महाराष्ट्राची रणधुमाळी

बहुमत नसल्यानेच सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला : निलेश राणे

सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. ..

नव्या सरकारने सगळे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे: चंद्रकांतदादा पाटील

हे नवे सरकार सगळे नियम धाब्यावर बसवत आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला...

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे

विधानसभा अध्यक्षपदाची लढत भाजप विरुद्ध काँग्रेस..

अजितदादांचे तळ्यात मळ्यात सुरूच ! उपमुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराजी

राज्यातील महाविकासआघाडीच्या नव्या संसाराच्या दिवसाची सुरुवातच वादाच्या ठिणगीने पडली आहे. एकीकडे काँग्रेसने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी विरोध केला आहे, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येऊ नये यासाठी फिल्डींग लावली आहे. अशाच अजितदादा मात्र, पक्षनेतृत्वावर अजूनही नाराजच आहेत...

इंदिरा गांधी-बाळासाहेबांच्या छायाचित्राद्वारे शिवसेनेची पोस्टरबाजी

शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथविधी घेण्यापूर्वी मोठे शक्तीप्रदर्शन पक्षातर्फे केले जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही फलकबाजीतून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यातील बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीदरम्यानचे छायाचित्र या फलकांवर दिसत आहेत...

अजित पवार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री ?

'महाविकासआघाडी'च्या शपथविधीपूर्वीच नेत्यांमध्ये बंडाचे निशाण उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्याभोवती ही चर्चा रंगत आहे. अजित पवार यांनी शरद पवारा यांची मनधरणी करून उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच ट्विटरवर #AjitPawarForCM हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे...

बंडखोर अजित पवारच उपमुख्यमंत्री ! जयंत पाटलांची शर्यतीतून माघार ?

'महाविकासआघाडी'च्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या आनंदात विरजण नको म्हणून आता नाराज राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. जयंत पाटील यांचे या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले आहेत. त्यामुळे 'महाविकासआघाडी'ला अजूनही अजित पवारांच्या बंडाची भीती वाटल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ..

कसा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शपथविधी ?

शिवतीर्थावर दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार ..

ब्रेकिंग : अजित पवार पुन्हा गायब !

'महविकासआघाडी'च्या नेत्यांशी संपर्क नाही..

अजित दादांना हवंय उपमुख्यमंत्रीपद ?

यशवंतराव चव्हाण सभागृहबाहेर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, अजितदादांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी उचलून धरली. ..

'सिल्वर ओक' बनले 'सत्ताकेंद्र'

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नव्या मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल खलबतं..

नव्या सरकारचा शपथविधी संपन्न

नव्या विधानसभेचे उद्या गठन, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी..

"जनतेने 'भगवा' फडकवला मात्र, उद्धव यांनी तो पवार-सोनियांच्या चरणी ठेवला"

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. जनतेने महाराष्ट्रात भगवा फडकवला मात्र, तोच भगवा उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या चरणी ठेवून जनादराचा अपमान केला, असे मत तावडे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राजभवनावर ते उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रीया दिली. ..

केंद्र व राज्यात 'एक' सरकार नसल्याचा फटका महाराष्ट्राला बसणार का ?

राज्याला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला अपयश आले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपयशी असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाविकासआघाडीच्या सरकारला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी एकत्र येत घेतलेला हा निर्णय त्यांच्यावरच उलटणार असल्याची टीकाही फडणवीस यावेळी केली आहे. राज्यात भाजपला थोपवण्यासाठी प्रखर विरोधकांनी ज्या प्रकारे एकत्र येत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार त्यांचे सरकार फारकाळ टीकणार नाही, असेही ..

'महाविकासआघाडी'ची तीन चाकांची रिक्षा चालणार नाही : फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी ३.३० वाजता आपल्या पदाचा राजीमाना देत असल्याचे जाहीर केले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे...

देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी ३.३० वाजता आपल्या पदाचा राजीमाना देत असल्याचे जाहीर केले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे...

राजभवनात कडेकोट बंदोबस्त

मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता..

आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू- रावसाहेब दानवे

बहुमत चाचणी उद्या संध्याकाळी होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीविषयी रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली. ..

भाजप बहुमत चाचणीसाठी तयार – चंद्रकांतदादा पाटील

चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘भाजप बहुमत चाचणीसाठी तयार’ असल्याचे सांगितले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ..

बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण होणार

उद्या पाच वाजेपर्यंत बहुमताची चाचणी घेण्यात यावी आणि ही चाचणी गुप्त मतदानाने होता ती थेट प्रक्षेपित व्हावी असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे...

ज्यांनी 'राम' नाकारला ते कपिल सिब्बल शिवसेनेच वकील झाले !

संजय राऊतांनी 'सामना'तून कपिल सिब्बलांवर ऐकेकाळी टीका केली होती : दानवे ..

अजित पवारांचा 'व्हीप' राष्ट्रवादी आमदारांना पाळावाच लागणार

अजित पवार तांत्रिकदृष्ट्या अजूनही राष्ट्रवादीतच आहेत. ते विधीमंडळ गटनेते पदावरही आहेत. काँग्रेसकडे त्यांचा गटनेता नाही. त्यामुळे अजित पवार यांची नियुक्तीच अजूनही अधिकृत आहे. त्यांनी जारी केलेला व्हीप हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायद्याच्या दृष्टीने मान्य करावा लागेल, असे स्पष्टीकरण भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिले आहे. तसेच महाविकासआघाडी म्हणजे 'पागलपंती', आहे. असेही ते म्हणाले. ..

शिवसेना आमदारांचा 'लपंडाव' सुरूचच; पुन्हा हॉटेल बदलले

शिवसेना आमदारांना आता हॉटेल ललितवरून 'लेमन ट्री' येथे हलवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला सोमवारीही नवे रंग दिसले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या निकाल राखून ठेवल्यानंतर शिवसेनेने आपल्या आमदारांवर पहारा आणखी वाढवला आहे. हॉटेल ललित येथून त्यांना मुंबई विमानतळानजीकच्या हॉटेलात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा जागता पाहारा दिवसरात्र सुरू आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी विशेष काळजी घेत आहे...

याच जन्मात भोगायचं आहे : शालिनी पाटीलांचा पवारांवर वार

महाराष्ट्राचे माजी मुख्ममंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ४१ वर्षांपूर्वीची एक घटना स्मरण करून दिली. अजित पवार हे राष्ट्रवादीत जाणे म्हणजे तुम्हाला एक धडा असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या प्रमाणे पवारांनी १९७८ मध्ये त्यावेळी पाठीत सुरा खुपसला होता. आज तुमचे पुतणे अजित पवार त्याचा हिशोब चुकता करत आहेत. शालिनी पाटील यांनी वेळोवेळी पवारांना यापूर्वीही त्यांच्या राजकारणावरून लक्ष्य केले होते. ..

राज्यात सरकार स्थापनेची संधी द्या : जयंत पाटील

राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना या तिन्ही पक्षांना सरकार स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी आज महाविकास आघाडीतील नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांनी राजभवनात पत्र सोपवले. १६२ आमदारांची परेड करण्यासाठी आम्ही तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सध्या राज्यपाल हे नवी दिल्ली येथे असल्याने त्यांनी केवळ कार्यालयात हे पत्र सादर केले आहे. ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्वीकारला पदभार

अजित पवारांनीही स्वीकारला उपमुख्यमंत्री पदाचा पदभार..

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पत्र धुडकावले आणि एकच हशा पिकला !

राज्यातील सत्तास्थापनेला देण्यात आलेल्या आव्हानावर सोमवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी झाली. न्यायालयाने मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निकाल राखून ठेवला, तसेच बहुमत सिद्ध करण्याबद्दलच्या तारखेतही कुठलाही बदल न करता फडणवीस सरकारला दिलासा दिला आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सादर करण्यात आलेले पत्र न्यायालयाने धुडकावले. तिन्ही पक्षांच्या वकीलांचेच एकमत नसल्याचे सुनावल्यानंतर न्यायालयात एकच हशा पिकला...

छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयशी

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे...

देवेंद्र फडणवीस यांना १७० आमदारांचा पाठींबा

सर्वोच्च सुनावणी LIVE UPDATES : देवेंद्र फडणवीस यांना १७० आमदारांचा पाठींबा ..

LIVE UPDATES : 'महा'सत्तापेचावर 'सर्वोच्च' सुनावणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीस आव्हान देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या रिट ..

येत्या काही दिवसांत शिवसेनेत मोठा भूकंप होणार!

आमदार रवी राणा यांचे सूतोवाच..

भाजपची रणनीती तयार : फडणवीसांचा अभिनंदन प्रस्ताव सादर

विश्वासदर्शक ठराव नक्की जिंकू आशिष शेलार यांचा विश्वास..

'महा'सत्तापेचावर 'सर्वोच्च' सुनावणी : न्यायालयात सरकार टीकेल का ?

भाजप सरकारचा शपथविधी चुकीच्या पद्धतीने पार पाडण्यात आला असून २४ तासात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत आणि प्रकरणाची तात्कळ सुनावणी करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा, न्या. अशोक भुषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावण केली. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली मांडली. भाजपतर्फे वरिष्ठ वकील मुकूल रोहतगी आणि राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद ..

भाजपच्या आमदारांना डांबून ठेवावे लागत नाही ! : महाविकासआघाडीला टोला

आमचा आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास : आशिष शेलार ..

भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, अजित पवार दिशाभूल करत आहेत : शरद पवार

अजित पवारांचे ट्विट चुकीचे : पवारांचे स्पष्टीकरण..

ब्रेकींग!!! राष्ट्रवादी-भाजप मिळूनच स्थिर सरकार देऊ : अजित पवार

मी राष्ट्रवादीतच, अजित पवारांचे स्पष्टीकरण..

आम्ही सकाळी सहा वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत ! संजय राऊतांना टोला

'रामप्रहर' काय असतो ते 'शिवसेने'ला काय कळणार : आशिष शेलार..

उद्धव ठाकरे म्हणतात, आपलंच सरकार येणार!

राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतरही 'महाविकासआघाडी'तील नेते सत्ता स्थापनेच्या दाव्यावर कायम आहेत. सकाळपासूनच सर्व नेत्यांनी आपापल्या नेत्यांना आश्वस्त करत सरकार आपलेच येणार असल्याचा विश्वास दिला. कुठलीही परिस्थिती आली तरीही आम्ही एकत्रच राहू असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारीही दिवसभर महाविकासआघाडीतील नेत्यांच्या बैठका सुरूच होत्या...

अजित पवारांनी कापून टाकले परतीचे दोर : 'राष्ट्रवादी'ला ट्विटद्वारे दिले संकेत

अजित पवारांकडून सर्व भाजप नेत्यांचे धन्यवाद..

'महाविकासआघाडी'वर भाजपचा 'सर्जिकल स्ट्राईक'

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले कसे वाचा सविस्तर..

उद्धव ठाकरेंसमोर पक्ष बांधून ठेवण्याचे आव्हान

राष्ट्रवादीच्या बऱ्याच आमदारांना शपथविधीची कल्पना होती !..

फडणवीसांनी 'राष्ट्रवादी' फोडली ?

भाजपकडे १४५ आमदरांचा पाठींबा !..

अजित पवारांनी सादर केले आमदारांच्या पाठींब्याचे पत्र : गिरीश महाजन

शरद पवारांनी जरी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आमच्या पक्षाचा अधिकृत निर्णय नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही अजित पवार यांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र दिल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा मोठा गट हा अजित पवारांसोबत असेल, अशी शक्यता व्यक्त के..

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली : चंद्रकांतदादा पाटील

राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपतर्फे अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे...

भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय अजित पवारांचा राष्ट्रवादीशी त्याचा संबंध नाही : शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक असल्याचे मत असल्याचे मत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी शनिवारी सकाळी शपथ घेतली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी गेले आठ दिवस चर्चा आणि बैठका सुरू होत्या. मात्र, या सगळ्या राजकीय नाट्यात भाजपने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले आहे...

देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि त्यांनी 'करून दाखवलं'

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार..

सत्तास्थापनेची 'खिचडी' अजून शिजली नाही ! 'महा'राष्ट्राचा 'विकास' कधी ?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची उद्याही पुन्हा चर्चा होणार..

'महाविकासआघाडी'च्या बैठकीत प्रथमच उद्धव ठाकरेंची हजेरी

राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीत बैठका झाल्यानंतर मुंबईतील नेहरू सेंटर येथे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव यांच्यासह संजय राऊत, मिलींद नार्वेकर आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, नसीम खान, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत...

सत्तेत किती वाटा हवा ते शिवसेनेला कळवू : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून, या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले याबाबत जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती...

ब्रेकींग ! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चर्चेचा बार फुसका

राष्ट्रवादी कॉंग्रेसला हवे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद..

राज्यात तीन पक्षांचे सरकार येणार : कॉंग्रेस-राष्ट्रवादी

पर्यायी सरकार देणार : नवाब मलिक ..

पेढ्यांची ऑर्डर दिलीच म्हणून समजा : राऊत

नेहमीच आक्रमक शैलीत असलेले संजय राऊत बुधवारी नवी दिल्लीत काहीसे निवांत दिसले. पेढ्यांची ऑर्डर दिलीच म्हणून समजा, लवकरच महाराष्ट्राला गोड बातमी मिळेल, अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. सध्या नवी दिल्लीत जनपथ येथील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे...

पवारांपासून दूर राहा उद्धव ठाकरेंना सेना नेत्यांचा सल्ला !

शरद पवारांनी सत्तास्थापनेबद्दल 'गुगली' टाकल्यानंतर उद्धव ठाकरे यांना 'आस्ते कदम' टाकण्याचा सल्ला शिवसेना नेत्यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. शरद पवारांपासून शिवसेनेने दोन हात दूर राहावे, असेही मत सेनानेत्यांच्या एका गटाने व्यक्त केले आहे. तसेच भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करून सरकार स्थापन करावे, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. ..

सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार?

राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा तिढा अद्यापही कायम असून विधानसभा निवडणुकीनंतर एकही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे...

शरद पवारांनी काढली 'महाशिवआघाडी'ची हवा

राज्यात सत्तास्थापन करणार नाही : पवार..

भाजप-शिवसेनेचेच सरकार येईल !

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरबैठका सुरू असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नवीनच माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर, “काळजी करू नका. भाजप-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल,” असे आपल्याला अमित शाह यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला आहे...

'महाशिवआघाडी'चं घोडं अडलं !

किमान समान कार्यक्रम अद्याप ठरेना !..

वय वाढते तशी बुद्धी परिपक्व होते! यांचं काय?

आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना टोला..

राष्ट्रवादीचे नऊ आमदार आमच्या संपर्कात : रणजितसिंह निंबाळकर

'महाशिवआघाडी'त सत्तास्थापनेबद्दल अजूनही शाशंकता दिसत असताना रणजितसिंह निंबाळकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या 'महाशिवआघाडी'ला हा धक्का मानला जात आहे. ..

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक !

महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रपती राजवट लागू होणार का ?..

नव्या सत्ता समीकरणांना सोनिया गांधींकडून वाटाण्याच्या अक्षता

सोनिया गांधी शिवसेनेला पाठींबा देणार नाही ?..

#MaharashtraNeedsDevendra : नेटकऱ्यांची फडणवीसांना पसंती

राज्यात सत्तास्थापनेबद्दलचा तिढा लवकरच सुटू दे, पुन्हा एकदा महाराष्ट्रला स्थिर सरकार लाभू दे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा व्हिजन असलेला नेता महाराष्ट्राला पुन्हा लाभू दे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ट्विटरवर याबद्दल #MaharashtraNeedsDevendra, असा हॅश टॅग ट्रॆंड होऊ लागला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ हजार नेटीझन्सनी या हॅशटॅगद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. यात राज्याला भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्रीपदाबद्दल दावेदार आहेत, याबद्दल ट्विटरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...

राऊतांनी '१७०'चा आकडा कसा काढला मला माहीत नाही : शरद पवार

शिवसेना-भाजपकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. संजय राऊत यांनी आमच्याकडे १७० चा आकडा असल्याचा दावा केला होता, त्याबद्दल बोलताना पवार म्हणाले. सत्ता स्थापनेबाबतच्या शक्यतेबाबत सांगताना राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचेही ते म्हणाले...

राज्यपालांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात, सत्तापेचाला आम्ही जबाबदार नाही !

शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सत्तापेचाला आम्ही जबाबदार नाही, सर्वोत मोठ्या पक्षाने सत्ता स्थापन करावी, असे आवाहन त्यांनी राज्यपालांना करण्यास सांगितले. ही भेट कोणत्याही राजकीय स्वरुपाची नव्हती, असे सांगितले...

सरकार स्थापनेत कुठलाही रस नाही : प्रफुल पटेल

राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करणार का ?, या शक्यतेला आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनीही तिलांजली दिली आहे. आम्ही विरोधीपक्षातच बसणार असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आम्हाला सत्ता स्थापनेत रस नाही, असे म्हटले आहे...

एकवेळ विरोधीपक्षात बसू पण शिवसेना नको : शरद पवार

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील का ? , अशा चर्चा राजकीय वर्तूळात रंगली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, हा दावा फेटाळून लावला आहे. एकवेळ विरोधी बाकांवर बसू पण शिवसेना नको, असे पवार म्हणाले आहेत...

हरलोय पण थांबलो नाही : उदयनराजे भोसले

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांनी पराभवानंतर भावनिक प्रतिक्रीया दिली आहे. "आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर" , अशी भावनिक प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली आहे...

विदर्भविजयाचा जल्लोष करा...

भाजपचा कार्यकर्ता, मतदारवर्ग यांच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत. सत्तेसाठी वाटेल ती तडजोड काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत माफ असते. भाजपकडून मात्र त्याच्या कार्यकर्ता-मतदारांच्या अपेक्षा कधीकधी अतिरेकी असतात. भाजपची अवस्था शेणखत वापरून पीक काढणाऱ्या शेतकऱ्यासारखी असते. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मात्र युरियाची पोती ओतून पीक घेण्याची सोय आहे. विश्लेषक शेवटी कोणी, किती पीक काढले यावरून यशापयशाचे मोजमाप करीत बसतात...

मराठवाड्यात सर्वाधिक जागा महायुतीच्याच!

मराठवाड्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आठ. ते जिल्हे म्हणजे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. राज्य विधानसभेच्या एकूण ४६ जागा इथे होत्या आणि तिथे मतदारांनी मतदानही बऱ्यापैकी केले. ४६ जागांसाठी ६७६ उमेदवारांसाठी ६५.७० टक्के मतदान झाले व त्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले...

उत्तर महाराष्ट्रात संमिश्र आणि धक्कादायक निकाल

नाशिक येथील कृषी वर्ग, जळगाव येथील सोने व्यापार आणि कृषी व्यवसाय, धुळे आणि नंदुरबार मधील वनवासी बहुल समाज आणि अहमदनगर जिल्ह्यातील सहकार आणि कृषीआधारित जनजीवन यांचा संगम म्हणजे उत्तर महाराष्ट्र होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ..