राष्ट्रीय

आंध्रप्रदेशात बोट उलटून ११ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत रविवारी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीतून ६१ लोक प्रवास करत होते. त्यापैकी १२ जणांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे...

हिंदी अशी भाषा जी भारताला एकजूट ठेवू शकते : गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी हिंदी भाषेत देशात ऐक्य निर्माण करण्याची क्षमता असण्यावर भर दिला. ..

दिल्ली विद्यापीठात 'अभाविप'चा झेंडा !

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांमध्ये तीन जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली आहे. ..

आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भारतीय सांस्कृतिक संबंध (आयसीसीआर) आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ..

प्लास्टीक बंद ! ४०० रेल्वे स्थानकात मिळणार कुल्लड चहा

लवकरच देशभरातील एकूण चारशे रेल्वेस्थानकांवर मातीच्या भांड्यांमध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी दररोज दोन कोटींहून जास्त मातीची भांडी तयार केली जाणार आहेत. रेल्वेमंत्रालयाने हे निर्देश जारी करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून पाचशे रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करावी, अशी विनंती केली होती...

पी.के.मिश्रा यांची पंतप्रधानांच्या प्रमुख सचिवपदी नियुक्ती

पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून माजी कॅबिनेट सचिव पी के मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने आज पदभार स्वीकारला आहे...

मोदी, 'ॐ', आणि गाय हे शब्द ऐकताच काहींच्या अंगावर काटा येतो

मथुरेत भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मोदी, गाय आणि 'ॐ' हे शब्द ऐकताच काही लोकांच्या अंगावर काटा येतो. 'ॐ' शब्द ऐकताच त्यांचे कान टवकारले जातात. अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर घणाघात केला. ..

आंध्रात राजकीय वादळ , चंद्राबाबू नायडू नजरकैदेत

सरकारविरोधी 'चलो आत्माकुरू' रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसमचे पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांना त्यांचा मुलगा लोकेश याच्यासह नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी नायडू यांच्या राहत्या घरीच त्यांना नजरकैदेत ठेवले आहे...

काश्मीर प्रश्नावर यूएनएचआर परिषदेत भारत आज पाकिस्तानला घेरणार

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे. यावेळी काश्मीरच्या मुद्दय़ावर पाकिस्तानने येथे कोणतीही युक्ती करू नये हे नवी दिल्लीसाठी सर्वात महत्वाचे आव्हान ठरेल. या परिषदेत भारताचे नेतृत्व सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह तसेच पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत होईल...

पहिल्या दक्षिण आशियायी सीमापार तेल पाईपलाईनचे उदघाटन

पहिली दक्षिण आशियायी सीमापार तेल पाईपलाईन भारत-नेपाळ दरम्यान सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाईपलाईनचे संयुक्तपणे उदघाटन केले...

पाकिस्तानात हिंदू आणि शीख सुरक्षित नाहीत : बलदेव कुमार

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर वारंवार अत्याचार होत असून त्यांची परिस्थिती बिघडत चालल्याचे पुरावे वारंवार समोर येत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे माजी आमदार बलदेव कुमार यांना आपल्या कुटुंबासमवेत प्राण वाचवून भारतात यावे लागले. ..

काँग्रेस नेत्यांचे विद्यार्थ्यांना गुंडागर्दीचे धडे

नेता होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची कॉलर धरा असे वक्तव्य छत्तीसगढचे उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे नेते कवासी लखमा यांनी केले. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी एका शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी असे वादग्रस्त विधान केले...

आसाम नाहीतर देशभरातील घुसखोरांना बाहेर काढणार : अमित शाह

आसाममधील एनआरसी यादी नुकतीच सरकारने जाहीर केली. त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले. "केंद्र सरकार आसाममधीलच नाही तर संपूर्ण देशभरातील घुसखोरांना बाहेर काढणार आहे. संपूर्ण देशाला आम्हाला घुसखोर मुक्त करायचे आहे, असे अमित शाह यांनी सांगितले...

मोदी २.० सरकारचे १०० दिवस पूर्ण

लोकसभा निवडणुकीच्या निकालात इतिहास घडवणार्‍या केंद्रातील भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास रविवारी १०० दिवस पूर्ण झाले. ..

विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश

चांद्रयान २ मोहिमेदरम्यान संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश आले आहे...

पाकिस्तानचा पुन्हा एकदा उद्दामपणा!

जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तानचा उद्दामपणा महिन्याभरानंतरही कायम असल्याचे चित्र आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपल्या हवाई हद्दीतून प्रवेश नाकारण्याचे दुस्साहस शनिवारी पाकिस्तानने केले...

आता सीमावर्ती भागातही वाढणार संघशक्ती : अरुण कुमार

पुष्करमध्ये संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक शनिवारपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख अरुण कुमार यांनी शुक्रवारी पुष्कर येथील महेश्वरी सेवा सदन येथे पत्रकार परिषद घेतली...

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये विकासकामांना जोर

१ महिन्यांतच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी अनेक नवीन प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिले आहेत. त्याचबरोबर जवळपास सर्व मंत्रालये जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी सातत्याने योजना आखत आहेत...

पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेने रचला इतिहास

प्रिया कोहली ही प्रिव्हिन्शनल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास झाली आहे. ही परीक्षा पास होत ती पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा पहिली हिंदू सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. २९ वर्षीय पुष्पा ही अल्पसंख्यांक कोहली समाजात मोडते...

झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात द्या : पंतप्रधान मोदी

केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर निर्णयावर चर्चा करत वादग्रस्त भारतीय इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली...

प्रतीक्षा केवळ ४ दिवसांची, विक्रम लँडरचा चांद्रयान २ ला निरोप

विक्रम लँडर आणि प्रयाग रोव्हर मुख्य चांद्रयानापासून वेगळं करण्यात इस्रोला यश आले आहे. विक्रम लँडर आणि प्रयाग रोव्हरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला असून चार दिवसांनी म्हणजे ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले जाईल...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा कॉंग्रेसवर हल्ला बोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी एका भाषणात सिलवासा येथे कॉंग्रेसवर चांगलाच शाब्दिक हल्ला चढविला. अमित शहा म्हणाले की, कॉंग्रेसला 'लाज वाटली पाहिजे' की पाकिस्तानने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा संयुक्त राष्ट्रातील काश्मीरसाठी केलेल्या याचिकेत उपयोग केला...

पाकिस्तानी ध्वज फडकविणे एमएसएफला महागात, ३० जणांवर गुन्हे दाखल

मुस्लिम विद्यार्थी आघाडीच्या तरुणांनी विद्यार्थी संघटनेच्या प्रचारवेळी पाकिस्तानी झेंडा फडकविला...

फुटीरतावाद्यांच्या नाकावर टिच्चून काश्मिरी तरुणांचा भारतीय सैन्याकडे ओढा

जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागातून ५७५ तरुण भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. शनिवारी श्रीनगरमधील पासिंग आउट परेडमध्ये जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीसाठी नवीन भरती करण्यात आल्या...

मोदींचे नाव घेताच पाकिस्तानी मंत्र्याला बसला विजेचा धक्का

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी काल एका भाषणादरम्यान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली. आज भाषणादरम्यान शेख रशीद यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख करताच त्यांना माईकमधून करंट लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ..

भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआयची धडक कारवाई

सीबीआयने शुक्रवारी भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई केली. सीबीआयने अचानक देशभरातील दीडशे ठिकाणी छापे टाकले...

वृत्तपत्राच्या 'फेक न्यूज'चे पितळ उघड; 'त्या' बातमीबाबत न्यायालयाचा खुलासा

कलम ३७० च्या ऐतिहासिक निर्णयांनंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत होत आहे. सर्व परिस्थिती सामान्य झाली असली, तरीही माध्यमे सरकारच्या या निर्णयावर टीका करत खोट्या बातम्या पसरवीत असल्याचे काही दिवसांपासून उघड होत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या अशाच एका खोट्या बातमीचे श्रीनगर उच्च न्यायालयाने पितळ उघडे पाडले आहे...

ईडीची मिशन सफाई; आता काँग्रेसचे डी .के.शिवकुमार रडारवर

काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असणारे डी. के. शिवकुमार यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. शिवकुमार यांना शुक्रवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही ईडीने त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते...

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस 'सेवा सप्ताह' म्हणून होणार साजरा

पंतप्रधान मोदींचा जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केले आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा सप्ताह' म्हणून साजरा करणार आहे. सेवा सप्ताह अभियानांतर्गत देशभरात सेवा आणि स्वच्छतेचे कार्यक्रम आयोजित केले जातील. ..

काश्मीरवर तुमचा अधिकारच काय ? : राजनाथ सिंग

लडाखच्या लेह येथे आयोजित २६व्या 'किसान जवान विज्ञान मेळाव्याच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. लडाखच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंह यांनी लडाखला भेट दिली. 'पाकिस्तानच्या निर्माणाचा आम्ही आदर करतो. पण काश्मीर कधी तुमचा नव्हताच, असा इशारा राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिला. ..

गुजरातमध्ये हाय अलर्ट, सागरीमार्गे हल्ल्याची शक्यता

पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी गुजरातच्या कच्छमार्गे भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संघटनेच्या हाती लागली आहे. यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ..

'फिट इंडिया' अभियानाचे शानदार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त 'फिट इंडिया' अभियानाची शानदार सुरवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात आज देशात खेळ दिन साजरा केला जातो...

टिपू सुलतान एक्सप्रेसच्या नामांतराची मागणी

२०१५ मध्ये कर्नाटकात साजऱ्या होणाऱ्या टिपू सुलतान जयंतीवर सरकारने बंदी आणली. सरकारच्या मते, टिपू सुलतान हा एक अत्याचारी आणि हिंदूंचा विरोध करणारा राजा होता. त्यामुळे त्याच्या जयंतीचा उत्सव साजरा करणे चुकीचे आहे. आता पुन्हा एकदा सुलतान एक्सप्रेसच्या नामांतराची मागणी होत आहे. ही रेल्वे म्हैसूर- बंगळुरू दरम्यान धावते...

जय शाह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘द वायर’ला झापलं !

अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांनी दाखल केलेल्या मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका 'द वायर'ने सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली.न्यायालयाने सिब्बल यांची मागणी मान्य केली, परंतु वारंवार होत असलेल्या पीत पत्रकारितेवरून 'द वायर'ला न्यायालयाने चांगलेच फटकारले...

चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत वाढ

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक झालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आज दुपारी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय अटकेच्या विरोधात चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली . त्यांनतर दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ..

ही काय आंधळी आणि बहिरी झाली आहे काय ? : पत्रकार तारिक फतेह

कायमच वादाच्या भोवऱ्यात असणारी लेखिका अरुंधती रॉय हिने पुन्हा एकदा पाकिस्तानची बाजू घेणारे वक्तव्य केले आहे. ..

काश्मीरमधील सचिवालय इमारतीवर तिरंगा फडकला

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर रविवारी येथील सचिवालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकविण्यात आला. या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. श्रीनगर येथील सचिवालयावर जम्मू-काश्मीरच्या झेंड्यासह तिरंगा झेंडा फडकत होता...

अरुण जेटली अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली रविवारी अनंतात विलीन झाले. नवी दिल्ली येथील निगम बोध घाट स्मशानभूमीवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ..

जेटलींच्या मुलाची पंतप्रधान मोदींना विनंती

फ्रान्स दौऱ्यावर असल्याकारणाने पंतप्रधान मोदींनीही फोनवरून जेटलींच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. आपण खूप जवळचा मित्र गमावला असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांनी तुम्ही देशासाठी परदेशात गेले आहेत. त्यामुळे दौरा अर्धवट सोडून परत येऊ नये असे पंतप्रधान मोदींना सांगितले...

अरुण जेटलींना राष्ट्रपतींसह देशभरातून श्रद्धांजली

जेटलींसारखा ज्येष्ठ , अनुभवी आणि कायदेतज्ज्ञ नेता गमावल्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे...

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचे छापे

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. ..

'गर्वी गुजरात भवन' उद्दघाटनासाठी सज्ज

दिल्लीतील सर्वात चर्चिली जाणारी वस्तू म्हणजे महाराष्ट्र सदन. यानंतरच आता दिल्लीतील अकबर रोडवर गुजरात भवनची नवी आकर्षक वास्तू उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वस्तू अवघ्या २ वर्षात उभारण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उदघाटन करण्यात येणार आहे...

एअर इंडियाचे 'टेक ऑफ' अडचणीत

थकीत रक्कम ना चुकविल्याच्या कारणावरून एअर इंडियाच्या पुण्यासह सहा विमानतळावरील इंधनपुरवठा रोखण्यात आला आहे. इंडियन ऑइल या तेल कंपनीसह अन्य सर्वच तेल कंपन्यांनी हा पुरवठा बंद केल्याचे समजते...

भीम आर्मीचा 'रावण' अटकेत; १४ दिवसाची कोठडी

दिल्लीतील तुघलकाबाद मधील रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी भीम आर्मीच्या रावण उर्फ चंद्रशेखर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यांच्यासह अजून ९६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सर्वाना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे..

पाकिस्तानी-चिनी कारवायांना मिळणार चोख प्रत्युत्तर

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच राफेल विमान दाखल होणार आहेत. २० सप्टेंबर रोजी फ्रान्सकडून ३६ पैकी काही विमाने भारताच्या ताब्यात देणार येतील. केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ स्वत: फ्रान्सला जाणार आहेत. ..

एनडीटीव्ही माध्यमसमूहाच्या रॉय दाम्पत्याविरोधात आरोपपत्र दाखल

सीबीआयने एनडीटीव्ही माध्यमसमूहाचे संस्थापक प्रणव रॉय व त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांच्यावर थेट परकीय गुंतवणूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे,असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबरोबरच या माध्यमसमूहाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमादित्य चंद्र यांच्यावर ही गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

उत्तराखंडमध्ये दुहेरी संकट ; मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळले

उत्तराखंडमध्ये पुरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ..

कुष्ठरोग्यांबाबत भेदभाव करणारे १०८ कायदे बदलावेत -डॉ. हर्षवर्धन यांची मागणी

कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे १०८ कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांना पाठवले आहे. ..

संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत खासगी उद्योगांनी सहभाग वाढवावा : राजनाथ सिंह

संरक्षण क्षेत्रातल्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांबाबत परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहणं कमी करून देशी बनावटीच्या संरक्षण आयुधांचा वापर वाढवायला हवा, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्लीत आज भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरण आणि देशीकरणाच्या योजना या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ..

दोनशे खासदारांना सरकारी बंगले खाली करण्याचे मोदी सरकारचे आदेश

खासदारकी गेल्यानंतरही सध्या वात्सवास असलेल्या दोनशे माजी खासदारांना आपले सरकारी बंगले खाली करण्याचे आदेश मोदी सरकारने दिले आहेत. बंगले खाली करण्यास येत्या सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे...

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते...

पाकिस्तानचे नापाक कृत्य, सीमावर्ती भागांत गोळीबार : जवानांनी दिले चोख प्रत्युत्तर

भारतात स्वातंत्र्यदिनाचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच पाकिस्तानच्या लष्कराने गुरुवारी पुन्हा एकदा नापाक कृत्य केले. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी पूँछमधील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले...

आता झोमॅटोचे कर्मचारीच कंपनीच्या विरोधात

सोशल मीडियावर नेहमीच वादाचा विषय ठरणारी ऑनलाईन खाद्य पदार्थ पोहोचवणारी 'झॉमेटो' कंपनी पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनली आहे...

कलम '३५ ए' वरून वातावरण तापलं : काश्मिरमध्ये २८ हजार जवान तैनात

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३५ ए आणि कलम ३७० या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापत असताना काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणेच्या २८० अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात एकूण २८ हजार सीआरपीएफचे जवान तैनात केले आहेत. यात सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे...

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर...!

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ९९ विरुद्ध ८४ मतांनी हे बिल मंजूर करण्यात आले. राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) अद्याप बहुमत नसल्याने यापूर्वीही या विधेयकाला विरोध झाला होता...

कर्नाटकमध्ये टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचा निर्णय

कर्नाटकमध्ये नवनिर्वाचित भाजप सरकारतर्फे टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे कन्नड सांस्कृतिक विभागाला या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. २०१५ मध्ये सिद्धारामय्या सरकारने भाजपच्या विरोधानंतरही टीपू सुलतान जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला होता...

पाकिस्तानात फाळणीनंतर पहिल्यांदाच उघडले या मंदिराचे दरवाजे

पाकिस्तानातील सियालकोट भागांत तब्बल एक हजार वर्ष जूने असलेले मंदिर फाळणीनंतर पहिल्यांदाच पूजेसाठी खुले करण्यात आले आहे. ..

कार नदीजवळ थांबवून सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता : आत्महत्या केल्याचा संशय

कर्नाटक पोलीसांकडून शोधमोहिम सुरू ..

सुदर्शन पटनाईक पीपल्स चॉईस पुरस्काराने सन्मानित

सुदर्शन पटनाईक हा भारतातील एक प्रसिद्ध सॅण्ड आर्टिस्ट असून अमेरिकेतील पीपल्स चॉईस पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. ही भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. ..

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये परदेशी मालमत्ता सापडली

प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी २३ जुलै रोजी दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात १३ ठिकाणी छापे घातले. या पैकी काही ठिकाणांमध्ये राजकीय वर्तृळात संपर्क असलेल्या प्रभावी व्यक्तींची अघोषित संपत्ती आढळली. ..

बेअर ग्रिल्स VS नरेंद्र मोदी

'ड़िस्कवरी' वाहिनीवरील प्रसिद्ध 'मॅन वर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकणार. ..

कर्नाटकात भाजपच; विश्वासदर्शक ठराव जिंकला !

कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदान घेत विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. ..

कर्नाटक : १४ बंडखोर आमदार अपात्र

कर्नाटकात भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष के. रमेशकुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले ..

‘महानायक सावरकर’ : लोकमान्य सेवा संघातर्फे लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला

१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार असून ‘महानायक सावरकर’ या विषयावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे अभ्यासक, लेखक अक्षय जोग हे आपले विचार मांडणार आहेत. ..

जगातील 'सर्वोत्तम' अपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात

भारताने बोईंक कंपनीकडे चार वर्षांपूर्वी २२ अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी नोंदणी केली होती..

खुशखबर : आता इलेक्ट्रिक वाहने स्वस्त

इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर..

माफी मागा अन्यथा कारवाई; लोकसभा अध्यक्षांनी खडसावले

लोकसभेच्या पीठासीन अध्यक्ष रमादेवी यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याबद्दल गेले २ दिवस लोकसभेत गदारोळ सुरु आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आझम खान यांच्या वर्तनाची गंभीर दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच मंत्र्यांची बैठक बोलावून चर्चा केली...

ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारचे प्रयत्न

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत दिली. ..

कारगिल विजय दिन देशभर अभिमानाने साजरा झाला

कारगिल विजय दिवसाचा विसावा वर्धापन दिन काल देशभर अभिमानाने साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातल्या शहीदांना पुष्पाजंली वाहिली. ..

भारतीय सुरक्षादलाकडून २ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू आणि काश्मीर मधील शोपीयाना याठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांपैकी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षदलाला यश याले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. अजूनही काही दहशतवादी याठिकाणी लपले असून चकमक सुरूच आहे...