कर्तृत्वाची गुढी

निराधारांचा आधारवड

विविध समस्यांनी ग्रासलेल्या आणि आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्‍या वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’चे माजी खजिनदार उमेश मेस्त्री यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख.....

गृहिणीसम जबाबदारी पेलणारी सभापती

‘गृहकर्तव्यदक्षता’ हा तर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य गुण. अशी सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेचा कारभार हाती घेते, तेव्हा घडणारे बदल हे निश्चितच नेत्रदीपक असेच असतात. याचीच अनुभूती येते, ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत. कारण, येथील कारभार आहे अशाच एका कर्तव्यदक्ष महिला सभापतीच्या हाती.सुवर्णा जगताप त्यांचे नाव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख.....

समाजभान जपणारा आनंदी डॉक्टर

डॉक्टर म्हटलं की, रुग्णसेवा, दैनंदिन व्यस्त जीवन, कामाचा ताण या गोष्टी ओघाने आल्याच. मात्र, यातूनच वेळ काढत ज्या समाजाचे आपण देणं लागतो, त्यासाठी आपले योगदान देणार्‍या डॉ. आनंद हर्डीकर यांचा हा संघर्षात्मक प्रवास.....

समाजकार्य आणि राजकारणातील ‘वारे’

घरात कोणताही राजकीय वारसा नसताना, वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र वारे यांनी राजकारण आणि सहकार क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. शेतकर्‍यांच्या समस्या त्यांनी अगदी जवळून पाहिल्या आणि अनुभल्याही. शेतकर्‍यांच्या याच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे काम राजेंद्र आज कसोशीने करीत आहेत. तेव्हा, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेल्या राजेंद्र वारे यांच्याविषयी कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

‘अ‍ॅस्ट्रोप्रिन्युअर’

आपली आवडच आपले जीवनध्येय ठरवून १८ वर्षांची एक मुलगी चक्क कंपनी स्थापन करते. त्या कंपनीची ‘सीईओ’ म्हणून अत्यंत जबाबदारीपूर्वक व्यवसायातही नेटाने उतरते. खगोलशास्त्राचे अजूनही शिक्षण घेणारी आणि कित्येक खगोल जिज्ञासूंना घरबसल्या अंतराळाचे धडा देणार्‍या ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’ या संकेतस्थळाची सर्वेसर्वा श्वेता कुलकर्णी. त्यामुळे आवड, शिक्षण, समाजसेवा आणि उद्योग यांना इतक्या कमी वयात एका धाग्यात गुंफणार्‍या या ‘अ‍ॅस्ट्रोप्रिन्युअर’ची ही यशोगाथा.....

शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक

कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना एखाद्या व्यवसायाची पायाभरणी करणे, हे तसे अवघड काम. मात्र, सफाळ्याच्या जयवंत राठोड यांनी हाताशी कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करत, विविधांगी व्यवसाय उभारले. त्यांच्या व्यवसाय भरारीमुळे अनेक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून पालघर जिल्ह्यातील एक कर्तृत्ववान उद्योजक म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख.....

अनंत अमुची ध्येयासक्ती...

“माझ्याकडे काहीच नाही, मला कुणाचे पाठबळ नाही, मलाच अडचणी येतात, किती लढू? जाऊ दे, त्यापेक्षा काहीच न केलेले बरे!” असे म्हणत रडणारे नकारात्मक लोक आपण नेहमीच अवतीभवती पाहतो. पण, शून्यातूनच विश्व निर्माण करणार्‍या अनिल सौंदडे यांची यशोगाथा ‘मराठी पाऊल पडते पुढे,’ असे म्हणायला भाग पाडते. ‘शीतल इंडस्ट्रीज’ आणि ‘एफिशियन्ट इंजिनिअरिंग’ या दोन कंपन्यांचेसर्वेसर्वा असलेले अनिल यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांचीच ही यशोगाथा.....

रक्ताची ‘नीता’

आजपासून २७ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावसारख्या ग्रामीण भागात एकटीच्या बळावर रक्तपेढी सुरू करणे तसे धाडसाचेच काम. पण, आपल्या समोर रक्ताअभावी होणारी रुग्णांची फरफट पाहून त्यांनी ती हिंमत केली आणि आजही रक्ताचा दर्जा, गुणवत्ता जपून त्या कार्यरत आहेत. त्या कोण? तर जाणून घेऊया, संजीवनी रक्तपेढीच्या संस्थापक-प्रमुख नीता पाटील यांच्याबद्दल.....

निराधार वृद्धांचा प्रीत‘किनारा’

समाजात अनेकदा आपल्याला निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी-आजोबा दिसतात. आपल्या मुलामुलींनी सांभाळावे, नातवंडांबरोबर लहान व्हावे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने जगावे, असे त्यांनाही वाटत असते. परंतु, दुर्दैवाने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी त्यांच्या नशिबी वेदना आणि यातनाच येतात. अशाच ५० पेक्षा अधिक आजी-आजोबांना ‘किनारा वृद्ध आणि मतिमंद ट्रस्ट’च्या माध्यमातून सांभाळताहेत पुण्यातील अ‍ॅड. प्रीती वैद्य, तेही अगदी मुलीच्या मायेने!..

स्वअस्तित्व निर्माता राजेंद्र

बहुराष्ट्रीय कंपनीत ११ वर्षांपासूनची, उत्तम वेतनाची नोकरी सोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कंपनीची स्थापना करणे, मोठे हिमतीचे काम. पण, तेच धाडस ‘एमिल फार्मास्युटिकल्स’चे संस्थापक राजेंद्र गोळे यांनी दाखवले आणि आज त्यांच्या कंपनीने निर्मिती केलेल्या उत्पादनांना देशात तर मागणी आहेच, पण परदेशातही त्यांची निर्यात होते. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख.....

व्यवसायातील ‘विक्रम’

व्यवसायात उतरण्याआधी संबंधित क्षेत्रात कमीत कमी सहा महिन्यांचा तरी प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव घेतलाच पाहिजे, असा मोलाचा सल्ला ‘वरदायिनी ऑटो’चे प्रमुख विक्रम कदम देतात. असे का...? तर ते समजून घेण्याआधी जाणून घेऊया विक्रम कदम यांचा नोकरी ते यशस्वी व्यावसायिकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास... ..

कविमनाचा डॉक्टर

एक संगीतप्रेमी, काव्यप्रेमी, समाजसेवक व एक यशस्वी डॉक्टर, ज्याने आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशकिरणांनी हजारोंच्या जीवनातील अंधकार दूर करत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अशा या काव्यप्रेमी साहित्यिक डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्यकर्तृत्वावर एक नजर.....

'सिंधुदुर्ग देशा’चा द्रष्टा छायाचित्रकार

‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या कोकणाचा साज तीनही ऋतूंमध्ये न्याराच दिसतो. आपल्या कॅमेर्‍यात कोकणचे हे निसर्गसौंदर्य कैद करणारा अवलिया छायाचित्रकार म्हणजे प्रल्हाद भाटकर... कोकणच्या विविध तालुका आणि खेडोपाड्यातील जवळपास दीड लाख छायाचित्रांचा संग्रह त्यांच्यापाशी आहे. तेव्हा, कोकणच्या सौंदर्यसृष्टीचे बारकावे टिपून जगासमोर मांडणार्‍या या सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रल्हाद भाटकर यांच्याविषयी.....

नवोदितांच्या मार्गदर्शक ‘माई’

गेली कित्येक वर्षं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये संजीवनी जाधव-खानविलकर यांनी अनेक संस्मरणीय कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर कधी हसतहसत त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवावरून संजीवनी जाधव यांनी नवीन पिढी घडवण्याचेदेखील काम केले. त्यांच्या ३० हून अधिक वर्षांच्या कलासंपन्न अनुभवाने अनेक तरुणांना कलाक्षेत्रात योग्य मार्ग दाखवला. अशा या नवोदितांच्या मार्गदर्शक ‘माईं’चा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख.....

‘प्रवास’ न्यायदेवतेकडून रंगदेवतेकडे...

महाविद्यालयात नाटकांची आवड जोपासताना प्रत्येकाला वाटतं की, आपण कलाकार व्हावं, लेखक व्हावं, काही जणांना तर अगदी नेपथ्यकार अथवा रंगभूषाकार व्हावं असंही वाटतं. पण, कोणीच ठरवून नाट्यनिर्माता मात्र होत नाही. अशा या नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राहुल भंडारे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता

बदलते हवामान, कोरडा आणि ओला दुष्काळ, तसेच घसरता बाजारभाव यांसारख्या आव्हानांनी पाचवीला पूजलेला व्यवसाय म्हणजे शेती. राज्यातील बहुतांश शेती व्यवसाय तोट्यात असल्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न काही प्रयोगशील शेतकरी करत आहेत. त्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचा वापर स्वतःच्या शेतात करून इतर शेतकर्‍यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारे प्रगतशील आणि उद्यमी शेतकरी म्हणजे सुभाष वसंत कराळे. कृषिक्षेत्राच्या विकासामध्ये मौल्यवान योगदान असलेल्या सुभाष कराळेंच्या कार्यप्रवासाचा ..

सामान्यांचा शिक्षक

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ या म्हणीनुसार आई संस्कारी असेल तर तिची मुलेही सुसंस्कारी असतात. राजश्री जोष्टे यांनी कठीण परिस्थितीतही दोन्ही मुलांना शिकवले, घडविले आणि सुसंस्कारांनी मढविलेदेखील. म्हणून त्यांचा मुलगा राजेश याने स्वकर्तृत्वाने दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरेल अशाच कामाचा वसा घेतला. ‘स्वतः जगा आणि दुसर्‍याला जगवा’ हा मंत्र त्यांनी आत्मसात केला. त्यामुळे दुसर्‍यांना जगण्याची दिशा मिळाली आहे. त्यांचे काम नक्कीच अनेकांना मार्गदर्शक आणि स्फूर्तिदायक ठरणारे आहे...

कलेच्या कलेने वाढणारी ‘पोर्णिमा’

“आयुष्य म्हणजेच एका आव्हान आहे. त्यात जय किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर तुम्ही ते आव्हान कसे पेलले आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हे अधिक महत्त्वाचे,” असे म्हणणारी आर्किटेक्ट पोर्णिमा बुद्धिवंत सध्या फॅशनच्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख... ..