धक्कादायक! प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिम पार्लरचा परवाना रद्द; कारण ऐकून बसेल धक्का...

 
Rustom Ice Cream License Cancelled
 
मुंबई: (Rustom Ice Cream License Cancelled) राज्यात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू ठेवली असून, मुंबईतील चर्चगेट परिसरातील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिम पार्लरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान गंभीर स्वच्छतेच्या त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने पार्लरचा परवाना रद्द करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पार्लरची अचानक तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासणीदरम्यान पार्लरमध्ये जिवंत उंदीर, माशा आणि अस्वच्छ वातावरण आढळले. तसेच अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
मुदतबाह्य पदार्थांचा वापर?
 
तपासणीदरम्यान मुदत संपलेले पिस्ता, स्वीट ऑरेंज, चेरी, बदाम, अमेरिकन आईस्क्रिम सोडा आणि मिक्स फ्रुट यांसारखे पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. हे पदार्थ आईस्क्रिम तयार करण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी ते तात्काळ नष्ट केले. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
एफडीएने आईस्क्रिमचे विविध नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचा अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणीत संबंधित उत्पादनातील मिल्क फॅटचे प्रमाण केवळ ७.९४ टक्के आढळले होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमानुसार आईस्क्रिममध्ये किमान १० टक्के मिल्क फॅट असणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी आढळल्यामुळेही पार्लरवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत कारवाई...
 
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सहआयुक्त पी. आर. सिंगारवाड आणि सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी तेजस्विनी पाटील आणि अशोक चव्हाण यांच्या पथकाने ही तपासणी केली. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
दरम्यान, एफडीएने राज्यभरात अशाच प्रकारच्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत. नागपूरमधील 'श्री हिरा स्वीट्स' येथे मेलेल्या उंदराच्या शेजारीच मिठाई तयार केली जात असल्याचे आढळल्यानंतर त्या आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला. तसेच धुळे येथील हॉटेल पाटीलवाडा हे आवश्यक परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळल्याने त्या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
राज्यात सुरक्षित आणि दर्जेदार अन्न नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अशा तपासण्या आणि कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. (Rustom Ice Cream License Cancelled)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर