‘कोरोना’वर मात करणारे ‘रोल मॉडेल’
प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत कठोर परिश्रम, जीवनमूल्ये आणि सत्य या तत्त्वावर चालत इतरांसाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरलेले भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोनाकाळात गरजूंना मदतीचा हात दिला. लहानपणापासून गरिबांचे चटके सहन केल्याने गरिबी काय असते, ते त्यांना चांगलेच ठावूक आहे. म्हणूनच गरिबांना मदतीचा हात देणारे गणपत गायकवाड यांनी ‘कोविड’काळात केलेल्या मदतकार्याचा आढावा...