"रडून काही होणार नाही, मॅडम उत्तरं द्यावीच लागतील"
नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची सहा तास चौकशी केली. मात्र, तिच्या चौकशीवेळी ती एकदा दोनदा नव्हे तर तीनदा रडू कोसळले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यानी दीपिकाला 'इमोशनल कार्ड' वापरू नको, उत्तरे द्यावीच लागतील, असा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दीपिकाच्या डोळ्यात अश्रू पाहून अधिकाऱ्यांनी तिच्यासमोर हात जोडले. आमच्यासमोर डोळे ओले करण्यापेक्षा खरं काय ते सांगा, तेच तुमच्यासाठी चांगले आहे, असा इशारा दिला आहे...