मुंबई (Anupam Kher Ram Temple Donation Theft) : चोर सर्वत्र असू शकतात; त्यामुळे मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा कमी होत नाही. तुमच्या घरात चोरी झाली तर दोष घराचा नसतो, तर चोरी करणाऱ्या व्यक्तीचा असतो. हीच गोष्ट संपूर्ण हिंदू समाजाने आणि नागरिकांनी समजून घेतली पाहिजे, अशी स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिली आहे. अयोध्या दौऱ्यावर असताना राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. (Anupam Kher Ram Temple Donation Theft)
अनुपम खेर हे त्यांच्या आगामी 'श्रीरामभूमी' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अयोध्येत आले आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी रामलल्लाचे आशीर्वाद घेतले. हा चित्रपट राम मंदिराच्या उभारणीचा प्रदीर्घ प्रवास, त्यामागील संघर्ष आणि मंदिर उभारणीदरम्यान आलेल्या कठीण परिस्थितींवर आधारित आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी झालेले प्रयत्न, आव्हाने आणि इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार असल्याचे खेर यांनी सांगितले. (Anupam Kher Ram Temple Donation Theft)
Ayodhya, Uttar Pradesh: On Ram Mandir donation theft case, Actor Anupam Kher says, "Thieves can be found everywhere; that does not diminish the dignity or sanctity of a temple. A temple whose establishment took 500 years cannot have its honour affected by the actions of a few… pic.twitter.com/1FqQvsISSk
अनुपम खेर यांनी बुधवारी अयोध्येतील रामलल्ला आणि हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकार अत्यंत चुकीचा असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, काही व्यक्तींच्या चुकीच्या कृत्यांमुळे कोट्यवधी भाविकांची श्रद्धा किंवा मंदिराचे पावित्र्य कमी होऊ शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (Anupam Kher Ram Temple Donation Theft)
चोरीचा संबंध धर्म किंवा समुदायाशी न जोडण्याबाबत आवाहन करत अनुपम खेर म्हणाले की, चोरी किंवा एखाद्या व्यक्तीने केलेला गुन्हा संपूर्ण धर्म, समाज किंवा मंदिराशी जोडून पाहणे योग्य नाही. अशा घटनांकडे संबंधित व्यक्तीचे वैयक्तिक कृत्य म्हणूनच पाहिले पाहिजे. भगवान श्रीराम आणि सनातन परंपरेचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे एखाद्या एका घटनेमुळे लोकांची श्रद्धा डळमळीत होता कामा नये. भाविकांनी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मंदिरात देणगी दिली आहे. ही देणगी कोणत्याही मोबदल्यासाठी किंवा देवाने तिचे रक्षण करावे या अपेक्षेने दिलेली नसते; ती केवळ ईश्वराप्रती असलेल्या भावनेतून अर्पण केलेली असते. (Anupam Kher Ram Temple Donation Theft)
अनुपम खेर यांनी पुढे नमूद केले की, ज्या राम मंदिराच्या उभारणीसाठी ५०० वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला आणि असंख्य लोकांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, त्याचा सन्मान काही व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळे कमी होणार नाही. (Anupam Kher Ram Temple Donation Theft)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक