मुंबई

'लोकल' सुरू झाली आता दोन घास सुखानं खाऊ !

कोरोना प्रतिबंधासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सात महिन्यांनंतर प्रथमच रेल्वेत पाऊल ठेवायला मिळाल्यानंतर महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ऑफिसमध्ये जाणाऱ्या गृहिणींसह फुल आणि भाजी विक्रेत्या महिलांच्याही डोळ्यात आनंद तरळत होता. लोकल सुरू झाल्याने दररोज मालाची ने-आण करण्यासाठी रिक्षा टॅक्सीला द्यावे लागणारे दोनशे ते तीनशे रुपये आता वाचणार आहेत. त्यामुळे समाधान आहे, अशी प्रतिक्रीया फळ, फूल आणि भाजी विक्रेत्या महिलांनी दिली...

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा प्रधान यांना देवाज्ञा

दत्तात्रय वामन प्रधान यांनी रा. स्व. संघाच्या अनेक जबाबदाऱ्या पाडल्या पार..

“कोरोनाकाळात मुंबईकरांची सेवा भाजपनेच करून दाखवली”

भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजप नागसेवाकांचे केले कौतुक..

महिला प्रवाशांना ‘लोकल’साठी हिरवा कंदिल

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यातर्फे घोषणा लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या लोकल प्रवासाबद्दल काहीशी सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केली आहे. उद्यापासून दि. २१ ऑक्टोबर २०२० पासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी तीन दरम्यान व सायंकाळी सात वाजल्यानंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे गोयल म्हणाले. “रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार ..

“जनतेने तुम्हाला उद्या आभासी मुख्यमंत्री मानले तर?”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका..

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : देवेंद्र फडणवीस

ज्या भागामध्ये परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे, तेथील शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..

खंडीत विजपुरवठ्यामुळे मुंबईत पाणीबाणी!

विजपुरवठा खंडीत झाल्याने आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यावर या वीज नसल्याने प्रभाव पडला आहे. मुंबई उपनगरातील अनेक पट्ट्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सकाळी वीज बंद झाल्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. जोपर्यंत पूर्णपणे वीजपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पाण्याची समस्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने उद्या दुपारपर्यंत मुदत दिली आहे. मंगळवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार ..

आता फक्त 'डायनसोर' आणि 'एलियन' दिसायचे राहिलेत !

वीज पुरवठा खंडीत प्रकरणामुळे भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आता फक्त 'डायनसोर' आणि 'एलियन' दिसायचे राहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. ..

वीज आली अन् मोठा अनर्थ टळला !

पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला. जनजीवन विस्कळीत झाले मात्र, सर्वात जास्त आव्हान हे रुग्णालय प्रशासन आणि यंत्रणांना पेलावे लागले होते. रुग्णालयात व्हेंटीलेटरसाठी अखंड वीज पुरवठा पुरवणे हे आव्हान मुंबई महापालिका आणि इतर रुग्णालयांसमोर होते. ..

मेट्रो कारशेड : 5000 कोटींचा भुर्दंड, पाच वर्षे विलंब

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, तसेच मेट्रो अजून पाच वर्षे उशीराने धावेल, अशी भीती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. ..

आरे कारशेड आता काजूरमार्गला : मुख्यमंत्री

हजारो कोटींचा खर्च करून बांधकाम चालू असलेले आरे कारशेड आता कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला..

"सरकारने आता मराठा समाजाची परीक्षा पाहू नये”

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला इशारा..

जास्त किंमतीला मास्क विकला तर कारवाई होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. एन-९५ मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील...

टीआरपीमध्ये छेडछाड ? : रिपब्लिट टिव्हीसह मराठी चॅनलही अडचणीत

सुशांत सिंह राजपूत प्रकरण लावून धरणारी हिंदी वृत्तवाहिनी रिपब्लिक टीव्ही विरोधात मुंबई पोलीसांनी आता शड्डू ठोकले आहे. रिपब्लिक टिव्ही विरोधात आमच्याकडे पुरावे आढळले आहेत, असा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे. टीआरपीच्या आकडेवारीशी छेडछाड केल्याचा आरोप मुंबई पोलीसांनी केला आहे. टीआरपीमध्ये क्रमांक १ वर येण्यासाठी मानांकनाच्या प्रमाणाशी छेडछाड केल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे...

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना पोलिसांची क्लीन चीट

२५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सरकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी ६९ जणांना क्लीन चीट मात्र एडीचा विरोध..

लोकल फेऱ्या वाढवा ; उच्च न्यायालयाचे आदेश

अत्यावश्यक सेवांसाठी मुंबई लोकल काही प्रमाणात चालू केली असली तरीही अद्याप तुफान होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी त्रस्त..

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार बनावट अकाऊंटस्

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कारवाईचा इशारा दिला..

उघड्या मॅनहोलमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

हाजीअली समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह सोमवारी आढळून आले..

रियाला त्रास देऊ नका,तिची सुटका करा : कॉंग्रेस नेत्याची मागणी

अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या आणि ड्रग्स प्रकरणामध्ये तुरुंगवास भोगत आहे रिया चक्रवर्ती..

“आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा पारित करा”

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र..

मुंबई लोकल यार्डातच : केंद्राला राज्याकडून प्रस्तावच नाही

अनलॉक प्रक्रीया सुरू झाल्यानंतर मुंबई लोकल केव्हा सुरू होणार असा प्रश्न वारंवार सरकारला विचारला जात आहे. उपनगरांतून शहरात जाणाऱ्या कामगारांचे हाल रोखण्यासाठी लोकल सुरू करा, अशी मागणी मनसेने आंदोलनाद्वारे केली होती. मात्र, सरकारची या प्रकरणी काहीशी भूमिका सावध असल्याचे दिसत आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी संकेत दिले आहेत...

“दिवाळीनंतर ९वी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा विचार”

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आश्वासन..

"राममंदिर हे स्वातंत्र्य मंदिर आहे" - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सा. विवेकच्या 'राष्ट्रजागरण' व्याख्यानमालेचा समारोप..

राज्यात सोमवारपासून सुरु होणार रेस्टॉरंटस आणि बार

राज्य सरकारने जारी केली नियमावली, पण जिम संदर्भात अद्याप एकही आदेश नाही..

"राष्ट्र मंदिराचा पाया हा घरातच"- पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे

सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाइन सातवे पुष्प शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले...

ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडमधील पूर्व मेकअप मॅन अटकेत

पूर्व मेकअप मॅन करत होता ‘एमडी’ या ड्रग्सची तस्करी..

नावीन्यपूर्ण कल्पनेतूनच भारताचा उत्कर्ष

‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा कार्य आणि भविष्यातील भारत’ या विषयावर स्नेहवन प्रकल्पाचे प्रमुख अशोक देशमाने यांनी आपले विचार प्रकट केले.‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील ..

जाहिरात क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी !

जाहिरात हे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर अबाधित आणि कायम असलेलं क्षेत्र. हे विश्व मोठं असल्याने नोकरी व्यवसायाच्या संधीही तितक्याच अफाट आणि वेगवेगळ्या आहेत. मात्र, नेमकी सुरुवात कशी करावी याच अडचणीमुळे स्वतःमध्ये कौशल्य असूनही अनेकांची संधी हुकते. मात्र, जाहिरात क्षेत्रातील अनुभवी नाव असलेल्या ब्रॅण्डगुरु गोपी कुकडे यांनी जाहिरात (अॅडर्व्हटायझिंग) क्षेत्रात नवनव्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना अचूक आणि नेमके मार्गदर्शन करण्यासाठी एक मंच उपस्थित केला आहे. इच्छुकांना या झूम मिटींगद्वारे ब्रॅण्डगुरू ..

मुंबईत दोन लाख कोरोना बाधित, मृत्यूदरही सर्वाधिक

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता दोन लाखांवर पोहोचली आहे. सोमवारी एकूण २ हजार ४४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबई हे देशातील सर्वाधिक रुग्ण असणारे चौथे शहर / जिल्हा बनला आहे. तसेच इथला मृत्युदरही सर्वाधिक ४.४ टक्के आहे. मुंबईकरांसाठी ही चिंताजनक बाब मानली जात आहे. ..

डिलिवरी बॉयच्या सहाय्याने ड्रग्सची तस्करी ? ; मुंबई पोलीस गुन्हे शाखेची कारवाई...

बॉलिवूडच्या कलाकारांना अमली पदार्थ देत असल्याच्या संशयावरून केली अटक..

मुंबईकरांनो आणखी किती पाण्यात जाणार ?

पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिका आणि पालिका आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना काय करत आहे, असा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. कंगना रणौत आणि माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यांशी वादंग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर या कामांकडे लक्ष दिले असते तर आज सामान्य जनतेला या नाहक त्रासाला बळी पडावे लागले नसते, असा टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे. ..

ठाकरे सरकारकडून मराठा आरक्षण अंतरिम स्थगितीविरोधात विनंती अर्ज

महाविकास आघाडी सरकारकडून मराठा आरक्षण स्थगितीविरोधात टाकले पहिले पाऊल..

पदोन्नती रखडली! ठाकरे सरकारला पोलीसांचा विसर

पोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली ..

इस्माईल यूसुफ महाविद्यालयात महिला कर्मचारीचे लैंगिक शोषण

महिला कर्मचारीचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची अभाविपची मागणी..

पश्चिम रेल्वेच्या आता ५०० विशेष लोकल फेऱ्या!

गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने फेऱ्या वाढवणार; मात्र सामान्यांना अद्याप प्रवेश नाही!..

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ला आशा सेविकांची नापसंती

लाखो अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांचा या योजनेवर बहिष्कार..

जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास!

सर्वसामान्यांसाठी मनसेचे आंदोलन; लोकल सेवा सुरु करण्याची मागणी!..

मुंबईत कोरोनाचा हाहाःकार अन् अंधेरीत डॉक्टरांची पदे रिक्तच

तातडीने डॉक्टरांची भरती करण्याची भाजप नगरसेवक मकवानी यांची मागणी..

मराठा समजाच्या आरक्षणासाठी मी पदाचा राजीनामा देईन !

खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया..

एनसीबी कारवाई : ड्रग्सप्रकरणी मुंबईतून ५ जणांना अटक!

एक किलो ड्रग्स तर चार लाखांची रोकड जप्त!..

मुंबईत कलम १४४ लागू : ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी

कोरोना नियंत्रण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने मुंबईत आता पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे...

खासगी रुग्णालयातील डॉक्टर आता जम्बो कोविड सेंटरमध्ये 'ऑन ड्युटी'!

दूरध्‍वनीद्वारे देणार सल्ला; गरजेनुसार भेटी..

मुंबई महापौरांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सोमय्या यांची आयुक्तांकडे तक्रार!

सखोल चौकशीची केली मागणी ..

मुंबईकरांनो सावध व्हा ! आढळले २३५२ रुग्ण

कोरोना पुन्हा थैमान घालतोय ..

अंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाचा निष्काळजीपणा!

प्रवीण दरेकर यांच्याकडे आयुक्तांची स्पष्टपणे कबुली..

'ऑनलाईन' वर्गांमुळे पाठ्यपुस्तकांकडे पाठ : विक्रेत्यांपुढे संकट

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरजच भासत नसेल तर आम्ही आता करायचे काय ?..

कोरोनाचे १० रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेची नवी नियमावली जारी!..

कांदा निर्यातबंदी मागे घ्या! : फडणवीसांचे केंद्राला पत्र

तातडीने निर्णय घेण्याची केली विनंती ..

राज्यात गरजेपेक्षा २०० मेट्रिक टन जास्त ऑक्सिजन : राजेश टोपे

राज्यामध्ये रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती..

शिवसेनेमुळेच अपमान आणि बदनामी

भारतच काय, जगात कोणतीही उलथापालथ झाली तरी शिवसेनेला मुंबई-महाराष्ट्राचा अपमान, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्मे, मुंबईला खच्ची करण्याचे कारस्थान, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या षड्यंत्रावरून बोंबाबोंब करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण, सकारात्मक व शाश्वत काम करण्याची धमक नसल्याने असला कांगावा करण्याव्यतिरिक्त शिवसेनेचे अस्तित्वच नाही. ..

बेस्ट कामगारांच्या खिशाला सुट्या नाण्यांचा भार!

निविदा प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांना पगारात दिली सुटी नाणी!..

शीव रुग्णालयात मृतदेह अदलाबदल : भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा

शीव रुग्णालयात कोरोना रुग्ण आणि अपघात झाल्यानंतर उपचार घेत असलेला तरुण अंकुश यांच्या मृतदेह अदलाबदली प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपने आंदोलन केले. रुग्णाची अदलाबदली झाली हे रुग्णालयाने मान्य केले तरीही रुग्णाची किडणी चोरीला गेली, असा आरोप घरच्यांनी केली आहे. या प्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि अन्य नेत्यांनी शीव रुग्णालयाबाहेर आंदोलन करत सरकारला धारेवर धरले. यावेळी स्थानिक आमदार कॅप्टन तमिळ सेलवनही उपस्थित होते...

महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकांना परवानगी!

महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकांना परवानगी!..

आहे ते 'बेस्ट' आहे!, जादा प्रवासी नकोच

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बेस्ट बसमध्ये जादा प्रवासी वाहतूक करण्याचा आदेश देण्यात आल्याच्या विरोधात बेस्ट कामगारांनी सोमवारी वडाळा आगारासमोर निदर्शने केली. जादा प्रवासी वाहतुकीच्या आदेशाबाबत बेस्ट कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे कामगारांसह प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार नेते नितीन पाटील, विठ्ठल गवस आदी उपस्थित होते. ..

मुंबईकरांची चिंता वाढणार : दादर, धारावीत रुग्णवाढ

आढळले एकूण ११६ नवीन रुग्ण ..

निवृत्त सेनाधिकारी मारहाण प्रकरण : शिवसेनेविरोधात कांदिवली येथे जोरदार निदर्शने!

मदन शर्मांसह निवृत्त सैनिकांचा सहभाग ..

“८ दिवसांत मराठा समाजाला न्याय द्या, नाहीतर...”

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा आंदोलनाचा इशारा..

हायराईज इमारतीतील कोरोनाचा फैलाव चिंताजनक!

सील इमारतींच्या संख्येत वाढ!..

सायन रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदलप्रकरणी दोन कामगार निलंबित!

संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयासमोर आक्रोश!..

मास्क न लावणाऱ्यांवर पालिकेचा वॉच!

५०० अधिकाऱ्यांची मुंबईत गस्त..

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसाठी महापालिकेची उपाययोजना सुरू!

'आयसीयू'मध्ये २५० खाटा वाढवणार; नर्सिंग होम सुरू करण्याचा विचार..

चिंताजनक : मुंबईतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येतही वाढ!

११ दिवसांत १,२३५ इमारत, इमारतीचे भाग सील!..

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरण : ‘त्या’ शिवसैनिकांची २४ तासात सुटका

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केलेल्या त्या ६ शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली..

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण; आशिष शेलारांची शिवसेनेवर उद्विग्न टीका..

ठाकरे सरकारने ‘गुंडाराज’ थांबवावा! : देवेंद्र फडणवीस

व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड वादातून माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण!..

देशाचे संरक्षण करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घरात बसून तानाशाही” भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप..

मुंबई कुणाच्या बापाची जहागीर नाही : आठवले

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली अभिनेत्री कंगना रानौतची भेट..

“ठाकरे अयशस्वी मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावे”

बिहारचे भाजप प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी केली टीका..

बांधकाम बेकायदा असल्यामुळेच कंगनाच्या कार्यालयावर कारवाई!

मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र; पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला..

अमिताभ बच्चन यांचे अनधिकृत बांधकाम नियमित

बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेचे वेळखाऊ धोरण..

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर 'क्वारंटाईन'!

"कोरोना अँटीजन चाचणी सकारात्मक आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच क्वारंटाईन राहणार आहे.". अशी माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, "मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरण होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली आहे. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन"..

“मी जगेन किंवा मरेन, पण तुमचे पितळ उघडे पाडेन”

अभिनेत्री कंगना रानौतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि करण जोहरला इशारा..

राज्य सरकारच्या असंवेदनशील हाताळणीचा हा परिणाम : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्य सरकारवर टीका..

“महाविकास आघाडीच्या मनातच नव्हते मराठा आरक्षण टिकावे”

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी व्यक्त केले मत..

कंगानाच्या मुंबईबद्दल वक्तव्यावर दरेकरांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई पालिका, राज्याची सत्ता यांचा सुढ बुद्धीने वापर..

कंगनाने कोर्टात आव्हान दिल्यानंतर कारवाई स्थगित

अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करावी लागणार आहे. या प्रकरणी अगदी काही वेळातच न्यायालयापुढे सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथे पाली हिल रोड येथे कंगना रणौतच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी पालिकेचे पथक बुधवारी सकाळीच दाखल झाले...

'कबीर कला मंच' म्हणजे प्रतिबंधित माओवाद्यांची फ्रंट

एनआयएची माहिती ; मंचाशी संबंधित ज्योती जगतापलादेखील अटक..

एल्गार परिषद हिंसाचार प्रकरण : कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांना अटक

नक्षल कारवायात सामील असल्याच्या आरोप..

कंगनाला व्हावे लागणार १४ दिवस होम क्वारंटाईन

राज्य सरकारच्या नियमानुसार १४ दिवस होम क्वारंटाईन करणार असल्याची माहिती देण्यात येत आहे..

गतिमान झालेल्या मुंबईत प्रदूषणाच्या पातळीतही वाढ!

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित! ..

कंगनाच्या पालीमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी!

मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का? याचा आढावा घेतला..

मुंबईत येणाऱ्या कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सुरक्षा कवच’!

‘Y’दर्जाच्या सुरक्षेसाठी कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार! ..

कोरोनाने घेतला १०७ सफाई कामगारांचा बळी!

कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत!..

पत्रकाराच्या मृत्यूनंतर पवारांना उपरती म्हणजे राज्य सरकारच्या पापाची कबुली!

शरद पवारांकडून पुण्याला ६ कार्डियाक रुग्णवाहिका; पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्युनंतर आमदार अतुल भातखळकरांची शरद पवारांवर टीका! ..

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के ; ४.० रिश्टर स्केलची नोंद

उत्तर मुंबईपासून ९० किमी अंतरावर झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

अंतिम वर्षांचा परीक्षा ५० गुणांची, एक तासाचा वेळ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती..

गंभीर रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरपी!

मुंबईत तीन रुग्णांवर यशस्वी उपचार! ..

कोरोनाच्या संकटामुळे हृदयविकारांकडे दुर्लक्ष

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी अभ्यासांतर्गत निष्कर्ष ..

शिवसेनेने दिला धोका ; कॉंग्रेस नेते संजय निरुपमांची टीका

ठाकरे सरकारने ‘आरे’बाबत घेतलेल्या निर्णयावर संजय निरुपम यांनी घेतला समाचार..

मुंबईकरांच्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता

विनामास्क वावरणाऱ्यांवरील कारवाई थंडावली : सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा..

गोरेगाव पत्रा चाळ रहिवाशांचा म्हाडावर निषेध मोर्चा

गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचा संघर्ष समिती यांनी म्हाडावर चार सप्टेंबर रोजी धडक मोर्चा देण्याचा इशारा दिलेला आहे. पत्रा चाळ रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे आपल्या हक्काची जागा सोडून मुंबईबाहेर राहात आहेत..

दिलासादायक : मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर!

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ!..

गणेश पूजा साहित्यात मास्क-सॅनिटायझरही 'अनिवार्य'

निलेश सावंत यांच्याहस्ते गणेश पूजा साहित्य वाटप..

‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ भाजपची अनोखी संकल्पना!

आमदार प्रसाद लाड यांच्याहस्ते उपक्रमाचे उद्घाटन..

मुंबईच्या डबेवाल्यांची उपासमार होऊ देऊ नका! : सुब्रमण्यम स्वामी

कोरोना महामारी काळात मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी सुब्रमण्यम स्वामींचे आवाहन!..

मुंबईच्या महापौरांचा पक्षपातीपणा; बहुतेक निधी शिवसेना नगरसेवकांनाच!

महापौरांच्या कृतीचा भाजपकडून निषेध..

पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का? मनसेचा सवाल

कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाकडे दिल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला..

महाराष्ट्रात नवे ‘ट्रान्सफर’ मंत्रालय : भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील

‘या मंत्रालयाच बजेट नसत तर टार्गेट असत,’ अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली..

“नियती कोणाला सोडत नाही, कुटुंबाला हिशेब द्यावा लागणार”

भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत केली ठाकरे सरकारवर टीका..

कोरोनानंतरच्या उपचारांसाठी केईएममध्ये ‘पोस्ट कोरोना ओपीडी’!

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना जाणवतोय श्वसनाचा त्रास; सायन, नायरमध्येही सुरू होणार ‘पोस्ट कोरोना ओपीडी’..