"मुंबईत आता महानगरपालिकेचे ‘इव्हनिंग फिव्हर क्लिनिक सुरू"

    09-Jul-2026   
 
 
BMC Evening Fever Clinics
 
मुंबई (BMC Evening Fever Clinics) : दिवसभर काम करणार्‍या नागरिकांना कार्यालयीन वेळेनंतरही उपचार घेता यावेत, या उद्देशाने मुंबईत आता महानगरपालिकेने ‘इव्हनिंग फिव्हर क्लिनिक सुरू केले आहे. पालिका प्रशासनाने नायर, केईएम, सायन आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही विशेष सेवा सुरू केली आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या, जुलाब तसेच डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि चिकुनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर इथे तातडीने उपचार केले जाणार आहेत. सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना तापासह इतर संसर्गजन्य आजारांवरील तपासणी, रक्त चाचण्या आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर आवश्यक रक्त तपासण्यांचे अहवाल अवघ्या दोन तासांत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(BMC Evening Fever Clinics)
 
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया आदी साथीच्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘इव्हनिंग फिव्हर क्लिनिक’ सुरू केले आहे. (BMC Evening Fever Clinics)
 
महानगरपालिकेच्या या आरोग्य सुविधेचा वस्तीपातळीवरील कष्टकरी जनतेला मोठा उपयोग होणार आहे. कारण पालिका प्रशासनाच्या ताब्यातील इस्पितळांमध्ये ओपिडी ही सकाळी सुरू असते. दुपारनंतर ती बंद होते. ‘इव्हनिंग फिव्हर क्लिनिकमुळे सकाळी कामाला गेलेला कर्मचारी काम करून आल्यानंतर पालिकेच्या इस्पितळात उपचार घेऊ शकतो. -मानसी पराडकर, सामाजिक कार्यकता (BMC Evening Fever Clinics)
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर