पिंपरीतील मोशीमध्ये रात्रभर बचावकार्य सुरू..., १४ कामगार सुखरूप बाहेर, बचाव मोहीम अद्याप सुरूच

 
Moshi Building Collapse
 
पिंपरी: (Moshi Building Collapse) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात बुधवारी ८ जुलै रोजी दुपारी भीषण दुर्घटना घडली. 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱ्याचा डोंगर अचानक कोसळल्याने दुमजली इमारत क्षणार्धात मलब्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Moshi Building Collapse)
 
प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये एकूण २३ कर्मचारी उपस्थित होते. त्यापैकी पाच कर्मचारी स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर बचाव पथकांनी एका महिलेसह आणखी सहा जणांना सुखरूप बाहेर काढले. काही कर्मचारी मलब्याखाली अडकल्याने त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. (Moshi Building Collapse)
 
एनडीआरएफचे रात्रभर बचाव अभियान
 
दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) ५व्या बटालियनने घटनास्थळी धाव घेतली. 'कोलॅप्स्ड स्ट्रक्चर सर्च अँड रेस्क्यू' (CSSR) मोहिमेअंतर्गत प्रशिक्षित जवानांनी अत्याधुनिक शोध उपकरणे आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू केला. (Moshi Building Collapse)
 
एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६.३० वाजेपर्यंत नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप आठ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. (Moshi Building Collapse)
 
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बचावकार्य अधिक वेगाने सुरू ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन आणि इतर आपत्कालीन यंत्रणा एकत्रितपणे समन्वय साधून कार्यरत आहेत. विशेष शोध यंत्रणा, थर्मल स्कॅनिंग उपकरणे आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Moshi Building Collapse)
 
दरम्यान, सततच्या पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड साठा अस्थिर झाला आणि अचानक तो प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी केली जाणार असून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. (Moshi Building Collapse)
 
घटनास्थळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महापालिका पदाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित असून बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या बचाव मोहिमेकडे लागले आहे. (Moshi Building Collapse)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर