कालजयी सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर : एक ऐतिहासिक पुनर्मूल्यांकन - अर्जुन राम मेघवाल

आधुनिकता, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, विज्ञाननिष्ठता आणि नव्या तंत्रज्ञानासंबंधी सावरकरांचे विचार कोरोना संकटानंतर नव्या भारताचे निर्माण करताना आजही प्रासंगिक ठरत आहेत...

सायंकाळी रानांत चुकलेलं कोकरूं...

एक व्यक्ती आयुष्यात काय काय करू शकते? तर विचारणार्‍याला तुम्ही सावरकरांचे तुम्हाला माहिती असलेले वर्णन करा. उत्तम लेखक, कवी, भाषांतरकार, क्रांतिकारक, भाषाशुद्धी, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक आणि अजून बरंच काही... ..

त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा

या उक्तीला सर्वार्थाने सार्थ करणार्‍या आणि आपल्या पतींनी (सावरकर बंधूंनी) चेतवलेल्या यज्ञकुंडात झोकून देऊन पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत आपल्या ध्येयापासून काकणभरही न ढळणार्‍या सावरकर कुटुंबातील तीन धीरोदात्त स्त्रिया, यशोदाबाई गणेश सावरकर (येसू वहिनी), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई). अशा या वीरांगनांची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला माहिती असणं, हे अज्ञात बलिदान प्रत्येक भारतीयाला ज्ञात होणं आवश्यक आहे आणि याच सार्थ भावनेने आपल्यासमोर हा इतिहास त्या तिघी... स्वातंत्र्यक..

देवनागरी लिपीचे पुरस्कर्ते- सावरकर आणि भगतसिंग

सावरकर आणि भगतसिंग या दोघांचेही भाषिक विचार बघितले की, हे लक्षात येते की, या दोन्ही महान विचारवंतांना परकीय भाषांविषयी आकस अथवा तिरस्कार नव्हता. स्वतंत्र भारताच्या संघटित, एकात्म, स्वतंत्र वाटचालीसाठी भाषा धोरण काय असावे, याबाबत दोघांमध्येही बर्‍यापैकी एकवाक्यता होती. --..

सावरकर आणि रासबिहारी बोस

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३८व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या शिक्षामाफी संबंधी निवेदनांवरून केल्या जाणार्‍या आरोपांचे खंडन करण्याचे योजिले आहे. पण, जरा वेगळ्या मार्गाने. जपान मार्गे सावरकर. ..

'१८५७ चे स्वातंत्र्यसमर' ग्रंथाचा रोमहर्षक प्रवास

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये प्रचंड संशोधन करून लिहिलेला ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सगळ्याच दृष्टीने ऐतिहासिक ठरला. ‘क्रांतिकारकांची गीता’ ठरलेल्या या ग्रंथावर प्रकाशनाआधीच बंदी आली होती. प्रकाशनाआधीच बंदी आणलेला बहुधा हा जगातील पहिलाच ग्रंथ असावा. या ग्रंथाने इतिहास निर्माण केला, तसेच त्याच्या मूळ हस्तलिखिताचा आणि प्रकाशनाचा इतिहासही रोमहर्षक आहे. ..

‘चले जाव ’? (भारत सोडा) चळवळीला सावरकरांचा विरोध का होता?

१९४२च्या ‘चले जाव’ चळवळीला स्वा. सावरकरांनी विरोध केला अथवा पाठिंबा दिला नाही, हा आरोप त्यांच्यावर केला जातो. सावरकरांनी या चळवळीला विरोध करण्याची कारणे समजावून घेण्यासाठी १९४२ची ‘चले जाव’ ही चळवळ नक्की काय होती? तिचे स्वरूप कसे व किती प्रभावी होते, ही पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे...

त्रावणकोर, नेपाळ संस्थान पाठिंबा विवाद

तात्यारावांच्या आयुष्यातील अशीच एक घटना ज्यावरून त्यांच्यावर आक्षेप नोंदवला जातो ती म्हणजे, त्रावणकोर आणि नेपाळ सारख्या संस्थानांना त्यांनी दिलेला पाठिंबा. पण, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच सावरकरांनी त्रावणकोर व नेपाळला पाठिंबा दिला हे स्पष्ट होते...

सावरकरांचा मानवतावाद

हिंदूंना झुकते माप देणारा दृष्टिकोन सावरकरांचा नव्हता आणि त्यामुळे पक्षपाती मानवतावादाचा आरोप उद्भवूच शकत नाही. त्या आरोपातला समजून घेण्याचा उरलेला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावरकरांचा मानवतावाद. त्यांच्या मानवतावादाला जातीची, धर्माची, राजकीय मतांची बंधने किंवा कुंपणे नव्हती...

स्वा. सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य

सावरकर जिथे गेले तिथे क्रांतिकार्य केले. तरुण जागृत केले. सावरकर नाशिकमध्ये होते, तिथेही क्रांतिकारी चळवळी चालू केल्या. इंग्लंडमध्ये गेले, तिथेही क्रांतिकार्य केले. अंदमानात शिक्षा भोगत असताना कैद्यांना जागृत करून क्रांतिकार्यात सहभागी केले. अंदमानातून रत्नागिरीत आले, तिथेही त्यांनी आपले क्रांतिकारी कार्य सुरूच ठेवले. क्रांतिकार्याचा व भारतमातेच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेऊन ती पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी ते जिथे असतील तिथे प्रयत्न केले आहेत. ..

सावरकरांच्या समाजसुधारणेमागील हेतू - मानवता

होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला - स्वातंत्र्यवीर सावरकर (ऐक भविष्याला) सावरकरांचे मानवतेच्या स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न होते. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. समाजसुधारक म्हणून ते अल्प परिचित आहेत...

सावरकर लोकशाहीवादी होते का?

१९४४ पासूनच वीर सावरकरांनी राज्यघटना कशी असावी, याविषयी अनेक भाषणांतून आपली मते मांडली होती. त्यांच्या सगळ्या भाषणांचा अभ्यास करता असेच आढळून येते की, वीर सावरकर हे लोकशाहीविरोधी अजिबात नव्हते. सर्वांना समान हक्काने वागणे या लोकशाहीच्या नियमाचे तर त्यांनी स्वतः आचरण केले होते. ..

सावरकर आणि नाझीवाद

‘वंशश्रेष्ठत्व’ याऐवजी सावरकरांनी जातिवादाला प्राधान्य दिले किंवा वर्णसंस्थेतील उच्च वर्णाचा वापर हिटलरच्या ‘मास्टर रेस’ या संकल्पनेप्रमाणे केला, असा आरोपही बर्‍याचदा ऐकला आहे. पण, सावरकर हे नेहमी जातिव्यवस्थेविरुद्ध उभे होते. सावरकरांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन करणे, सर्व जातींना हिंदू सणांच्या एकत्रित उत्सवासाठी प्रोत्साहित करणे आणि जाती-जातींतील भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. ..

स्वा. सावरकरांचे गाईविषयक विचार

सावरकरांच्या गाईवरील अनेक लेखांपैकी पहिल्या लेखाचे नावच होते ‘गाय एक उपयुक्त पशू आहे, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!’ या लेखातील मूळ अर्थ न समजता आणि महत्त्वाचे म्हणजे तो लेख पूर्ण न वाचता ‘सावरकर वीर, पण सैनिक नव्हे, हिंदुहृदयसम्राट तर नव्हेच नव्हे!’ असे प्रतिपादन केले जाते. अर्थात, सावरकरांच्या हयातीतसुद्धा अशी टीका होत होती आणि स्वतः सावरकरांनी त्याला उत्तर दिले आहे. ..

सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण

सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण या विषयावर दीर्घ चिंतन होणे आवश्यक आहे. उगाच कोणीही उठावं आणि कोणतीही माहिती जाणून न घेता सावरकरांबद्दल, त्यांच्या हिंदुत्वाबद्दल, अल्पसंख्याक धोरणाबद्दल बोलावं, इतका हा साधा सोपा विषय नाही. इंटरनेटवर माहिती शोधून, पुस्तकं वाचून सावरकरांबद्दल समजेल, पण ‘सावरकर’ समजतीलच असं नाही. सावरकर ही केवळ एक व्यक्ती नसून एक प्रगल्भ विचारसरणी आहे. धर्म, शास्त्र, दूरदृष्टी, देशभक्ती आणि निःपक्षपतीपणाच्या भरभक्कम आधारावर उभी असणारी ही विचारसरणी आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर ..

सावरकर निर्वाह भत्ता : वाद-प्रतिवाद

सावरकरांच्या निर्वाह भत्त्याविषयी माहिती घ्यायची असेल, तर त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यावर प्रकाश टाकावा लागेल. रत्नागिरीत वास्तव्याला असताना सावरकरांची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांनी ब्रिटिशांकडे निर्वाह भत्ता का मागितला, या प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे...

सावरकर, द्विराष्ट्रवाद आणि गैरसमज!

तत्कालीन हिंदू महासभेने (ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते) फाळणीला कडाडून विरोध केला आणि धर्माच्या आधारावर होणारी ही फाळणी हिंदुस्थानच्या हिताची नाही, हे ठणकावून सांगितले होते. त्याच काळात सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची (स्वतंत्र हिंदू आणि मुस्लीम राष्ट्र) भूमिका घेतली आणि तेच या भूमिकेचे प्रणेते आहेत अशा आशयाचे निराधार आरोप सावरकरांवर झाले. ..

सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ व सावरकर या नात्यातही काही काळ उणे अधिक प्रमाणात प्रसंग आले असतीलही. परंतु, या निवडक प्रसंगांमुळे थेट या पवित्र नात्यालाच दुय्यम किंवा अयोग्य ठरवण्याचा काही अंशी झालेला प्रयत्न साफ चुकीचा वाटतो. संघाला आजवर सावरकर कुटुंबाचा कधीही विसर पडलेला नाही आणि भविष्यात कधीही पडणार नाही हेही तितकंच खरं आहे. ..

हिंदू महासभा-मुस्लीम लीग युती

सावरकरांसारख्या देशभक्त अन् राष्ट्रहितैषी घटकांसाठी आग्रही असणार्‍या व्यक्तीवर फाळणीवादी, सत्तापिपासू असे निरर्थक अन् अश्लाघ्य आरोप केले जातात, तो आक्षेप म्हणजे, सावरकरांनी मुस्लीमबहुल भागात हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने मुस्लीम लीगसोबत संयुक्त मंत्रिमंडळे स्थापण्यास अनुमती दिली होती हा होय. तथापि, सावरकरांच्या राजकारणाची मूलतत्त्वे समजून घेतल्यास, या कृतीवरून होणार्‍या आरोपांतील फोलपणा सहज ध्यानात यावा!..

सावरकर नास्तिक आणि अध्यात्मविरोधी होते का?

वीर सावरकर नास्तिक, अध्यात्मविरोधी तर नव्हतेच, उलट ते मनाने, कार्याने उच्चप्रतीचे अध्यात्मवादी होते. प्रथम आपण अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्मवादी कोण? याची संक्षिप्त चर्चा करून हे विशेषण सावरकरांना किती प्रमाणात लागू पडतं, याचं परीक्षण करू. ..

सावरकर आणि गांधी

आजच नव्हे तर ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हयात असतानाही ‘सावरकर-गांधी’ नांवं उच्चारताच भुवया उंचावून आणि मग आपसूक ’लेबल’ जोडले जात. या दोघांविषयी पूर्वग्रह मनात ठेवल्याने एक साचेबंदपणा त्यांच्या विचारांना चिकटला. तथापि सापेक्ष बुद्धीने तौलनिक अभ्यास करण्याची वृत्ती आवश्यक आहे...

सावरकर, गांधीहत्या आणि कपूर आयोग - आक्षेप आणि वास्तव

गांधीहत्येच्या प्रकरणात सावरकरांवर फक्त संशयित आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि नंतर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हीच खरी वस्तुस्थिती असल्याची जाणीव या संदर्भातील अनेक पुस्तकांचा आणि साहित्याचा विचारपूर्वक अभ्यास केल्यानंतर सातत्याने होत राहते...

सावरकरांचे हिंदुत्व आणि वाद-प्रतिवाद

संघर्षाच्या इतिहासाबद्दल सर्वांना सारखीच भावना आहे. त्यामुळे एक राष्ट्र, एक जाती (जन्मजात ‘जात’ या अर्थाने नव्हे) आणि समान संस्कृती या तिन्ही लक्षणांनी युक्त ते ‘हिंदुत्व’ असे सावरकरांनी मानले...

सावरकरांची माफीपत्रे

अंदमानातून इंग्रजांना माफीची पत्रे पाठवून आणि त्यांच्या सर्व अटी मान्य करून सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली. या गोष्टीचं भांडवल करून त्यामागची सत्य परिस्थिती काय होती, हे जाणून न घेता काही लोक सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवतात. असे लोक ‘सावरकरांची माफीपत्रे’ पुरावा म्हणून दाखवतात. ज्या लोकांना या पत्रांमागील सत्य काय आहे, हे ठाऊक नसतं ते या लोकांची शिकार होतात...

द्रष्टे सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे द्रष्टे महापुरुष. असामान्य व्यक्ती काळाच्या दोन पावलं पुढे असतात; पण सावरकरांसारखे महापुरुष काळाच्या शंभर पावलं पुढे असतात. सावरकरांनी वर्तवलेले भविष्य काही दशकांनी सत्यात उतरल्यावर सामान्य व्यक्तीला त्याची प्रचिती येते. इतिहास आणि वर्तमानाचे तटस्थ, चिकित्सक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून केलेले अध्ययन, सूक्ष्म आकलनशक्ती नि त्याचे वास्तववादी भूमिकेतून केलेले विश्लेषण, यामुळे सावरकर, ‘द्रष्टे’ ठरतात. ..