण भारताने जम्मू-काश्मीरबाबत जो काही निर्णय घेतला तो त्याच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रातील आणि घटनेला धरून होता, पाकिस्तानातील कोणत्या प्रांताबाबत नव्हता. मात्र, पाकिस्तानची गेल्या काही दिवसांतील वागणूक ही पिसाळल्यासारखी आहे. पाकिस्तान आधीही भारतात घातपाती कारवाया घडवून आणत होता, आता तर त्याची वागणूक चेकाळल्यासारखी ..

कुठवर सहन करणार आम्ही भ्रष्टाचार?

   भारतातल्या लोकांना लाच दिली की कुठलेही काम होते, असा संदेश जर जगात जाणार असेल, तर त्याचा आपल्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात भारत सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला देश आहे, हे वाचून भारतीयांना आश्चर्यही वाटणार नाही. कारण, आपले काम करवून घेण्यासाठी सरकारी बाबूचा खिसा गरम केला नाही, असा नागरिक शोधूनही सापडायचा नाही! मी लाच घेणार नाही आणि देणार नाही, अशी प्रतिज्ञा अनेक लोक करतात. पण, लाच घेणार नाही हे जरी तुमच्या ..

फार लवकर जिरली पाकिस्तानची!

   जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने हटविल्यानंतर, पाकिस्तान जगभर बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटला होता. भारताला अणुयुद्धाची धमकी देण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली होती. अजूनही तिथल्या अनेक नेत्यांच्या तोंडून युद्धाची भाषा निघते आहे. एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, पंतप्रधान इम्रान खान कटोरा घेऊन भीक मागत फिरत आहे, अमेरिकेने बुडावर लाथ मारली आहे, चीनचा डोळा पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यावर आहे आणि अशा स्थितीत पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर, आयएसआय ..

ई-1 वाघीण आणि काही प्रश्न...

  वनविभागाने नुकत्याच राबविलेल्या मोहिमेत, ई-1 या वाघिणीला जिवंत पकडले आणि नागपूरनजीकच्या प्राणिसंग्रहालयात पाठविले. दोन नागरिकांना ठार मारल्यानंतर तिला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि ती यशस्वी रीत्या पार पडली. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात तिचा वावर होता. वास्तविक पाहता, तिला गेल्या मे महिन्यातच पकडण्यात आले होते. तिचे पुनर्वसन करण्यासाठी तिला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डोलार येथील कोअर क्षेत्रात मुक्त करण्यात आले होते. पण, ती कोअर क्षेत्र सोडून र्बेंर क्षेत्रात आली आणि मेळघाट येथील प्रादेशिक ..

दिग्विजय सिंह यांचे डोके तर फिरले नाही!

  ‘‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का,’’ असा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रज सरकारला उद्देशून विचारला होता. मुळात इंग्रजांना डोके होते, पण ते काही कारणाने ठिकाणावर नव्हते. त्यामुळे हा प्रश्न उचित होता. पण, आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे डोके तर फिरले नाही, असा प्रश्न त्यांच्या वागणुकीतून सतत सगळ्यांना पडत असतो. मात्र याचे उत्तर, ज्याला थोर्डेफार डोके असेल त्याचेच डोके फिरू शकेल. ज्याला ..

बँकांचे विलीनीकरण...

    देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी 15 बँकांचे विलीनीकरण करून 27 बँकांची संख्या 12 वर आणण्याचा निर्णय घेतला. देशाचा जीडीपी 5.8 टक्क्यांवरून 5 वर आल्याची बातमीही तत्पूर्वी घोषित झाली. त्याआधी रिझर्व्ह बँकेने 2018-19 च्या वार्षिक अहवालात, बँकिंग व्यवहारात 71 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याचे जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मोटारी, गृहनिर्माण, उत्पादन, मोठे उद्योग यांसारख्या मोठ्या क्षेत्रातील लोक कर्जाची उचल करीत नसल्याने या उद्योगांवर काहीसे मंदीचे सावट निर्माण ..

खंजीर काळजात घुसला!

आता या अशा शीर्षकाचे दुसरे संगीत नाटक लिहिले जावे. एकतर बराच काळ झाला, चांगलं संगीत नाटक रंगभूमीवर आलेले नाही आणि राजकीय नाटकही आलेले नाही. त्यामुळे आता ही योग्य वेळ आहे. कारण परवा साहेबांचा लाडका खंजीर त्यांच्याच काळजात खुपसला गेला. एका पत्रकाराने अनवधानाने का होईन हे काम केले. साहेब आजकाल अस्वस्थ असतात. नाहीतर साहेबांचे पाणी खूपच खोल, तळ दिसत नाही अन् ढवळूनही काढता येत नाही. साहेबांच्या या खोलपणाचे खूपसारे किस्से आजही लोक कडवट कौतुकाने सांगत असतात. साहेबांनी सांगितले, मंत्रिपदाची शपथ घेण्याची ..

बैल वाचला तर पोळा!

 ग्रामीण भागात पोळा सण उत्साहात साजरा झाला, अशी बातमी वाचून आपण आपल्या दैनंदिन कामाला लागतो. परंतु, पोळ्याच्या निमित्ताने कुणीच बैलांच्या आणि एकूणच ग्रामीण भागातील पशुधनाच्या बाबतीत बोलताना दिसत नाही. खूपच झाले तर बैलाच्या कष्टमय जीवनाविषयी उसासे सोडल्याचे दिसून येईल. एक बाब मात्र सर्व मान्य करतात की, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बैल हा केंद्रबिंदू आहे. ही वस्तुस्थिती हजारो वर्षांपासून लोकांना माहीत होती, म्हणूनच केवळ बैलांसाठी पोळा हा सण प्रारंभ करण्यात आला. पोळ्याच्या दिवशी बैलांचा जो थाट असतो, जो ..

जनहितकारी निर्णय!

  मोदींच्या कामाचा झपाटा सुरूच आहे, त्याला जोड त्यांच्या मंत्रिमंडळातील तत्पर मंत्र्यांच्या कार्यशैलीची मिळत आहे. एकापाठोपाठ एक निर्णय घेऊन ते, लोकहितकारी सरकार कसे असले पाहिजे, हे सिद्ध करून दाखवत आहेत. मोदींच्या सरकारने 75 दिवसांच्या त्यांच्या नव्या सरकारच्या कार्यकाळात थक्क करणारे निर्णय घेतले. तिहेरी तलाक, चांद्रयान मोहीम आणि घटनेचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी बहुमताचे सरकार काय करू शकते, त्यांची ताकद काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयांमुळे सार्या जगाचे ..

खेलो इंडिया, फिट इंडिया...

बॅडमिंटनमधील एकेरीचे विश्वविजेतेपद पटकावून पी. व्ही. सिंधू हिने भारताची मान उंचावली आहे, तर स्पेनची राजधानी माद्रिद येथे झालेल्या विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कोमलिका बारीने सुवर्णपदक जिंकत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे या दोघींनी आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. रविवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूने आधीच्या दोन वेळच्या विजेत्या नोजोमी ओकुहारा हिला हरवीत आपल्या आधी..

नारायणमूर्ती यांच्या नजरेतील अर्थव्यवस्था

  जगात कुठेही जा, मग ते राष्ट्र विकसित असो की विकसनशील, त्याची सगळी भिस्त ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर असते. गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो आहे, हे खरे. भारतही त्यातून सुटलेला नाही. पण, यामुळे भारतात मंदी आली, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. आज जगातील अनेक देश, प्रामुख्याने जपान वगळता सर्वच देशात सध्या मंदीचे काहीसे वातावरण निर्माण झाले आहे. याला स्थानिक स्थिती कमी आणि जागतिक स्थिती प्रामुख्याने जबाबदार आहे. यातील सर्वात मोठा घटक म्हणजे, गेल्या दोन ..

अर्थ अरुणास्त!

    अवतार म्हणून कुणीच जन्माला येत नाही. मात्र या जन्माचे सार्थक करणारे जीणे कुणी जगत असेल आणि आपल्या कर्तृत्वाची रेखा बुलंद करत असेल तर मग अशांच्या मरणापाशी जग थांबतं, त्यांच्या जगण्याचे सगळेच संदर्भ इतरांना मार्गदर्शक ठरतात. त्यांचा जन्म मग महात्म्याचा अवतार म्हणून पूजला जात असतो... पात्र विशाल झाले की मग त्याच्या उगमाचा शोध घेतला जातो आणि ते पवित्र स्थळ होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गेल्या पाच वर्षांतील नव भारताच्या अर्थनीतीची मांडणी करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या ..

यशवंतराव यांना र्मों करतील?

मोठमोठे कार्यकर्ते व नेते पक्ष सोडून जात असतानाच, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष आणखीनच संकटात सापडला आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने एका निर्णयान्वये, राज्य सहकारी बँकेच्या अजित पवारांसह 50 संचालकांवर आर्थिक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत...

चिदम्बरी मगरुरीला चपराक!

 देशाचे माजी गृहमंत्री पोलिसांच्या भीतीने पळून गेले. एका घोटाळ्यात अडकलेले देशाचे माजी वित्तमंत्री, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताच फरार झाले... काय दुर्भाग्य आहे बघा या देशाचे! कधीकाळी संसदेत बसलेली, विविध राज्यांच्या विधानसभेत बसलेली लालूप्रसाद यादवांपासून तर ए. राजापर्यंत, सुरेश कलमाडींपासून तर कानीमोझी, अमरसिंहांपर्यंतची मंडळी कधीतरी कारागृहात जाऊन आली आहे. आता पी. चिदम्बरम् त्या रांगेत आहेत. ज्यांनी कधीकाळी गृहमंत्री म्हणून, हाताशी असलेल्या यंत्रणेच्या बळावर देशाच्या कानाकोपर्यात दरारा ..

भिजायचं की थिजायचं? तुम्हीच ठरवा!

आता वर पाऊस आलाच नव्हता. आता आला आहे. आला आहे, असं म्हणतोय् कारण तो नागपुरात येतो आहे गेले दोन दिवस. किमान त्याचा हँगओव्हर तरी असतोच. जिकडे पाऊस येतो ना त्यांना वाटत असतं की सार्या दुनियेत लोक भिजताहेत. आजकाल मात्र तुमच्या घराच्या समोरच्या भागात पाऊस पडत असतो आणि मागे असेल अंगण तर ते कोरडं असतं... तरीही आता पाऊस विदर्भात पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यावर कसं धो धो बोलता येतं. उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर तसं काही बोलता येत नाही. कारण उन्हाळ्यात सगळी कोरड असते अन् हिवाळ्यात गोठलं असतं सगळं... ..

भिजायचं की थिजायचं? तुम्हीच ठरवा!

आता वर पाऊस आलाच नव्हता. आता आला आहे. आला आहे, असं म्हणतोय् कारण तो नागपुरात येतो आहे गेले दोन दिवस. किमान त्याचा हँगओव्हर तरी असतोच. जिकडे पाऊस येतो ना त्यांना वाटत असतं की सार्या दुनियेत लोक भिजताहेत. आजकाल मात्र तुमच्या घराच्या समोरच्या भागात पाऊस पडत असतो आणि मागे असेल अंगण तर ते कोरडं असतं... तरीही आता पाऊस विदर्भात पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यावर कसं धो धो बोलता येतं. उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर तसं काही बोलता येत नाही. कारण उन्हाळ्यात सगळी कोरड असते अन् हिवाळ्यात गोठलं असतं सगळं... ..

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!

अर्धशिक्षित किंवा गावठी डॉक्टर, जखम डोक्याला झालेली असताना इलाज पोटाचा करतो. तसाच प्रकार देशात सध्या सुरू आहे. मूळ मुद्दे बाजूला सोडून अत्यल्प महत्त्वाच्या अथवा किरकोळ मुद्यांकडे देशातील जनतेचे, प्रशासनाचे, नोकरशाहीचे आणि होय, लोकप्रतिनिधींचेदेखील लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करून वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असली, तरी या देशाची अनेक समस्यांनी पाठ सोडलेली नाही. निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ, महिलांवरील अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषण, ..

कर्नाटकात नुसतीच वळणे!

गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेला राजकीय गोंधळ समाप्त व्हावा म्हणून, कर्नाटकच्या राज्यपालांना अखेर हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी मुख्यमंत्री तसेच विधानसभाध्यक्षांना पत्र पाठवून, कुमारस्वामी सरकारने शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे, असा आदेश दिला. राज्यपाल वजुभाई वाला यांना राज्यपाल म्हणून असा आदेश विधानसभाध्यक्षांना देता येतो का, यावर आता नवा ‘घटनात्मक गोंधळ’ सुरू झाला आहे. प्रत्येक जण आपापल्या राजकीय विचारधारेच्या कलानुसार मत मांडत आहे.  ..

दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या दिशेने...

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला व्यापक अधिकार देणारे सुधारणा विधेयक परवा, सोमवारी लोकसभेत पारित झाल्याने देशविरोधी शक्तींना वठणीवर आणणे शक्य होणार आहे. सत्ताधारी भाजपाप्रणीत रालोआने मांडलेल्या या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक आदी विरोधी पक्षांचे अभिनंदन केले पाहिजे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॉंग्रेसप्रणीत संपुआने 2009 साली एनआयएची स्थापना केली होती. या यंत्रणेला बळकटी देणे अत्यंत आवश्यक होते. ती बळकटी देण्याचे फार ..

करतारपूर कॉरिडॉरची शीख बांधवांना अमूल्य भेट!

  करतारपूर कॉरिडॉरबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेली सहमती, या दोन देशांत सहकार्याचे नवे पर्व सुरू करताना दोन देशांतील तणावही कमी करू शकेल, असा विश्वास करायला हरकत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांत झालेली चर्चा सुखद राहिली आणि भारतातील शीख बांधवांचा, पाकिस्तानातील करतारपूर गुरुद्वारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. भारतीय पासपोर्ट असलेल्या शीख बांधवांना आता करतारपूर गुरुद्वारात जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा ..

कॉंग्रेसमधील नाराजीनामा सत्र...

राहुल गांधी यांच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस महासचिव हरीश रावत, पश्चिमी उत्तरप्रदेशचे कॉंग्रेस महासचिव ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष केशवचंद्र यादव यांच्यासह अनेकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. याआधीही कॉंग्रेसच्या जवळपास 120 नेत्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, त्यात दखलपात्र असे कोणतेच नेते नव्हते. पदावर असल्यामुळे पक्षाचा फायदा नाही आणि पक्षात नसले तरी पक्षाचे ..

काय म्हणता देवा पीक-पाणी?

 काय म्हणते पीकपाणी अन् पाऊसही? आता या दिवसांत आणखी कुठली विचारपूस करणार? एकतर मुलांची अ‍ॅडमिशन कुठे नि कशी झाली अन् दुसरा सवाल हाच की पीकपाणी कसं आहे? दोन्ही ठिकाणी पेरणीच होत असते. दहावी- बारावीचे निकाल लागल्यावर मुलांचे प्रवेश होत असतात. त्यासाठी पालक बिचारे त्यांच्या खिशात, बँकेत अन् घरात असलेलं किडूकमिडूक विकून मुलांच्या भविष्याची तजवीज करत असतात. शेतकरीही नेमके तेच करतात. घरात असेल नसेल ते विकून बी-बियाणं, खते विकत घेतात अन् पेरण्या आटोपतात. त्यानंतर सगळेच कसे पावसावर अवलंबून असते. ..

सरकारच्या प्रामाणिक भूमिकेवर शिक्कामोर्तब!

मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरविल्यानं, या समाजातील आर्थिक आणि समाजिकदृष्ट्या मागास घटकांना निश्चितपणे न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत आणि मराठा समाजाची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार नाहीत, अशी शंका काही नतद्रष्टांनी घेतली होती. पण, आपण मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत, याबाबत ..

मोदींचा घणाघात!

2019 च्या नव्याने गठित लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अशी काही खरडपट्टी काढली की, सर्वांचीच बोलती बंद झाली! कॉंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी काही मुद्दे मांडले. आम्ही गेल्या 60 वर्षांत काय काय केले याची जंत्री वाचली. मोदी म्हणाले, आज 25 जून आहे. 25 जूनची ती रात्र, ज्या वेळी देशाचा आत्मा तुडवून टाकण्यात आला होता. लोकशाहीचा गळा आवळला गेला. मीडियावर निर्बंध लावण्यात आले. न्यायपालिकेचा अपमान कसा केला जातो, त्याचे ..

... म्हणून आणिबाणीचे स्मरण!

 आजपासून 44 वर्षांपूर्वी, 25 जून 1975 च्या मध्यरात्री भारताच्या लोकशाहीवर स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घाला घालण्यात आला होता. ज्या इंदिरा गांधींना कॉंग्रेसी लोक डोक्यावर घेत असतात, त्याच इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागू करून, जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. विरोधकांना तुरुंगात डांबून त्यांचा अनन्वित छळ केला होता. न्यायपालिका तर त्यांनी स्वत:च्या पदरालाच बांधली होती. ज्या कॉंग्रेस पक्षाने देशावर आणिबाणी लादली, त्याच पक्षाचे नेते आज बेशरमासारखे तोंड वर करून स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या ..

बरे झाले, अमेरिकेला जागा दाखवली!

   अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने, भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत दिलेल्या प्रतिकूल अहवालाला जशास तसे उत्तर देत भारताने अमेरिकेला तिची जागा दाखवून दिली आहे. मुळात अमेरिकेची ही कृती अव्यापरेषू व्यापार, या प्रकारातील होती. धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतात काय सुरू आहे, याबाबत बोलण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही. भारतात 2018 मध्ये हिंदू कट्टरपंथीयांनी अल्पसंख्यकांवर हल्ले चढवले होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अहवालात ..

स्विस बँक व भारताचा संयुक्त फास!

  स्विस बँकेने गेल्या काही महिन्यांत, ज्या भारतीयांनी बँकेत अवैध मार्गाने पैसा जमा केला असेल, त्यांची संपूर्ण माहिती भारतीय तपास संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्विस बँक व भारताने अशा करबुडव्या भारतीयांविरुद्ध फास अधिकच आवळला आहे. एवढेच नव्हे, तर काही संशयित भारतीयांची नावेही स्विस बँकेने उघड केली आहेत. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी, स्विस बँकेत दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यास प्राधान्य दिले होते. देशातून भ्रष्टाचाराला खणून काढण्यासाठी त्यांचा निर्धार ..

पेरते व्हा... अर्थात पाऊस आला तर!

आता मान्सून सगळीकडे लवकरच दाखल होणार आहे, अशा बातम्या येतात नि थोडी चीडचीड कमी होते. सकाळी ढगाळ वातावरण असते नि मग आज नक्कीच येणार पाऊस, असे आपण सांगतो ठामपणे, कारण आपल्या घरी येणार्या वर्तमानपत्रांत तशी बातमी आलेली असते. मात्र थोड्याच वेळात ऊन्हं दाखल होतात अन् मग घरी आलेले वर्तमानपत्र ‘रद्दीङ्क झालेले असते. वाईट निकाल लागल्यावर गावभर उनाडत राहणारा पोरगा बाप आता घरी नक्कीच नसेल म्हणून भुकेच्या वेळी घरी येतोच. तसा आता हा पाऊसही कधीतरी पडणारच. किमान रजिस्टरवर हजेरीची सही मारायला सरकारी कर्मचारी ..

एकत्रित निवडणुका देशहितार्थच!

आपल्या देशातच नव्हे, तर यत्र, तत्र, सर्वत्र बदलांना विरोध करण्याची परंपरा आढळते. कुठलीही व्यवस्था स्थायी राहू शकत नाही, हे माहीत असूनही अगदी मोठ्या हुद्यावर असलेल्या व्यक्ती, राजकारणी, अर्थतज्ज्ञ म्हणा, की विरोधी पक्ष म्हणा बदलांना विरोध करतात. ही जणू परिपाठीच झाली आहे. ‘एक देश एक निवडणुकी’च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाला विरोध करणार्यांची भविष्यात अशीच परिस्थिती होणार आहे. एक देश एक निवडणूक ही काही आजचीच मागणी नाही. फक्त तेव्हा या मागणीचा आवाज क्षीण होता इतकेच. किंवा आजवरच्या ..

व्यवस्थेचा मेंदूज्वर...

मरण अटळच असतं, कुठल्याही जिवाच्या जन्मासोबतच त्याच्या मरणाचाही जन्म झालेला असतो... असा एका गरुडपुराणातील संस्कृत सुभाषिताचा अर्थ आहे. त्यामुळे जिवांचे पार्थिव सोडणे अटळच आहे. मात्र त्याचे कारण काय, त्याचाच तपास काढायचा असतो. किंवा मग मृत्यूच्या कारणातच लोकांना रस असतो. कुणी गेल्याची वार्ता ऐकविली, तर पहिला उद्गार आश्चर्याचा असतो, ‘‘अरे! आत्ता तर होते...’’ किंवा मग ‘‘काय झाले होते?’’ असे विचारले जाते. दोन्हीचा अर्थ एकच की, मरणाचे कारण काय? त्यावरून हळहळ ..

पंतप्रधानांची अनाठायी अपेक्षा!

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार दुसर्यांदा सत्तासीन झाले आणि या सरकारचे पहिले अधिवेशन 17 जूनपासून सुरू झाले आहे. साहजिकच सत्तेच्या दुसर्या पर्वात नरेंद्र मोदी आपल्या राजकारणाची आणि समाजकारणाची कुठली दिशा दर्शवितात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. विरोधी पक्ष तर अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यात ही उत्सुकता असेल असे वाटत नाही. 2014 साली बहुमताने निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान मानायला विरोधी पक्षांचे मन धजलेच नाही. पाच वर्षे ..

सक्तीचा राजकारणसंन्यास!

   जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सक्तीचा राजकारणसंन्यास घ्यावा लागणे, हे त्यांचे नाही तर देशवासीयांचे दुर्दैव आहे. डॉक्टरांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली आहे. ही मुदत संपायच्या आत त्यांना पुन्हा राज्यसभेत आणणे कॉंग्रेस पक्षाला शक्य झाले नाही. आणखी काही काळतरी ते शक्यही दिसत नाही. डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत नसणे, हा ज्या उद्देशाने राज्यसभेची स्थापना करण्यात आली, त्या उद्देशाचाच पराभव आहे. राज्यसभा हे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. कला, ..

बिश्केक जाहीरनामा...

दहशतवाद हा आता काही देशांपुरता मर्यादित नसून, त्याची पाळेमुळे अधिक विस्तीर्ण आणि खोलवर रुजण्याची चिन्हे पाहता, आता जगभरातच त्याबाबत चिंता उत्पन्न होत आहे. चांगला व वाईट दहशतवाद असा भेद करून, ज्यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते, त्यांनाच दहशतवादाचे चटके बसू लागल्यानंतर त्यांनाही आता या प्रश्नाची दाहकता कळून आली, हे एक शुभचिन्ह मानावे लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाने याची दखल आधीच घेतली आहे. अमेरिकेवर 9/11 चा हल्ला झाल्यानंतरच हा देश झोपेतून खाडकन जागा झाला आणि त्यालाही दहशतवाद काय चीज असते, हे कळून आले. ..

कर्ज- एक परतफेड...

   माणसं बेटी भलतीच काहीच्या काही वागतात. खरेतर कर्ज, पुस्तके, सीडीज् कुणाकडून घेतले की ते परत करण्याची पद्धत नाही. परंपरा नाही. आपण आपल्या देशातील परंपरांचे पाईक आहोत, त्यामुळे उधारी, कर्ज परत करायचे नसते. मात्र, काही लोक वेडे असतात. आता बघा ना, राजस्थानातील हनुमानगढ़ जिल्ह्यातील रावतसर या छोट्याशा गावातल्या एका युवकाने, त्याच्या वडिलांचे 18 वर्षे जुने कर्ज तेही तब्बल 55 लाख रुपये फेडले. त्याचे वडील, तो लहान असताना बुचूबुचू कर्ज झाल्यामुळे नेपाळला पळून गेले होते. कर्ज काढून विदेशात ..

कॉंग्रेसपुढील दोन आव्हाने

2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा अपमानास्पद पराभव झाला. मग नेहमीप्रमाणे समिती बनली. पराभवाची कारणे शोधण्यासाठी. ए. के. अॅन्थोनी यांना समितीप्रमुख नेमले. त्यांनी अहवाल दिला. कॉंग्रेस पक्ष मुस्लिमधार्जिणा आहे, असा समज लोकांत पसरल्याने हिंदू पक्षापासून दूर गेला आहे. हिंदूना चुचकारले पाहिजे... राहुल गांधी यांना वाटले, आपल्या हाती अलादीनचा चिरागच लागला. पण, चुचकारण्याच्या नादात राहुल गांधी यांचे हिंदूत्वप्रेम हे बेगडी आहे, हे समजण्यास मतदारांना वेळ लागला नाही. 2019 चे निकाल समोर आहेत. बय बी गेली अन् बयची ..

जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर बँकेचे अनर्थकारण!

  भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची जननी म्हणून सर्वत्र बोलबाला झालेल्या जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर बँकेचे सर्वेसर्वा, अध्यक्ष परवेझ अहमद यांच्यावर कारवाई करून केंद्र सरकारने वित्तीय क्षेत्रातील घोटाळे मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील समस्या चिघळवण्यासाठी जबाबदार असलेल्या या बँकेवर खरेतर यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते. या बँकेवरही कारवाई व्हावी, असा आवाज उठत होता. आता, केंद्राने योग्य वेळ साधली आणि अमित शाह यांनी देशाचे गृहमंत्रिपद स्वीकारताच या बँकेच्या ..

मुजोर कार्यपालिकेला दणका!

एकीकडे दिल्लीतील 12 उच्चपदस्थ आयकर अधिकार्यांवरील सक्तीच्या निवृत्तीची कारवाई अन् दुसरीकडे सचिवस्तरावरील अधिकार्यांशी थेट पंतप्रधानांनी साधलेला संवाद, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या 123 अधिकार्यांवरील खटल्यांचे सरकारच्या मंजुरीसाठी दाखल झालेले प्रस्ताव... लोकशाही व्यवस्थेचा कणा समजल्या जाणार्या प्रशासकीय यंत्रणेची जनमानसातील प्रतिमा विश्वासार्ह ठरून ती यंत्रणा लोकोपयोगी व्हावी, तिच्या कृतीतून जनहिताचे अपेक्षित कार्य साकारावे, अपेक्षित ईप्सित साध्य व्हावे, एवढीच सरकार आणि सर्वसामान्य जनतेची अप..

काकांपेक्षा पुतण्याच निघाला समजदार!

 म्हातार्या लोकांनी राजकारणातून निवृत्त व्हावे असे जे म्हटले जाते, ते राजकीय पक्षांच्या हिताचेच असते, याची दिवसेंदिवस खात्री पटू लागली आहे. कारण, वृद्ध झालेल्या नेतृत्वात, पराभवानंतर पुन्हा उभे होण्याची उभारी नसते. तो नेता थकलेला असतो. म्हणून त्याला वाटते आपले कार्यकर्तेही थकलेले आहेत. आणि मग, पराभवाची मीमांसा करताना, सर्वप्रथम पराभव मान्य करावा लागतो हे विसरून, ही वृद्ध नेतेमंडळी याला-त्याला दोष देत पराभवापासून काही धडा शिकण्यास नकार देत बसतात. हे सर्व सांगायचे कारण की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ..

आणखी किती हत्या होऊ देणार?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांचे मानसिक संतुलत बिघडले आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करून मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करवून घेणे गरजेचे आहे. ‘जय श्रीराम’चे नारे लावल्याने सामान्य हिंदूंवर भडकणार्या ममता बॅनर्जी हिंदू आहेत की नाही, अशी शंका यावी, इतपत त्यांची आक्रमकता ‘जय श्रीराम’विरुद्ध दिसत आहे. आपण एका राज्याच्या मुख्यमंत्री आहोत, कायदा-सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे, याचेही भान त्या ..

मोदी यांचा मालदीव आणि श्रीलंका दौरा...

   पंतप्रधानपदाची शपथ घेऊन दहा दिवसही होत नाही, तोच नरेंद्र मोदी कामाला लागले आहेत. ते मालदीव आणि श्रीलंकेच्या दौर्यावर गेले. मालदीव हा भारताच्या तुलनेत अतिशय चिमुकला देश, भारतातील अनेक शहरांपेक्षाही पर्यटनासाठी ओळखला जाणारा हा देश लहान आहे. त्यामुळे मोदी, मालदीव आणि श्रीलंकेच्या दौर्यावर का गेले, असा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर मोदी यांनी मालदीवच्या संसदेत केलेल्या भाषणातून मिळाले आहे. आपल्या या दौर्यातून मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला झटका दिला आहे. मोदी यांच्याबद्दल ..

नेमेची येतात त्याच त्या गोष्टी...

 आता काही गोष्टी फिरूनफारून येतातच. तुम्ही नाही म्हटले तरीही येतात आणि नाही म्हटले तरीही येतातच आणि त्यावेळी आपण जसे वागायचे तसेच वागतो. म्हणजे बायकोचा (प्रत्येकाच्या) वाढदिवस दर वर्षीच येतो आणि नवरे तो दरवर्षीच विसरतात... तर आता दहावीचा निकाल लागला. मागच्या आठवड्यात बारावीचा लागला. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस वेळेवर येणार नाही; पण शाळा वेळेवरच सुरू होतात. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही नको असल्या तरीही शाळा नेमेची सुरू होतातच. आता शाळा अद्याप सुरू व्हायच्या आहेत; पण प्रवेशाची लगबग ..

चिकाटी म्हणजे काय हो?

महाराष्ट्राचे जाणते नेते म्हणवून घेणारे, केवळ राज्याचेच नाही तर, देशाचेही राजकारण कावेबाजपणाने आपल्या भोवती फिरवत ठेवण्याची धडपड करणारे वयोवृद्ध नेते शरद पवार यांना, लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाचा सपाटून पराभव झाल्यानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आठवण झाली आहे. कार्यकर्त्यांनी चिकाटी कशी ठेवावी, यासाठी त्यांनी संघ स्वयंसेवकांचा दृष्टांत दिला आहे. जनसंपर्क करताना स्वयंसेवक जसे सातत्य ठेवतात, जशी चिकाटी ठेवतात, तशी आपण ठेवली तर निवडणुकीत अपयश येणारच नाही, असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ..

शुभसंकेती विजयारंभ!

‘वेल बिगिन इज हाफ डन’ अशी इंग्रजीत म्हण आहे. त्या अर्थाने, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील विजयारंभ भारतासाठी शुभसंकेत देणारा ठरावा. इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान मोडून काढले. उपकर्णधार रोहित शर्मा याची शतकी खेळी आणि यजुवेंद्र चहल याने टिपलेल्या चार बळींच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा गडी आणि 15 चेंडू राखून नमविले. आफ्रिकेचा वर्ल्डकप स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला.    क्रिकेटच्या सर्वात मोठ्या ..

श्रीलंकन मुस्लिम मंत्र्यांच्या गच्छंतीचा अन्वयार्थ...

श्रीलंकेत घडवल्या गेलेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत सुमारे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला. सारा देश हादरला. स्फोट मुस्लिम दहशतवाद्यांनी घडविल्याची बाब नुसती स्पष्टच झाली, तर त्या देशाचे प्रशासन दोषींचा बीमोड करण्याच्या इराद्याने अक्षरश: पेटून उठले. मशिदीवरचे भोंगे हटविण्यापासून तर मुस्लिमांना अनेकानेक ठिकाणी मज्जाव करण्यापर्यंतची कारवाई त्वरेने करण्यात आली. केवळ सरकारच नव्हे, तर त्या देशातले नागरिकही या लढाईत सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यासाठी सरकारला कुणीही मुस्लिमविरोधी ठरवले नाही. जातीयवादाचा ..

महागात पडला नकारात्मक प्रचार!

  केंद्रात भारतीय जनता पार्टीप्रणीत रालोआचे सरकार येऊन सहा दिवस झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारून कामांचा धडाकाही सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील 10 अतिरेक्यांची यादी तयार केली आहे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचिनला भेट देऊन आले आहेत, तर भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासाला गती देत, पर्यावरणसंरक्षणाच्या दृष्टीने महामार्गांच्या बाजूला सव्वाशे कोटी झाडे लावण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली ..

ममता बॅनर्जींचे डोके तर फिरले नाही?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झाले तरी काय, असा प्रश्न संपूर्ण देशातील जनतेला पडला आहे. लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. 2014 मध्ये राज्यातील 42 पैकी 34 जागा जिंकणार्या ममता बॅनर्जी यांना यावेळी फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले. 2014 मध्ये राज्यात दोन जागा जिंकणार्या भाजपाने यंदा 18 जागा जिंकत इतिहास घडवला आहे. भाजपाने राज्यात मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे ममता बॅनर्जी यांचे डोके तर फिरले नाही, अशी शंका त्यांच्या वागणुकीतून येऊ लागली ..

नव्या गृहमंत्र्यांपुढील मोठी आव्हाने...

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार दुसर्‍यांदा निवडून आले आणि 2014 पेक्षा अधिक जागा घेऊन निवडून आले. नुकताच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आणि त्यात पूर्वीचे मंत्री आणि काही खात्यात बदल करण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात अमित शाह यांन..

अग अग म्हशी...

  ऐन बहरातला सचिन मैदानात उतरल्यावर शोएब अख्तरसारख्या तीव्र गती आणि मंदत मती गोलंदाजाचे जे काय होत होते ते सध्या सर्वच विरोधी पक्षांचे झाले आहे. म्हणजे आता विरोधी पक्षच राहिलेला नाही. कारण त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळावे इतकेही उमेदवार निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसचे हे कलेवर संसदेत येती पाच वर्षे वाहून नेण्यासाठी राष्ट्रवादीचे चार खांदेकरी लागणार आहेत. त्यासाठी मग राहुलबाबा (आता हे कोण, असे विचारू नका.) शरद पवारांना भेटले. राष्ट्रवादीचे विलिनीकरण कॉंग्रेसमध्ये करावे, असा ..

सक्षम मंत्री, संतुलित खाती...

सार्या जगाचे लक्ष लागलेला नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा दुसर्यांदा शपथविधी झाला आणि त्यापाठोपाठ त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या 57 मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर झाले. मंत्र्यांची निवड आणि खातेवाटप करताना मोदींनी देशभरातील जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतििंबब त्यात उमटेल, याची पूर्ण खबरदारी घेतलेली दिसत आहे. केवळ व्यक्तीची ज्येष्ठता, वारंवार निवडून येण्याचे कसब, पूर्वानुभव असे निकष न ठेवता मंत्र्यांची निवडक्षमता, कौशल्य, कार्यतत्परता, जनसंपर्क, विषयाची जाण आणि न्याय देण्याची सक्षमता, हे निकष बघून मत्रिमंडळ संतुलित ..