मनी पांडुरंगाची आस वारी आहे खास

    08-Jul-2026
 
Pandharpur Wari 2026
 
मुंबई (Pandharpur Wari 2026) : इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे यावेळी आळंदी येथे बरेच वारकरी जाऊ शकले नाहीत. पण आळंदी जवळील गावात तसेच श्रीक्षेत्र देहू येते वारकऱ्यांची मोजकीच संख्या असली तरी उत्साह मात्र मोठा पाहायला मिळाला.
 
श्री क्षेत्र देहू आणि आळंदी येथे येणाऱ्या वेगवेगळ्या दिंड्यांची सुरक्षित कारणे काळजी घेण्यासाठी काही चोपदार असतात. श्री क्षेत्र देहू येथे दिंडीसोबत आलेले एक चोपदार मंगळवार दि.७ जुलै रोजी म्हणाले की," माझे काम दिंडीत असणाऱ्या सर्व वारकऱ्यांची काळजी घेणे हे आहे.यात लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष काळजी घ्यावी लागते.एखादी व्यक्ती जरी चुकली किंवा काही त्रास झाला तर आम्हाला त्याची रुखरुख लागते म्हणून संपूर्ण दिंडीतील व्यक्तींची कुटुंबाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. श्री स्वामी समर्थ यांच्या दिंडीचे काम देखील मी बघत असतो." (Pandharpur Wari 2026)
 
कर्नाटक मधून आलेले ७५ वयाचे एक वारकरी म्हणाले," गेली १५ वर्ष न चुकता आम्ही ही वारी करतो.यावेळी २५० लोक आलो आहोत.पूर्ण एक महिना सर्व कामे बाजूला ठेवून वारीत सहभागी होतो. वारीत मिळणारे सुख अवर्णनीय आहे." (Pandharpur Wari 2026)
 
डोक्याला टिळा लावण्याचे काम करणारा एक वारकरी म्हणाला की,"गेली चार वर्षे मी या वारीमध्ये वारकऱ्यांच्या डोक्याला गंध ,टिळा लावण्याचे काम करीत आहे. स्वेच्छेने मी हे काम करीत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारात नाही." (Pandharpur Wari 2026)
 
हातात वीणा घेतलेले ७८ वर्षाचे एक ज्येष्ठ वारकरी म्हणाले ,"काम क्रोध मोह,मत्सर या चार चोरांपासून अंतर्मनाने सावध राहिले पाहिजे हीच वारीतून शिकवण मिळत असते. वारीतून गेल्यानंतर पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाने जे स्वर्ग सुख मिळते त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. येथून गेल्यावर गावी सप्ताहमध्ये सहभागी होत असतो. (Pandharpur Wari 2026)
 




संबंधित मजकूर