राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारा आणणारी आहे. अवघ्या १२ वर्षांच्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिला सलग चार दिवस ओलीस ठेवण्यात आलं, तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, तिला अमली पदार्थ आणि दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले, अशा क्रूरतेची सीमा ओलांडणाऱ्या या प्रकरणाने संपूर्ण देश हादरलाय. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
१८ नराधमांना अटक, अनधिकृत हॉटेल्सवर चाललेला बुलडोझर आणि संपूर्ण शहरात उसळलेला संताप... नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पोलिसांच्या अधिकृत तपासात कोणते धक्कादायक खुलासे झाले आहेत? सविस्तर जाणून घेऊयात... (Rajasthan Child Sexual Abuse Case)
हे प्रकरण आहे राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातल. एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका मुलाशी ओळख झाली होती. १८ जून रोजी ती मुलगी त्या मित्राला भेटण्यासाठी श्रीगंगानगरपासून तब्बल १०० किलोमीटर दूर असलेल्या विजयनगरला पोहोचली. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
मित्राला भेटल्यानंतर, ती रात्रीच बसने पुन्हा श्रीगंगानगर बस स्टँडवर परतली. तिथून तिने घरी जाण्यासाठी एक ई-रिक्षा पकडली. पण तिला घरी पोहोचवण्याऐवजी रिक्षाचालक रामबाबू याने तिचं अपहरण केलं आणि पैशांच्या हव्यासापोटी तिचा सौदा करून, तिला स्थानिक हॉटेलमधील दलालांच्या हवाली केलं. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
ही सुरुवातच त्या चिमुकलीसाठी नरकवासाची होती. १८ जूनच्या रात्रीपासून २२ जूनच्या दुपारपर्यंत तिला वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं. या काळात तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तिला सतत दारू आणि अंमली पदार्थ पाजले जात होते, जेणेकरून ती वेदनेने ओरडू नये, भानावर राहू नये आणि प्रतिकार करू नये. तिच्या निष्पापपणाचा, वयाचा आणि असहाय्यतेचा अत्यंत निर्घृण फायदा घेतला गेला. एका हॉटेल मॅनेजरने तिचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर आणखी काही नराधम त्या ठिकाणी येऊन अत्याचारात सहभागी झाल्याचाही गंभीर संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
पीडितेला केवळ लैंगिक अत्याचार सहन करायला लावण्यात आलं नाही, तर तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न करण्यात आला, या संपूर्ण प्रकरणातून मानवी तस्करी, बाललैंगिक अत्याचार, अपहरण आणि संगठित गुन्हेगारीचा भीषण चेहरा समोर येतो. त्यामुळे आता या प्रकरणाकडे केवळ एक अपहरण किंवा अत्याचार म्हणून न पाहता, एका संगठित आणि क्रूर गुन्हेगारी साखळीचा भाग म्हणून पाहिलं जाताय. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईने नातेवाईकांकडे शोध सुरू केला. अखेर २२ जून रोजी आई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचली. मात्र, आई तिथे पोहोचण्यापूर्वीच पोलिसांना गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे या गंभीर गुन्ह्याचा सुगावा लागला होता. श्रीगंगानगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मोबाईल लोकेशन, संशयास्पद ठिकाणे, आणि हॉटेल परिसरातील हालचालींच्या आधारे छापे टाकले. अखेर २२ जूनच्या दुपारी त्या चिमुकलीची हॉटेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली. तिच्या सुटकेनंतर पोलिसांनी हे प्रकरण महिला पोलिस ठाण्याकडे वर्ग केलं असून, पॉक्सो, बाल न्याय कायदा, मानवी तस्करी, अपहरण आणि अत्याचाराच्या विविध गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
श्रीगंगानगरचे पोलीस अधीक्षक हरिशंकर आणि अतिरिक्त एसपी कैलाश दान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात १८ आरोपींना अटक करण्यात आलेय. यात मुख्य आरोपी रिक्षाचालक रामबाबू, हॉटेल मालक मयंक सेन आणि हॉटेल मॅनेजरचा समावेश आहे. ज्या इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी ती विजयनगरला गेली होती, त्यालाही पोलिसांनी संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं आहे. चौकशीसाठी आणखी काही जणांवरही संशय व्यक्त होत असून, हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
या घटनेनंतर श्रीगंगानगरमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. लोकांचा रोष एवढा वाढला की जिल्हा प्रशासनालाही कठोर पावलं उचलावी लागली. ज्या हॉटेल्समध्ये मुलीला ओलीस ठेवून अत्याचार करण्यात आला, ती हॉटेल्स प्रशासनाने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली. हॉटेल खुंगर जॉईन, हॉटेल सफायर आणि इतर संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
पीडित मुलगी सध्या तिच्या आई-वडिलांसोबत घरी सुरक्षित आहे, मात्र या भयानक घटनेचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला आहे. दिल्ली एम्समधील मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, अशा अत्याचारातून गेलेल्या अल्पवयीन मुलांना PTSD म्हणजेच तीव्र मानसिक धक्का बसू शकतो. अशा मुलांना वारंवार त्या घटनेच्या आठवणी त्रास देतात, त्यांना झोपेत दचकून जाग येते, अनोळखी लोकांची भीती वाटते, समाजावरचा विश्वास कमी होतो आणि ते स्वतःमध्येच बंद होऊन जातात. त्यामुळे अशा मुलांसाठी दीर्घकालीन समुपदेशन, थेरपी आणि आवश्यक औषधोपचार अत्यंत गरजेचे असतात. (Rajasthan Child Sexual Abuse Case)
हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. कारण ही केवळ एका मुलीवर झालेली अत्याचाराची घटना नाही, तर समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेला, कायद्याच्या अंमलबजावणीला आणि माणुसकीच्या मूलभूत मूल्यांना हादरवणारी घटना आहे. अशा गुन्ह्यांना केवळ शिक्षा नव्हे, तर समाजाला इशारा देणारा निकाल हवा, अशीच आज सर्वांची अपेक्षा आहे. (Rajasthan Child Sexual Abuse Case)