मुंबई : (Monsoon Inspection) मागील 4 ते 5 दिवस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठया प्रमाणावर पर्जन्यृष्टी झाली असून ताशी 60 ते 70 कि.मी. वादळी वाऱ्यामुळे मोठया प्रमाणात झाडांची पडझड झाली. महानगरपालिकेची मदत यंत्रणा या काळात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अथक कार्यरत होती. आयुक्त सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास व विभागीय कक्षास प्राप्त् होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोहचून निराकरणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
आज महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा दिघा ते बेलापूर असा पाहणी दौरा करत क्षेत्रीय स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व पाणी साचलेल्या ठिकाणांवरील कारणे जाणून घेत उपाययोजनांच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. (Monsoon Inspection)
त्यामध्ये महापे शिळफाटा मार्गावर एल ॲन्ड टी जवळील उड्डाणपुलाखालील रस्त्याखालून दक्षिणोत्तर जाणारी नाली पूर्ण बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचले होते. यावर तांत्रिक उपाययोजना करीत त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल ड्रिलिंग मशिन या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा उपयोग करुन नाली सफाईचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करीत सध्या पावसाने काहीशी उघडीप दिली असल्याने हे काम जलद गतीने हे काम पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. (Monsoon Inspection)
त्याचप्रमाणे एमआयडीसीने रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या ड्रेनेज लाईनवर आणखी एक विटांचे बांधकाम केले त्यामुळे ड्रेनेज लाईन खालच्या पातळीवर आल्या व पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे आणि त्या ठिकाणी पाणी साचत आहे. ही बाब लक्षात घेऊन ड्रेनेजच्या वर केलेले बांधकाम तोडून सदर ड्रेनेज लाईन खुल्या करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले व या कामास त्वरित सुरुवातही करण्यात आली. (Monsoon Inspection)
अशाच प्रकारे ऐरोली येथे टी जंक्शन हा भाग अतिसखल असल्याने या भागात साचणारे पाणी निचरा होण्यासाठी त्या ठिकाणी पंपांची व्यवस्था वाढविण्याचे तसेच ड्रेन होलची संख्या व आकारमान वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. (Monsoon Inspection)
यासोबतच कुठेही मॅनहोलवर झाकणे असतील याची संपूर्ण खातरजमा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले व यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
एमआयडीसी क्षेत्रासह ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व अंतर्गत मुख्यमार्ग अशा सर्वच क्षेत्राची पाहणी करताना 60 ते 70 कि.मी. प्रती तास वादळी वाऱ्यामुळे मोठया प्रमाणात झाडे पडली असल्याचे लक्षात घेऊन या झाडाच्या फांदयांची कटाई करुन ती हलविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. हे काम मनुष्यबळ वाढवून अधिक जलदगतीने करावे असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. त्याचसोबत पडण्यासारखी वाकलेली झाडेही नेण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.
पावसाची काहीशी उघडीप मिळाल्याने काही प्रमाणात रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन दुरुस्तीचे कामही जलद गतीने करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गवळीदेव सारख्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्याकरिता त्याठिकाणी उंच बॅरिकेटींग लावावेत व पावसाळी कालावधीत प्रवेश प्रतिबंधाचे फलक लावावेत असेही निर्देशित करण्यात आले.
सेक्टर 9 कोपरखैरणे येथील रस्त्याच्या बाजूच्या वॉटर एन्ट्रीज मोठया करण्याच्या तसेच ग्रीनवर्ल्ड दिघा समोरील चौकात कॉर्नरची रस्ते सुधारणा करावी असेही निर्देश देण्यात आले. वाशीगाव मागील बाजूच्या नविन अंडरपासच्या ठिकाणी जादा पंपांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उरण फाटा, से-8 सीबीडी बेलापूर दूर्गामाता नगर, आरबीआय कॉलनी जवळील मेट्रो स्टेशन, एमपीएससी कार्यालयाजवळील परिसर, अपोलो हॉस्पिटल समोरील चौक तसेच से.12 येथील पंपिंग हाऊस याचीही पाहणी आयुक्तांनी केली. (Monsoon Inspection)
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात माती वाहून आली असून रस्त्याच्या कडेला असलेली तत्परतेने माती उचलून नेण्यात यावी असेही निर्देश देताना आयुक्तांनी स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष दयावे असे सूचित केले. (Monsoon Inspection)
जुईनगर-सानपाडा अंडरपास सबवे खाली अतिसखल भाग असल्यामुळे साचणारे पाणी बाहेर फेकण्यासाठी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवावी असे निर्देश आयुक्तांनी दिले व त्या ठिकाणी येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याला चर खणण्याच्या कामाचीही पाहणी केली. अशाच प्रकारे सायन पनवेल महामार्गावर एलपी जंक्शनजवळ साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी असलेल्या ड्रेन होलचा आकार वाढवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अजय गडदे, आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त श्रीम.स्मिता काळे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.नैनेश बदले तसेच त्या-त्या ठिकाणी संबंधित विभागाचे सहा.आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. (Monsoon Inspection)
मागील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस व वादळी वारे असताना मोठया प्रमाणावर झाडे पडण्याचे प्रमाण वाढले. या कालावधीत फिल्डवर असलेल्या महापालिका यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य केले. त्याबद्दल आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांनी हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता असताना नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व पावसाळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन झाडाखाली उभे राहू नये व आपली वाहने झाडाखाली उभी करु नयेत असे आवाहन केले आहे. (Monsoon Inspection)