राहुल गांधींमध्ये हिम्मत असेल तर आधी प्रियंका गांधींना काँग्रेस अध्यक्ष करा; नवनाथ बनांचा घणाघात

    23-Aug-2026
BJP Spokesperson Navnath Ban V/S Rahul Gandhi
 
मुंबई : (BJP Spokesperson Navnath Ban V/S Rahul Gandhi) “संसदेत महिलांच्या आरक्षण कायद्यास विरोध करण्याच काम राहुल गांधी आणि काँग्रेसन केल आणि तेच राहुल गांधी पुण्यातल्या पैसो की गुंज कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारत आहेत. पुण्यातील कार्यक्रम पेड होता हे राज्याने बघीतल आहे.राहुल गांधींच्यात हिम्मत असेल तर आधी प्रियांका गांधी यांना काँग्रेसच अध्यक्ष कराव.राहुल गांधी हे प्रियांका गांधींना बोलू देत नाहीत.२०१३ नंतर त्यांनी एकही महिला मुख्यमंत्री केली नाही.” असा घणाघात भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.२३ रोजी केला.
 
“आंगणवाडी पोषणआहार घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.दोषींवर कारवाई करण्यात येईल. पण कोवीड काळात कामगारांना वाटल्या जाणा-या खिचडीत घोटाळा करणारे आणि पैसे खाणारे संजय राऊत आहेत.पत्राचाळ घोटाळ्यात तर त्यांना १०० दिवस जेलमध्ये बसावे लागले.त्यामुळे घोटाळ्याच्या गप्पा संजय राऊत यांनी करु नयेत.मुंबईत परप्रांतीय कंत्राटदारांना कशापध्दतीने राऊत यांनी कंत्राट दिली होती याचा इतिहास संदीप देशपांडे यांनी वाचला होता.यासर्व घोटाळ्यांचा हिशेब उध्दव ठाकरे,संजय राऊत आणि उबाठा गटाने दिला पाहिजे.”असेही बन म्हणाले.
 
“जनाब राऊत हातभर कुणाची फाटली ते विधानसभेला आणि महापालिकेला संपूर्ण राज्याने बघीतले आहे. उबाठाचे खासदार,आमदार व नगरसेवक सोडून गेले त्यामुळे अख्या पक्षाचा गो.गो.झाला आहे.त्याच आत्मचिंतन करावे.राहुल गांधींना पंतप्रधान करण्याच्या नादात आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरेंच करीअर उध्वस्त करण्याच काम जनाब संजय राऊत करत आहेत.”असा आरोप बन यांनी राऊतांवर केला.
 
“सप्टेंबर २०२५ मध्ये वरळी डोममध्ये जेन झी सोबत सर्वात आधी देवाभाऊंनी संवाद साधला होता.तेंव्हा ना अभिजीत दिपकेंनी आंदोलन केल होत ना दिपकेस तुम्ही विष्णूचा अवतार म्हणून संबोधल होत.आज उबाठाच अस्तित्व संपल्यावर अभिजीत दिपकेच्या जिवावर तुम्हाला राजकीय पुर्नजीवन कराव लागत आहे याची चिंता करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालही जेन-झी सोबत होते,आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत.जामनेरच्या पॅटर्नच नाव घेण्याआधी मुंबई महापालिकेत २५ वर्ष भ्रष्टाचाराचा मातोश्री पॅटर्न टू कुणी राबवला होता तो राऊतांनी एकदा महाराष्ट्राला सांगितला पाहिजे.उबाठा गट ज्यांनी संपवून टाकला तो संपत राऊत कोण आहे हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे.”असेही बन म्हणाले.
 
“कुंभमेळा हा हिंदूंचा मेळा आहे.लाखो हिंदू येणार म्हणुन राऊत यांच्या पोटात दुखत आहे.हाच जर मुल्ला मौलवींचा मेळावा असता तर राऊतांनी पायघड्या घातल्या असत्या.हिंदूंच्या मेळाव्यास विरोध करण्याच पाप राऊत करत आहेत.पण साधुसंतांचे आशीर्वाद राज्याच्या पाठीशी आहेत आणि राज्यातील जनता कुंभमेळ्याच्या सोबत आहे त्यामुळे कुंभमेळा मोठ्या उत्साहात होणार.”असे बन यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 




संबंधित मजकूर