संस्कृती

संपूर्ण गीता कंठस्थ असणाऱ्या आभा घाटगे हिचा 'गीताव्रती' पदवीने सन्मान

गीता जयंतीनिमित्त संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या गीतापठण स्पर्धेत आभा सुहास घाटगे हीने प्रथम क्रमांक पटकवत 'गीताव्रती' ही पदवी मिळवली. शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी गीता जयंती तसेच प.पू. गोविंददेव गिरी स्वामी अध्यक्ष गीता परिवार यांच्या ७१व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गीता परिवार संगमनेर तर्फे संगमनेर येथे संपूर्ण गीता कंठस्थ असलेल्या मूला मुलींची स्पर्धा घेण्यात आली होती. Abha Ghatge, honored with the title Gitaavrati..

जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार होणार

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी पोलीसांना जम्मू काश्मीरच्या सर्व धार्मिक सुरक्षा स्थळांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत...

आपली संस्कृती संपूर्ण जगाला विविधतेतून एकतेचा संदेश देते : पंतप्रधान मोदी

"आपली संस्कृती, भाषा या संपूर्ण जगाला विविधतेतून एकतेचा संदेश देतात," असे प्रतिपादन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून केले. आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या या कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "आपल्या देशात शतकांपासून शेकडो भाषा बहरल्या. संयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्ष' म्हणून जाहीर केले. लुप्त होण्याच्या मार्गावर असणार्‍या भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत," असे त्यांनी यावेळी सांगित..

डॉ. फिरोझ खान यांच्या नियुक्तीला विरोध चुकीचा : संघाचे मत

बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विद्या आणि धर्म विज्ञान संस्थेच्या साहित्य विभागात डॉ. फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीला अनेकांकडून विरोध करण्यात आला. डॉ. फिरोज खान यांच्या नियुक्तीला विरोध करणे चुकीचे असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समाज एकच : भैय्याजी जोशी

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समाज एकच आहेत. त्यामुळे हिंदूचे प्रश्न आणि संघाचे प्रश्न वेगवेगळे असू शकत नाहीत. दोन्हींचा पायादेखील एकसमान आहे. त्यामुळे यात जर काही दोष असतील, तर ते दूर केले जातील," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले. ..

वनवासींच्या तारपा वाद्याचे सूर हरवले..

काळाच्या ओघात अनेक वाद्ये, किंवा संगीत कमीकमी होऊ लागली आहे. वनवासींच्या प्रसिद्ध 'तारपा' या वाद्याबाबत होताना दिसत आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकार कमी होऊ लागल्याने येणार्‍या काळात या वाद्याचे सूर हरपतात कि काय असे वाटू लागले आहे. आता 'तारपा' वादकांची संख्या घटू लागली असल्याने 'तारपा' वादकांची वानवा कमी भासू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात 'तारपा' नृत्याचे सूर हरवण्याची चिंता भासू लागली आहे. श्रमजीवी संघटना आता यासाठी पुढाकार घेणार आहे...

राजस्थानातील संस्कृत शाळेत ८० टक्के मुस्लीम विद्यार्थी

राजस्थानातील ठाकूर हरिसिंह शेखावत मंडावा प्रवेशिका संस्कृत विद्यालयात ८० टक्के मुले मुस्लीम असून, ते संस्कृत भाषेचा कसून अभ्यास करत आहेत. याशिवाय त्यांना तब्बल चार भाषा अवगत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संस्कृत विद्यालयात शिकणार्‍या एकूण २७७ विद्यार्थ्यांपैकी २२२ विद्यार्थी मुस्लीम आहेत...

अयोद्ध्या प्रकरणी पूर्नविचार याचिका दाखल होणार ?

अयोद्ध्या प्रकरणी रामलल्लाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर आता 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड'तर्फे रविवारी बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पूर्नविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मशिदीसाठी देण्यात इतर ठिकाणी येणारी जागा आम्हाला मान्य नाही, अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली. ..

राहुल देशमुख यांना 'केशवसृष्टी' पुरस्कार

Rahul Deshmukh receives Keshavsrishti award..

शत्रुत्वाची भावना संपवा... : नरेंद्र मोदी

दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाकण्याचे आवाहन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना केले...

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान काश्मीरात

देशभरात दिवाळीचा उत्साह असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही जवानांसह दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात बालाकोट येथे पोहोचले आहेत. हा क्षण जम्मू काश्मीरसह देशवासीयांसाठीही खास आकर्षण असणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी या भागात जाणार असल्याने साऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे...

दिवाळीच्या सुट्टीत नवीन गोष्टी शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासह या दरम्यान नवनवीन गोष्टी शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. ही सुट्टी छोटी असली तरी बहुतांशी विद्यार्थी पुढील अभ्यासाच्या तयारीसह नवीन भाषा, क्रीडा, संबंधित नवी कौशल्ये, आर्ट, क्राफ्ट कुकींगसह विविध नवनवीन गोष्टी शिक्षणासाठी आपल्या सुट्टीचा सदुपयोग करीत असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या पीअर टू पीअर कम्युनिटीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कोणत्या योजना असतात हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते...

हिंदू संस्कृतीमुळे भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी : सरसंघचालक मोहनजी भागवत

जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी आहेत. भारतातील हिंदू संस्कृतीमुळे केवळ मुस्लिमच नाही, तर इतर धर्मातील लोकांनाही भारतात आश्रय घ्यावासा वाटतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले...

समाजातील प्रत्येक घटकांना जोडणारी राष्ट्रभावना म्हणजेच हिंदुत्व : सरसंघचालक

राष्ट्रीय विविधतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे ! ..

डॉ. बाळ फोंडके यांचे ‘चांद्रयान’ मोहिमेवर व्याख्यान

लोकमान्य सेवा संघ, पार्ले या संस्थेच्या वतीने येत्या शनिवारी दि. २८ सप्टेंबर रोजी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे...

काश्मिरातील ५० हजार बंद मंदिरे केंद्र सरकार खुली करणार!

जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने येथील अनेक वर्षांपासून बंद असलेली हजारो मंदिरे खुली करण्याचे संकेत सोमवारी दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली हजारो मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने हिंदू समाजाला न्याय दिल्याची भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. ..

शरद पवार कान उघडून ऐका : शाह यांनी सुनावले खडेबोल

कलम ३७० रद्द झाल्याने देश खऱ्या अर्थाने अखंड : अमित शाह..

राम मंदिर बनणार का ? १८ ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणी

राम मंदिर बनणार का ? ..

'हिंदी राष्ट्रभाषा' उल्लेख दाक्षिणात्य राजकारण्यांच्या वर्मी

'हिंदी राष्ट्रभाषा' उल्लेख दाक्षिणात्य राजकारण्यांच्या वर्मी ..

भारताच्या मातीतला ‘रेनेसान्स’ संस्कृत भाषेतून शक्य : दिलीप करंबेळकर

“युरोपातील ‘रेनेसान्स’ हा ग्रीकमधील ज्ञानाच्या पुनर्जीविकरणातून झाला. तसा मूलभूत ‘रेनेसान्स’ भारताच्या मातीतून व्हायचा असेल तर संस्कृतज्ज्ञांनी आपल्यासमोरील आव्हानांना ओळखून त्यावर कार्यवाही करायला हवी,” असे प्रतिपादन राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केले. ..

आम्ही श्रीराम पुत्र कुशचे वंशज : भाजप खासदार दिया कुमारी यांचा दावा

श्रीराम पुत्र कुशचे आम्ही वंशज आहोत, असा दावा जयपुरातील राजघराण्याच्या सदस्य आणि भाजपाच्या खासदार दिया कुमारी यांनी रविवारी केला. रघुवंशातील कुणाचे अयोध्येत वास्तव्य आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे. ..

रवी मी...

मराठी संगीतसृष्टी आणि रंगभूमीला लाभलेलं एक रत्नं म्हणजे वसंत बाळकृष्ण देशपांडे. त्यांची आज जयंती. २ मे १९२० साली अकोल्यातील मूर्तिजापूर या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्याविषयी.....

महारांगोळीतून रेखाटली आपले सण आपली संस्कृती

राष्ट्रीय विकास मंडळ संचालित नववर्ष यात्रा स्वागत समितीच्या माध्यमातून येथील गोदाघाटावरील पाडवा पटांगण येथे महारांगोळी साकारण्यात आली. ‘आपले सण, आपली संस्कृती’ या विषयावर रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीच्या रेखाटनकामी सुमारे १० टन रंग व रांगोळी यांचा वापर करण्यात आला. ही महारांगोळी रेखाटण्याकरिता सुमारे ५०० महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. ..

वसईतील शिवालयात भाविकांची गर्दी

जय भोले बम बम भोलेच्या जयघोषात वसईत शिवालयात भक्तांची अलोट गर्दी जमली होती. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या. वसई तालुक्यात अनेक शिवमंदिरे असून यातील वसई पूर्व विभागात निसर्गरम्य डोंगर दऱ्यात असलेल्या प्रसिद्ध पुरातन मंदिरा पैकी तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी परंतु अरण्यात असलेले ईश्वरपुरी आत्मलीनगेश्वर मंदिर, अभ्यारण्यातच परंतु महामार्गाच्या बाजूस असणारे तुंगारेश्वर महादेव मंदिर, महामार्गावरील विरार फाटा येथील मल्लिनाथ मंदिर, खानिवडे येथील वृंदावन टेकडी महादेव ..

‘रामायण' प्रत्येक भारतीयाच्या 'डीएनए'मध्ये : चे. विद्यासागर राव

'रामायण' प्रत्येक भारतीयाच्या 'डीएनए'मध्ये आहे. रामायण हे भारतीय जीवनमूल्यांचे एक प्रतिक असून रामायण प्रेम, आदर, आज्ञाधारकता, सत्य आणि त्यागाची कथा आहे. असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करणारी महागाथा असलेल्या या महाकाव्यामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येईल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला...

महर्षी दयानंद सरस्वती यांचा वारसा पुढे नेण्याची गरज : राष्ट्रपती

देशाला विश्वगुरु बनण्यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शक तत्वांवर चालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

अतुल्य भारतच्या लोगोमध्ये ‘गांधींची भूमी’

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९ दरम्यान भारतासह संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार..

दूर व्हावं अवनक रूप...

माहात्म्य आणि कीर्ती लाभलेल्या सुखकर्ता आणि दु:खहर्ता गणपतीचा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्यांनी सुरू केला. सामाजिक एकोपा, सामंजस्य, सहवास निर्माण व्हावा, हा यामागील उद्देश होता. आजही याच उद्देशाने हा मंगलमय महोत्सव साजरा व्हायला हवा. त्याला मिळत असणारं अवनक रूप दूर होईल आणि एका चांगल्या स्वरूपात हा उत्सव पार पडेल, अशी आशा करू या.....

बदलत चाललेली नारळी पौर्णिमा...

नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाला नारळ अर्पण करूनच मग मासेमारीसाठी समुद्रात होड्या सोडल्या जातात...

उत्तराखंडमध्ये ११५ भाविक अडकले

त्तराखंडच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील खराब वातारणामुळे हे सर्व भाविक पर्वतीय भागामध्ये अडकून पडले असून भारत सरकार या सर्व भाविकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. ..

तिरुपती बालाजीचे मंदिर ६ दिवस राहणार बंद

तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर बारा वर्षांमध्ये एकदा महासंप्रोक्षण अनुष्ठान केले जाते...

भारत सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय पर्यटनाला चालना मिळणार

भारत सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयामुळे आता भारतीय पर्यटनाला चालना मिळणार आहे. विदेशी आणि भारतीय पर्यटकांना आता स्मारकांचे छायाचित्र काढता येणार आहे..

अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसला अपघात

उधमपूरजवळील बिरमा पुलाजवळ ही दुर्घटना घडली आहे. अमरनाथ भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसने अत्यंत वेगाने येत, याठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ..

अमरनाथ यात्रा : बालटालनंतर पहलगाम मार्गही बंद

सहा दिवसांमध्ये आज दुसऱ्यांदा पहलगाम येथील मार्ग भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे. ..

अमरनाथ यात्रेत दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

बालटालपासून अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे...

नेपाळमधील सर्व भारतीयांना सरकारकडून मदत : सुषमा स्वराज

भारतातून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी तब्बल १४०० हून भाविक यंदा तिबेटला गेले आहेत. या यात्रेवर जात असताना मुसळधार पावसामुळे हे सर्व भाविक सिमिकोट, हिल्सा आणि तिबेटच्या भागामध्ये अडकून पडले आहेत. ..

दमदार पावसामुळे अमरनाथ यात्रेत आज देखील व्यत्यय

काल रात्री पासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे नुकत्याच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये व्यत्यय आला आहे. अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगाम या मार्गांवर थांबवण्यात आली आहे. ..

'विरोधकांना देशापेक्षा कुटुंबाची अधिक चिंता' : पंतप्रधान मोदी

आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून आज देशातील विरोध देशातील एकता भंग करू पाहत आहे...

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेत खंड

आज पहाटेपासूनच अनंतनाग, बालटाल, कारगिल येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे...

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर राज्यात चित्रनगरी विकसित करणार - विनोद तावडे यांची घोषणा

चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर चित्रनगरी विकसित करण्यात येईल..

अमरनाथ यात्रेची धुरा 'एनएसजी' कमांडोंवर

गृह मंत्रालयाने याविषयी घोषणा करत एनएसजी कमांडोच्या दोन तुकड्या, २० ड्रोन आणि रडार यंत्रणा तैनात करणार आहे. तसेच सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांची संख्या देखील यात्रे दरम्यान वाढवण्यात आलेली आहे...

योग दिनाची 'ही' सुंदर कलाकृती पाहिलीत का ?

'योगा फॉर हार्मोनी अॅण्ड पीस' या संकल्पनेवर आधारित हि कलाकृती बनवण्यात आली असून यामधून जागतिक शांतता आणि एकात्मतेच संदेश देण्यात आला आहे..

रायगड होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ : जयकुमार रावल

भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यात सामंजस्य ठेवून रायगड किल्ल्याचा विकास करण्यात येईल..

पंतप्रधानांनी केले सावरकरांचे स्मरण

तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची एक आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली, सावरकरांच्या स्मरणार्थ अटलजी नेहमी म्हणत कि, 'सावरकर म्हणजे तेज,..

रमजाननिमित्त मुस्लीम रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे मंत्रालयाची भेट

रमजानमध्ये दिवसभर उपवास असलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांना रोजा सोडण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी म्हणून रेल्वे मंत्रालयाने सर्व मुस्लीम कर्मचाऱ्यांना दररोज वेळेअगोदरच सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ..

वैदिक मंत्रोच्चारासह कोविंद यांनी केली पुष्कर सरोवराची पूजा

कोविंद यांनी आज पुष्कर येथील पवित्र अशा पुष्कर सरोवराची सहकुटुंब विधिवत पूजा केली. वैदिक मंत्रोच्चारांसह आपल्या पत्नी आणि मुलीसह राष्ट्रपतींनी या सरोवराचे पूजन केले, तसेच येथील धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. ..

'मदर्स डे' च्या निमित्ताने सुदर्शन पटनाईक यांच्या पंतप्रधानांच्या आईंना शुभेच्छा

आज जागतिक माता दिन म्हणजेच 'मदर्स डे'. या निमित्ताने प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या अत्यंत सुंदर भावना दाखवणारी कलाकृती सुदर्शन पटनाईक यांनी साकारली आहे. ..

ताजमहाल प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला फटकारले

ताजमहाल प्रदूषण प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अर्थात ‘एएसआय’ फटकारले. ..

स्वतः मधील बुद्धाला ओळखा : पंतप्रधान मोदी

तथागत गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये समता, समरसता, समदृष्टी आणि संघभाव या आदर्शपना केली...

दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचे आज होणार वितरण

देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण ४४ मान्यवरांना आज या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे...

श्रीनगरच्या लाल चौकातही घुमला 'जय श्रीराम'चा घोष

श्रीनगरमधील हा लाल चौक अत्यंत वादग्रस्त आणि अशांत असा मानला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी रामनवमी निमित्त रथयात्रा निघणे हे विशेष मानले जात आहे...

देशभरात रामनवमी उत्साहात साजरी

देशभरात आज सर्वत्र रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी राम मंदिरांमध्ये रामकथा, रामभजन व कीर्तन-प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते...

दलाई लामा यांच्या दिल्लीतील कार्यक्रमाला सरकारचा नकार

येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला चीनच्या तिबेट प्रशासनाकडून भारतामध्ये 'थँक्यू इंडिया' हे शिबीर राबवण्यात येणार आहे. ..

ताज महालचे दर्शन होणार 'महाग'

यापुढे ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना १ हजार २५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे...

महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात, राष्ट्रपतींची उपस्थिती

कर्नाटक येथील जैन समाजाच्या प्रसिद्ध महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ८८व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा १२ वर्षातून एकदा आयोजित करण्यात येतो. त्यामुळे यांदाचा महामस्तकाभिषेक सोहळा अत्यंत खास असा मानला जात आहे...

मुघल उद्यान आजपासून सामान्य जनतेसाठी सुरु

दरवर्षी सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणारे राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यान हे आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. ..

'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम आज संपन्न होणार

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा झाल्यावर दिल्ली येथील राजपथावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. ..

बहुआयामी व्यक्तिमत्व पद्मविभूषण पी.परमेश्वरन

परमेस्वरण हे भारतीय विचार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

इलैय्याराजा यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित

प्रसिद्ध संगीतकार इलैय्याराजा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. दक्षिण भारतातील १००० पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत देणारे तसेच किमान साडेसहा हजारपेक्षा जास्त गाण्यांना संगीत दिणारे इलैय्याराजा यांना भारत सरकार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ..

जेव्हा राजपथावरून निघते 'छत्रपतींची' स्वारी...

चित्ररथाच्या मध्यभागी शिवराज्याभिषेकाचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. यामध्ये अष्टस्तंभाच्या मेघडंबरीमध्ये सिंहासनावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्यात आले होते...

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवन ते लाल किल्ला हा सर्व परिसर सजविण्यात आला आहे. ..

बेंजामिन नेतन्याहू यांची ताजमहालला भेट

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज जगातील सातवे आश्चर्य असलेल्या ताजमहाल स्मारकाला भेट दिली. बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या पत्नीसोबत ताजमहालचा फेरफटका मारला आहे. ..

नरेंद्र मोदी यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

आज मकरसंक्रांतीचा सण असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा देत नागरिकांच्या जीवनात भरभरून आनंद येवो अशी इच्छा व्यक्त केली आहे...

देशभरात युवा दिनाचा जल्लोष

रामकृष्ण मिशनच्या देशभरातील सर्व आश्रम आणि मठांमध्ये आज या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ..

सागरीमार्गे हजयात्रेला सौदी अरेबियाची मान्यता

भारताचा हज यात्रेतील कोटा वाढवून तो १ लाख ७५ हजार २५ इतका करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा 'मेहरम' शिवाय हज यात्रेला जाण्यासाठी नावनोंदणी केलेल्या सर्व १३०० मुस्लीम महिलांना भारत सरकारकडून हज यात्रेला पाठवण्यात येणार आहे, असे नक्वी यांनी सांगितले आहे. तसेच सागरी प्रवासामुळे भारत सरकारच्या खर्चात देखील बचत होणार असून नव्या जहाजांच्या माध्यमातून मुंबईहून हजला अवघ्या चार दिवसांमध्येच जाता येणार आहे,..

‘आयसीसीआर’च्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात ‘आयसीसीआर’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ..

मिर्झा गालिब यांना गुगल डुडलचे अभिवादन

प्रसिद्ध फारसी आणि उर्दू शायर मिर्झा असदुल्ला खान गालिब यांच्या २२० व्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डुडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे...

कुंभमेळा हा मानवतेचा सांस्कृतिक वारसा : युनेस्को

युनेस्कोकडून कुंभ मेळ्याला ‘मानवतेचा सांस्कृतिक वारसा’ हा दर्जा देण्यात आला आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली आहे...

गंगेसाठी येणार ब्रिटेनमधून 'गंगाजळी'

गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरु करण्यात आलेल्या 'नमामि गंगे' या उपक्रमासाठी आता ब्रिटेनमधून गंगाजळी येणार आहे. ब्रिटेनमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिक हे गंगा शुद्धीकरणासाठी ५०० कोटी रुपयांची सहाय्यता करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ..

तरुण कलाकारांना शिष्यवृत्ती 

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे आता ४०० युवा कलाकारांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.  भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातच्या सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे भारतीय शास्त्रीय संगीत,नृत्य,सुगम शास्त्रीय संगीत, नाट्य,दृश्यकला,लोककला, पारंपरिक आणि व्यक्तीगत कला क्षेत्रातील ४०० युवा कलाकारांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे...