मुंबई कोविड योद्धा

प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जाणारा महाराष्ट्रातील एकमेव लढवय्या

राज्य चालविण्याची जबाबदारी असतानाही सत्ताधारी पक्षांतील अनेक नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाच्या भीतीने घरात बसून राहिले. मात्र, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी प्रत्येक ‘हॉटस्पॉट’ला भेट देत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तो म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवेसाठी आयुष्य वेचणारे फडणवीस यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा लेख... ..

जनतेचा विश्वास हेच माझे बळ!

कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या दूर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद दिला. आपल्या मतदारसंघात विविध सेवाकार्ये चालविली, त्यामुळे गरजूंना त्याचा मोठा लाभ झाला. स्वत: सेवाकार्यांमध्ये उतरून पूनम महाजन यांनी कार्यकर्त्यांसह जनतेचाही विश्वास जिंकला. ..

अन्यायग्रस्तांचा बुलंद आवाज!

कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधींनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यामध्ये प्रामुख्याने गरजवंतांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यावर प्रामुख्याने भर होता. तेव्हा, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी महामुंबईतील प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जात अन्यायग्रस्तांविरोधात सातत्याने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

कर्तव्यदक्ष नेता...

कोविडचा काळ हा केवळ जनतेचीच नव्हे, तर सरकार आणि लोकप्रतिनिधींचीही सर्वार्थाने परीक्षा पाहणारा होता. या संकटसमयीच जो जनतेच्या मदतीला धावून जातो, तोे कर्तव्यदक्ष नेता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे त्यापैकीच एक. गरजूंना मदत असो ‘निसर्ग’ चक्रीवादळातून कोकणवासीयांना दिलासा द्यायचा असो, दरेकर यांनी जनतेला सर्वार्थाने आधार दिला. अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा परिचय करुन देणारा लेख... ..

‘क्यूंकी काम बोलता हैं।

’कोरोनासारख्या जागतिक महामारीने मुंबईसह महाराष्ट्रात हाहा:कार माजविला असताना राज्यातील सत्ताधारी पक्षांतील नेत्यांवर विसंबून न राहता, प्रत्येक वेळी ‘वर्क फ्रॉम फ्रंट’ तत्त्वाचा अवलंब करून कांदिवली पूर्व मतदारसंघासह मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरोनाच्या विरोधातील लढाईत स्वतःला झोकून देणारे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा आढावा घेणारा हा लेख... ..

लोकसेवेचे महानायक

‘सेवा परमो धर्म:’, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा आयुष्याचा संकल्प मानून राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणारे सेवाव्रती म्हणजे खा. मनोज कोटक. कोरोनाकाळात कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे ईशान्य मुंबईच्या रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. मनोज कोटक यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी कोविड काळात केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा... ..

समाजसेवा हेच साध्य

समाजसेवा हे साध्य आहे, तर लोकप्रतिनिधित्व हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. या साधनाचा उपयोग करून जनसामान्यांची सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मात्र, बोरिवली मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील दत्तात्रेय राणे यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केलेले व्यापक मदतकार्य त्यांच्या मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या या मदतकार्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा... ..

कुलाबाकरांचा कैवारी

‘प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’ या भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वाचे पालन सर्वच कार्यकर्ते करतात. असाच एक हाडाचा कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक आकाश राज पुरोहित. कोरोनाच्या संकटात ते पायाला भिंगरी लावून कुलाबा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या मदतीला धावत होते. या काळात गरजूंना त्यांनी लागेल ते साहाय्य करत खूप मोठा दिलासा दिला. तेव्हा, ‘कोविड’ संकटात त्यांनी केलेल्या कामाचा हा आढावा... ..

लोकसेवेचा अविरत वारसा

कोरोनाच्या संक्रमण काळात मैदानात उतरून सर्वसामान्य जनतेत जाऊन प्रत्यक्ष मदतीचा हात देणे जितके जिकिरीचे तितकेच धाडसाचे. मात्र, सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याला निश्चयाचे बळ देत, मदतीचा हात तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी केले. कोरोना संकटकाळातील त्यांच्या कामावर दृष्टिक्षेप टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न. ..

रंजल्या-गांजल्यांचा तारणहार

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात झोपडपट्टी, चाळीत राहणारे, हातावर पोट असणारे अशा सर्वांसमोर जीवन जगण्याचे संकट उभे ठाकले. मात्र, भाजप नेते विनोद शेलार यांनी या कठीण काळात समाजातील रंजल्या-गांजल्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले, कोरोना रुग्णांना बिल कमी करणे, वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, अशाप्रकारची मदत केली. तेव्हा, त्यांच्या या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... vinod shelar..

आव्हानाचा सामना

कोरोना हे जागतिक महामारीचे संकट म्हणजे कार्यकर्त्यांना आव्हानच होते. तो कुठून येईल आणि कोणाला विळखा घालेल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे सजग राहणे आणि लोकांना जागरूक ठेवणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून सुधा सिंग यांनी आपले कर्तव्य मानले आणि कार्यकर्त्यांच्या बळावर गल्लोगल्ली फिरून कोरोना प्रतिबंधासाठी अविरत लढा दिला. गरजूंना सर्वोपरी मदतीचा हात दिला. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

सत्ता स्वार्थासाठी नव्हे, सेवेसाठी...

कोरोनाच्या काळात लोकांना लागेल त्या मदतीसाठी नगरसेवक प्रकाश गंगाधरे हे रस्त्यावर उतरले. अक्षरश: २४ तास जनतेच्या सेवेस सिद्ध झाले. सर्वात प्रथम लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती आणि कोरोनाबद्दलचे गैरसमज दूर करणे गरजेचे होते. प्रकाश गंगाधरे यांनी वस्ती पातळीवर अशा प्रकारे नियोजन केले की, वस्तीतील लोकांशी तत्काळ संपर्क होईल. तेव्हा, प्रकाश गंगाधरे यांच्या कोरोना महामारीच्या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..

संकटात सेवेची संधी

‘कोरोना’ या जागतिक महामारीच्या संकटाने उच्च-नीच भेद गळून पडले. सारे एका पातळीत आले. पण, या संकटात सापडलेल्यांना संजय पांडे यांनी मदतीचा हात दिला. कुठलाही भेदाभेद न बाळगता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणुकीनुसार रंजल्या-गांजल्यांची सेवा संजय पांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याचा मोबदला म्हणजे जनतेने दिलेले अनेकानेक आशीर्वाद आणि प्रेम. तेव्हा, त्यांच्या या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख.....

तळागाळातल्यालोकांचा हक्काचा माणूस

हरिष भांदिर्गे... तळागाळातल्या लोकांचा हक्काचा माणूस आणि नगरसेवक म्हणून परिसरात ओळख. मूळ पिंड समाजसेवकाचा असल्यामुळे कोरोनाच्या काळात हरिष भांदिर्गे स्वयंस्फूर्तीने लोकांच्या मदतीला खर्‍या अर्थाने रस्त्यावर उतरले. कुणालाही कुठच्याही प्रकारची मदत करण्यास ते आणि त्यांचे कार्यकर्ते २४ तास तत्पर होते. तेव्हा, त्यांनी या महामारीच्या काळात केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

मुंबादेवीचा कोरोना रक्षक

मुंबादेवीवरून मुंबई शहराचे नामकरण झाले. व्यापारी आणि कामगारांनी प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी परिसरालाही कोरोनाचा विळखा बसला. अशा परिस्थितीत खचून न जाता, येथील नगरसेवक अतुल शहा खंबीरपणे उभे राहिले. कोरोनामुळे त्रासलेल्या व्यक्तींना त्यांनी धीर दिला. मदत केली. गरजूंना आसरा दिला. त्यांचे हे सेवाकार्य आजही अविरतपणे सुरु आहे. तेव्हा, त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा.....

रुग्णसेवेचा पाईक

‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥’ तुकोबारायांच्या या अभंग पक्तींचा प्रत्यय समाजातील अनेक माणसं प्रत्यक्ष कृतीमधून अमलात आणत आहेत. समाजातील अशाच रंजल्या-गांजल्या लोकांना आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे एक व्यक्ती म्हणजे ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’चे संस्थापक सत्यवान नर. त्यांनी हाती घेतलेल्या समाजकार्याचा वसा खऱ्या अर्थाने ‘कोविड’ संक्रमणाच्या काळात लोकहितास पडला...

अवघे धरू सुपंथ!

कोरोनाकाळात हजारो गरजूंना सर्वतोपरी मदत करणारे विशाल कडणे हे मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक असून उच्च विद्याविभूषित आहेत. DCE, BE, ME, AMIE, FIV अशी शैक्षणिक गुणवत्ता असलेले विशाल हे पेशाने इंजिनिअर आहेत. त्यांनीही कोरोनाकाळात समाजासाठी महत्त्वपूर्ण सेवाकार्य केले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला.तेव्हा, या कोविड योद्ध्याच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

संकटकाळात मदत हे आमचे ब्रीद!

संकटकाळात संस्थेचे काम आणि माणसातली माणुसकी, याचा प्रत्यय येत असतो. कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाने प्रत्येक जण हादरून गेला असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लोकसेवेला वाहून घेतले. या संकटकाळात त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यापैकीच एक म्हणजे भाजयुमो, उत्तर मुंबईचे अध्यक्ष अमर शहा. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....

कार्यकर्त्यांचे बळ हीच मोठी शक्ती

कोरोना हे जागतिक महामारीचे संकट होईल आणि जगाचे अर्थचक्र ठप्प होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, जसजसे या आजाराने गंभीर रूप धारण केले, तसे या आजाराची भयानकता लोकांच्या लक्षात यायला लागली. पण, अशा संकटातही लोकांना धीर देत, त्यांना या आजाराशी सामना करण्यासाठी बळ दिले ते प्रभाग क्र. ५२च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी. तेव्हा, या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

युवाशक्तीचा सेवाभावी आविष्कार

‘कोविड’च्या संकटात गरजूंना खर्‍या अर्थाने मदतीचा हात मिळाला तो म्हणजे युवकांचा. अनेक युवा संघटना आपल्याला या काळात रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या. ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ही यामध्ये कुठेही मागे राहिला नाही. खास करून मोर्चाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष शंतनू अगस्ती यांनी या काळात धडाडीने काम केले. त्यांनी या कोरोनाच्या संकटसमयी केलेल्या विविध कामांचा आढावा घेणारा हा सविस्तर लेख.....

जनआकांक्षांची ‘अक्षता’पूर्ती

‘कोविड’संकटाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झपाटून काम केल्याचे आपण पाहिले. यामधीलच एक नाव म्हणजे, पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर. माहिम विधानसभा क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी नवख्या असणाऱ्या तेंडुलकर यांनी लोकांचा विश्वासग्रहण केला आहे. त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा......

यापुढेही समाजासाठी काम करतच राहणार...

कोरोनाचे संकट हे अगदीच अचानक आले. कोणाच्या ध्यानीमनी नसलेल्या या संकटामुळे सुरुवातीच्या काळात सर्वच अगदी भयभीत झाले होते. त्यात हातावर पोट असलेल्या मजुरांची, फेरीवाल्यांची स्थिती सर्वाधिक गंभीर होती. मात्र, तरीदेखील गोरेगाव येथील भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या प्रभागात मदतकार्य सुरू केले, ते आजही सुरूच आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

‘नरही नारायण’

कोरोनाच्या संकटकाळात समाजातील अनेक व्यक्तींनी अगदी निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले. त्यामध्ये मोठा वाटा आहे तो लोकप्रतिनिधींचा. मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक आदींनी आपल्या कर्तव्याला स्मरून जनतेची अगदी निरपेक्ष भावनेने सेवा केली. चारकोप विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ३१ चे कर्तव्यदक्ष नगरसेवक कमलेश यादव यांनी ‘नरही नारायण’ ही उक्ती सार्थ ठरवत आपल्या प्रभागात सेवाकार्य अविरत सुरूच ठेवले आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

कोरोना हरणार आपण जिंकू!

करुणा हा धम्माचा गाभा आहे. ती करुणा, ती संवेदना आणि ती माणुसकी जपत योजना ठोकळे यांनी कोरोना काळात कार्य केले. गेली कित्येक वर्षे समाजासाठी काम करत असताना समाजाचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. त्यामुळेच कोरोनाने समाजात भयावह वातावरण झाले. त्यावेळी योजना ठोकळे आपल्या ‘आधार महिला संस्थे’द्वारे समाजाला आधार देण्यासाठी उभ्या ठाकल्या. समता परिषद तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी समाजाला सहकार्य केले...